आता भाग – १ ते भाग – ५  अशी इतकी सारी काप्पे ढोसल्या नंतर कंटाळा आला असेल ना , म्हणून ‘ईडली – वड्डाय’ एकदम चैन्नै  स्पेशल!

ही गोचरी + जन्मस्थ अशी संयुक्त (सुपर ईम्पोज्ड) पत्रिका पाहताच एक बाब लगेच लक्षात येते की लग्न, चतुर्थ, सप्तम, व्यय, लाभ या भावांत बरीच खळबळ माजलेली आहे. दशम स्थानात सामसुम आहे !

सगळ्यात प्रथम माझ्या समोर आली ती चतुर्थ स्थानातली  (जन्मस्थ) प्लुटो- (गोचरी) गुरु यांची राशात्मक युती.

गुरु- प्लुटो युती मोठे  लाभ देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. 

 

या लेखमालेतले पहीले पाच भाग इथे वाचा:

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

 

ण त्याही पूर्वी मी बघितले ते ‘युरेनस’ चे दशम स्थानातले भ्रमण, युरेनस गोचरीने नुकताच म्हणजे मार्च २०१७ मध्ये मेषेत आला आहे , पण त्यापुर्वी तो सात वर्षे मीनेत होता. म्हणजे गोचरीचा युरेनस मीनेत असताच्या सात वर्षात त्याची जातकाच्या जन्मस्थ मीनेच्या गुरु शी राश्यात्मक युती चालूच होती.

युरेनस च्या या (नुकत्याच पूर्ण) दशमातल्या भ्रमणा बद्दल पाश्चात्य ज्योतिर्विदांंनी बरीच निरिक्षणे नोंदवली आहेत:

Transiting Uranus through the Natal Tenth House

Interesting and original professional work characterizes this transit. The individual is likely to employ new and unusual methods of achieving professional goals and ambitions. Often, there is involvement in corporate business politics or in outside political intrigues.

This is a favorable transit for involvement in professional groups and organizations. Friendships and group or organizational associations can come about through the individual’s business or profession, and professional opportunities and benefits, in turn, often arise through group organizations, and friendships.

The individual’s professional activities are likely to be related to scirntific, technological, or corporate endeavors during this transit. Professional activity related to occult or astrological fields is also possible.

The individual may undergo sudden changes in professional or political status during this transit. Many individuals promote or support radlical, revolutionary, reformist, or liberal political causes and viewpoints during this period.

If Uranus makes stress aspects while transiting the natal Tenth house the individual is subject to loss of job or other sudden professional political reversals of fortune.

जातकाच्या दशमास्थानातले गोचरीच्या युरेनस चे भ्रमण जे सुमारे सात वर्षे चालू होते त्याच काळात या गोचरीच्या युरेनस ची जन्मस्थ गुरूशी युती होउन गेली होती. हा गुरु साधारण मीनेच्या मध्यावर आहे त्यामुळे ही युती सुमारे साडे – तीन वर्षा पूर्वी झाली असणार आणि त्याचा परिणाम नंतरची दोन एक वर्षे तरी जाणवला असेल. म्हणजे  या काळात जातकाने (जातक बिझनेश करत असल्याची जवळजवळ खात्री पटल्यामुळे )  बिझनेस मध्ये नाविन्यपूर्ण बदल केले असतील, नाविन्यपूर्ण उत्पादने/ सेवा उपलब्ध करून दिली असेल.

गोचरीचा युरेनस मार्च  २०१७  मध्ये जातकाच्या लाभ स्थानात आल्याने या मेहेनतीचे चांगले आणि अनपेक्षित सुद्धा, रिझल्ट्स मिळायला सुरवात झाली असावी.

आता आपण मुळ मुद्द्या कडे वळू तो म्हणजे गुरु – प्लुटो युती !  ही गुरु- प्लुटो युती मोठे  लाभ देणारी म्हणून प्रसिद्ध आहे.

बहुतेक वेळा ही युती मोठा आर्थिक लाभ मिळवून देते अर्थात काही वेळा इतरही लाभ होतात/ या बद्दल पाश्चात्य ग्रंथांतून असे उल्लेख आहेत:

‘An indication of a new beginning in life. A new job, marriage, relocation or advancement in present position. There is the desire for power, leadership and personal achievements. Favorable gains through inheritance or insurance and assistance through in-laws or individuals of influence. Unfavorable aspects to this conjunction can still promise gain through inheritance but unfortunately it may come as a direct loss of some close member of the family or an in-law.

On psychological fronts, this can bring about important (and most often permanent) changes in religious and philosophical outlook. There is a deeper understanding of life’s mysteries and often a special interest in life after death, reincarnation, and karma. This is a quite favorable period for occult and/or religious practices. ‘

आता कोणी म्हणेल,

प्रत्येकाच्या पत्रिकेत प्लुटो असतोच आणि गोचरीचा गुरु बारा वर्षात राशीचक्राचा एक फेरा पूर्ण करत असल्याने जन्मस्थ प्लुटो आणि गोचरीचा गुरु एकाच राशीत ही परिस्थिती प्रत्येक दर बारा वर्षांनी एकदा वर्षभर असणार आणि प्रत्यक्ष अंशात्मक युती (१ डिग्री +/- दीप्तांश )  दिड महीना टिकणारी असते. त्यामुळे दर बारा वर्षांनी एकदा असा मोठा लाभ प्रत्येकालाच मिळणार का?

नाही! असा लाभ प्रत्येकालाच मिळणार नाही !

याचे कारण म्हणजे केवळ अशी युती झाली म्हणजे लाभ मिळणार असे नसते तर ही युती होते तेव्हा फक्त लाभ मिळण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण होते बाकी काही नाही. ही युती होत असतनाच इतर काही घटक सक्रीय असतील तर आणि तरच ही युती पदरात माप टाकेल. त्यामुळेच काही जणांच्या बाबतीत अशी युती होऊन सुद्धा ती निष्फळ ठरते.

वरच्या पत्रिकेत अशी युती होत असतानाच इतर काही घटक पण सक्रीय होत आहेत / झाले आहेत का?

 

(गोचरीचे ग्रह वर्तुळात, जन्मस्थ ग्रह वर्तुळ विरहीत.)

 

आपण पाहीले आहे की युरेनस गोचरीने सात वर्षे मीनेत होता. गोचरीचा युरेनस मीनेत असताच्या सात वर्ष त्याची जातकाच्या जन्मस्थ मीनेच्या गुरु शी राश्यात्मक युती चालूच होती, आणि या सात वर्षात गोचरीचा गुरु मीनेत येऊन जन्मस्थ प्लुटो शी  राशात्मक (आणि त्याहून ही ही महत्वाची अशी अंशात्मक ) युती करेल तेव्हा हा दुहेरी योगच जातकाला मोठा लाभ मिळवून देईल. गोचरीचा गुरु आणि जन्मस्थ प्लुटो ही युती बारा वर्षात एकदा होत असली तरी गोचरीचा युरेनस व जन्मस्थ गुरु ही युती आयुष्यात एकदाच हौऊ शकते  कारण युरेनस ला सगळ्या राशीचक्राचे भ्रमण पूर्ण करायला ८४ वर्षे लागतात! (वयाची ८५+ ओलांडून गेलेल्या काही जातकांना कदाचित हे युरेनस चे दुसरे सायकल अनुभवास येईल!).  गोचरीचा गुरु व जन्मस्थ प्लुटो (राशात्मक) युतीत आणि त्याचवेळी गोचरीचा युरेनस व जन्मस्थ गुरु (राशात्मक) युतीत , हा योग आयुष्यात आला तर एकदाच येऊ शकेल काहींच्या आयुष्यात तो येणार ही नाही.

 

तरंगिनी बेन च्या बाबतीत, हा दुहेरी योग केव्हा आला असेल?

गोचरीचा गुरु ऑगष्ट २०१६  ते  सप्टेंबर २०१७ या काळात कन्येत होता. ह्याच काळात गोचरीचा गुरु आणि जन्मस्थ प्लुटो यांची  प्रथम राश्यात्म्क मग अंशात्मक आणि शेवटी पुन्हा राशातमक युती होणार आहे.

या  हे वर्ष अशी संधी आणून देणार आहे  कारण या काळात गोचरीचा गुरु जन्मस्थ प्लुटो च्या राशात्मक युतीत आणि गोचरीचा युरेनस जन्मस्थ गुरुच्या राशात्मक युतीत असेल).

या ऑगष्ट २०१६  ते  सप्टेंबर २०१७ या कालावधीत गोचरीचा युरेनस ऑगष्ट २०१६  ते  मार्च २०१७ या काळात मीनेत होता व त्याची जन्मस्थ गुरु शी राशात्मक युती चालू होती , म्हणजे  ऑगष्ट २०१६  ते  सप्टेंबर २०१७ या कालावधीत हा दुहेरी योग आला होता!

जातकाच्या पत्रिके नुसाराची जन्मस्थ गुरु – गोचरीचा युरेनस ही युती महत्वाची ठरली. कारण युरेनस हा मोठ्या वादळी , अकल्पित , चमत्कारीक घटनां (चांगल्या / वाईट) घडवून आणतो. घबाड मिळणे ही अनपेक्षित घटनाच असते.

जन्मस्थ गुरु – गोचरीचा युरेनस किंवा गोचरीच गुरु- जन्मस्थ युरेनस अशी युती नेहमीच फलदायी ठरते, या बाबतच्या माझ्या नोट्स अशा आहेत:

This transit often coincides with inheriting a large sum of money from someone you did not even know very well, or a compensation package.  Sudden fame and media contacts helping springboard your career is also reflective of this transit.

Jupiter Uranus aspects represent the type of success which is more sudden, unpredictable or unexpected, and appears totally out of the blue. What you can do though is to be prepared for it and bide your time instead of being too restless. Big windfalls which needed some sort of upheaval as well to materialize are typical of Uranus and Jupiter transits.

Sudden good fortune in financial affairs and unexpected financial gain through gifts, joint finances, inheritance, tax benefits, insurance claims, corporate business, government appropriations and grants often accompany this transit.

गुरु- प्लुटो युती प्रत्येकाला दर बार वर्षांनी एकदा अनुभवास आली तरी त्यातच युरेनस (किंवा अन्य स्पेश्यल योग) होईलच असे नाही म्हणूनच प्रत्येकाला अशी युती लाभदायक ठरणार नाही, काही भाग्यवंतांनाच याची फळे चाखायला मिळणार हे उघड आहे.

(अर्थात या गुरु -प्लुटो योगा सारखेच अचानक धन लाभ देणारे आणखी कांही वेगळे काही ग्रह योग आहेत पण आपला तो विषय नाही)

 

गुरु कन्येत ऑगष्ट २०१६ मध्ये आला, गुरु सप्टेंबर २०१७ मध्ये कन्येतुन बाहेर पडेल. साधारण १३ महीन्यांचा कालावधी आहे, म्हणजे गुरु महीन्याला २ अंश २० कला या गतीने कन्येत पुढे सरकत आहे, जन्मस्थ प्लुटो कन्येत साधारण पणे ११ अंशावर असावा असा आपला अंदाज आहे (पहा भाग – २) त्यामुळे हे ११ अंशाचे अंतर जायला गोचरीच्या गुरुला साधारण पाच-साडे पाच महीने लागले असतील म्हणजे साधारणपणे जानेवारी २०१७ मध्ये ही अंशात्मक युती झाली असावी.

गोचरीचा युरेनस मीनेत आला २०१० च्या सुरवातीला आणि मार्च २०१७ ला युरेनस मेषेत गेला, मीन रास ओलांडायला युरेनस ला ७ वर्षे लागली म्हणजे युरेनसने एका वर्षात मीनेचे  ४.२५ अंश ओलांडले. त्या हिशेबाने या जन्मस्थ गुरु साधारण पणे १२ अंशावर असावा असा आपला अंदाज आहे (पहा भाग – २) त्यामुळे हे १२ अंशाचे अंतर जायला गोचरीच्या युरेनसला साधारण पाच-साडे पाच महीने लागले असतील म्हणजे साधारणपणे जानेवारी २०१७ मध्ये ही अंशात्मक युती झाली असावी.

(त्यावेळी , हॉटेलात माझ्या कडे कोणतीही साधन सामग्री नसताना मी गुरु व प्लुटो यांच्या ग्रहस्थितींचा अंदाज केला होता, प्रत्यक्षात जन्मस्थ गुरु २६:३० मीने वर होता आणि जन्मस्थ प्लुटो १२:५८ कन्येत होता!

११ ऑक्टोबर २०१६ रोजी जन्मस्थ प्लुटो आणि गोचरीचा गुरु यांची  पूर्ण अंशात्मक युती होती, आणि त्याच दिवशी जन्मस्थ गुरु आणि गोचरीचा युरेनस यांंची २ अंशां तली युती झाली होती !! )

गुरु – प्लुटो युतीचा घबाड लाभ नेमका काय हे ही युती कोणत्या स्थानात होणार त्यावर अवलंबून असते. जातकाच्या पत्रिकेत ही युती चतुर्थ स्थानात होत आहे म्हणजे हा लाभ जमीन – जुमला, इमारत अशा स्थावर मालमत्तेचा असणार हे उघड आहे.  स्थावर मालमत्तेचा कारक ग्रह शनी लग्न स्थानात आहे, जन्मस्थ गुरु दशमात आहे  , गोचरीचा प्लुटो सप्तम स्थानात तळ  ठोकून आहेच, आता राहता राहिला तो मंगळ, हा बाबा गोचरीने १, ४,७,१० या पैकी एखाद्या स्थानात येईल आणि मंडल पूर्ण करेल.  हे चार बडे ग्रह असे जेव्हा केंद्रात येतील तेव्हा तो  एक मोठा प्रभावशाली समुच्च्यय तयार होऊन, घबाड योग फळास आणेल. जातकाचा जन्मस्थ मंगळ कोठे आहे हे माहीती नाही, जर जन्मस्थ मंगळ पण केंद्रातच असेल तर हे काम आणखी सोपे होईल.

(त्यावेळी , हॉटेलात माझ्या कडे कोणतीही साधन सामग्री नसताना मी मंगळाचा अंदाज घेऊ शकलो नव्हतो , प्रत्यक्षात जातकाचा जन्मस्थ मंगळ दशम स्थनात म्हणजे मीनेत २८ अंशावर होता , म्हणजे जन्मपत्रिकेत गुरु – मंगळ अंशात्मक युती आहे! ११ ऑक्टोबर २०१६ रोजी गोचरीचा युरेनस आणि जन्मस्थ मंगळ यांची पूर्ण अंशात्मक युती होती आणि गोचरीचा मंगळ धनेत १५ अंशावर होता म्हणजे जातकाच्या सप्तमस्थानातून भ्रमण  करत होता !! )

अर्थात हे सगळे होत असताना जातकाच्या पत्रिकेत जन्मस्थ प्लुटो आणि जन्मस्थ गुरु प्रतियोगात आहेत आणि आता गोचरीचा प्लुटो आणि जन्मस्थ शनी हे पण प्रतियोगातच आहेत हे पण विसरुन चालणार नाही, घबाड मिळताना हा योग आणि गोचरीचा प्लुटो आणि जन्मस्थ गुरु यांचा केंद्र योग पण होत आहे हे पण लक्षात घेतले पाहीजे. या सार्‍याचा अर्थ असा निघतो:

म्हणजे साधारण पणे  ऑक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत या जातकाला कोणता तरी मोठा लाभ झाला असावा.

गोचरीचा गुरु आणि जन्मस्थ प्लुटो या चतुर्थ स्थानातल्या युती वरुन हा लाभ जमीन / वास्तु अशा प्रकाराचा आहे. चतुर्थ स्थानाचा वारंवार संबंध येत असल्याने , हा लाभ बहुदा जातकाच्या माहेर कडून झाला असावा.

ही गुरु – प्लुटो युती  मोठा आर्थिक लाभ देणार असली तरी त्याच वेळेस होत असणारे गुरु- प्लुटो , प्लुटो- शनी हे अशुभ योग त्या घबाडाला कटुतेची , दु:खाची किनार जोडल्या शिवाय राहणार नाहीत हे नक्की. हा लाभ होतानाच काहीतरी मोठे गमावले गेले असणार हे नक्की.

 

आता आणखी काही घटना सापडतात ते पाहू.

संयुक्त पत्रिका पाहता क्षणी मला लक्षात आले की पत्रिकेतला जन्मस्थ वृश्चिकेचा नेपच्युन (जो आपल्या अंदाजा नुसार १५ अंशावर असावा असा आपला अंदाज आहे. आणि)  गोचरीने वृषभेत १४ अंशावर आलेल्या बुधाशी प्रतियोग झाला आहे.  जन्मस्थ नेपच्युन बद्दलचा आपला अंदाज काहीसा मागेपुढे झाला तरी तो वृश्चीकेतच असेल हे नक्की त्यामुळे बुध गोचरीत वृषभेत असतानाच्या एका महीन्यात गोचरीचा बुध – जन्मस्थ नेपच्युन प्रतियोग (याच महिन्यात) नुकताच झाला असेल किंवा होणार असेल.

तसे पाहीले तर या योगाची व्याप्ती बरीच मोठी आहे, पण नेपच्युन आणि बुधाच्या कारकत्वाचा विचार करता ह्या  प्रतियोगाचे मुख्य फळ बाह्य कारणांमुळे झालेला मानसिक त्रास  हेच असते.

आता तुम्ही म्हणाल गोचरीने बुध वृषभेत येणे आणि त्यांचा जन्मस्थ नेपच्युनशी प्रतियोग होणे ही दरवर्षी घडणारी आणि महीना भर टिकणारी घटना आहे. अगदी अंशात्मक योग बघायचा तो सुमारे तीन एक दिवस टिकणारा असतो. दर वर्षी घडणारा रुटीन प्रकार आहे हा. मग जातकाला दरवर्षी मानसीक त्रासाची फळे मिळत राहणार का?

………………  पुढच्या भागात या बाबत जास्त सखोल विचार करु …………………

 

क्रमश:  

शुभं भवतु 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.