कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भक्कम असल्या पाहिजेत, त्याच बरोबर राहू व केतू या दोन छाया ग्रहांचाही सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे, कारण या दोन्हीं छाया ग्रहांना कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कमालीचे महत्व दिले गेले आहे.

नक्षत्रे हा तर कृष्णमुर्ती पद्धतीचा आत्मा आहे, त्यामुळे नक्षत्रांचा अभ्यास ही अत्यावश्यक ठरतो. शिवाय मुहुर्तशास्त्रात नक्षत्रांचे महत्व किती आहे ते वेगळे सांगायला नकोच.

आज मी राहू व केतू  आणि नक्षत्रे  या दोन  विषयांवरच्या काही  उत्तम ग्रथांची यादी सादर करत आहे. पण याच विषयांवर इतर अनेक ग्रंथ असे आहेत की जे या यादीत मानाचे स्थान मिळवू शकतात, तूर्तास माझ्या वैयक्तिक संग्रहांतल्या ग्रंथापुरतीच ही यादी मर्यादित ठेवत आहे.

या यादीतले पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ बघून दचकू नका, पण जे चांगले आहे ते अभ्यासलेच पाहिजे, पाश्चात्त्य ग्रथकारांचे ग्रंथ खूप व्यासंगातून निर्माण झाले आहेत त्यामागे लेखकाची स्वत:ची तपश्चर्या आहे , निव्वळ पोपटपंची नाही की एखाद्या संस्कृत ग्रंथा चे भ्रष्ट भाषांतर नाही.

वेळे अभावी सध्या फक्त यादीच देतो आहे, सवड मिळताच, हीच पोष्ट edit करुन   , या ग्रंथां चे छोटेसे परिक्षण पण देणार आहे, तेव्हा या पोष्ट वर लक्ष ठेवा, अधुनमधुन तपासता रहा.

 

 

कृष्णमूर्ती पद्धती च्या अभ्यासा साठी आणखी काही पूरक ग्रंथ

ग्रंथ

लेखक

1

Tne Lunar Nodes

Judith Hill

2

Astrology For Soul

Jan Spiller

3

Lunar Nodes

Mohan Koparkar

5

The Rahu Ketu Experiences

Prash Trivedi

6

Rahu and Ketu in Predictive Astrology

M C Jain

7

Nakshatra (part 1)

K T Shubhakaran

6

Nakshatra

Prash Trivedi

7

Brihat Nakshatra

Sanjay Rath

8

नक्षत्र ज्योतिष

प्र. सु  आंबेकर


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. SHIVRAM KAJAREKAR

  वरीलयादीतीलनक्षत्रज्योतिष हे पुस्त प्र सु आंबेकरांचे आहे की सु य आंबेकरांचे?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. शिवराम जी ,

   नक्षत्र ज्योतिष हे पुस्तक श्री प्र.सु. आंबेकरांचे आहे. लेखातली टायपिंग ची चूक निदर्शनास आणुन दिल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

   जाता जाता , ह्या पुस्तकाचा यादीत समावेश केलेला असला तरी स्त्रियांच्या कामूक , काहीशा अश्लिल वर्णनांनी लडबडले हे पुस्तक (ज्योतिषा वरचे पुस्तक आहे का एखादी चावट कादंबरी वाचतो हेच कळत नाही !) चुकांनी भरलेले आहे ते पुस्तक जास्त गांभिर्याने घेऊ नका.

   नक्षत्रा वर सगळ्यात चांगले पुस्तक श्री. प्राश त्रिवेदींचे आहे , ते रेफरंस म्हणून वापरायला हरकत नाही, श्री. संजय रथ यांचे ‘बृहत नक्षत्र’ त्यानंतरचे चांगले पुस्तक ( आऊट ऑफ प्रिंट आहे) , श्री शुभाकरण यांचे दोन भागातले पुस्तक उ/अपाय , तोडगे स्पेशल आहे (विश्वास असल्यास वाचायला हरकत नाही)

   माझे मत विचाराल तर नक्षत्रां पेक्षा स्थिरा तार्‍यां कडे जास्त लक्षा द्या , श्री . म.दा. भटांनी (श्री. व. द. भट यांचे थोरले बंधू) याबाबतीत काही लिखाण केले आहे , मराठीट हे एव्हढेच उअपल्ब्ध आहे. फ्र्रंग्यांनी यावर बरेच संशोधन करुन लिखाण केले आहे , ते दर्जेदार आहे , आपली इच्छा असल्यास ती माहीती शेअर करेन.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.