आधीच्या पोष्टस् मध्ये,आपण खास कृष्णमुर्ती पद्धती वरचे ग्रंथ बघितले पण ह्या सर्वच ग्रंथाचा मुख्य भर कृष्णमुर्ती पद्धती वर असल्याने ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत त्रोटक पद्धतीने सांगितल्या आहेत, ह्या मुळेच की काय कृष्णमुर्ती पद्धती साठी याची आवश्यकता नाही असा एक मोठा गैरसमज अभ्यासकांत निर्माण झाला आहे किंवा तो तसा करून देण्यात आला असावा.
पण माझ्या मते कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भककम असल्या पाहिजेत, तो या शास्त्राचा पाया आहे. त्याला वगळून काहीही हाताला लागणार नाही, इथे शॉर्टकटस नाहीत.
मी सादर करत असलेल्या यादीत काही अत्यावश्यक ग्रंथांचा समावेश आहे, पण असे अनेक ग्रंथ आहेत की जे या यादीत मानाचे स्थान मिळवू शकतात, तूर्तास माझ्या वैयक्तिक संग्रहांतल्या ग्रंथापुरतीच ही यादी मर्यादित ठेवत आहे.
या यादीत काही पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ बघून दचकू नका, पण जे चांगले आहे ते अभ्यासलेच पाहिजे, पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ खूप व्यासंगातून निर्माण झाले आहेत त्यामागे लेखकाची स्वत:ची तपश्चर्या आहे , निव्वळ पोपटपंची नाही की एखाद्या संस्कृत ग्रंथा चे भ्रष्ट भाषांतर नाही.
सर्व प्रथम आपण ग्रहयोग या विषयांवरचे काही उत्तम ग्रंथ पाहू.
कृष्णमुर्ती पद्धतीत ग्रहयोगांचा विचार (दुर्दैवाने) अगदीच कमी केला जातो, पण माझ्या मते ग्रहयोगांवरच भविष्य कथनाचा डोलारा अवलंबून असतो.
त्यामुळे ग्रहयोगांचा परिपूर्ण अभ्यास होणे एव्हढेच नव्हे त्यावर एक प्रकारची मास्टरी मिळणे अत्यावश्यक आहे.
ग्रहयोगांवरचे एकच पुस्तक उचलायला सांगितले तर मी डोळे झाकून कोझी ( कॉम्बीनेशन्स ऑफ स्टेलार इनफलुएन्सेस ) हा ग्रंथ उचलेन. ह्या ग्रंथाची मी एव्ह्ढी पारायणे केली आहेत, इतके की माझी पहिली प्रत खिळखिळी झाल्याने मला दुसरी प्रत विकत घ्यावी लागली. हा ग्रंथ संपूर्ण जगभरात अत्यंत नावाजलेला आहे, कोणताही ज्योतिषी या ग्रंथाच्या प्रती शिवाय अपूर्ण आहे. पूर्णविराम.
ग्रहयोगावरील ग्रंथांत आणखी एक तोलमोलाचा ग्रंथ आहे तो श्री वसंतराव भटांचा, या ग्रंथा वर सी इ ओ कार्टर यांच्या ग्रंथाचा प्रभाव आहे हे जाणवते. मात्र हे मानलेच पाहिजे की कार्टर साहेबांनी मांडलेल्या संकल्पना वसंतरावांनी अत्यंत कल्पकतेने उत्तमरीत्या विस्तारल्या आहेत, त्याचे सुंदर भारतीय करण केले आहे, कार्टर साहेबाच्या ग्रंथात नसलेले राशी, भाव यांचे संबंध समर्पक रित्या मांडले आहेत. वसंतरवांनी हा ग्रंथ लिहून तमाम ज्योतिषवर्गा वर अनंत उपकार केले आहेत. ह्या ग्रंथाचे ईंग्रजीत भाषंतर व्हायला हवे.
अचूक व चपखल असे वर्णन ज्याला सर्वार्थाने लागू पडेल असा जर कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे जेम्स ब्राहांचा आहे. ग्रंथाचे नाव जरासे फसवे वाटले तरी ते तसे का दिले असावे याचा विचार करता लक्षात येते की ग्रहयोगांचा अभ्यास पूर्ण झाल्या शिवाय कोणीही चांगला ज्योतिषी बनू शकणार नाही. जेम्स ब्राहा स्वतः: भारतात बरीच वर्षे राहून , भारतीय गुरुंकडून ज्योतिष शिकलेले आहेत, पाश्चात्त्यांची तर्कशुद्ध विचार सरणी, विषय मुळातून ग्रहण करण्याचा ध्यास, अभ्यासाची व विवेचनाची एक शिस्त , व्यासंग, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटी वर घासूनच घ्यायची वृत्ती याचा एक सुंदर मिलाप तुम्हाला या ग्रंथात दिसेल. त्यांचे ग्रहयोगाचे विवेचन म्हणूनच अत्यंत चपखल आहे.
सु टोम्पकीन यांचा ग्रंथ ग्रहयोगांचा मानसिक जडण घडणी वर काय परिणाम होतो यांचे सुंदर विश्लेषण करतो. लेखिकेने प्रत्येक ग्रहयोगावर पान पान भर लिहिले आहे , पण माहिती अत्यंत परिपूर्ण आहे, संपूर्णतः: मानसशास्त्रीय अंगाने लिहलेली माहिती ज्योतिषशास्त्र व मानसशास्त्र यांचा किती जवळचा संबंध आहे ते दाखवून देते.
ओ पी वर्मांचा छोटेखानी ग्रंथ चांगली माहिती देतो, फक्त लेखकाने इबर्टीन यांच्या कोझी मधून जी शब्दशः उचलेगिरी केली आहे ती मनाला खटकते, लेखकाने तसा उल्लेख तरी करायला हवा होता.
ग्रंथ |
लेखक |
|
1 |
Combination Of Stellar Influences COSI |
Reinhold Ebertin |
2 |
Astrological Aspects |
C E O Carter |
3 |
फलज्योतिषातील समग्र ग्रहयोग |
व दा भट |
4 |
How to be a Good Astrologer |
James Braha |
5 |
Aspects in Astrology |
Sue Tompkins |
6 |
Planetary Aspects in Astrology |
O P Verma |
आणखी काही ग्रंथ पुढच्या पोष्ट मध्ये
मूलभूत ज्योतिष शास्त्र ( लेोकरच जोडत आहे)
नक्षत्रे
राहू-केतू
मुहूर्त
पत्रिकेचा अभ्यास
ग्रह व भावांच्या कारकत्वाची प्रचंड मोठी यादी
शुभं भवतू
सुहास
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020