‘काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे. पण तो तितकाच अवघड ही आहे, ज्योतिर्विदाची बाजारातली सगळी ‘पत’ या एकट्या ‘कालनिर्णय’ करण्याच्या क्षमते वर व त्याच्या अचूकते वर अवलंबून असते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष असा फार मोठा गैर समज निदान आपल्या भारतात तरी आहे .

मी ‘गैर समज’ हा शब्द मोठ्या काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वापरला आहे कारण ‘काल निर्णय’ हा ज्योतिषाचा केवळ एक लहान हिस्सा आहे, जेवणानंतर दिली जाणारी एक ‘स्वीट डिश’ समजा. ते मुख्य जेवण नाही. खरे तर ज्योतिषशास्त्राची खरी ताकद व त्याच्या सुयोग्य उपयोग भारतियांना कळलाच नाही असे खेदाने म्हणावे लागेल. ‘विवाह कधी होईल’ हा प्रश्न जरुर असावा पण त्याहूनही तो ‘विवाह सुखाचा होईल का ‘ हे जास्त महत्वाचे नाही का? पण सध्या दुर्दैवाने ‘कधी?” या कालनिर्णयात्मक बाबीलाच नको ईतके महत्व दिले जात आहे आणि मुख्य मुद्दा बाजूलाच पडतो ! त्यातच ‘के.पी. (कृष्णमुर्ती पद्ध्ती) ’ वाल्यांनी फक्त ‘काल निर्णया” वर (Event prediction) अतिरेकी जोर देऊन ज्योतिषशास्त्राच्या मूळ उद्देश्यालाच तिलांजली दिली आहे!

पण आज एखाद्याला ज्योतिष हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर ‘मला काय वाटते / रुचते ‘ त्यापेक्षा ‘ग्राहकाला काय वाटते / रुचते ‘ हे या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे लागते आणि म्हणूनच ‘काल निर्णय ‘ तोही ‘अचूक’ करणे भाग पडते.

या सर्वाला एक कारण आहे. समाजात 90% लोकांची लग्न होतातच मग पण एकाद्याला ‘होईल रे तुझे लग्न , का काळजी करतोस ‘ असे सांगून त्याचे समाधान होईल का? लोकांना लग्न,नोकरी, संतती,परदेश गमन अश्या मोठ्या ठळक घटना घडणार आहेत का आणि असल्यास त्या केव्हा घडणार आहेत यात जास्त उत्सुकता असते, एव्हढेच नव्हे तर प्रवास, आजारपण , घर-जमिनीचे व्यवहार, कोर्टकचेर्‍यांचे निकाल या सारखे प्रश्न ही सतावत असतात त्यांचीही उत्तरे जाणून घ्यायची कमालीची उत्सुकता असतेच.

ह्या झाल्या आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या घटना पण ‘आजचा माझा दिवस कसा जाईल’ , ‘आजची माझी बिझनेसची बोलणी यशस्वी होतील का?’ अशा दैनंदिन जीवनातल्या घटनां बद्दलही तितकीच उत्सुकता असते, वृत्तपत्रात छापलेले राशी भविष्य भाकड असते हे माहीती असूनही वाचले जाते ते केवळ या उत्कंठेपोटीच !

भविष्यकथना साठी लागते ती जातकाची जन्मपत्रिका. एकदा ही जन्मपत्रिका तयार झाली की मग त्याचा अभ्यास (अ‍ॅनॅलायसिस) केले जाते वा त्यानंतरच भविष्य सांगणे शक्य होते.

जन्मपत्रिकेचा हा अभ्यास दोन अंगाने केला जातो. स्टॅटिक (स्थिर) व डायनॅमिक (बदलता).

‘स्टॅटिक’ अंगाने विचार करताना जातकाच्या जन्मवेळेच्या ग्रहांची ग्रहस्थिती म्हणजेच ग्रहांची पत्रिकेतली स्थाने वा राशी यांचा विचार होतो, प्रथम ग्रहांचे बलाबल ठरवले जाते व नंतर ग्रहांची स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत फळे तसेच भावेशांची फळे, तसेच या ग्रहांमध्ये होत असलेले ग्रह योग या सार्‍याचा सखोल अभ्यास होतो. या अभ्यासातून त्या व्यक्तीच्या एकंदर आयुष्याचे चित्र आपल्या समोर उभा राहते – जातकाचे व्यक्तीमत्व, शरीर बांधा, व्यंग, हुषारी कर्तबगारी, स्वभाव, आरोग्य, पैसा व प्रसिद्धी, शिक्षण, नोकरी-धंदा ,कला गुण, वैवाहिक जीवन, संतती, वृद्धापकाळ, घात अपघात, मृत्यू ईतकेच नव्हे तर जातकाचा गतजन्म व पुढचा जन्म याबाबतीही काही आडाखे बांधता येतात. म्हणजेच ही जणू काही जातकाच्या उभ्या आयुष्याची एक प्रकाराची ब्लू प्रिंटच म्हणायची. यालाच ‘नाताल प्रॉमिस’ म्हणतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर:

स्थान गत :

“दशमातला रवी हा एक प्रकारचा राजयोग आहे,मोठी प्रतिष्ठा , मानसन्मान, दर्जा, अधिकार प्राप्त होतो”- व.दा. भट

स्थान + राशी गत:

“दशमस्थानातला कर्केचा रवी कणखर विरोधी नेता बनवतो, हाच रवी जर वृश्चिकेत असेल तर व्यक्ती करारी, कर्तबगार असते पण सत्तेची लालची वा बेपर्वा असू शकते” – द्वारकानाथ राजे

नक्षत्र गत:

“रवी मृग नक्षत्रात असेल तर व्यक्ती आळशी कामचुकार असते, अति चिकित्सा व धरसोडवृत्ती यामुळे नुकसान होते, अपयश येते. आयुष्यात स्थिरस्थावरता येणे कष्ट्साध्य बनते.” म.दा. भट

भावेशात्वा नुसार:

“जर रवी धनेश (द्वितीयस्थानाचा स्वामी) असेल तर दृष्टीदोष, नेत्रविकार असतात. रवी धनेश असून फारच दूषित असेल तर अशी व्यक्ती समाजाने गुन्हेगारी स्वरुपाचे मानले गेलेले , हलके व्यवसाय करते, त्यात त्या व्यक्ती पकडल्या जातात, न्यायालयाचे खेटे , शत्रुकडून धननाश,कायम हलक्या दर्जाची नोकरी, सततचे दारिद्र्य, वडिलोपार्जित संपत्ती असल्यास ते नष्ट होणे अशा प्रकारची फळें मिळतात” – भृगु संहिता

 ग्रहयोगानुसार:

रवीचा मंगळाशी केद्र योग:

Failure cause by too heavy demands made upon oneself and upon others, over strain, a strained relationship with other persons. Upsets (cardiac troubles)- Reinohold Ebertin

Inability to relax, Quarrels and contentions, Dissidence, Hyper-activity, Brutality, Violence, Over strain, Hastiness, Many upsets, Cardiac troubles,  Headstrong. A.T. Mann

अत्यंत तापट, वागण्यात निधड्या छातीचे, बेफाम , हट्टी, साहसी, अ‍हंकारी, शस्त्रक्रिया, हाडांची मोड्तोड, अपघात, तिक्ष्ण हत्याराने ईजा, रक्तदाब, ह्र्दयविकार … व.दा. भट

व.दा. भटांनीही विवाहा संदर्भात स्टॅटीक अ‍ॅनॅलायसिस साठी उत्तम लिखाण केले आहे, नमुन्यादाखल:

“उशीरा विवाह होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सप्तमात शनि, मंगळ, हर्षल, नेपच्युन सारखे ग्रह असणे, रवी , मंगळ हे हर्षल / शनि च्या कुयोगात असणे, 75% पत्रिकांत चंद्र वा शुक्र हा शनीच्या अशुभ योगात असतो, पंचमात शनी हा देखिल विवाहास विलंबाचे एक प्रमुख कारण असते, वक्री शनी सप्तमात किंवा चंद्र शुक्रच्या केंद्र योगात/ प्रती योगात असता विवाहास विलंब होतो, चंद्र , र्वी, शुक्र हे अशुभ ग्रहांच्या युतीत असणे, चंद्र निर्बली असून सहा, आठ, बारा या स्थानी पापग्रहांच्या युतीत असणे, शुक्र नीच राशीत असणे, चंद्र – शुक्रावर शनी – मंगलाची दृष्टी असणे….” – व.दा. भट

आरोग्य विषयक ‘स्टॅटीक अ‍ॅनालायसिस’ चे एक उत्तम उदाहरण देतो:-

“… In this chart, the Moon rules the 6th house and is exactly semi-square the Sun who is weak by Sign and still more by interception in the physical 1st, so that there is constitutional malfunction. But we need at least there afflictions involving the body before we can diagnose the sickness as serious. the other two are the malefic Saturn semi-square the Ascendant and the presence of two malefic Uranus & Neptune , in the 1st house. This clearly indicates a great disorder that began at conception, and established itself during 9 month gestation period causing an abnormal health condition at birth leading to some deformity later. There is more in store, Chronic – Saturn (rheumatism) semi-square Ascendant , acute and inflammatory Mars (arthritis) squaring the Ascendant; Uranus (paralysis) in the first house also squaring ‘the part of sickness’ , then we see Neptune (abnormality) conjunct the Ascendant , all together conspired against the native physically. Mars in the 8th and elevated over the Sun and Moon might give acute arthritis as the cause of death!

(It was seen that the native indeed got crippled by rheumatic arthritis and after a heavy paralysis attack confined to a wheel chair for rest of his life and died because the same reason as MS Jacobson had predicted almost 40 years before!!!) ”- Ivy M Goldstein Jacobson.

स्वभावा बद्दल आणि कार्य पद्धती वरचे ‘युरेनियन अस्ट्रोलॉजि’ वर आधारित स्टॅटीक अ‍ॅनॅलायसिस :-

“The Sun is the individual’s basic source of energy and its function in the psyche is to focus and to integrate. Thus the quality and nature of someone’s Sun as described by the midpoint s to it will tell you a lot about how they ‘organize and integrate’ their life and the energies they will use in their basic striving towards self-expression. Here we see that the Sun is configured with Neptune and the MC – it is on the Neptune / MC midpoint. This will suggest someone who will seek to ‘make a career’ or use the qualities of Neptune to establish themselves in the world. The qualities of Neptune will merge with the Sun and be projected as some form of goal or aim in that person’s life. There is another midpoint for the Sun, Sun = Mars / MC; this says the same sort of things except that it is now Mars that is going to be used to in a similar manner. Martian qualities will come strongly to the force in the individual’s striving to manifest himself in his chosen direction. His ego is consciously (MC) tied in with his personal energy (Mars) and wish to express it in the self-integration process (Sun)” –Michael Harding & Charles Harvey

यावरुन आपल्या लक्षात आले असेल की ‘स्टॅटीक अ‍ॅनालायसिस’ मधून ‘विवाह होणार’, ‘संतती योग आहे’, ‘अपघात संभवतो’ , ‘धनलाभ होईल’ असे जरुर सांगता येते म्हणजेच ‘काय?” हे सांगता येते पण ‘कधी?” ह्याचे उत्तर ‘स्टॅटीक अ‍ॅनालायसिस’ देऊ शकत नाही. पण लोकांना तर घटनांचा कालनिर्णय हवा असतो त्यातही वर्ष –महिना- दिवस आणि शक्य झाले तर तास- मिनीट-सेकंद यासारखा नेमके पणा अपेक्षित असतो!

याची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला जन्मपत्रिकेचा ‘डायनॅमीक’ अभ्यास करावा लागेल. किंबहुना ‘डायनॅमिक अ‍ॅनॅलायसिस’ केल्या शिवाय असा कालनिर्णय करणे केवळ अशक्य आहे ! आजच्या मितीला कालनिर्णायासाठी असंख्य पद्धती वापरल्या जात आहेत पण अशा प्रत्येक , हो , अगदी प्रत्येक पद्धतीत कोणते ना कोणते ‘डायनॅमिक अ‍ॅनॅलायसिस’ वापरले जातेच . मग ती आपली परंपरागत ज्योतिष पद्धती असो वा कृष्णमुर्ती पद्धती !

‘स्टॅटीक’ अ‍ॅनॅलायसिसची थोडीफार कल्पना आली असेल पण हे ‘डायनॅमीक’ अ‍ॅनॅलायसिस काय आहे?

भाग-2 मध्ये पाहू या…

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
  1. swapnil kodolikar

    सर कर्केचा गुरु फसवा असतो म्हणतात ते खरे आहे का ? तो वाईट फळे देतो असे म्हणतात .

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.