मागच्या भागात चैन्नै  स्पेशल ‘ईडली – वड्डाय’ चा आस्वाद घेतला आता या अखेरच्या भागात स्पेश्यल डोस्साय !

 

संयुक्त पत्रिका पाहता क्षणी मला लक्षात आले की पत्रिकेतला जन्मस्थ वृश्चिकेचा नेपच्युनचा (जो आपल्या अंदाजा नुसार १५ अंशावर असावा) आणि गोचरीने वृषभेत १४ अंशावर आलेल्या बुधाशी प्रतियोग झाला आहे.  जन्मस्थ नेपच्युन बद्दलचा आपला अंदाज काहीसा मागेपुढे झाला तरी तो वृश्चीकेतच असेल हे नक्की त्यामुळे बुध गोचरीत वृषभेत असतानाच्या एका महीन्यात गोचरीचा बुध – जन्मस्थ नेपच्युन प्रतियोग (याच महिन्यात) नुकताच झाला असेल किंवा होणार असेल.

तसे पाहीले तर या योगाची व्याप्ती बरीच मोठी आहे, पण नेपच्युन आणि बुधाच्या कारकत्वाचा विचार करता ह्या  प्रतियोगाचे मुख्य फळ बाह्य कारणांमुळे झालेला मानसिक त्रास  हेच असते.

आता तुम्ही म्हणाल गोचरीने बुध वृषभेत येणे आणि त्याचा जातकाच्या जन्मस्थ नेपच्युनशी प्रतियोग होणे ही दरवर्षी घडणारी आणि महीना भर टिकणारी घटना आहे. अगदी अंशात्मक योग बघायचा तो सुमारे तीन एक दिवस टिकणारा असतो. दर वर्षी घडणारा रुटीन प्रकार आहे हा. मग जातकाला दरवर्षी मानसीक त्रासाची फळे मिळत राहणार का?

 

या लेखमालेतले पहीले सहा भाग इथे वाचा:

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ६

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

 

(गोचरीचे ग्रह वर्तुळात, जन्मस्थ ग्रह वर्तुळ विरहीत.)

गोचरीने बुध वृषभेत येणे आणि त्याचा जातकाच्या जन्मस्थ नेपच्युनशी प्रतियोग होणे ही दरवर्षी घडणारी आणि महीना भर टिकणारी घटना आहे. अगदी अंशात्मक योग बघायचा तो सुमारे तीन एक दिवस टिकणारा असतो. दर वर्षी घडणारा रुटीन प्रकार आहे हा. मग जातकाला दरवर्षी मानसीक त्रासाची फळे मिळत राहणार का?

नाही !

मनाचा / मानसिक त्रासाचा संबंध असल्याने या संबधीतला आणखी एखादा ग्रह या अभद्र योगात साथ देईल तर अप्रिय घटना घडण्याची शक्यता वाढेल. चंद्र हा मनाचा कारक असल्याने तो या आगीत तेल ओतण्याचे काम सहजपणे करु शकेल, म्हणजेच गोचरीचा चंद्र जेव्हा वृश्चिकेत येऊन जन्मस्थ नेपच्युन शी युती करेल तेव्हा मानसिक त्रास होण्याची मोठी शक्यता निर्माण होईल.

या चंद्राचा विचार करायचा म्हणले तरी प्रश्न सुटला असे नाही, याचे कारण दरवर्षी  (गोचरीचा) बुध वृषभेत येऊन (जन्मस्थ) नेपच्युन प्रतियोग करणार, त्याच महीन्यात चंद्र पण गोचरीने वृश्चिकेत येणारच (चंद्र संपूर्ण राशीचक्र एका महीन्यात पूर्ण करतो)  म्हणजे हा चंद्राचा योग ही तसा दरवर्षी घडणारा रुटीनच म्हणायचा !

मी हा असा विचार करत असताना माझे डोळे लकाकले ! काय पाहीले मी ? गोचरीचा चंद्र – जन्मस्थ नेपच्युन युती व गोचरीचा बुध – जन्मस्थ नेपच्युन प्रतीयोग असणे हा खेळ चालू असतानाच, अगदी त्याच वेळी …  अगदी त्याच वेळी जन्मस्थ चंद्राचा गोचरीच्या युरेनसशी आणि गोचरीच्या शुक्राशी एकाच वेळी राश्यात्मक प्रतियोग होत आहे.

हे बघत असताना माझे लक्ष गोचरीच्या मंगळा कडे गेले हा गोचरीचा मंगळ लग्नात असून जन्मस्थ नेपच्युनशी षडाष्टक योग  करतो आहे. जातकाच्या पत्रिकेत मंगळ षष्ठेश आहे , मंगळ – नेपच्युन योग नेहमीच मोठे आजार , अपघात / दुखापती, हॉस्पीटल मधले उपचार दर्शवतात.

आता अजुन एक विस्मयकारक खेळ पाहा, सध्या जन्मस्थ नेपचुन आणि गोचरीचा नेपच्युन यांचा केंद्र योग आहे तसेच गोचरीचा नेपच्युन आणि गोचरीचे बुध पण केंद्र योगात आहेत. गोचरीचा चंद्र जो दोन एक दिवसांपूर्वी वृश्चिकेत होता तेव्हा त्याने एकाच वेळी जन्मस्थ नेपच्युन शी युती व गोचरीच्या नेपचुन शी केंद्र योग.

म्हणजे चंद्राचे वृश्चिकेतले भ्रमण नेपच्युन , बुध , युरेनस आणि शुक्राच्या साथीने काहीतरी घडवून आणत आहे !

काय असावे हे? नेपच्युन , बुध हे बातमी दर्शवतात, चंद्र व नेपच्युन एकत्रित पणे  भावानातिरेक , खिन्नता , अशुभता दाखवते. षष्ठ स्थान व व्ययस्थान, मंगळ , नेपच्युन आजारपण , हॉस्पीटल दाखवतात, शुक्र व चंद्र दोघेही स्त्री वाचक ग्रह आहेत. षष्ठम स्थान मातुल घराणे दाखवते, युरेनस काहीतरी अनपेक्षित घटना दाखवत आहे . गोचरीचे शुक्र व नेपच्युन लाभात आहेत म्हणजे मोठे भावंड / मित्रपरिवार !

या सार्‍यांचा एकत्रित परिणाम असा असू शकेल?

अगदी अलीकडच्या काळात जातकाच्या बाबतीत एखादी घटना ती सुद्धा आजारपणा संदर्भात घडली असावी. अर्थात जातकाचा जन्मस्थ मंगळ कोठे आहे माहीती नसल्याने हा योग जातकाला आजारपण देणारा आहे का नाही हे नक्की सांगता येणार नाही. सर्व ग्रहस्थिती पाहता घटना जातकाच्या आयुष्यात घडलेली असण्या पेक्षा ती घटना दुसर्‍या कोणा स्त्रीच्या त्यातही जातकाच्या माहेर कडच्या एखाद्या स्त्री बाबतीत घडेल, ती घटना / बातमी  आजारपण , हॉस्पीटल संदर्भात असावी. या घटनेने / घटनेच्या बातमीने जातक खुप अस्वथ / दु:खी झाला असण्याची मोठी शक्यता आहे.

आज गोचरीचा चंद्र धनेत १४ अंशावर असल्याने एक – दोन दिवसां पूर्वी तो वृश्चिकेत होता आणि त्याचा जन्मस्थ नेपच्युन शी युती योग झाला होता… बस कल – परसों की तो बात !

 

मी आधी लिहले आहेच तरी पुन्हा एकदा लिहतो:

बर्‍याच वेळा दशा – विदशा , डायरेक्शन्स , रिटर्नस, प्रोग्रशन्स वापरुन फळे खरोखरची मिळणार आहेत का हे नक्की करता येते पण अनुकूल गोचर लाभल्या शिवाय ‘ती वेळ’ येत नाही हे पण लक्षात ठेवायचे असते. गोचर भ्रमणें तपासणे  ही शेवटची आणि निर्णायक पायरी समजावी. उत्तम अवस्थेतली बंदुक हातात (ग्रहस्थिती + ग्रह योग) असणे हा एक भाग , बंदुकीत जिवंत काडतूस असणे (दशा – विदशा , डायरेक्शन्स , रिटर्नस, प्रोग्रशन्स ने दाखवलेला अनुकूल काळ) ही दुसरी महत्वाची गरज1 आणि बंदुकीतून गोळी उडण्यासाठी ट्रीगर (गोचर – ट्रॅन्सिट) दाबला जाणे ही शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गरज!

अर्थात दशा – विदशा , डायरेक्शन्स , रिटर्नस, प्रोग्रशन्स तपासणे हे मोठे वेळ काढू काम, बरीच गणिते करावी लागतात आणि महत्वाचे म्हणजे अंशात्मक ग्रहस्थिती मांडलेली पत्रिका समोर असावी लागते. इथे नेमकी तीच उपलब्ध नाही!

उपलब्ध सामुग्रीवरुन मला एक – दोन घटनां तरी हेरता आल्या हेच मोठे यश!

मी आणखी काही घटना सापडतात का, या दृष्टीने विचार करत होतो इतक्यात तरंगिनी बाईंचा फोन कॉल संपला आणि त्यांनी माझी विचार श्रृंखला तोडली गेली!

……

……

पत्रिकेचा अभ्यास अनेक अंगाने करता आला पाहीजे, स्टॅटीक अ‍ॅनालायसीस बरोबरच डायनॅमीक अ‍ॅनालायसीस पण करता आले पाहीजे. पत्रिकेच्या अभ्यासा बरोबरच जातकाचा अभ्यास पण करता आला पाहीजे , काही ग्रहस्थितींचा / ग्रहयोगांचा अन्वयार्थ लावणे हे जातकाच्या शारीरीक , मानसीक, सामाजिक स्थितीचा संदर्भ असल्या शक्य होणार नाही.

ज्योतिषशास्त्रातले  साधे , सरळ, अनुभवास येणारे , काळाच्या कसोटीवर उतरलेले पायाभूत नियम पुरेसे आहेत, ते जरी मनापासून आत्मसात केले तरी बर्‍या पैकी अंदाज बांधत येतात आणि ते बरोबर ही येतात असा निदान माझा तरी अनुभव आहे. उगाच अट्टाहासाने , ओढून ताणून , वर्गकुंडल्या , अष्टक वर्ग , सर्वतोभद्र चक्र, सब सब लॉर्ड , कस्पल ईंटरलिंक्स यासारखी तंत्रे वापरायची काहीही गरज नाही.

मी समोर आलेल्या प्रत्येक पत्रिकेचा असा अभ्यास करतो, त्याच बरोबर जातक समोर येतो / जातकाचा प्रश्न मला समजतो  त्या वेळेचा  ‘कन्सलटेशन चार्ट’ पण वापरतो.

पत्रिका जरी कॉम्प्युटर वर बनवत असलो तरी, स्वत:च्या हाताने एका कागदावर ती पत्रिका पुन्हा चितारतो, ग्रह – अंश लिहून घेतो, ग्रहयोग लिहून काढतो , हे सर्व करत असताना ती पत्रिका माझ्याशी बोलायला सुरवात करते!

अशा हाताने लिहून काढलेल्या पत्रिके कडे मी थोडा वेळ निरखून पाहतो , नंतर डोळे मिटून ती पत्रिका डोळ्या समोर आणतो आणि एखादी जादू झाल्या सारखे पत्रिकेचे एक एक पदर उलगडायला सुरवात होते , अगदी आपोआप ! हे देवाची कृपा आणि , गुरुंच्या आशीर्वादाचे फळ तर आहेच त्याच बरोबर माझी या शास्त्रा विषयक तळमळ , वैयक्तिक साधन सुचिता यांचा ही त्यात थोडा का होईना सहभाग आहेच.

एखादी पत्रिका समोर आली की डोक्यात चक्रे फिरायला सुरवात झाली पाहीजे , प्रत्येक व्यक्ती जशी स्वतंत्र / वेगळी असते तसेच व्यक्तीची पत्रिका पण स्वतंत्र आणि वेगळीच असते, एक सारख्या ग्रहस्थिती असलेल्या हजारोंनी पत्रिका असतात पण त्यातला सुक्ष्म असा वेगळे पणा नेमका हेरता आला पाहीजे.

या लेखमालेतुन असा विचार नेमका कसा करता येईल याबद्दल जराशी कल्पना येईल. ती नजर , तो आवाका, तो वकुब केवळ पुस्तके वाचून पोपटपंची करुन येणार नाही त्यासाठी मान खाली घालून मेहेनत केली पाहीजे, हजाराच्या घरात पत्रिका अभ्यासल्या पाहीजेत , दुर्दैवाने हे करणारे ज्योतिषी फार कमी आहेत!

आजकाल ज्योतिषी म्हणवणार्‍यांतले ९०% लोक पत्रिका बघायचे नाटक करुन उपाय-तोडगे सांगताना दिसतील. त्यांना ज्योतिषशास्त्राचे काडीचेही ज्ञान नसते.

मुळात ज्योतिष शास्त्र हे समस्या निवारण करण्याचे शास्त्र नाही.

पत्रिके नुसारची (जन्मस्थ) ग्रहस्थिती नुसार आपली बलस्थाने कोणती ते जाणून घेणे, आपल्या कमकुवत बाजू कोणत्या हे पाहणे आणि आणि आगामी काळातली गोचरीच्या ग्रह स्थितींचा अभ्यास करुन आपल्याला कोणत्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे , कोणत्या क्षेत्रात ते जाणणे, आपल्या समोर कोणती आव्हाने (किंवा अडचणीं) येऊ शकतात यांचा अदमास घेणे आणि या सगळ्यांचा मेळ घालून आलेल्या संधींचा चांगला लाभ करुन घेणे, बलस्थानांचा अधिकाधिक उपयोग होईल अशा क्षेत्रात काम करणे, कमकुवत बाजू सक्षम करायचा प्रयत्न करणे/ कमकुवत बाजू उघड्या पडतील अशी क्षेत्रें टाळणे, आगामी प्रतिकूल काळा साठी आधीपासुन तयारी करणे, उपलब्ध साधनसामग्री चा पर्याप्त वापर करुन संकटांशी दोन हात करणे…. अशा प्रकारे या शास्त्राचा उपयोग करुन घेतला पाहीजे. पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही..

लग्न कधी होईल याची चिंता आहे ते केव्हा होईल हे सांगा , लग्न व्हावे म्हणून तोडगा सांगा पण लग्न सुखाचे कसे होईल याबाबत कोणतीच फिकीर नाही.. नोकरी पाहीजे त्यासाठी तोडगा सुचवा त्यासाठी वाट्टेल तितका खर्च करायची तयारी पण मुळात अशी नोकरी मिळण्यात आपण का कमी पडलो आणि ती उणीव कशी भरुन काढता येईल याबद्दल काही विचार करावा असे कोणालाच वाटत नाही. किंबहुना कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकाराची  नोकरी/ व्यवसाय केल्यास लाभदायक ठरेल याची कोणाला फिकिर नाही. लाच खाण्याची संधी असलेली नोकरी हवी मग त्यासाठी परमेश्वरास लाच देण्याची तयारी!

पण ज्योतिषांना तरी दोष का द्यायचा, ज्योतिषां कडे येणारे जातकच त्याला जास्त दोषी आहेत, आज कोणाला काहीही न करता, घरबसल्या सगळे हवे आहे, सरकारी कामासाठी व अन्यत्र लाच देऊन कामे करुन घ्यायची सवय असलेला जातक मग देवादिकांना, ग्रहांनाही लाच द्यायला सुरवात करतो. तुमचे ते ज्योतिष वगैरे सांगू नका , काय उपाय तोडगे असेल तो सांगा, वाट्टेल तो खर्च करतो पण घरबसल्या नोकरी/पैसा/आरोग्य/ बायको मिळेल असा तोडगा सांगा! 

जातकाला आपल्या अपयशाचे खापर फोडायला काही तरी हवे असतेच, चपराश्याची सुद्धा लायकी नसलेल्याला कलेक्ट्रर व्हायचे असते, ते होणार्‍यातले नसते मग त्याला या अपयशाचे खापर फोडायला ‘माझा गुरु बिघडलेला आहे’, ‘सातेसाती चालू आहे’, ‘पितृदोष आहे ‘, ‘नक्षत्र शांती केली नाही’, ‘घराण्याला शाप आहे’, ‘गुरु – चांडाल आहे’,’व्यतिपात योग ‘ अमुक करण आणि फलाणे नक्षत्र ‘ आहे म्हणून रखडलोय नाहीतर कोठल्या कोठे पोहोचलो असतो… असे काहीतरी लागतेच ना ! 

उपाय तोडग्याचे दुकान थाटून बसलेला ज्योतिषी हे नेमके ओळखून असतो,  तो मग ही गरज तत्परतेने पूर्ण करतो!  तो ही मग पत्रिका हातात घेतली रे घेतली की ‘नक्षत्रशांती’ करा, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे , यंव आहे त्यंव आहे असे सांगत बसतो. जोडीला साडेसाती, कालसर्प, मंगळदोष, गुरु-चांडाल योग, ग्रहण योग इ.इ. आहेतच. आणि एकदा अशी भिती घालून झाली की ‘उपाय – तोडग्यां’ ना रान मोकळेच असते!

या शास्त्राचा मुळ उद्देश काय होता, काय उपयोग अभिप्रेत होता !  शास्त्र लयास गेले आहे आणि उरला आहे तो ‘उपाय-तोडग्यांचा’ किळसवाणा बाजार ! 

ज्योतिषशास्त्राची जननी मानल्या गेलेल्या भारत देशात ज्योतिषाशास्त्रा वर ही वेळ यावी यासारखे दुर्दैव दुसरे कोणते?

 

लेखमाला समाप्त

 

मी अफाट वेळ खर्चुन , मेहेनत घेऊन ही मालीका लिहीत होतो, मुळ संकल्पने नुसार या मालीकेचे बारा भाग तयार करणार होतो पण वाचकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता , नाईलाजाने ही लेख मालीका सात भागातच गुंडाळावी  लागली, हे आणखी एक दुर्दैव म्हणायचे!  ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी’  सारखी लेखमाला मराठीतच कशाला , हिंदी , इंग्रजीत पण कोणी लिहलेली नाही हे मी खात्रीने सांगतो.. मी एक प्रयत्न जरुर केला पण वाचकांचा अत्यल्प प्रतिसाद निराशा देऊन गेला .  काय चुकले तेच कळत नाही !

मी याहुनही मोठी सुमारे २० भागांची ‘ कपूर अंकल ‘ ही  सत्य घटनेवरची ‘अस्ट्रो नॉव्हेल ‘ लिहायचे योजत आहे , कच्ची टिपणे तयार आहेत ,ज्यांच्या आयुष्यावर ही लेखमाला आहे त्या ‘कपूर अंकल’ ची अधिकृत ,लेखी परवानगी पण मिळाली आहे.  पण वाचकांचा असा ठंडा प्रतिसाद पाहता , लेखन करण्यातला उत्साहच निघून जातो.

मायबाप वाचक हो, आता तुम्हीच सांगा …लिहू की नको ?

 

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

21 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  Please write. I think this series was one of the most commented story on your facebook page yet. So I won’t say, it had weak response.

  0
 2. Avinash

  सुंदर ।बंदुकीची उपमा अतिशय चपखल ।कपूर अंकलची वाट पहातोय ।तम्ही लिहीत रहावे ही विनंती ।प्रतिसाद येईलच ।

  0
 3. pramod

  sir,
  jyotishamadhale mala evadhe kalat nahi, pan bhavishya vartavnyamadhe tumhi kitit tari bajuncha drushtikon vaparta/vichar karta aani mala vatat nahi evdhi mehanat karun abhyas karnare jast astil.
  pan tumche he margdarshan tya abhyasakana nakkich upyogi padel achuk bhavishya mandaanisathi prayatnshil astil. te tumche nehmi abharach mantil.

  pramod

  0
 4. अण्णासाहेब गलांडे

  मि काहि बोलू सुहासजी,प्रत्येक लेखाला सुखांत किंवा दुखांत शेवट असतो. वाचक त्यानूसार भारवतो.तुम्हीं कधीही शेवटाची फिकीर करत नाही.वाचक बिचारा गोधंळून जातो की हे नक्की काय होत,कशासाठी हे वाचल.(ऊदा.तरंगीनी)
  संपुर्ण लेखमाला विद्वताप्रचुर होती नक्कीच पण ते ज्योतिष विद्यापीठात दिलेल व्याख्यान होत!माझ्यासारखे कित्येक तुमचे चाहते फक्त भांबऊन वाचत राहिले.असो. माझ मत काहिहि असलं तरी तुमच्या लेखन मेहनतीला त्रिवार सलाम!आम्ही तुमचे ऋणी आहोत!
  ता.क. भविष्य पाहण्यार्या जातकाच्या वाईट ग्रहस्थितवर उपाय/तोडगे नाहित हे मान्य पण तो किती हवालदील होतो याची कधी जाणिव होते काहो?असो. पढील लेखनाच्या प्रतिक्षेत
  धन्यवाद.

  0
 5. Shardul Puntambekar

  Suhasji ,your analysis is very detailed and follows scientific methods. I feel you should continue to write it and eventually it will get the publicity you deserve.
  May be when 3rd house become positively activated by transit 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री शार्दुलजी

   अभिप्रया बद्दल धन्यवाद . पण आता मला या नॉन प्रॉडक्टीव्ह गोष्टींवर किटि वेळ घालवायचा हा विचार करावा लागतो आहे. साअधी माझी फेसबुक वॉल वरची पोष्ट लोकांनी शेअर केली असती (त्या साठी फक्त एक माऊस क्लिक लागतो) तरी प्रचार झाला असता , बरेच नवे वाचक लाभले असते पण दुर्दैवाने एकानेही हे केले नाही , आता ब्लॉग बंद करु म्हणालो म्हणल्यावर ‘असे करु नका’ म्हणणार्‍यांनी या आधी माझी एखादि पोष्ट शेअर का केली नाही याचे उतात्र स्वत:लाच द्यावे. माझी अशी सक्ति नव्हती पण एक मित्र म्हणून इतके तरी करता आले असतेच ना? मी स्वत: माझ्या मित्रांच्या बाबतीत असे काम करत असतो.

   सुहास गोखले

   0
 6. संतोष

  धन्यवाद सुहासजी,

  आता हि लेख मला पूर्णपणे परत एकत्र वाचायला लागेल, यात बर्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
  ह्यावरून एक गोष्ट ठामपणे जाणवली ग्रह्योगाचा अभ्यास असायालाच पाहिजे, तशी तुम्ही अगोदरच्या ब्लोग मध्ये २ ते ३ पुस्तकांची नावे दिलेली आहेतच (James Braha, CEO Carter).

  ज्योतिष म्हणजे तोडगे आणि ज्योतिषी म्हणजे नशीब बदलावणारी व्यक्ती हि मानसिकता बदलायला पाहिजे नाहीतर ज्योतिष हे शास्त्र म्हणून प्रगती नाही करू शकणार.

  ‘ कपूर अंकल ‘ हि लेखमाला काही कारणांनी लिहिली गेली नाही तर राशी भविष्य वाचणार्यांना वाचकांना कदाचित काही फरक नाही पडणार पण अभ्यासू लोकांचं नुकसान मात्र होईल.

  तुमच्या लेखनातून बरंच काही वेगळ्या दृष्टीकोनातून वाचायला मिळालं त्या बद्दल धन्यवाद.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री संतोषजी,

   ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलोजी’ ही लेखमाला ही कमालीची तांत्रिक होती आणि ज्याचा ज्योतिषाचा थोडाफार अभ्यास झाला आहे त्यालाच ती काही समजेल. मला ह्याची पूर्ण कल्पना होती. पण ज्योतिष विषयावर मराठीत आत्तापर्यंत असे लेखन क्वचितच केले गेले आहे म्हणुन मी एक प्रयत्न केला आहे. ज्यांना ज्योतिषशात्राचा परिचय नाही त्यांच्या बाबत काही वाद नाही पण ज्यांना यातले कळते त्यांनी सुद्धा या लेखमालेची दखल घेतली नाही , इतकेच कशाला पुण्याच्या 70 वर्षाच्या तथाकथित ज्योतिषाने याची खिल्ली उडवली हे बघून व्यथित झालो, त्या 70 वर्षाच्या माणसाला आयुष्यात एक ओळ लिहता आली नाही एक ‘हा सुर्य हा जयदेअथ’ असा पडताळा देता आला नाही पण दुसर्‍याने काही चांगले लिहले त्यावर तत्परतेने पिचकारी मात्र मारण्याचे काम लगेच जमले.

   ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ ची ही अवस्था पाहता माझी आगामी ‘कपुर अंकल’ ही ‘अ‍ॅस्ट्रो नॉव्हेल’ जी तब्बल 20+ भागांची होईल , असा प्रयत्न आत्ता पर्यंत कोणी केला नसेल (मराठी , हिंदी, इंग्रजी) याची मला खात्री आहे , मला काळजी वाटायला लागली, इतके मर मर लिहाअय्चे आणि ते जर कोणी वाचणारच नसेल तर लिहायचे कशाला ? म्हणून आता मी इंग्रजीत लिहणार आहे निदान भारतातल्या नसले परदेशातले वाचक तरी त्याची कदर करतील अशी आशा आहे.

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   सुहास गोखले

   0
 7. प्राणेश

  लेखमाला उत्तमच झाली आहे. त्यातल्या त्यात हा शेवटचा भाग म्हणजे कळस ठरावा असा आहे. यात खूप मोठे तत्त्वज्ञान लपलेले आहे.

  माफ करा मी थोडासा लहान तोंडी मोठा घास घेत आहे. पण उपाय तोडग्यांबद्दल माझा थोडासा वेगळा दृष्टीकोण आहे. जर एखादा डॉक्टर रोग काय झालेला आहे हेच केवळ सांगत असेल, त्यावर काहीही औषध सांगतच नसेल, तर असा डॉक्टर काय कामाचा? त्याचप्रमाणे काय समस्या येऊ शकतात हे जसे ज्योतिष शास्त्राने सांगता येते तसेच उपायही सांगता आलेच पाहिजेत.

  व्यासांनी सुद्धा नवग्रह स्तोत्र लिहिले आहे. त्यात या स्तोत्राची फळे सुद्धा दिलेली आहेत. शुद्ध संस्कृत श्लोकांमध्ये व्याकरणाची एकही चूक राहू न देता छंदःशास्त्राचे नियम पाळत अनेक ग्रंथांमधून याची अनेक उदाहरणे आढळतात. या सर्वच थोर ऋषीमुनींचे विचार चुकीचे कसे असतील?

  आजकालचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी वेगळेच उपाय सुचवत असतील तर तो दोष या लोकांचाआहे. ऋषीमुनींचा नाही शास्त्राचा तर नाहीच.

  असो. आपल्या लिखाणामुळे महाराष्ट्रातील मुठभर का होईना लोक या शास्त्राबद्दल सकारात्मक विचार करू लागले आहेत हे आपल्या लेखमालाचे यशच म्हणावे लागेल. कृपया लिहित रहावे ही विनंती.

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी,

   रोग झालेला असताना डॉक्टर कडे जाणे हे योग्य पण समस्या असताना ज्योतिषा कडे जाणे तितकेच अयोग्य आहे. मुळात जगातला कोणताच उपाय तोडगा आपल्या समस्या सोडवत नाही हे लक्षात घ्या. हा असलाच तर प्लॅसिबो इफेक्ट असू शकतो , जातकाचे मनोधैर्य किंचितसे वाढावे या पलीकडे त्यात काही नाही,

   बाकी जुन्या ग्रथां बाबत बोलायचे तर आज ज्या ग्रथांचे दाखले दिले जात आहेत ते ग्रंथ मूळ स्वरुपात आहेत का अन्य हे तपासले आहे का? व्यासांनी लिहलेले मूळ महाभारत अवध्या हजार – बाराशे श्लोकांचे होते आणी सध्याचे महाभारत समारे एक लाख श्लोकांचे आहे मग हा विस्तार कोणी केला? त्यात नंतर माल मसाला कोणी भरला ? इतर ग्रथांचे ही तसेच आहे , कोणी ही काहीही भर त्यात टाकली आहे , त्याकाळत एकच एक अशी रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी नसल्याने कोणाचे ही या प्रकारावर नियंत्रण नव्हते

   या ग्रंथात त्या ग्रथांत उपाय तोड्गे आहेत ते असेच काही बिझनेस करणार्‍या ज्योतिषांनी घुसडूण दिले आहेत हे नक्की ( दशक्रिया सिनेमा अगदीच चुकीचे बोलत नाहि !)

   असो यावर वाद विवाद नको , ज्याला उपाय तोडगेच सांगायचे त्याने ज्योतिषाचा अभ्यास कशाला करायचा ? नऊ ग्रह, बारा राशी , सत्तावीस नक्षत्रांची नावे माहीती असली तरी पुरेसे आहे.

   सुहास गोखले

   0
 8. Sudhanva Gharpure

  Dear Suhasji,

  Your write up series on Kappe Astrology is amazing and has stupefied the readers like me. You have rightly said that nobody has wrote such a series with such perfect analysis. It takes lot of guts to make such writing at public place, you need to be knowledgeable, accurate and confident.

  Please don’t draw a conclusion that response is very poor. When the film Sholey had come on screen, initial response appeared as poor since people had got stupefied, nobody was concious enough to reply !!!

  Pl continue Kappe, as we are eager to know what predictions came true and how the dialogues happened with Taranginibe.

  Warm regards,

  Sudhanva

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुधन्वाजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ हा माझा एक नवा, काहीसा धाडसी लेखन उपक्रम होता, माझ्या ब्लॉग वर एखाद्या जातकाची जन्मवेळ / जन्मतारीख इ तपशील देणारी ही पहीलीच केस स्ट्डी होती त्यासाठी मी मोठ्या प्रयत्नाने जातकाची (सौ तरंगिनि बेन) लेखी परवानगी मिळवली होती. मी मराठी बरोबरच, हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या ज्योतिष समुदायात कार्यरत असतो आणि माझ्या माहीती प्रमाणे ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ सारखा लेखन प्रकार या तीन ही भाषेत या पूर्वी कोणी केलेला मला तरी आढळलेला नाही म्हणून मी एक ‘पथदर्शी’ प्रकल्प म्हणून मोठ्या हौसेने आणि कमालीची मेहेनत घेऊन ही लेखमाला लिहली होती. असे लेखन या शास्त्राच्या प्रसारा साठी , हे शास्त्र नव्याने शिकणार्‍यां साठी होणे आवश्यक आहे असे या शास्त्राचा एक तळमळीचा विद्यार्थी म्हणून मला मनापासुन वाटले म्हणून हा पंक्तीप्रपंच केला होता. पण दुर्दैवाने फार कमी जणांनी वाचायचे कष्ट घेतले आणि त्यातल्याही फार म्हणजे फारच कमी लोकांना ती कळली. मी एक ‘राग लोभ मद मोह मत्सर’ इ ष्ड्ररीपुंनी ग्रस्त सर्वसामान्य माणुस , इतकी मेहनत घेतल्या नंतर त्याची दखल घेतली जावी अशी माफक अपेक्षा धरुन बसलो होतो.
   मराठी वाचक वर्गाने निराशा केली इतकेच नव्हे तर एक दोन ठिकाणी त्याची कुचाळकी केली गेली पण आश्चर्य म्हणजे त्या तुलनेत ज्यांना ‘मराठी’ वाचता येत नाही अशा अनेक फिरंगी ज्योतिष अभ्यासकांनी / विद्यार्थ्यांनी ही मालीका पाहून (त्यांना वाचता आली नाही) याचे इंग्रजीत भाषांतर करा अशा विचारणां सुरु केल्या. ‘काप्पे..’ प्रकाशीत झाली आणि अनपेक्षित रित्या अमेरिका, युरोप, अगदी क्रोएशिया, नेदरलॅन्ड सारख्या देशांतून मला मोठ्या प्रमाणात पेज हीट्स मिळल्या, पाकीस्तान सारख्या देशातून दोन विचारणां आल्या! भारतातून मिळणार्‍या पेज हिट्स पेक्षा ही संख्या दुप्पट हो हे लक्षवेधी आहे! मी परदेशातल्या काही ज्योतिष ग्रुप्स चा सक्रिय सभासद आहे तिथुन ही मला या लेखमालेचे इंग्रजी भाषांतर करा असे ‘पर्सनल मेसेजेस’ येऊ लागले. मराठीतल्या माझ्या ‘काप्पे..’ कशाला अन्य बर्‍याच लिखाणाला जो अत्यल्प प्रतिसाद मिळत गेला त्या तुलनेत इंग्रजी वाचकां कडून मिळालेला हा प्रतिसाद अभूत पूर्व होता, भारावून टाकणारा होता!

   तेव्हा मला लक्षात आले की इंग्रजी भाषेतल्या फार मोठा सुजाण , पारखी वाचक समुहा कडे माझे कमालीचे दुर्लक्ष होते आहे.

   मराठीत लिहण्यापेक्षा इंग्रजीत लिहले तर मी जास्त मोठ्या वाचक समुहा पर्यंत पोहोचू शकतो, आणि माझा या सार्‍या लेखना मागचा मुळ उद्देश ( शास्त्राचा प्रसार, हे शास्त्र नव्याने शिकणार्‍यां सहाय्य) साध्य झाला तर याच मार्गाने होऊ शकेल असे मला प्रकर्षाने जाणवले. मी गेले चार वर्षे ब्लॉग लिहीत आहे, प्रतिसाद कायमच तोळा मासा राहीलेला आहे. माझी लेखनाची हौस फिटली इतकेच काय ते त्यातून साध्य झाले आहे. व्यवसाय वृद्धी म्हणून या लेखना कडे कधी पाहीले नव्हतेच पण त्या अंगानेही या लेखनाचा फारसा उपयोग मला झालेला नाही.

   हे सगळे चालू असताना काळ बदलला , माझे प्राधान्य क्रम बदलले (पुस्तक लेखन, ऑन लाईन क्लास, संशोधन प्रकल्प) आणि ब्लॉग लिहण्यात खर्च होणारा वेळ व शक्ती अन्यत्र: वापरता आले तर मला लाभदायक ठरेल असे दिसत आहे.

   या पार्श्वभूमी वर मला आता लिहायचेच असेल तर इंग्रजी लिहणे संयुक्तीक ठरेल अशा विचाराने मी मराठीत लेखन करायचे निदान काही काळा साठी स्थगीत करत आहे. अर्थात एक – दोन पूर्ण असलेले लेख प्रसिद्ध करेन आणि काही अपूर्ण असलेल्या लेखमाला मात्र जरुर प्रकाशीत करेन. इथूनचे माझे नवे लेखन खास करुन माझी आगामी , महत्वाकांक्षी (काप्पे पेक्षाही प्रत्यंयकारी) , अ‍ॅस्ट्रो नॉव्हेल .. ‘कपूर अंकल’ इंग्रजीतच लिहली जाईल आणि माझ्या इंग्रजी ब्लॉग वर प्रकाशीत होईल आपल्याला ती वाचता येईलच.

   ‘काप्पे ..’ मालीका पूर्ण केली आहे, मी त्या पत्रिकेचे आणखी विश्लेषण करणार होतो पण वाचकांचा लुकेवॉर्म रिस्पॉन्स पाहून आवरती घेतली इतकेच. सौ तरंगिनी बेन ना मी पंधरा मिनिटात काही सांगीतले (जे लेखमालेच्या पहील्या भागात आहे) ते कसे सांगीतले हे कसे सांगीतले ते मी पुढच्या सहा भागांत विस्ताराने लिहले आहे, तो भाग पूर्ण आहे. सौ तरंगिनी बेन नंतर मला भेटल्या , तेव्हा त्यांनी काय विचारले , मी त्यांना काय सांगीतले हा भाग लिहण्याचा मूळ हेतू नव्हताच त्यामुळे ते लिहण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे ही लेखमाल आता जशी आहे त्या स्वरुपात संपूर्ण आहे.

   आपण माझ्या ब्लॉग चे नियमित वाचक आहात , आपल्या सारख्या वाचकांच्या पाठींब्यावर , प्रोत्साहना वर तर मी इतकी मजल गाठू शकलो आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे मराठीत न लिहता इंग्रजीत लिहणे हे काहीसे कृतघ्न पणाचे ठरेल हे देखिल मला पटते आहे पण काय करु , काळ – काम – वेगाची गणिते वेगळेच सांगत आहेत आणि माझ्या कडे उपलब्ध असलेला वेळ आणि साधन सामुग्रीचा विचार करता आत्ता माझ्या कडे दुसरा पर्यायही शिल्लक नाही. आपली निराशा समजू शकतो पण माझा ही नाईलाज आहे.

   आपण मला समजुल घ्याल अशी अपेक्षा करतो,

   आपला लोभ आहेच तो असाच कायम राहावा हि विनंती,

   सुहास गोखले

   0
 9. Anand Deshkar

  तुमचे भरपुर लेख वाचलेत. मी लेखानंतर प्रतिक्रीया पण वाचतो. त्यावरून लक्षात येतेच की लेखांना प्रतिसाद हा फारसा नाही. त्यासाठी काही गोष्टी सुचवतो
  १. लेखाचे लहान लहान भाग करण्या ऐवजी एकच मोठा लेख लिहावा कारण मोठा लेख सलग वाचून होतो, लहान लेख वाचतांनी वाचकांना वारंवार नवीन लिंक उघडावी लागते त्यानी वाचनात व्यत्यय येतो. सतत लहान लहान लेख अपलोड करण्यापेक्षा एकदाच मोठा लेख अपलोड करून पहा. प्रतिसाद नक्की वाढेल.
  २. ब्लाॅगची थोडीफार पब्लिसिटी करून पहा. आजकाल आॅनलाईन मराठी भरपुर लोकं वाचतात पण हा ब्लाॅग फार कमी लोकांना माहिती आहे.
  ३. लेख लिहून झाल्यावर एकदा कोण्या जवळच्या व्यक्तीस वाचण्यास देउन त्यांचे विचार जाणून घ्यावेत. म्हणजे आपल्यला लहान सहान बदल करता येतात.
  ४. लेखाच्या शेवटी रेटिंग सिस्टीम आणी स्माईलींचे आॅप्शन ठेवा कारण सर्वच वाचक ऐवठे मोठे प्रतिसाद लिहीत नाहीत.

  बाकी दिवसेंदिवस तुम्ही नवीन नवीन विषयांवर लिहीता आहात ( चर्मचंची, सॅमबाबा ) ते पाहून आनंद वाटतो. भविष्य काळासाठी शुभेच्छा.

  0
  1. सुहास गोखले

   श्री आनंदजी,

   आपण दिलेला अभिप्राय आणि बहुमोल सुचनां बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आप्ल्या अशाच सुचनांचे नेहमीच स्वागत असेल.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply to सुहास गोखले Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.