ही घटना पूर्णपणे सत्य आहे , खोटे काही नाही. माझा स्वत:चा अनुभव आहे.

हा अमानवी किस्सा माझ्याच बाबतीत घडला आहे. आजही हा किस्सा आठवला की अंगावर काटा येतो.

१९९४ चा मार्च महीना असावा , त्यावेळी मी कोथरुड ला गणंजय सोसायटीत (आझादवाडी -सुतार दवाखाना परिसर) राहात होतो, लग्न झालेले नव्हते त्यामुळे मस्त मजेत एकटाच सडाफटिंग आयुष्य जगत होतो (गेले ते दिन गेले !) .

एके दिवशी मी माझ्या मित्राकडे जो तेव्हा वारज्याला रहात असे त्याच्याकडे संध्याकाळचा असा गेलो होतो, माझा मित्र एक सर्कीट असेंबल करत होता पण त्यात काही फॉल्ट असल्याने त्याने मला मदतीला बोलावले होते (मी त्यातला एक्स्पर्ट ना!) , आम्ही दोघे बराच उशीरा पर्यंत त्या सर्किट मधला फॉल्ट हुडकत बसलो होतो. शेवटी एकदाचा फॉल्ट सापडला आम्ही जाम खुष झालो. हे होई पर्यंत घड्याळात नऊ वाजले होतो. मित्राने मला आग्रह केला. आता मेसला नाही जायचे, इथेच जेवण करुन जा, नाही तरी उद्या गुरुवार आहे , सुट्टीच आहे , मस्त जेवण करु , गप्पा हाणू निवांतपणे. मला काय , मी घरी जाऊन तरी काय करणार ?

मित्राच्या आईने फस्क्लास जेवण बनवले होते मी अगदी ओ येईस्तो जेवलो, ती माऊली पण खूष झाली. थोडा वेळ टी.व्ही. बघून आम्ही टेरेस वर खुर्च्या टाकून निवांत गप्पा हाणत बसलो. बर्‍याच दिवसांनी असा योग जुळून आला होता आणि दुसरे दिवशी गुरुवारची सुट्टी असल्याने काही गडबड नव्हती… दोन चार कप चहा आणि वर मस्त गाय छाप चे गिलावें मग काय विचारता, त्यात जोडीला मित्राचा थोरला भाऊ , मस्त गप्पा रंगल्या..

मध्येच मी घड्याळ्यात पाहीले … रात्रीचा चक्क १॥ वाजला होता.. चहाचा मारा झाल्या मुळे झोप अशी नव्हतीच डोळ्यावर पण आता निघायलाच पाहीजे याहून जास्त उशीर नको म्हणून मी मित्राला म्हणालो..

“कटतो आता.. खूप उशीर झाला”

“आता रात्री इतक्या उशीरा कोठे जातोस घरी ,पड इथेच , उद्या सकाळचा चहा मारुनच जा”

“नाही रे , उशीरा का होईना घरी जाऊन पडलेले बरे, म्हणजे दुसर्‍या दिवशीची कामे सुरळीत चालू होतात. त्यातच दर गुरुवारी सकाळी ८ वाजता पं. अरविंद गजेंद्रगडकरां कडे जायचे  असते, पाच मिनिटें उशीर झालेला त्यांना खपत नाही”

(तेव्हा मी पं. अरविंद गजेंद्रगडकरां कडे शास्त्रीय संगीताचे धडें गिरवत होतो)

मित्राने खूप आग्रह केला, पण माझा ही नाईलाज होता ..

पण नंतर कधीतरी अशीच मैफल जमवू म्हणत मी शेवटी तिथून निघालो.

तेव्हा माझ्याकडे बजाज सुपर स्कूटर होती, वारज्या हून माझ्या घरा कडे यायचा सगळ्यात जवळचा मार्ग होता तो डहाणूकर कॉलनीतून. डहाणूकर सर्कल वरुन तसेच पुढे आले की डेड एंड येते कारण समोर कमिंस इंडीयाचे (जुनी किर्लोस्कर कमीन्स) भव्य गेट आहे. इथे आपल्याला डावी कडे गांधीभवन रस्त्यालाच वळावे लागते. उजव्या बाजूला रस्ताच नाही , सगळ्या हौसिंग सोसायट्या आहेत.

हा गांधीभवन रस्ता कमिन्स ला वळसा घालून एका टी –जंक्शन ला येतो, त्याची एक बाजू  महात्मा नगर / गोपीनाथनगर कडे जाते आणि टी मधला दुसरा रस्ता सरळ गणंजय सोसायटीतून पुढे जात स्टेट बँक ऑफ हैद्राबाद समोरुन , आझाद नगर ,सुतार दवाखाना रस्त्याला जाऊन मिळतो मिळतो. माझे घर या गणंजय सोसायटी मध्ये असल्याने मी सरळ महात्मा सोसायती कडे न जाता , टी –जंक्शनला उजवी कडे वळायचो.

त्या दिवशी वारज्यातून मी निघालो तेव्हा अंदाजे रात्रीचे १:४५ वाजले असतील, मला कमीन्स च्या गेट पर्यंत पोहोचायला दहा एक मिनिटें तरी नक्कीच लागली असतील. सगळी कडे पूर्ण शांतता, भटकी कुत्री सोडली तर रस्त्यावर चिटपाखरु सुद्धा नव्हते. अर्थात माझ्यासाठी हा रस्ता नेहमीचाच असल्याने मला ते काही जाणवलें नाही.

हा गांधीभवन रस्ता मस्त आहे एकदम सिनेरीक म्हणतात तसा, कमीन्स च्या गेटला उजवी घालून पुढे आले की डाव्या हाताला अपार्टमेंट्स आणि उजव्या हाताला कमीन्स. साधारण ३०० मीटर पुढे आले की रस्ता उजवीकडे वळतो. आता डाव्या हाताला अगदी जंगलाचा फिल देणारे ‘स्मृतीवन’ आणि उजव्या हाताला कमीन्स ची मागची बाजू. इथून साधारण ६०० मीटर पुढे आले की रस्ता एक लहानसे अर्धवर्तुळाकार पण शार्प असे वळण घेतो .. इथे दोन्ही बाजूला अगदी डेन्स झाडी आहे, एक लहान ओढा रस्त्याला ओलांडून कमीन्स च्या कॅम्पस मध्ये गडप होतो, ओढ्या वर एक कल्व्हर्ट आहे. तिथेच एक उंच वाढलेले विचित्र पसारा असलेले झाड होते (त्या वेळी होते , सध्याचे काही माहीती नाही)


घटना नेमकी इथेच घडली …

 

मी येत होतो तो मार्ग पिवळ्या बाणांनी दाखवलेला आहे, घटना जिथे घडली तो भाग लाल बाणाने दाखवली आहे.

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

27 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद हिमांशुजी ,

   हे काहीच नाही , अजून मी OBE आऊट ऑफ बॉडी एक्स्पीरीयन्स बद्दल काहीच लिहले नाही… यावर नक्की लिहणार आहे शिवाय गोविंड आचार्यांनी सांगीतलेले पण लिहावयाचे आहे , ते वाचले तर बर्‍याच जणांना घाम फुटेल .

   मी काहीसा धाडसी आणि चौकस असल्याने असे अनुभव आले त्यावेळी मी कमालीचा घट्ट आणि खंबीर राहू शकलो . पूढे मला काही साधना शिकून्ही घेतली , संमोहन शास्त्राचा ही अभ्यास केला . आजही काही लहान सहान अनुभव येत असतात.

   सुहास गोखले

   0
 1. स्वप्नील

  पुढे उत्सुकता आहेच सुहासजी . पण पुढे बाबाजींचा अनुभव पण पूर्ण करा ना !! आऊट ऑफ बॉडी एक्स्पीरीयन्स बद्दल पण उत्सुक आहे . त्याबद्दल वाचन खूप झालंय. प्रा.अ .कृ.देशपांडे यांचे सूक्ष्म देहाने प्रवास आणि मृत्यू नंतरचे जीवन या पुस्तकात माहिती छान दिली आहे . बाकी इतर Catagary मध्ये लोम्संग राम्पा आहेतच .

  0
 2. स्वप्नील

  …….आणि तुमचे सगळेच अनुभव वाचायला उत्सुक आहोत !!!

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   बाबाजी सध्या विश्रांती घेत आहेत , पण लौकरच पुढचे भाग येतील ..

   OBE चे अनुभ्व मी स्वत: घेतले आहेत , त्यावर मी बरेच वाचले आहेत , बरेच प्रयोग केले आहेत , यावर लिहण्या सारखे बरेच आहे.
   या बाबतीत्त भारतीय लेखकांचे लिखाण मी फारसे वाचले नाही (बहुदा हे लिखाण एखाद्या पाश्चात्य लेखकाच्या लिखाणाचा अनुवाद किंवा चक्क चोरी असते असा माझा अनुभव आहे!) मी मुळ इंग्रजी लिखाण वाचतो , या विषयावरच्या अनेक परदेशी अभ्यासकांशी माझा नेहमी कॉन्टॅक्ट असतो, इमेल्स ची देवाण घेवाण असते. असो.. या विषयावर नक्की लिहेन..

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    सर तुमचा बाबतीत स्वतःचा अभ्यास आहेच आणि पाश्चिमात्य लोकांशी आपला संपर्क आहे . मस्तच…..!! त्यामुळे आणखी Advance and Scientific माहिती मिळत असेल

    0
 3. Himanshu

  I’ve read a few NDEs (Near Death Experiences). But I kind of don’t believe them. If someone says I saw lord Krishna or Jesus at the end of a tunnel then that was most probably a dream with you seeing your beliefs. I may be wrong though.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी ,

   आपल्या एक लक्षात आले असेल , सगळे NDE एका सारखे आहेत … स्वत:च्या बॉडी पासुन अलग होणे… आपली बॉडी , आजूबाजूचे लोक (कुटुंबिय , डॉक्टर्स , नर्सेस ..इ) … मग एखाद्या टनेल मधला प्रवास… टनेल च्या दुसर्‍या टोकाला अत्यंत ब्राईट प्रकाश दिसणे … तिथे एका आकारहीन व्यक्तीने केवळ विचार प्रक्षेपणातूण स्वागत करणे …

   हे अनुभव सांगीतलेल्या लोकां पैकी बरेचसे जनसामान्यातले होते त्यांनी असे दुसर्‍यांचे NDE ऐकले / वाचले असण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजे त्यांनी जे अनुभवले / स्वप्न पाहीले ते त्यांचे स्वत:चे ओरजीनल फर्स्ट हँड अनुभव आहेत.. असे असताना सगळ्याच्याच अनुभवात इतके कमालीचे साम्य कसे काय असू शकेल.. एक दोन अनुभव केवळ योगातोगाने एका सारखे असू शकतील , बायस्ड असू शकतील पण सग़ळ्यांचे अनुभव एकच असणे हे काय असू शकेल.. ?

   मला वाटते की टनेल, प्रकाश हा भाग अगदी बरोबर नंतर मात्र जेव्हा आकारहीन व्यक्ती हा भाग येतो तेव्हा ज्याने त्याने त्याच्या धार्मिक कंडीशनिंग नुसार त्याला यम, चित्रगुप्त, जिझस, अल्ला अशी नावे दिली असावीत ….

   असो.. मी यावर काही तरी लिहावयाचा प्रयत्न करेन..

   सुहास गोखले

   0
 4. Sai Ingale

  सर,
  तुमचे सर्वच लेख आमची खूप उत्सुकता वाढवत आहेत . पुढील भागाची चातका सारखी वाट पाहत आहोत. OBE बद्दल जर जास्तच. कारण तो एकदम मस्त विषय आहे.

  0
 5. स्वप्नील

  बरोबर सुहास जी परदेशात सूक्ष्म देह प्रक्षेपण यावर खूप संशोधन सुरु आहे . आणि याची सत्यता हि त्यांना आता अनुभवास येत आहे . सूक्ष्म देहाने संचार / प्रवास करून आलेल्या व्यक्तीने जर त्याच्याशी संबंधित व्यक्ती अमुक एक वेळी अमुक अमुक गोष्ट करत होती आणि या या ठिकाणी होती हे तपशीलवार सांगतात त्यामुळे शंकेला जागा राहत नाही .

  0
  1. सुहास गोखले

   बरोबर आहे स्वप्नीलजी , आपल्या कडे दुर्दैवाने असे शिस्तबद्द संशोधन होत नाही. खरे तर आपल्या कडे पूवी ऋषी मुनिंनी बरेच काम करुन ठेवले आहे पण ते सगळे धार्मिकतेच्या विळख्यात बंदिस्त झाले आहे , मूळ तत्व / थिअरी बाजूला होऊन पोकळ कर्मकांड आणी पाखंडच वाढले आहेत. ज्योतिषातही असेच पाहीले जाते जे काही शिस्तबद्ध संशोधन होते आहे ते पाश्चात्यांच्या कडेच.

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    खरेच सुहासजी आपल्याकडे टोकाची भूमिका घेतली जाते . एकतर अन्धश्रधा किवा अतिरेक केला जातो किवा सबकुच झूट है असा पवित्र घेतला जातो . मात्र पाश्चात्य देशात आपण म्हणता तसे शिस्तबद्ध संशोधन केले जाते . माणसाने नकारात्मक व होकारात्मक दोन्ही श्रद्धा टाळून Neutral राहून अभ्यास किवा संशोधन केले पाहिजे .आपल्याकडे पुण्याचे डॉ.प.वि .वर्तक यांनी जाहीर रित्या यावर आव्हान देऊन सदर प्रयोग सिद्ध केला होता . त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात केला आहे .

    0
    1. सुहास गोखले

     श्री. स्वप्नीलजी ,

     म्हणूनच मी ज्योतिष विषयाच्या बराचसा अभ्यास पाश्चात्य ग्रथांवरुनच केला आहे.

     सुहास गोखले

     0
 6. माधुरी लेले

  कमालिची उत्सुकता लागून राहिली आहे पुढे वाचायची..कारण तुम्ही वर्णन केलेल्या रस्तयाने अनेकवार ये जा केली आहे.

  0
 7. Anant

  श्री. सुहासजी,

  जबरदस्त !
  मी याच रस्त्याने अशाच रात्रीच्या वेळी अनेक वेळा प्रवास केला होता, साधारणपणे ८९-९० च्या आसपास मी पण गणंजय सोसायटीत राहत होतो, त्यावेळी महात्मा सोसायटीच्या मागे काही नव्ह्ते. त्यामुळे पुढील भागाची उत्सुकता अजून ताणली गेली आहे.

  हा विषयच मुळात इतका वेगळा आणि गहन आहे आणि त्यावर अधिकाराने बोलणारे खूप थोडे आहेत, त्यात तुम्ही एक. याविषयावर बोलण्यासाठी एकतर प्रचंड अभ्यास आणि दुसरे म्हणजे काही प्रमाणात दैवी देणगी – तुमच्याकडे दोन्ही आहेत त्यामुळे तुमचे लेखन वाचताना सखोल माहिती मिळते. तुमच्याकडून याविषयावर वाचायला मनापासून आवडेल.

  धन्यवाद,
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री अनंजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.’तो’ रस्ता आता बराच वर्दळीचा झाला आहे, नंतरच्या काळात तिथेच परांजपेंची वुड्लॅन्ड स्किम झाली .. मी कित्येक वर्षात त्या भागात फिरकलेलो नाही. पण मला उत्सुकता आहे.

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद उमेश जी,

   मी मोठ्या उत्साहाने ‘कोणा एकाची..’ लिहायला घेतली पण अवघ्या 15-20 लोकांनी ती वाचली , माझ्या लेखांना आत्ता पर्यंत मिळालेला हा सगळ्यात पुअर रिस्पॉन्स ! म्हणून काही काळ त्या मालिकेतले लेखन स्थगित केले आहे.. पुढे मागे फक्त ईमेल म्मर्फत ते पाठवून द्यायचा विचार करत आहे.

   सुहास गोखले

   0
 8. Avinash

  मला तुमच्या गूढकथा अतिशय आवडतात. मागच्यावेळेसही मी ब्लाॅगवर वाचल्या आहेत. पण माझ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत; कां ते कळल नाही.असो तरीपण मला त्या वाचतांना आनंदच होतो.
  ती रेल्वेप्रवासात भेटलेल्या व्यक्तीची गूढकथा मात्र अर्धवट राहिली आहे.

  +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.