‘गेल्या दोन भागांत आपण हे पाहीले की ‘डायनॅमीक अ‍ॅनॅलायसिस’ शिवाय आपल्याला कोणताही कालनिर्णय करता येणार नाही. यातला ‘डायनॅमीक’ हा शब्द आपल्याला सुचवतो की यात काहीतरी ‘अ‍ॅक्शन’ आहे, कोणती तरी ‘हालचाल / मुव्हमेंट’ आहे. काहीतरी बदलतयेय.

काल निर्णय’ या लेख मालिकेतला हा तिसरा भाग . हा भागातले विवेचन समजण्यासाठी या मालीकेतले पहिले दोन भाग वाचणे महत्वाचे आहे, ते आपल्याला ला इथे वाचावयास मिळतील:

कालनिर्णय भाग -1

कालनिर्णय भाग -2

गेल्या भागात आपण बघितले की ही ‘अ‍ॅक्शन’ /‘हालचाल’ /’ मुव्हमेंट’ , वेगवेगळ्या मार्गांनी विचारात घेतली जाते. चंद्र आकाशात पृथ्वी भोवती फेर्‍या’ घालतो, तसेच इतर ग्रह ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात, ही झाली आपल्याला हवी असलेली ‘अ‍ॅक्शन’ / ‘हालचाल / मुव्हमेंट’. ही ‘अॅक्शन’ नैसर्गिक आहे, कालबद्द आहे, नियमित आहे, म्हणुनच आपण गेल्या ह्जारो वर्षापूर्वी ‘गुरु ‘ ग्रह आकाशात नेमक्या कोणत्या जागी होता हे पाहू शकतो आणि आणखी हजार वर्षांनी या ‘गुरु’ आकाशात कोठे असेल हे अगदी अचूकपणे ठरवु शकतो.सर्व आकाशस्थ ग्रहांच्या अशा कालबद्ध भ्रमणांचे तक्ते (टेबल्स) आपण बनवतो , त्याला ‘एफेमेरीज’ म्हणतात. आपल्या कडच्या पंचांगात सुद्धा आगामी एक वर्षाच्या कालावधीत होणारी ग्रह स्थिती दिलेली असते.

ही झाली नैसर्गिक ‘हालचाल / मुव्हमेंट’, जी कालनिर्णया साठी आवश्यक असते. पण नुसतेच ‘काहीतरी हालतेय, काहीतरी बदलेय’ एव्हढ्यावरुन आपल्या हाती काही लागणार नाही, म्हणजेच ह्या ‘काहीतरी बदलणार्‍या ‘ गोष्टीचा ‘कोणत्या तरी स्थिर’ गोष्टींशी मेळ घातल्या शिवाय या ‘हालचाल / मुव्हमेंट’ चा आपल्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होणार आहे हे लक्षात येणार नाही, नुसती ‘अॅ्क्शन / हालचाल / बदल’ हे संदर्भ नसेल तर निरर्थक आहे. आपल्याला काहीतरी  ‘संदर्भ / रेफारन्स/ सुरवात / स्टार्टिंग पॉईंट ‘ हवा असतो, त्यासाठीच ह्या नित्य क्रमाने बदलणार्‍या ग्रहस्थितीचा आपल्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहस्थितीशी मेळ घातला जातो. म्हणजेच आपल्या जन्माच्या वेळेचा ग्रहस्थितीचा स्क्रिन शॉट व आता या वेळेला आकाशातल्या ग्रहस्थितीचा स्क्रिनशॉट यांचा एकत्रित विचार केला जातो. हा विचार ‘ग्रह गोचरी / ट्रांसिट’ पद्धतीत कसा करतात व त्यावरुन ‘काल निर्णय’ कसा करतात हे आज आपण बघणार आहोत.

समजा एखाद्याच्या जन्माच्या वेळी जन्मकुंडलीत (जन्माच्या वेळेचा ग्रहस्थितीचा स्क्रिन शॉट ) ‘गुरु’ मेष राशीत , लग्नात (प्रथम स्थान) असून तो चतुर्थ स्थानातील कर्केतल्या मंगळाशी केंद्र योग करत आहे. जन्मानंतर साधारण तीन वर्षानंतर गुरु 3 राशी (मेष-वृषभ- मिथुन) ओलांडून कर्केत येईल.( आकाशातल्या ग्रहस्थितीचा स्क्रिनशॉट ) त्यावेळी हा कर्के तला गुरु जन्मपत्रिकेतल्या कर्के तल्या मंगळाशी युती करेल.

इथे कोणी विचारेल की जसा गुरु राशी ओलांडत पुढे सरकला तसा ‘मंगळ’ ही पुढे गेला असेल ना? अगदी बरोबर , तो तसा पुढे नक्कीच गेला असणार पण ‘ग्रहगोचरी’ चा अभ्यास करताना हे महत्वाचे की आपण एक ग्रह (गुरु) गोचरीचा (ट्रांसीट) घेतला आहे तर एक ग्रह (मंगळ) हा जन्मस्थ (नाताल) घेतला आहे. आपण मंगळ (गोचरीचा /ट्रांसीट) व गुरु (जन्मस्थ /नाताल) घेऊन ही विचार करु शकतो . पण हे दोन्ही वेगवेगळे परिणाम आहेत, जरी दोन्ही स्थिती मध्ये ग्रह (मंगळ व गुरु) तेच असले तरी कोण जन्मस्थ आहे व कोण गोचरीचा यावरुन दोन वेगवेगळ्या केसेस तयार होतील व त्यांचा स्वतंत्र विचार करावा लागतो.

दोन्ही ग्रहांच्या गती (स्पीड) मध्ये फरक असल्याने या केसेस वेगवेगळ्या वेळी तयार झालेल्या पाहावयास मिळतील, आपण घेतलेल्या उदाहरणात: गोचरी चा गुरु – जन्मस्थ मंगळ – युती हा योग दर बारा वर्षांनी होणार, कारण मंगळ स्थिर आहे, गुरु बद्लता आहे, गुरु सरासरी बारा वर्षांत सर्व राशींमधले एक भ्रमण पूर्ण करतो. या उलट , जन्मस्थ गुरु – गोचरीचा मंगळ – युती हा योग साधारण पणे दर दीड वर्षांनी होणार, कारण गुरु स्थिर आहे, मंगळ बदलता आहे, मंगळ सरासरी दीड वर्षांत सर्व राशींमधले एक भ्रमण पूर्ण करतो.

आपण घेतलेल्या उदाहरणातल्या जातकाला वयाच्या तिसर्‍या वर्षी गुरु – मंगळाच्या युतीची काही फळें मिळण्याची शक्यता आहे. जातकाचे मेष लग्न असल्याने आता गोचरीने गुरु कर्केत आल्याने, चौथ्या भावात आला आहे त्यामुळे ‘गुरु -चौथ्या भावात’ असताना ज्या प्रकारची फळे मिळतात तशी काही फळें त्या जातकाला वयाच्या तिसर्‍या वर्षी मिळतील. त्याचप्रमाणे गुरु आता कर्केत आल्यामुळे ‘कर्क’ राशीचा गुरु वर होणारा प्रभाव ही विचारात घ्यावा लागतो कारण प्रत्येक ग्रहाची एक स्वरास , उच्च रास , नीच रास असते, ग्रह नीच राशीत असताना त्याचा प्रभाव कमी होतो.

वरील उदाहरणातून आपल्या काय लक्षात आले हे सांगू शकाल?

 1. एक ग्रह जन्मस्थ व दुसरा ग्रह गोचरीचा.
 2. गोचरीच्या ग्रहाची स्थिती त्याच्या नैसर्गिक भ्रमण गती मुळे जी काही सध्या आहे ती स्थिती.
 3. दोन ग्रहांत होणारा योग (अस्पेक्ट)
 4. गोचरीचा ग्रह त्याच्या गोचरीचा स्थिती नुसार जन्मपत्रिकेतल्या कोणत्या घरात आला आहे.
 5. गोचरीचा ग्रह सध्या कोणत्या राशीत आहे त्याप्रमाणे त्या ग्रहाचा प्रभाव कमी-जास्त पडतो.

 

या पद्धतीने सर्व ग्रह गोलांचे बघितले जाते.

अर्थात वरील विवेचन अगदी स्थूलमानाने केले आहे, यात अनेक बारकावे आहेत. त्यांचा विचार केल्या शिवाय काही ठोस अनुमाने काढणे चुकीचे ठरेल.

ज्योतीषशास्त्राची हीच तर मोठी अडचण आहे, सुरवात नेहमीच सोपी वाटते , पण एकदा का त्यातल्या बारकाव्यांचा विचार करायला सुरवात केली की चक्रव्यूहात सापडायला होते. त्याला ईलाज नाही, शिस्तबद्द रित्या एक एक बारकावा आत्मसात करायचा किंवा करत राहायचे , कारण हे बारकावे अक्षरश: अनंत आहेत, संपतच नाहीत. कोठे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवावे !

पुढच्या भागात आपण जरा ते वर दिलेले गुरु-मंगळा चे उदाहरण व त्याचा जातकावर होणारा परिणाम बघूयात आणि ते बारकावे का काय म्हणालो त्यांच्यावर ही एक नजर टाकूया……………

एव्हढ्यातच कंटाळला नाहीत ना?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  Aajjibat Nai…! 🙂 tumachi sangaychi method ch etaki changli ahe subject pan interesting aahe… so.. please continue..

  0
 2. Deepali sawant

  पुढच्या भागात आपण जरा ते वर दिलेले गुरु-मंगळा चे उदाहरण व त्याचा जातकावर होणारा परिणाम बघूयात आणि ते बारकावे का काय म्हणालो त्यांच्यावर ही एक नजर टाकूया……………
  Chan lekh ya pudhacha lekh lihava hi vinati
  happy dipawali

  0
  1. सुहास गोखले

   दीपालीजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .
   कालनिर्णय ही लेखमाला काही कारणांमुळे अपूर्ण राहीली आहे पण सध्याच्या दोन लेखमाला पूर्ण होताच तीही लेखमाला पूर्ण करत आहे.

   आपल्याला दीपावलीच्या अनेक अनेक ह्रार्दीक शुभेच्छा .

   आपला
   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.