ही घटना पूर्णपणे सत्य आहे , खोटे काही नाही. माझा स्वत:चा अनुभव आहे.

या लेखमाले तला पहीला भाग इथे वाचा:

काहीसे अमानवी… भाग – १

कमीन्सच्या गेट समोरुन मी डावी कडे वळलो. कमीन्सच्या गेट वर देखील शुकशुकाट होता, सिक्युरिटी गेट वरचे एक – दोन कर्मचारी वगळता सारे सामसुम. गेट वर दिवे असल्याने बराच उजेड होता पण जसा मी डावी कडे वळून गांधी भवन रस्त्यावर आलो तसे लक्षात आले की स्ट्रीट लाईट्स बंद आहेत डाव्या हाताला अपार्टमेंट्स होती पण तिथून ही काही उजेड येत नव्हता. अर्थात मला त्याचे काहीच वाटले नाही, पाच -सात मिनिटांचा तर काय तो प्रवास.

पुढे उजव्या हाताचे वळण घेतले, आता डाव्या हाताला स्मृती वनाची गर्द झाडी आणि उजव्या हाताला कमिन्स चे बॅक यार्ड असा सिन होता. आधीच अंधार त्यात रस्त्याची दयनीय अवस्था , स्मृतीवनातून कोल्हे , कुत्री या सारखे प्राणी आडवे येण्याची शक्यता , हे सगळे गृहीत धरुन मी स्कूटरचा वेग तसा कमीच ठेवला होता.

मार्च महिना असला तरी स्मृतीवना तून येणारे वारे चांगलेच झोंबत होते. आता ते अर्धवर्तुळाकार वळण जवळ आले , हा ब्लाईंड स्पॉट असल्याने मी स्कुटरचा वेग आणखी कमी केला, इथेच एक ओढा स्मृतीवनाच्या टेकडीवरुन येऊन रस्ता ओलांडून कमीन्स च्या प्रॉपर्टीत गडप होतो, त्या ओढ्यावर एक कल्वर्ट आहे , मी त्या कल्वर्ट पाशी पोचलो.. सावधगिरी म्हणून स्कूटरचा हार्न ही वाजवला. बजाजच्या स्कूटरचा तो दळभद्री हॉर्न , तो काय आवाज करणार पण रात्रीच्या निरव शांततेत त्याचा आवाज चांगलाच मोठा वाटला..

[गोविंद आचार्यांनी जेव्हा मला ही संपूर्ण घटना उलगडून सांगीतली तेव्हा अनेक गोष्टींचा खुलासा झाला त्यानुसार मी हार्न वाजवला ही मी नकळत केलेली चूक होती … तो एक ट्रिगर पॉईंट ठरणार आहे हे त्यावेळी मला कसे काय माहीती असणार?] हॉर्न वाजवला , वळण अगदी जवळ आले आणि एक एक विचित्र प्रकार घडायला सुरवात झाली.

स्कूटर कोणी तरी घट्ट पकडून ठेवल्या सारखी जागची स्थिर झाली , मला क्षणभर कळलेच नाही, मी अ‍ॅक्सेलेटर रेज केला , काही फरक नाही, स्कूटर चे इंजिन कर्कश्य आवाज करत होते पण स्कूटर एक इंच ही पुढे सरकत नव्हती. स्कूटर सारखे वाहन मी कित्येक वर्षे चालवत होतो, इतक्या वर्षात स्कूटर ला येऊ शकणारे सर्व प्रॉब्लेम्स एकेकदा का होईना येऊन गेलेले होते, पण हे काही तरी विचित्रच होते , एकदम नविन अनुभव होता.  पेट्रोल चे म्हणाल तर संध्याकाळी वारज्याला जातानाच मी टाकी फुल्ल केली होती. पेट्रोल मध्ये कचरा हे कारण असू शकते पण गाडीचे फायरिंग स्मूथ होते. एक शंका आली  की टायर मध्ये काही तरी अडकले असावे त्याने स्कूटर जॅम झाली असावी. मी स्कूटर न्यूट्रल ला घेऊन , तिचे इंजीन बंद केले. स्कूटर रस्त्याच्या कडेला घेऊन स्टॅन्ड वर उभी केली. खाली वाकून चौफेर पाहीले , चाकांत काही अडकले नव्हते. मी गियर आणि क्लच केबल्स चालवून पाहील्या त्यातही काही बिघाड दिसत नव्हता.

मी काही क्षण तसाच उभारलो असेन .. इतक्यात काय झाले कोण जाणे कोणी तरी मला चक्क ढकलले असे वाटले.. का माझा तोल गेला नक्की काय झाले असेल ते आता सांगता येणार नाही पण मी विजेचा शॉक बसल्या सारखा झटकन त्या कल्व्हर्टच्या दिशेला खेचला गेलो.

आता मी स्कूटर पासून सात – आठ फूटांवर आलो असेन.. त्या क्षणी मला जाणीव झाली की मी स्वत:च्या पायाने इथे पर्यंत आलेलो नाही.. हे सर्व आपोआप अणि सेकंदाच्या दशांश भागात झाले आहे… काहीतरी अघटीत घडत आहे …

मी दचकलो एक नैसर्गीक म्हणा किंवा प्रतिक्षीप्त क्रिया… मी स्कूटर कडे धाव घेतली ..

घेतली म्हणण्या पेक्षा तसा प्रयत्न केला असेच म्हणावे लागेल कारण जे स्कूटरच्या बाबतीत झाले तेच माझ्या बाबतीत झाले. मला अक्षरश: एक इंच ही पुढे सरकता आले नाही! पाय जमीनीला चक्क चिकटल्या सारखे झाले होते ,   माझा कमरेच्या वरचा भाग पुढे जात होता तर कमरे खालचा भाग स्थिर रहात होता आणि एखादे ताणलेले रब्बर सट्ट्कन मूळ जागी यावे तसा माझी अप्परबॉडी मागे खेचली जात होती. मला आठवतेय.. ह्या पॉईंटला भितीची जबरदस्त लहर माझ्या शरीरातून दौडत गेली… मला जबरदस्त तहान लागली… पाणी पाणी असे मी कदाचित म्हणालो ही असेन..

मला गरगरायला लागले… माझे पाय जमिनीवर असले तरी क्षणभर मला कोणी तरी उचलल्या सारखे वाटले. हा अनुभव साधारणपणे विमान जेव्हा टेक ऑफ करते त्यावेळी येतो.. विमानाची चाके धावपट्टी वरुन उचलली जातात त्या अर्ध्या सेकंदात असा अनुभव नेहमीच येतो.

मी लटपटलो, आता माझ्या समोरचा सगळा निसर्ग बदलून गेला होता , एखादा पडदा वार्‍याच्या झुळूकी सरशी मागे पुढे व्हावा , त्यात वार्‍यामुळे फुगवटा यावा तसे सगळे एकदा ह्या बाजूला तर एकदा त्या बाजूला असे हलत होते.. मुळात मला एका मोठ्या काचेच्या गोलात बसून जागेवरच मागे पुढे , वर खाली होतोय असा भास होऊ लागला..

कमिन्स बॅक यार्ड मधले सोडियम वेपर चे  केशरी रंगाचे दिवे रंग  पालटू लागले… दिव्यांतून आता प्रकाश येत नव्हता तर पाण्याचा फवारा उडावा तसा अत्यंत तिव्र असा प्रकाशाचा फवारा येत आहे असे वाटू लागले .. प्रकाश ज्यापासुन बनतो ते फोटॉन्स त्यांच्या मूळ रुपात पाहत असेन कदाचित!

समोर ’ते’ झाड होते पण चक्क वर खाली , डावे –उजवे असे झुलत होते… मुळात त्या झाडाचा आकार सतत बदलत होता. मी कॉलेजात शिकत असताना C.R.O वर दोन फिक्वंसींज चा वापर करुन आलेल्या लिसाजस फिगर्स बघितल्या होत्या , हा प्रकार तसलाच होता पण त्याहुनही जास्त डेन्स होता.. त्याहुनही वेगळा प्रकार म्हणजे ते आकार नसुन वेगवेगळ्या फ्रिक्वंसीज ची नर्तने होती… कारण आकार बदलण्याला सुद्धा एक ताल होता…

[पुढे मी यावर बरेच वाचले … हे नेमके काय होते याचा थोडा फार खुलासा आता झाला आहे .त्याबद्दल नंतर कधी तरी विस्ताराने सांगेन..] मी डोके गच्च पकडून त्या कल्वर्ट च्या कट्ट्यावर बसलो.. बसलो कसला चक्क कोणी तरी खांद्यावर दाब देऊन मला तिथे बसवले म्हणले तर वावगे ठरणार नाही.

आता मला एक प्रकारचे संगीत वाजतेय असा भास व्हायला लागला , संगीतच म्हणायचे त्याला, त्या संगीतात असंख्य वाद्ये असावीत का एकच वाद्य एकाच वेळी अनेक ध्वनी निर्माण करत होते कोण जाणे… हो एक प्रकारचे संगीतच होते. … उदबत्तीचा धूर कसा गिरक्या घेत वेगवेगळे आकार निर्माण करत आकाशात झेपावतो तसे हे संगीत ज्याला आवाज होता आणि आकारपण … कॉर्ड्स बदलल्या की आकार पण बदलत होते … मुळात तो आवाज काना मार्फत ऐकायला न येता त्वचे मार्फत येत असावा कारण या आवाजाची स्पंदने मला प्रथम त्वचे वर जाणवत होती, मग मेंदू मार्फत त्याचे आकलन होत होते.  क्षणभर मला वाटले की मी पारदर्शक झालो आहे , किंबहुना मला कोणती मितीच राहीली नाही… कसली तरी स्पंदने जाणवत होती तेव्हढेच काय ते माझे आस्तित्व राहीले असावे !

हे असेच चालू राहीले असते आणि त्यातून माझी सुटका झालीही नसती असे आज मला वाटतेय पण माझे नशीब चांगले म्हणा किंवा कोणती तरी दैवी मदत मला मिळाली असावी पण त्या भूलभूलैया तून माझी सुटका ही काहीशी अनपेक्षित रित्या झाली.

मला एक जोरदार शिंक आली , पूर्ण शरीर पिळवटून टाकणारी शिंक होती ती, त्या शिंके बरोबरच मी काहीसा अधांतरी उचलला गेलो आणि परत कल्हर्ट्च्या कट्ट्यावर टेकला गेलो.

बस्स… त्याक्षणी एखादे बटन दाबल्यावर दिवा विझावा तसे सगळे थांबले.. ते संगीत, तो गोलगोल फिरणारा परिसर, त्रिमीती आकृत्यांचे नर्तन सगळे सगळे थांबले… समोरचे ते विचित्र झाड अंगात आलेल्या व्यक्ती सारखे झुलत होते ते ही नेहमी सारखे उभे दिसायला लागले. आणि कमालीचा सन्नाटा पसरला …

मी उठून उभा राहीलो, संपूर्ण शरीरात कमालीची थरथर जाणवत होती. पाय लटपटत होते, इथून पळून जायचे , जीव वाचवायचा एव्हढेच …

कसेबसे बळ एकवटून मी स्कूटर कडे गेलो, या खेपेला मला चालता आले.. क्षणात माझ्या लक्षात आले , स्कूटर पुढे जाऊ शकणार नाही .. ढकलत न्यायला लागेल… पण का कोणास ठाऊक .. कुणीतरी सक्ती केल्या सारखे मी स्कूटर ला किक मारली, स्कूटर चालू झाली ,स्टॅन्ड वरुन उतरवली आणि सिट वर बसलो… कसाबसा पहीला गियर टाकला आणि काय आश्चर्य स्कूटर नेहमी प्रमाणे सुरळीत धावू लागली . धाडकन दुसरा.. तिसरा आणि चौथा असे गियर बदलत मी सुसाट वेगाने निघालो..

मी घरी कसा पोहोचलो असेल हे मला आज ही सांगता येणार नाही, कितिही प्रयत्न केलात तरी त्यातले काहीही आठवत नाही , मी गियर बदलत निघालो ते आठवते आणि नंतर एकदम आमच्या अपार्ट्मेंटच्या गेट पाशी स्कूटर आली एव्हढेच आठवते, त्या प्रवासातला तो चार –पाच मिनिटांचा भाग माझ्या स्मृतीतून कायमचा पुसून गेला आहे.

हा सगळा प्रकार माझ्या अंदाजा नुसार अवघा दोन एक मिनिटें चालला असावा पण प्रत्यक्षात तो तासभर तरी चालला असावा कारण मी त्या जागेवर अंदाजे २ वाजता आलो असेन .. प्रसंग घडल्यानंतर मी अवघ्या दोन एक मिनिटात तिथून निघालो असेन आणि सुसाट स्पीड ने घरी पोहोचायला मला ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला असेल. पार्किंग लॉट मध्ये स्कुटर पार्क करुन दोन जिने चढून घरात आत येई पर्यंत आणखी पाच मिनिटें , म्हणजे मी साधारण पणे २:२० – २:२५ पर्यंत घरी असायला हवा होतो.. मी जेव्हा फ्लॅट मध्ये आत येऊन दिवे लावून भिंती वरच्या घड्याळ्यात पाहीले तेव्हा घड्याळ्यात पहाटेचे ३:२५ वाजले होते !

घरात आल्या आल्या मी प्रथम थंड पाण्याच्या शॉवर घेतला, देव्हार्‍या समोर एक उदबत्ती लावली, गायत्री मंत्राचा थोडा जप केला. बरेच शांत वाटले…माझ्याकडे कॉम्बीफ्लॅम ची स्ट्रीप होती, एक गोळी कशीबशी घेतली , सुन्नपणे सगळे दिवे चालू ठेऊन बसून राहीलो. शरीरात एक सुक्ष्म थरथर जाणवत होती ती मात्र दुसरे दिवशी सतत जाणवत राहीली.

त्या रात्री मी झोपलोच नाही, जे पाहीले , जे अनुभवले ते नेमके काय असू शकेल शकेल याचाच विचार करत होतो. मी वेगवेगळ्या लोकांकडुन, वेगवेगळ्या ठिकाणांचे असे अनेक किस्से ऐकले होते, मी ते तेव्हा हसण्यावारी नेले होते.पण आज मी पाहीले ते हसण्यावारी नेण्या सारखे नव्हते. मी अनेक मार्गाने विचार करुन पाहीला,  जे मी पाहीले ते , अर्थात त्यात पाहण्या सारखे काहीच नव्हते , तो विचित्र एक अनुभव होता.. आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडले असे काही तरी होते.

[ पुढे गोविंद आचार्यांशी झालेल्या चर्चेत खुलासा झाला की कळत नकळत का होईना मी एका वेगळ्या मिती मध्ये शिरलो होतो…] गुरुवार चा संपूर्ण दिवस माझ्या डोक्यात ते संगीत घुमत होते…

पुढे अनेक वर्षानी मी जेव्हा ‘जॅझ’या संगीत प्रकारात रुची घ्यायला सुरवात केली तेव्हा मी चार्ली पार्कर (बर्ड) चे संगीत ऐकत असताना एक ट्रॅक ऐकला आणि मी नखशिखांत हादरलो. त्या दिवशी त्या ठिकाणी मी जे संगीत ऐकले त्याची अगदी पुसटशी का होईना जाणिव झाली. बर्ड ने सॅक्सोफोन वर वाजवलेली ती ट्यून लॉर्ड ग्रेशवीन ची ‘समर टाइम’ होती..

‘त्या’ दिवशी , ‘त्या’ ठिकाणि मी जे संगीत ऐकले होते ते वर्णन करण्या पलिकडचे होते , ती वाद्ये , त्या फ्रिक्वंसीज, त्या कॉर्ड्स या पृथ्वी तला वर ऐकायला मिळणार नाहीत पण बर्ड च्या या ट्यून चे रेंडरिंग, लेयरिंग मी ऐकलेल्या आवाजाशी काहीसे मिळते जुळते होते हे नक्कीच. अर्थात मी ऐकलेले संगीत हे त्रिमीती स्वरुपाचे होते , आजचे आपले रेकॉर्डींग तंत्रज्ञान मग ते मल्टी ट्रॅक असो, ऑक्टोफोनिक असो किंवा , ७.१ / १२.१ असो , यातले कोणीही ‘त्या’ अनुभूतीची बरोबरी करु शकेल असे मला वाटत नाही कारण हा वरच्या मितिचा अनुभव घेण्या साठी लागणारे ज्ञानेंद्रीय आपल्या कडे नाही!

[गोविंद आचार्यांनी याचाही खुलासा केला , त्या क्षणी मी जेव्हा वरच्या मीतीत दाखल झालो होतो तेव्हाच ही जादाची सेन्सरी फॅकल्टी मला उपलब्ध झाली होती!] मानवी आवाजाच्या अगदी जवळ जाणारी जी काही मोजकी वाद्ये आहेत त्यात सॅक्सोफोन पहिल्या क्रमांकावर आहे , आपल्या कडचे सारंगी हे वाद्य ही मानवी गळ्याच्या खूप जवळ जाणारे वाद्य आहे. सॅक्सोफोन बद्दल बोलायचे झाले तर त्याला सुरवातीला ‘सैतानाचे वाद्य’ असेच मानले जात होते !
बर्ड च्या त्या ट्यून मध्ये खूप पुसटसा का होईना मी ऐकलेल्या ‘त्या ‘ आवाजाचा भास होतो हे नक्कीच . हे साम्य कशामुळे आले असावे ? याचे एक उत्तर असू शकते ते म्हणजे बर्ड चे ड्र्ग्जस चे व्यसन … बर्ड ची बरीच रेकॉर्डिंगज तो मार्जुआना च्या अंमला खाली असताना झालेली आहेत. बर्ड ला नंतर त्याच ट्यून्स पुन्हा तशाच कधीच वाजवता आल्या नाहीत ! बर्ड च नव्हे तर जॅझ मधल्या अनेक कलाकारांनी केलेल्या अजोड निर्मीती ह्या अशाच अंमली पदार्थांच्या नशेत असताना निर्माण झालेल्या आहेत ही वस्तूस्थिती आहे.
ड्रग्ज च्या अंमलाखाली आपल्या मनाचे / मेंदूचे काही अज्ञात कप्पे खोलले जातात , पुढच्या मितीं मध्ये कळत –नकळत का होईना प्रवेश होऊ शकतो आणि मग पंच ज्ञानेंद्रियां पलीकडे जाऊन संवेदना / जाणीवां अनुभवता येऊ शकतात.  म्हणूनच असेल , तांत्रीक साधना करणारे अनेकजण भांग पिणे, गांजा ची चिलिम ओढणे असे प्रकार करताना दिसतात.
असो.
आपल्यालाही ह्या स्वर्गीय संगीताची झलक ऐकवायचा मोह मला आवरत नाही… तेव्हा ऐका चार्ली पार्कर (बर्ड) … ‘समरटाईम’ !

ही पोष्ट प्रकाशित झाल्या नंतर आपल्या ब्लॉग च्या एका सन्माननिय वाचकाने एक शंका विचारली , त्याला कॉमेट मार्फत मी उत्तर दिले आहे , सगळेच वाचक कॉमेंटस वाचतातच असे नाही म्हणून सर्वांच्या माहीती साठी तो प्रश्न आणि त्याला मी माझ्या अल्प मतीने दिलेले उत्तर इथे देत आहे:

प्रश्न:

मला एक शंका आहे.. या रस्त्यावरुन अनेक लोकं ये जा करतात..रात्रीच्या वेळचे तिथले वातावरण कसे असेल मला पूर्ण कल्पना आहे.. पण असा अनुभव कधी एेकला नव्हता.. कि असे अनुभव काही ठराविक जणांनाच येतात?

उत्तर:

आपण जे विश्व आपल्या पाच ज्ञानेंद्रियां मार्फत अनुभवतो ते अत्यंत लहान आहे , इतकेच नव्हे तर ते कमालीचे डिस्टॉर्डेड आहे. या सार्‍या पलीकडे जाउन बरेच काही आहे पण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अपुर्‍या क्षमते मुळे ते आपल्याला कळू शकत नाही किंबहुना असे म्हणता येईल त्याची अनुभुती घेण्यासाठी आपल्या कडे योग्य अशी ज्ञानेंद्रिये नाहीत. एखाद्या जन्मापासुन आंधळ्या व्यक्तीला आपण लाल , हिरवा , मोरपंखी रंग कसे काय समजाऊन सांगणार ? कर्ण बधिर मुलास राग ‘यमन कल्याण’ कसा ऐकवणार ? डोळे / कान ही ज्ञानेंद्रिये असल्या खेरीज रंग / ध्वनी या अनुभूती येणारच नाहीत. आपल्याला दिसत नाही, ऐकायला येत नाही, वास नाही, स्पर्श नाही , चव नाही म्हणून आपण जरी याचे आस्तित्व नाकारले तरी ‘ते’ आहे हे सत्य आहे.

लांबी + रुंदी + खोली + वेळ असे ४ मिती मधले विश्व म्हणजे सर्व काही आहे ही आपली समजूत मुळातच चुकीची आहे. पण हे वरच्या मिति / पातळी वरचे विश्व आपण अजुनही अनुभवू शकतो ! आपल्याकडे त्या क्षमता आहेत पण त्या बंद करुन ठेवल्या आहेत. त्या खोलण्याचे अनेक मार्ग आजही उपलब्ध आहेत . त्यासाठी काही साधना करावयास लागतात किंवा एखाद्या गुरुची कृपा लागते… पण काही वेळा केवळ अपघाताने किंवा योगायोगानेच कळत – नकळत आपण ‘त्या’ विश्वात प्रवेश करु शकतो…

हा अपघातच असतो, तो घडण्यासाठी काही विविक्षित घटना एका विविक्षित क्रमाने घडावयास लागतात, जसे ‘आग’ लागण्यासाठी ‘इंधन (जळण्या योग्य वस्तू) + ऑक्सीजन + तापमान’ या तीन वस्तुंचा संयोग व्हावा लागतो.. यातला एखादा जरी घटक कमी पडला तरी आग लागत नाही. (ओली लाकडे पेटवायचा प्रयत्न करुन पहा !) किंवा लागलेल्या आगीतून या तीन पैकी एखादा जरी घटक दूर केला तरी आग विझते (आगीवर पाणी / वाळू यासाठी तर ओततात !)

मला जो अनुभव आला ती जागा अशीच एक ‘ट्रीगर पोईंट’ होता.. आवश्यक त्या गोष्टी जुळून आल्या आणि ‘बूम’ मी त्या वरच्या मितीत दाखल झालो. !

या जगात अशा अनेक जागा आहेत तिथे काही गोष्टी आधीपासुनच उपलब्ध असतात (लाकडे रचून ठेवली आहेत , वारा जोरात वाहतो आहे आता फक्त एक ठिणगीची आवश्यकता आहे !) , उरलेल्या एक दोन गोष्टींची पूर्तता होणेच बाकी असते , त्या कोणी नकळत (किंवा एखाद्या तांत्रिकाने कळून सवरुन !) पूर्ण केल्या तर ती व्यक्ती पुढच्या मितीत खेचली जाते. आपण ऐकले असेल की जुनी अनुभवी माणसे अमूक ठिकाणी जाऊ नका (खास करुन तिठा) असे सांगतात याचे कारण हेच आहे. ओली बाळंतीण, अमावस्या (काही वेळा पौर्णीमा !), काही ‘वेळां’ याबद्दल बरेच बोलले जाते ते या अशा आलेल्या अनुभवातूनच !

‘तो’ अनुभव येण्यापूर्वी आणि नंतरही मी ‘त्या’ जागेवरुन , अगदी ‘त्याच’ वेळेला  सुद्धा गेलो होतो पण तसा अनुभव पुन्हा आला नाही, याचे कारण तो ‘ट्रीगर पॉईंट’ एक्साईट व्हावयास काही तरी कमी पडले असावे. इतर अनेक लोकांना ज्यात तुम्ही स्वत: ही मोडता , असा अनुभव का आला नाही याचे हेच उत्तर आहे.

प्रश्न:

तुम्ही लिहिल्याप्रमाणे “हॉर्न वाजविणे ” हा ट्रिगर पॉईट ठरला, त्याच वेळी जर समोरून दुसरा स्कूटरवाला येत असता तर – हा अनुभव कुणाला आला असता – त्याला का तुम्हाला ? तसेच जेव्हा तुम्ही या अनुभवातून जात होता तेव्हा जर दुसरे कोणी त्या रस्त्यावरून आले असते तर त्यांना तुम्हाला मदत करता आली असती का ?

उत्तर:

मी त्यावेळी नकळत का होईना दुसर्‍या विश्वात , जे पाचव्या मितिपासून सुरु होते , गेलो होतो / ओढलो गेलो होते. हे असे होण्यासाठी काही पूर्वतयारी आधी पासुनच असावयास लागते आणि एक अचूक साधलेली वेळ. शेवट्ची आवश्यकता म्हणजे एक ट्रीगर , जो बर्‍याच वेळा एक ‘आवाज’ असतो, आवाजात (साऊंड) मध्ये जबरदस्त पोटेंशियल असते. ते किती ते त्या साऊंडच्या फ्रिक्वन्सी वर अवलंबून असते. ‘ओम कार ’ किंवा एका विषीष्ट लयीत आघात देत म्हणलेले मंत्र ही त्याची काही उदाहरणे आहेत. रामायण , महाभारतात साऊंड फ्रिक्वंसीचा वापर करुन साध्या गवताची काडीचे महाविध्वंसक हत्यार बनवले असे अनेक दाखले आहेत. आजच्या आधुनिक विज्ञानातले उदाहरण द्यायचे तर आपण वापरत असलेली अल्ट्रा साऊंड टेक्नोलॉजी.

मी वाजवलेला स्कूटर चा हॉर्न ने नि:संशय ट्रीगर चे काम केले, आता याच वेळी दुसरा स्कूटर वाला आला असता (किंवा अन्य काही तिसरे त्या जागी असते) तर आपली मिती आणि ती वरची मिती यांची प्लेन्स क्रॉस होऊ शकली नसती , आणि मी त्या पाचव्या (का सहाव्या) मिती मध्ये गेलो नसतो.

मी तो अनुभव घेत असताना म्हणजेच मी हायर डायमेन्शन मध्ये असताना तिथून कितीही वर्दळ झाली असती तरी काही फरक पडला नसता. त्यावेळी त्या जागे वर कोणी आले असते तर त्यांना मी दिसलोच नसतो.. कदाचित माझी स्कूटर पण त्यांना दिसली नसती. ह्या पाचव्या आणि त्याहून वरच्या डायमेन्शस मध्ये कोणतेही डोळ्याला दिसणारे आकार नसतात, दिसले तरी ते कमालीचे तरल आणि अस्थिर असू शकतात ! आपण जे डोळ्यांनी पाहतो ते आकार हा वस्तुत: आपला दृष्टी भ्रम आहे ! वरच्या मितीत यातले काहीच नसते … जे काही असते त्याला आपल्या वैज्ञानिक परिभाषेत ’ ‘एनर्जी फिल्ड’ असे काहीसे म्हणता येईल, जे आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या इलेक्टो मॅगनेटीक किंवा रॅडीएशन फिल्ड्स पेक्षा फार वेगळे असते … विज्ञानाला याचा शोध अजून लागायचा आहे.

मी येत होतो तो मार्ग पिवळ्या बाणांनी दाखवलेला आहे, घटना जिथे घडली तो भाग लाल बाणाने दाखवली आहे.

क्रमश: (पुढच्या भागात संपूर्ण )

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   घटना घडली तेव्हा मला काहीच कळले नाही पण त्यातून सहीसलामत वाचलो एव्हढीच भावना होती. पुढे मी याचा शोध घेतला , गोविंदा आचार्य भेटले आणि त्यांच्या कडुन काही बाबतीत त्याचा उलगडा झाला. याबद्दल मी लिहणार आहे.

   सुहास गोखले

   0
 1. स्वप्नील

  चक्राऊन टाकणारा अनुभव सुहास जी ! येथे नक्की काय प्रकार घडला ? निगेटिव एनर्जी जाणवली का आपले प्रक्षेपण म्हणजे सूक्ष्म देह बाहेर पडला होता ? जर एखाद्या व्यक्तीला साधना न करता जर काही काळासाठी जर अतींद्रिय संवेदना अनुभवायच्या असतील तर काही उपाय आहे काय ? म्हणजे अगदी गांजा वगरे नाही पण काही तरी तत्सम ज्याचा कधीतरी तारतम्याने वापर केला तर चालतो असे काही?.असो . आणि श्री गोविंदा आचार्य हे कोण आहेत ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री . स्वप्नीलजी

   अभिप्राया बद्दल धन्यवाद आपण उल्लेख केलेल्या विषयांवर मी सविस्तर लिहण्याचा प्रयत्न करेन.

   श्री. गोविंद आचार्य यांच्या बद्दल नंतर लिहीतोच आहे.

   सुहास गोखले

   0
 2. Santosh

  सुहासजी,

  एकदम थरारक अनुभव, वाचताना एवढा जाणवतोय तुम्ही तो प्रत्यक्षात अनुभव केला आहे.
  गोविंद आचार्यांचा खुलासा वाचायला आवडेल तसेच गोविंद आचार्य बद्धल सांगितले तर वाचकांना माहिती मिळेल.

  पुढील पोस्टची वाट पाहतोय 🙂

  संतोष

  0
  1. सुहास गोखले

   श्री .संतोषजी

   अभिप्राया बद्दल धन्यावाद

   श्री. गोविंद आचार्य यांच्या बद्दल नंतर लिहीतोच आहे.

   सुहास गोखले

   0
 3. माधुरी लेले

  बापरे भयंकर आहे.. मला एक शंका आहे.. या रस्त्यावरुन अनेक लोकं ये जा करतात..रात्रीच्या वेळचे तिथले वातावरण कसे असेल मला पूर्ण कल्पना आहे.. पण असा अनुभव कधी एेकला नव्हता.. कि असे अनुभव काही ठराविक जणांनाच येतात?

  0
  1. सुहास गोखले

   माधुरीताई,

   आपण जे विश्व आपल्या पाच ज्ञानेंद्रियां मार्फत अनुभवतो ते अत्यंत लहान आहे , इतकेच नव्हे तर ते कमालीचे डिस्टॉर्डेड आहे. या सार्‍या पलीकडे जाउन बरेच काही आहे पण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अपुर्‍या क्षमते मुळे ते आपल्याला कळू शकत नाही किंबहुना असे म्हणता येईल त्याची अनुभुती घेण्यासाठी आपल्या कडे योग्य अशी ज्ञनेंद्रिये नाहीत. एखाद्या जन्मापासुन आंधळ्या व्यक्तीला आपण लाल , हिरवा , मोरपंखी रंग कसे काय समजाऊन सांगणार ? कर्ण बधिर मुलास राग ‘यमन कल्याण’ कसा ऐकवणार ? डोळे / कान ही ज्ञानेंद्रिये असल्या खेरीज रंग / ध्वनी या अनुभूती येणारच नाहीत. आपल्याला दिसत नाही, ऐकायला येत नाही, वास नाही, स्पर्श नाही , चव नाही म्हणून आपण जरी याचे आस्तित्व नाकारले तरी ‘ते’ आहे हे सत्य आहे.

   लांबी + रुंदी + खोली + वेळ असे 4 मीती मधले विश्व म्हणजे सर्व काही आहे ही आपली समजूत मुळातच चुकीची आहे. पण हे वरच्या मिति / पातळी वरचे विश्व आपण अजुनही अनुभवू शकतो ! आपल्याकडे त्या क्षमता आहेत पण त्या बंद करुन ठेवल्या आहेत. त्या खोलण्याचे अनेक मार्ग आजही उपलब्ध आहेत . त्यासाठी काही साधना करावयास लागतात किंवा एखाद्या गुरुची कृपा लागते… पण काही वेळा केवळ अपघाताने किंवा योगायोगानेच कळत – नकळत आपण ‘त्या’ विश्वात प्रवेश करु शकतो… हा अपघातच असतो, तो घडण्यासाठी काही विविक्षित घटना एका विविक्षित क्रमाने घडावयास लागतात, जसे ‘आग’ लागण्यासाठी ‘इंधन (जळण्या योग्य वस्तू) + ऑक्सीजन + तापमान’ या तीन वस्तुंचा संयोग व्हावा लागतो.. यातला एखादा जरी घटक कमी पडला तरी आग लागत नाही. (ओली लाकडे पेटवायचा प्रयत्न करुन पहा !) किंवा लागलेल्या आगीतून या तीन पैकी एखादा जरी घटक दूर् केला तरी आग विझते (आगीवर पाणी / वाळू यासाठी तर ओततात !)

   मला जो अनुभव आला ती जागा अशीच एक ‘ट्रीगर पोईंट’ होता.. आवश्यक त्या गोष्टी जुळून आल्या आणि ‘बूम’ मी त्या वरच्या मितीत दाखल झालो. !

   या जगात अशा अनेक जागा आहेत तिथे काही गोष्टी आधीपासुनच उपलब्ध असतात (लाकडे रचून ठेवली आहेत , वारा जोरात वाहतो आहे आता फक्त एक ठिणगीची आवश्यकता आहे !) , उरलेल्या एक दोन गोष्टींची पूर्तता होणेच बाकी असते , त्या कोणी नकळत (किंवा एखाद्या तांत्रिकाने कळून सवरुन !) पूर्ण केल्या तर ती व्यक्ती पुढच्या मितीत खेचली जाते. आपण ऐकले असेल की जुनी अनुभवी माणसे अमूक ठिकाणी जाऊ नका (खास करुन तिठा) असे सांगतात याचे कारण हेच आहे. ओली बाळंतीण, अमावस्या (काही वेळा पौर्णीमा !), काही ‘वेळां’ याबद्दल बरेच बोलले जाते ते या अशा आलेल्या अनुभवातूनच !

   ‘तो’ अनुभव येण्यापूर्वी आणि नंतरही मी ‘त्या’ जागेवरुन अनेक वेळा अगदी रात्री बेरात्री सुद्धा गेलो होतो पण तसा अनुभव पुन्हा आला नाही, याचे कारण तो ‘ट्रीगर पॉईंट’ एक्साईट व्हावयासा काही तरी कमी पडले असावे. इतर अनेक त्यात तुम्ही स्वत: ही मोडता , असा अनुभव का आला नाही याचे हेच उत्तर आहे.

   सुहास गोखले

   0
   1. माधुरी लेले

    सर, सविस्तर उत्तराने समाधान झाले..आभारी आहे..

    0
 4. Anant

  श्री. सुहासजी,

  वाचताना अंगावर काटा आला. तुम्ही लिहिल्याप्रमाणे “हॉर्न वाजविणे ” हा ट्रिगर पॉईट ठरला, त्याच वेळी जर समोरून दुसरा स्कूटरवाला येत असता तर – हा अनुभव कुणाला आला असता – त्याला का तुम्हाला ? तसेच जेव्हा तुम्ही या अनुभवातून जात होता तेव्हा जर दुसरे कोणी त्या रस्त्यावरून आले असते तर त्यांना तुम्हाला मदत करता आली असती का ?

  तुमच्या लेखन शैलीला पुन्हा एकदा मनापासून दाद.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी त्यावेळी नकळत का होईना दुसर्‍या विश्वात , जे पाचव्या मितिपासून सुरु होते , गेलो होतो / ओढलो गेलो होते. हे असे होण्यासाठी काही पूर्वतयारी आधी पासुनच असावयास लागते आणि एक अचूक साधलेली वेळ. शेवट्ची आवश्यकता म्हणजे एक ट्रीगर , जो बर्‍याच वेळा एक ‘आवाज’ असतो, आवाजात (साऊंड) मध्ये जबरदस्त पोटेंशियल असते. ते किती ते त्या साऊंडच्या फ्रिक्वन्सी वर अवलंबून असते. ‘ओम कार ’ किंवा एका विषीष्ट लयीत आघात देत म्हणलेले मंत्र ही त्याची काही उदाहरणे आहेत. रामायण , महाभारतात साऊंड फ्रिक्वंसीचा वापर करुन साध्या गवताची काडीचे महाविध्वंसक हत्यार बनवले असे अनेक दाखले आहेत. आजच्या आधुनिक विज्ञानातले उदाहरण द्यायचे तर आपण वापरत असलेली अल्ट्रा साऊंड टेक्नोलॉजी.

   मी वाजवलेला स्कूटर चा हॉर्न ने नि:संशय ट्रीगर चे काम केले, आता याच वेळी दुसरा स्कूटर वाला आला असता (किंवा अन्य काही तिसरे त्या जागी असते) तर आपली मिती आणि ती वरची मिती यांची प्लेन्स क्रॉस होऊ शकली नसती , आणि मी त्या पाचव्या (का सहाव्या) मिती मध्ये गेलो नसतो.

   मी तो अनुभव घेत असताना म्हणजेच मी हायर डायमेन्शन मध्ये असताना तिथून कितीही वर्दळ झाली असती तरी काही फरक पडला नसता. त्यावेळी त्या जागे वर कोणी आले असते तर त्यांना मी दिसलोच नसतो.. कदाचित माझी स्कूटर पण त्यांना दिसली नसती. ह्या पाचव्या आणि त्याहून वरच्या डायमेन्शस मध्ये कोणतेही डोळ्याला दिसणारे आकार नसतात, दिसले तरी ते कमालीचे तरल आणि अस्थिर असू शकतात ! आपण जे डोळ्यांनी पाहतो ते आकार हा वस्तुत: आपला दृष्टी भ्रम आहे ! वरच्या मितीत यातले काहीच नसते … जे काही असते त्याला आपल्या वैज्ञानिक परिभाषेत ’ ‘एनर्जी फिल्ड’ असे काहीसे म्हणता येईल, जे आपल्याला सध्या ज्ञात असलेल्या इलेक्टो मॅगनेटीक किंवा रॅडीएशन फिल्ड्स पेक्षा फार वेगळे असते … विज्ञानाला याचा शोध अजून लागायचा आहे.

   सुहास गोखले

   0
 5. Suresh

  सुहासजी ,

  आपल्याला आलेला अनुभव नक्कीच अद्वितीय होता. तो नक्कीच अमानवी होता परंतु भीतीदायक किंवा भयंकर असे काही वाटले नाही कारण आपल्या बाबत जे घडले त्यात आपल्याला इजा करण्याचा किंवा आपला ताबा घेण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही. पण असा अचानक अनुभव तोही रात्रीच्या वेळी येणे म्हणजे थोडी भीती हि वाटणारच! परंतु मी म्हणेन की तुम्ही लकी होतात जेणेकरून तुम्हाला असा अनुभव मिळाला. May be it’s a divine will?

  आपले बाकीचे लेखही वाचले. नेहमीप्रमाणे छान आहेत. अजून असेच दर्जेदार लेख येवुद्यात.

  कृपया बाबाजी चे अनुभव हि लेखमाला पण पुढे सुरु ठेवावी. आज जसे काही थोड्या ज्योतीषांमुळे संपूर्ण ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे तसेच काही खोट्या बाबाजींमुळे गुरु-शिष्य परंपरा किंवा दैवी शक्ती असणारी खरी आणि genuine माणसे पण बदनाम आहेत आणि सुशिक्षित लोकांचा अश्या गोष्टींवर विश्वास कमी होत चालला आहे. आपल्या अश्या अनुभवांमुळे आपल्या भारतीय अध्यात्मात ३ dimension च्या पलीकडे जाऊन अनुभव घेवू शकणारी आणि तसे अनुभव दुसर्यांना दाखवणाऱ्या क्षमतेची माणसे अस्तीस्त्वात आहेत यावर विश्वास दृढ होईल आणि आपल्याच समाजाकडून अध्यात्मशास्त्राची हेटाळणी थोडीफार कमी होईल असे मला वाटते.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   बाबाजींची लेखमाला चालू आहे , त्यातले काही भाग सध्या मी एडीट करत असल्याने प्रकाशीत करु शकलो नाही. पण लौकरच ते भाग येतील.

   मला आलेला अनुभव मला अपाय करणारा नव्हता हे नक्कीच , मी चूकून त्या भूल भुलैयात सापडलो आणि केवळ एक चमत्कार म्हणून त्यातून सहीसलामत बाहेर पडलो.

   विज्ञानाच्या आकलना बाहेरच्या बर्‍याच गोष्टी आहेत , टेस्ला सारख्या शास्त्रज्ञांनी ते मान्य करुन त्याबाबतीत काही संशोधन केले आहे. असे अनुभव हे वन – ऑफ असल्याने ते पुन्हा आमच्या समोर करुन दाखवा या कॅटेगोरीत येत नाहीत त्यामुळे आजचे वैज्ञानीक / अंनिस / बुप्रा वाले ते मानायला तयार नाहीत. पण एक काळ असा यईल की हे सर्व मान्य होईल असे संशोधन सध्या चालू आहे.

   सुहास गोखले

   0
 6. Himanshu

  Do you have any information on whether a world with 3/2 or even 1 dimension exist? If yes, then is it possible to go to that dimension instead of higher dimensions?

  0
 7. Niranjan Joshi

  Dear Suhas Ji , This is interesting . Your experience is thrilling / out of world . Just wish to know if you have read foll. Marathi books :

  Maze Naav Ramakant Walavalkar by D. P. Khambete
  Viplava by Dr. Jayant Naralikar

  0
  1. सुहास गोखले

   श्री. निरंजनजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   आपण उल्लेख केलेली पुस्तके मी वाचलेली नाहीत. माझे बरेचसे वाचन इंग्रजी असल्याने ही पुस्तके माझ्या पाहाण्यात आली नसावीत. पण याची नोंद घेतली आहे , ही पुस्तके मिळवून वाचण्याचा प्रयत्न जरुर करेन

   सुहास गोखले

   0
 8. Snehal N Kothari (Male)

  Sir Above incidence must be related to Teleportation or Time travelling
  A lot of videos are available on YouTube
  Specially
  1) Running car disappear suddenly ( caught on CCTV)
  2) A 30 yr man sudden and unknowingly travel in future and meet himself whose age was 60 ( evidence …. Same face & same tattoo mark on hand)
  3) 2 lady teachers suddenly went in past ( 20 .. 25 yrs back) at same place and after few hrs came back to present world.
  Thanks sir for sharing such incidence
  Amanviya Gudh Akalpaniya and etc etc

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.