>“हसमुखजी से हमारी दोस्ती हैं, आपके बारेमें हमेशा तारीफ ही तारीफ सुनता आ रहा हूँ. आपसे मिलने की कई दिनोंकी चाँह थी, आज वो मन की मुराद पुरी हो गयी”
इतके अदबशीर , खानदानी , चांदीचा वर्ख लावलेले उर्दू मिश्रीत हिंदी ऐकायची सवय नसते हो आपल्या सारख्यांना !
असले काही आपण सिनेमात बघत असतो … आज ते प्रत्यक्ष माझ्या समोर उभे होते!
या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:
काही बोलायचे आहे … पण बोलणार नाही.. (भाग – १)
‘रायसाब’ ! खरे नाव गुप्ततेच्या संकेतां मुळे उघड करु शकत नाही. लिखाणाच्या सोयीसाठी आपण ‘राय साब’ म्हणूया !
“रायसाबजी , आप है पंडीत सुहास, इनके बारे में आपको पहेलेसेही पता है”
“सुहासजी, आप है रायसाब, ‘ZZZZZ” रियासत के नवाब, आपका देस विदेस में फैला हुवा काफी सारा कारोबार है”
“सुहासजी आपसे मिलके बडी खुषी हुई, आज जैसे पंडत हमारे गरीबखानें मै पधारें ये हमारी खुश किस्मती”
हा गरीबखाना ? नाही हो , वर्णन नाही करत, कसे करणार ? देवा शप्पथ , आपली तेव्हढी औकात नाही ! (बघा अजुनही तो प्रसंग आठवला की तोंडातून उर्दू शब्दच बाहेर येतात !) …फार फार फार फार फार भारी होते हो ते सगळे. ते शिणूमा वाले काय दाखवणार? (आपली धाव शिणूमा पर्यंतच जाणार ना?)
हात लागला तर फुटेल की काय अशी भिती वाटावी अशा सुबक , नाजुक ग्लासां मधुन थंडगार पाणी आले. इकडे मला त्या कुर्ला -चुना भट्टी वाल्या XXXX च्या कॅन्टीन मधले हाताची पाचही बोटे बुडवून आणून दिलेला ‘पंच बोटांकित’ गिलास मधले पाणी आठवून पोटात ढवळले !
सोफ्यावर अत्यंत सहजतेने विसावलेले ते ‘राय साब’ नावाचे भारदस्त , रुबाबदार नवाबी व्यक्तिमत्व अत्यंत नजाकतीने , मृदू मुलायम आवाजात , अदबीने पेश आले…ती आदब आठवून आजही मला अवघडल्या सारखे वाटते, अरे यांनी कसली आदब दाखवायची , ते आमचे काम , यांनी हुक्म करायचा!
“वैसे तो हमारा मजहब इसकी इजाजत भी नहीं देता , लेकिन मामला ही इतना संगिन है के जहाँ से भी थोडासा सूकून मिलें , आज उसकी जरुरत है”
“राय साब मैं मानतां हुँ आप की सोच को”
“सुहासजी , आप सोच रहें होंगे , ऐसी उँची महल में रहने वाले को क्या परेशानी हो सकती है ? लेकिन हाँ , हमे भी परेशानियाँ होती है, ZZZZ रियासत के नवाब होने के बावजुद भी.. आखिर हम भी इंसाँ जो ठेहेरे”
“जी बिल्कूल”
“हसमुखजी कहते है, के आप काफी भरोसेमंद हो तो शक की कोई गुँजाईश ही नहीं, लेकिन आजका मामला कुछ ज्यादा ही ज्याती हैं , गुस्ताखी मुआफ लेकिन क्या मै आप पर पूरा भरोसा कर सकतां हूँ ?
“आप बेफिक्र रहीये”
“अच्छी बात “
इतके सारे होत असताना रायसाहेबांची ती एक्स – रे घेणारी नजर जरा अस्वस्थता आणणारी होती.
मेहमान नवाजी चा दुसरा हप्ता आला.. डोळ्याचे पारणें फिरेल अशा नाजूक ग्लास मधून ऑरेंज ज्युस!
ऑरेंज ज्युस घेता घेता रायसाहेबांची बारकाईने चौकशी चालू होती, देवळाली में कहाँ रेहेते हो, क्या काम करते हो, मुंबई कैसा आना हुवा इ.
एव्हाना रायसाब जरासे आश्वस्त झालेले दिसले.
“सुहासजी, हसमुख भाई आपके बारे में बताते रेहते के आप् वो क्या केहते हैं ..”
“होरोस्कोप”
“वहीं, देखके सबकुछ बता सकते हैं”
“जी, मैं वैसी कोशिस तो जुरुर करता हूँ”
“अच्छी बात है, हम ऐसे मामले में बिल्कुलही अनपढ गवाँर साबित होंगे , लेकिन कई लोगोंसे ये ऐसा अक्सर सुनता आ रहा हूँ , ताज्जुब होता है , ये कैसा मुमकिन होता है?”
“रायसाब इसका जवाब देना काफी मुश्कील है , फिर भी ये होता है , लेकिन लगातार , बार बार नहीं”
“यानें ?”
vमी छ्ता कडे बोट करुन म्हणालो..
“उस की मर्जी”
v“ठीक है समज गया”
“…”
“तो आप कुछ पर्ची बनाते हो , होरोस्कोप, और उसे देखके परेशानियोंका हल बताते हो”
v“जी नहीं. समस्या का हल पर्ची में नहीं बल्की आपकी कोशिस से होता हें, पर्ची सिर्फ कोशीस कैसी , कहाँ और कब करनी है , बस्स इतनाही बता सकती है”
“सुभानल्ला , ये भी तो काफी मदतगार साबित हो सकता हैं”
“जी”
“सुहासजी , अगर आप बुरा ना मानों तो एक बात पुछ सकता हूँ ?”
“बेहिजज “
“ये बात तो हम समझ गये के पर्ची से आप परेशानी के बारे में बता सकते है, सहीं”
“बराबर “
‘कल मैं हसमुख भाई से बात करता था , वो बोले , परेशानी बताने बाद आप वो होरोस्कोप बनाते और उसी अंदाज से आगे का काम होता है”
“जी बिल्कुल , मेरे काम करने का तरीका कुछ ऐसाही है”
“तो क्या सिर्फ पर्ची देखके हमारी परेशानी कौनसी होगी ये बता सकते हो?”
“यानें के आप बिना बताये , आपकी परेशानी कौनसी होगी उसका हमें अंदाजा लगना है?”
“बहुत खुब, पंडितजी, हसमुखजी सहीं कह रहे थे”
“शुक्रिया”
“सुहासजी , तो ये मुमकिन हैं ?”
“गुस्ताखी मुआफ , रायसाब, लेकिन ऐसा लगता है , आप हमें आजमाना चाहते हो”
“अगर हमने कुछ गलत कह दिया होगा तो हमें मुआफ करना”
“नहीं , नहीं, रायसाब, इसमें बिल्कुल भी कोई गलती नहीं, बल्कि ये तो मेरे लिए एक बडा मौका है , मेरा हुनर साबित करनेका”
“हसमुखजी, लगता है , आज हम सहीं शक्स से बात कर रहें है”
“शुक्रिया”
“सुहासजी , तो समझो , हम कुछ बतायेंगे नही , आप को धुँढ निकालना है , हम किस परेशानी के दौर से गुजर रहें है?
“मै समज गया, काम मुश्कील है लेकिन नामुमकीन नहीं, मैं जरुर कोशीस करुंग़ा “
“बिसमिल्लाह”
…..
एरव्ही कसे होते जातक प्रश्न विचारतो , ज्योतिर्विद मग प्रश्नकुंडली किंवा जन्मकुंडली च्या साह्याने त्या प्रश्नाचे उत्तर शोधतो. इथे जातकाने प्रश्न सांगीतलेला नाही तर तो प्रश्न काय आहे हेच मुळात हुडकून काढायचे आहे.
पेशंटने डॉक्टरची परिक्षा घेऊन मग तब्बेतीचा त्रास काय ते सांगायचे अशातला काहीसा प्रकार होता हा. अशा प्रकारची आव्हाने ज्योतिषांना दिली जातात, खासकरुन सध्या बोकाळलेलेल्या ‘अंनिस’ च्या अर्धवटरावां कडून ! माझ्या कडेही असले लोक आले होते त्यांना ओळखणे अगदी सोपे असते, त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवायचा. वाद घालत बसायचे नाही. हे शास्त्र आहे हे ज्यांना मान्य आहे त्यांच्या साठीच काम करायचे, उगाच गल्ली बोळ्यातल्या , कोणा आंडू पांडू शी वाद घालून वेळ बरबाद करायचा नाही हे माझे धोरण आहे.
पण इथे समोर रायसाब होते , ते हा असला ‘अंनिस’ वाला खेळ करणार्यातले नाहीत हे दिसतच होते.
जातकाने अशी माझी परीक्षा घेण्याची पहीलीच वेळ नाही , आणि अशा जवळजवळ सर्वच परीक्षांत मी उत्तीर्ण होत आलो आहे. मला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते पण काहीसा दबाव आला होता हे मान्यच करावे लागेल…
माझ्या ब्लॉग वरुन मी ‘कन्सलटेशन चार्ट’ बद्दल बरेच लिहले आहे आणि काही उदाहरणे पण दिली आहेत. जातक समोर येतो तेव्हाची वेळ व स्थळ घेऊन केलेली समय पत्रिका ( Time Chart) आपल्याला जातका बद्दल , जातक सध्या कोणत्या परिस्थिति आहे, जातकाचा संभाव्य प्रश्न काय आहे ह्या बद्दल आपल्याला बरेच काही सांगून जात असते. आणि बहुतांश केसीस मध्ये तोच चार्ट वापरुन जातकाच्या समस्यांचे उत्तर पण शोधता येते.
या कामासाठी मी वेस्टर्न (सायन) चार्ट वापरतो. आणि सारे अॅनॅलायसिस पण वेस्टर्न पद्धतीने करतो. मी के.पी. आणि पारंपरीक पद्धतीने काम करुन बघितले पण वेस्टर्न चार्ट आणि वेस्टर्न पद्धतीने मला सातत्याने अचूक माहिती पुरवली आहे.
लॅपटॉप चालू केला , सॉफ्टवेअर फायर केले , हे सॉफ्टवेअर लॉन्च होताच त्या वेळेची कुंडली स्क्रीन वर झळकली. अर्थात ही कुंडली ‘देवळाली कँप’ स्थळाची असते. (तसे सेटिंग केलेले असते) , पण आत्ता मी बसलो होतो ते मलबार हिल, मुंबई. तेव्हा सेल फोन वरुन गुगल केले आणि मलबार हिल चे को-ऑर्डिनेट्स घेतले. स्क्रीन वर आलेली कुंड्ली या मलबार हिल, मुंबई लोकेशन साठी एडिट केली (देवळाली , मुंबई तसे फार लांब नाही, फरक अगदी किरकोळ असतो, तशी देवळाली लोकेशन ची कुंडली पण चालली असती, पण अचूक डेटा सहज उपलब्ध असेल तर तो वापरलाच पाहीजे)
अशा तर्हेने ‘कन्स्लटेशन चार्ट ‘ तयार होताच मी कामाला लागलो..
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहासजी,
‘पंच बोटांकित’ एकदम मस्त पंच आहे :).
एकदम वेगळा विषय निवडला आहे आणि डोक्याला मस्त खाद्य आहे.
आता ह्या केस मधली उत्सुकता आता वाढायला लागली आहे, पुढील भाग लवकर येऊ देत.
एक अवांतर प्रश्न, तुम्ही website वरून कुंडली बनवता, offline तुम्ही कोणत software वापरता वेस्टर्न कुंडली बनवण्यासाठी?
संतोष सुसवीरकर
श्री. संतोषजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
नवे नवे विषय घेण्याकडे माझा कल असतो. माझ्या ब्लॉग वरच्या केस स्ट्डीज नाविन्यपूर्ण असाव्यात , तेच तेच विषय नकोत हा प्रयत्न असतो. एखादी केस स्ट्डी (किंवा इतर कोणताही लेख) ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यात काही तासांची मेहेनत असते. मराठी टायपिंग फार वेळ काढू आहे. आपल्याला हे आवडले हे वाचून समाधान वाटले.
माझ्या कडे पारंपरीक व के.पी. साठी KP Star One हे सॉफ्टवेअर आहे , ते फ्री आहे म्हणजे याला लायसेन्स लागत नाही, त्यांच्या साईट वरुन ते अधिकृत डाऊंलोड करुन घेता येते , सॉह्टवेअर दर्जेदार आहे , अचूक आहे , विश्वासार्ह्य आहे. पारंपरीक मधल्या इतर कुंडल्या, त्रिभागी दशा इ साठी मी Jagannath Hora हे सॉफ्टवेअर वापरतो. हे पण फ्री आहे , अधिकृत आहे , चांगले आहे पण ग्राफिक्स आणि युजर इंटरफेस इतका चांगला नाही.
वेस्टर्न साठी माझ्या कडे Janus चे लायसेंस आहे, सॉफ्टवेअर चांगले असले तरी ग्राफिक्स चांगले नाही पण बाकी गणिते इ भाग सगळ्यात जास्त अॅक्युरेट आहे , गोल्ड स्टॅन्डर्ड !
ब्लॉग वर आणि माझ्या रिपोर्ट मध्ये ज्या पत्रिका देतो ते ड्रॉईंग असते ते माझा मुलगा ग्राफिक्स जिम्प GIMP नावाचे सॉफ़्टवेअर वापरुन काढून देतो.
सुहास गोखले
वा! क्या बात हे.
सावरुन बसलोय, येउ दया.
तुम्ही देत अस्लेल्या मेजवाणी बद्दल आभार व्यक्त करतो.
श्री अण्णासाहेब , धन्यवाद
सुहास गोखले
sir mala shop chya sambandhi tumala kahi vicharawayache aahe vicharle tar chalel ka
साै ज्योती जी ,
आपण प्रश्न विचारु शकता
सुहास गोखले
sir , दुकान विकण्या साठी मी कुणाला स्वतःहोऊन विचारले तर चालेल का
साै ज्योती जी,
चालेल सर्व मार्गांनी प्रयत्न करावेत.
सुहास गोखले