हसमुखभाई माझ्या शेजारी, ‘आर्टीक चिल्स’ म्हणावे असा फुल्ल ए.सी. सोडलेला, लोण्यातुन गरम सुरी फिरवावी अशी अल्लाद जणू रस्त्यावर तरंगतीय असे वाटावे अशी पळणारी बी.एम.डब्ल्यु ! या गाडी बद्दल ऐकले होते आज बसण्याची संधी मिळाली ! (आपल्या सारख्यांच्या नशीबात असल्या गाड्या नुसत्या बघण्या साठीच असतात नै का?)

लबार हिलच्या कुठल्याश्या छोट्या गल्लीत गाडी शिरली आणि हसमुखभाई , ईतका वेळ कपाळावर चढवून ठेवलेला (खरोखरीच्या) सोन्याचा रिमचा चष्मा पुन्हा डोळ्यावर आणत म्हणाले..

‘लो आ गया भाई, आर्यन विला!’

आठ फुट उंचीचे नक्षिदार गेट , दारात चौकीदार आणि दोन आडदांड ‘रॉट व्हायलर’ जातीचे कुत्रें (कुत्रे कसले ते लांडगेच म्हणायचे!)  खरोखरचा व्हिला होता तो…

……….

हसमुखभाई माझे क्लायंट , डायमंड कटिंग अ‍ॅन्ड एक्स्पोर्ट चा व्यवसाय. मुंबईला राहात असले तरी पंधरा दिवसातुन देवळाली ला चक्कर असायचीच. आणि देवळालीत आले की त्यांचा ‘जय श्रीकृष्ण’ ठरलेलाच . मला असले हसमुखभाई हवेच असतात ‘ ए सुहास भाय , हमारा सनी (शनी) काय बोलतां ते ज्यरा बघून सांग ना..” तेच ते पुन्हा पुन्हा विचारत राहतात… आणि मी त्याच त्याच प्रश्नांना तिच तिच उत्तरें देत राहातो ! मी तरी काय करणार शनी एका राशीत अडीच वर्षे असतो ना! याचा ना त्यांना कंटाळा ना मला! ‘गांधीबाबा’ मोजायचा कंटाळा कशाला येईल?

———

आज हसमुख भाई माझ्या बरोबर असले तरी मला भेटायचे होते एका बड्या असामीला ! असली बडी असामी काय ‘टु बी एच के’ मध्ये राहते का? त्यांचा असला आर्यन व्हिलाच असायचा ना!

——–

झाले असे ….

मी त्या दिवशी (आणि त्याच्या आदल्या दिवशी पण) कुर्ल्याला एका निमशासकीय संस्थेत ARM 7 चा दोन दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यासाठी मुंबईत आलो होतो. प्रोग्रॅमच्या पहील्याच दिवशी सकाळी हसमुख भाईंचा फोन आला…

“कहाँ हो आप, पंडितजी’

“जी, एक ट्रेनिंग प्रोग्रॅम चल राहा हैं, उसी सिलसिलें मुंबई में “

“तो मेरा आधा काम हो गया..”

“क्या हुवा?”

“आपको मेरे एक बहुत करिबीं दोस्त से मिलवाना है”

“किस खुशी में”

“एस्ट्रोलोजि ! उसके बजाय और कुछ हो सकता है क्या ?”

“वो ठीक है, लेकिन मै तो पुरा दिन ये लेक्चर के चक्कर मै रहूँगा , वक्त मिलना मुश्किल है”

“हां , मालूम हाय, लेकिन शाम को तो फ्री हो जायेंगे ना/”

खरेतर  दिवसभर चाळीस विद्यार्थ्यां समोर लेक्चर झोडल्या नंतर अंगात कसलेच त्राण राहत नाही. त्यात पुन्हा दोन – तीन तासांचे कन्सलटेशन ! बाप रे, शक्यच नाही !

“हाँ भाई शाम को फ्री जरुर होता हूँ , लेकिन थकान इतनी होती है के पूछो मत“

“कब खतम हो रहा है ट्रेनिंग प्रोग्रॅम “

“आज और कल,  दो दिन का  प्रोग्रॅम है”

“तो  कल ट्रेनिंग वगैरा खत्म होने के बाद तो टाईम निकाल सकते हो ना?”

“कल ? ना बाबा, कल शाम को ‘पंचवटी’ पकडके वापस देवळाली जा रहा हूँ”

“कॅन्सल करो”

“…”

“कल वख्त निकालो हमारे लिए, वो ‘पंचवटी’ क्या चीज है, हमारा काम खत्म होने के बाद हम आपको स्पेशल कार से देवळाली पहुँचा देगे , कोई फिक्र नहीं”

“लेकिन..”

“बस.. अभी जादा बात नहीं.. कल आप मेरे साथ मेरे दोस्त के घर पर होंगे, बात पक्की”

“अब आप इतनी जिद कर रहें हो, ठीक है, लेकिन मिलना कहाँ हैं”

“आप कहाँ पे ठेहरे हो?”

“कुर्ला -चुना भट्टी, वो XXXX आपको मालूम रहेगा शायद, वहाँ चल रहा  है ये ट्रेनिंग प्रोग्रॅम, उनके कॅम्पस में गेस्ट हाऊस है , वहीं पे ठेहरा हूँ”

“हां मालुम है वो जगह, वो YYYYY के शोरुम के सामनेवाली ना?”

“जी बिल्कुल “

“तो ऐसा करते है, कल शाम को आपको हम वहाँ से पिक-अप करते , पहेले हमारे घर चलेंगे, गरीब के यहां कुछ चाय पानी होगा.बाद में हमारे दोस्त के पास चलतें है, बातें होंगी और डीनर भी वहीं होगा , ठीक है”

“ये आपके दोस्त है  कौन , कहाँ पे मिलेंगे”

“कल सबकुछ बता देंगे”

“ठीक है, “

“तो कल मिलेंगे.. जय श्रीकृष्ण “

“जय श्रीकृष्ण”

….

समोर एक भारदस्त व्यक्तीमत्व उभे होते. लख्ख गोरा रंग, मध्यम उंची, चंदेरी केसांच्या चप्प चौकटीत सुबक टक्कल , सिल्कचा कुडता- पायजमा, हाताच्या बोटांना  ट्प्पोर्‍या हिर्‍यांची झळाळी, मनगटात डोळे पांढरे करु शकणारी किंमत असलेले स्विस घड्याळ, पायात गुची ( Gucci) ! समोरच्याचा एक्स रे घेणारी बारीक पण तरबेज , धारदार नजर!

“आईये , पंडितजी, आईये , हसमुखजी , सब खैरियत तो हैं ना?”

सुटलेले पोट जेव्हढी परवानगी देईल तितके वाकत हसमुखभाई..

“जी बिल्कुल आपकी दूवाँ से “

“आईये पंडीतजी , हमारे गरीबखानें मे तशरिफ  रखीये”

जिभे वर खानदानी आदब होती,  हे मी उगाचच  लिहले आहे , लिहायची गरजच पडू नये , ती व्यक्ती ज्या  खानदानातली होती ते खानदान किमान तिनशे वर्षांची परंपरा असलेले होते!

“हसमुखजी से हमारी दोस्ती हैं, आपके बारेमें हमेशा तारीफ ही तारीफ सुनता आ रहा हूँ. आपसे मिलने की कई दिनोंकी चाँह थी, आज वो मन की मुराद पुरी हो गयी”

इतके अदबशीर , खानदानी , चांदीचा वर्ख लावलेले उर्दू  मिश्रीत हिंदी ऐकायची सवय नसते हो आपल्या सारख्यांना  !

आपण सिनेमात बघत असतो … आज ते प्रत्यक्ष माझ्या समोर उभे होते!

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.