नेपच्युन आणि शुक्राची जातकुळी एकच असल्याने शुक्राच्या कारकत्वाचा अतिशय चांगला विकास या योगामुळे झालेला पहावयास मिळतो. कला, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, सौदर्य, भावना या अंगाने या योगाचा विचार करता येतो. नव-पंचम योग असल्याने वर दिलेल्या क्षेत्रात अत्यंत चांगली (दणकेबाज) फळे मिळतात. अनेक कलावंतांच्या पत्रिकांत असा योग हमखास पहावयास मिळतो. मात्र नेपच्युन च्या प्रभावामुळे असा योग असलेल्या व्यक्ती जरा जास्तच भावनाशील व स्वप्नाळु असतात. स्वत:च्या कल्पनाविश्वास रममाण होताना काहीवेळा वास्तवतेचे भान सुटलेले पहावयास मिळते.

इंट्युईशन, खरी होणारी सूचक स्वप्ने पडणे, दृष्टांत होणे , ईश्वरभक्तीत तल्लीन होणे अशी फळे मिळण्याची शक्यता जास्त असते.

या योगा मुळे व्यक्ती कलासक्त बनते मात्र काही वेळा ही कलासक्ती टोकाची असते त्यातुन चैन , पैशाची उधळपट्टी, सुख – ऐषोरामाचा अतिरेक आणि काही वेळा आळशी पणा अशीही फळे मिळू शकतात.

तरंगिनी बेन बाबतीत कला , कलासक्ती, ऐषोआरामाची सवय, नव निर्मिती अशी फळे मिळण्याची शक्यता मोठी आहे.

जर तरंगिनी बेन चा शुक्र धनस्थाना ऐवजी लग्न, व्यय अथवा लाभ स्थानात असेल तर वर दिलेली फळे थोड्या कमी प्रमाणात का होईना मिळतीलच पण अशुभ योग होत असल्याने , जास्त भावनाशील स्वभाव, भावना सहज दुखावल्या जातात, लौकर नैराश्य येते, अपेक्षाभंगाचे दु:ख मोठे असते, अनेक वेळा काल्पनिक चिंता / भिती असते. वैवाहीक जीवनात काही वैगुण्य असते , शुक्र / नेपच्युन जास्त बिघडले असेल मानसिक त्रासाचे मानसिक विकृती मध्ये रुपांतर होऊ शकते.

 

या लेखमालिकेतले पहीले भाग येथे वाचा:

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २

काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

 

लेखमालेतल्या या भागात आपण जातकाच्या पत्रिकेतले उर्वरीत ग्रहयोग तपासू.

 

गुरु – शनी केंद्र योग

शनी मिथुनेत २९ अंशावर आणि गुरु मीनेत १२ अंशावर असतील असा आपला अंदाज आहे त्यानुसार या दोन ग्रहांत केंद्र योग होत आहे.

शनी व गुरु हे ग्रह मंदगती ग्रह असल्याने या ग्रहांमधले योग बरेच दिवस चालू असतात. मोठ्या ग्रहांतला योग असल्याने आपण १ अंश दीप्तांश घेतो,  १ अंश योग होण्या पूर्वी, १ अंश योगात असताना आणि १ अंश योग होऊन झाल्यानंतर , असा ३ अंशाचा  हिशेब होतो. गुरु आणि शनी मध्ये गुरु जलद असल्याने गुरु पुढे सरकत शनी शी योग करतो. गुरु साधारण एक राशी ओलांडायला एक वर्ष घेतो, म्हणजे ३० अंशाला एक वर्ष, या हिशेबाने गुरुला ३ डिग्रीज प्रवास करायला  ५० दिवस लागतात. त्यामुळे हा केंद्र योग सुमारे ५० दिवस आकाशात टिकणारा असतो , या विषीष्ट कालावधीत जन्मलेल्या लाखो लोकांच्या पत्रिकेत हा केंद्र योग असू शकतो त्यामुळे याच नव्हे तर सर्वच मंद गतीच्या ग्रहां मधले योग तारतम्याने घ्यायचे असतात, अगदी पूर्ण अंशात्मक योग असेल तर त्याचा प्रभाव जाणवण्या इतका असतो, अन्यथा असे योग हे स्थूल मानाने (आऊट लाईन) बघायचे.

हा योग अंशात्मक नाही (नसावा) त्यामुळे या योगाची खास अशी काही फळें आहेत ती बर्‍याच कमी प्रमाणात मिळतील. गुरु हा शिक्षणाचा कारक ग्रह शनीच्या प्रभावाने बराचसा बिघडतो. शिक्षणात अडथळे येणे हा हमखास प्रत्ययास येणारे फल. गुरु हा पुत्रकारक असल्याने तो जेव्हा शनीच्या प्रभावाखाली येतो तेव्हा पुत्र संतती होणे दुरापास्त करुन टाकतो, या योगात संतती होणार नाही असे नाही तर पुत्र संतती होणे कठीण असते. या योगामुळे संतती विषय कोणती ना कोणती चिंता निर्माण होते.

बाकी या योगाची ‘त्यागमय जीवन, काहीशी विरक्ती, यशा साठी जास्त कष्ट पडणे, गंभीर स्वभाव, जीवनात दु:खाचे प्रमाण जास्त, नैराश्य, आत्महत्येचे विचार, आर्थिक चणचण, आर्थिक गंडांतरे , फसगत’ अशी खास फळे या जातकाला मिळणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे हा  गुरु – शनी मधला हा केंद्र योग बराच वाईड आहे त्या शिवाय जातकाच्या पत्रिकेत इतर चांगले दणकेबाज ग्रहयोग असल्याने या गुरु –शनी च्या केंद्र योगाचा काहीसा प्रतिकूल प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

तरंगिनीबेन ला या अशुभ योगाचा फारसा त्रास होणार नसला तरी काही पत्रिकांत हा योग आपला हात जरुर दाखवेल म्हणून या योगा बद्दल श्री C E O Carter काय म्हणत आहेत हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरेल!

“These incline to melancholy and disappointment, and often to instability and a dislike of any settled condition; the native is restless and dissatisfied at heart, or, if s/he attains inner content, s/he does so at the price of considerable self-denial.  The combination does not forbid success, but it demands a heavy price of toil, self-control, hardship and self-abnegation.  It is a common feature in military nativities, indicating the privations and restrictions of military life and the constant thwarting of initiative and free expression which characterize it.

Sometimes the native never attains his/her aim, or does so only in part, or very late in life.  Sometimes success comes more easily but does not remain.  There may be small or belated opportunities, or when it comes the native may fail to “fill the bill” either because his/her abilities are too limited (though perhaps good of their sort) or because s/he lacks persistence – these alternatives depend on the relative strength of the two planets.  For if Jupiter predominates he will be flighty and superficial and not fond of hard work; but if Saturn is the stronger, s/he will lack imagination, enthusiasm and driving-force, being inclined to legalism and formalities.  In weak horoscopes this might become mere stupidity and indicate a man of routine without ideas or ambition – a “stick-in-the-mud.”  In powerful maps the aspects will externalize, and indicate obstacles and ill-fortune.

Very frequently there is a Jupiter-Saturn affliction in the maps of suicides; and although it does not follow that this tendency will appear, even in a slight degree, in all cases with this contact, yet the fact illustrates its depressive nature.

The father is often inefficient, unfortunate, careless or imprudent; or, if Saturn is stronger, he may be harsh or narrow-minded, or there may be a lack of sympathy between the native and him.  It is rare that he thrives in a worldly way.”

यातला काही भाग तरंगिनीबेन च्या बाबतीत अनुभवास येण्याची मोठी शक्यता आहे .

शनी – युरेनस नवपंचम

शनी मिथुनेत २९ अंशावर आणि युरेनस तुळेत ४ अंशावर असतील असा आपला अंदाज आहे त्यानुसार या दोन ग्रहांत नवपंचम  योग होत आहे.

शनी व युरेनस हे ग्रह कमालीचे मंदगती ग्रह असल्याने त्यांच्यातले योग बरेच महीने चालू असतात त्यामुळे त्या विषीष्ट कालावधीत जन्मलेल्या लाखो लोकांच्या पत्रिकेत तो योग असू शकतो त्यामुळे अशा मंद गतीच्या ग्रहां मधले  योग तारतम्याने घ्यायचे असतात, अगदी पूर्ण अंशात्मक योग असेल तर त्याचा प्रभाव जाणवण्या इतका असतो, अन्यथा असे योग हे स्थूल मानाने (आऊट लाईन) बघायचे.

सामन्यत: या योगात शनीची चिकाटी, संयम, दीर्घोद्योग, शांत व व्यवहारी वृत्ती आणि युरेनसचा उत्साह, तडफ यांचा एक सुरेख एकजिनसी मेळ झालेला दिसतो. शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांचा संगम झालेला दिसतो. उत्तम कार्यशक्ती, संघटन शक्ती, मोठी कामे , प्रकल्प लिलया पार पाडण्याची धमक आणि चिकाटी या योगा द्वारे लाभते.

जातकाच्या बाबतीत हा योग राश्यात्मक नवपंचम आहे , तो जर अंशात्मक असता तर वर दिलेली फळें नक्की मिळाली असती, पण असे जरी असले तरी या योगाची थोडीशी का होईना पण एक झाक जातकाच्या जीवनावर पडल्या शिवाय राहणार नाही.

या योगा बद्दल श्री C E O Carter म्हणतात:

“This is an excellent practical combination, uniting common sense with initiative, will-power and nervous energy.  It is favorable for any sort of work that requires patience and prudence, combined with originality and insight.  Thus it is good for organizing or for scientific work – the “marshaling of facts” in the logical up building of a great theory (e.g. Newton, Wallace, and Pasteur).  The same tendency is exemplified by Ulysses Grant’s remark: “I will fight it out on this line if it takes me all the summer.” This great leader had Saturn Trine Uranus-Neptune, and his determination was equally well evinced by his personal fortitude in great pain.  Note that, as so often with Saturn, success came late.

There should be concentration, mental and volitional vigor, quiet resolution, prolonged preparation and drastic final action.

It favors positions of control and administration; and, to judge by examples, it seems by no means without relation to the arts.  It is likely to make the native popular as a governor.

However, even the good aspects appear to be of little use as preventatives of injury and violence, for they often occur in maps of victims of such things, although one can scarcely suppose that they are themselves indicators of the dangers.”

शनी – नेपच्युन षडाष्टक:

शनी  मिथुनेत २९ अंशावर आणि नेपच्युन वृश्चिकेत १५ अंशावर असतील असा आपला अंदाज आहे त्यानुसार या दोन ग्रहांत षडाष्ट्क योग होत आहे.

शनी व नेपच्युन हे ग्रह कमालीचे मंदगती ग्रह असल्याने त्यांच्यातले योग तीन-चार महीने चालू असतात त्यामुळे त्या विषीष्ट कालावधीत जन्मलेल्या लाखो लोकांच्या पत्रिकेत तो योग असू शकतो त्यामुळे अशा मंद गतीच्या ग्रहां मधले  योग तारतम्याने घ्यायचे असतात, अगदी पूर्ण अंशात्मक योग असेल तर त्याचा प्रभाव जाणवण्या इतका असतो, अन्यथा असे योग हे स्थूल मानाने (आऊट लाईन) बघायचे.

जातकाच्या बाबतीत हा शनी – नेपच्युन षडाष्टक योग बराच वाईड (शनी – नेपच्युन साधारण १५ अंशाचा फरक) असल्याने याची शास्त्रात वर्णन केलेली , अनुभवास येणारी अशुभ फळे फारशी मिळणार नाही. जातकाच्या कुंडलीतले इतर ग्रहमान पाहता हा षडाष्टक योग जातकाच्या बाबतीत काही बाबतीत नक्कीच फलदायी ठरेल त्यामध्ये उत्तम चिकाटी, अपार कष्ट घेण्याची तयारी, योजकता, धोरणीपणा, संयम, उत्तम ईच्छाशक्ती , उद्योग धंद्यात प्रगती इ. पण त्याच बरोबर हा योग काही अशुभ फळे देण्याचीही शक्यता आहे त्यात, मानसीक त्रास, जीवनात मध्यावर मोठे स्थित्यंतर, प्रतिकूल परिस्थीतीत झगडण्यात फार शक्ती वाया जाणे , मोठे आजार अशा फळांचा समावेश असेल. शनी कर्माचा कारक ग्रह त्यामुळे नेपच्युनच्या योगातला शनी जातकाने जर कला, संगीत , लेखन, कल्पनाशक्ती यांवर आधारीत असलेल्या उद्योग – व्यवसाय केल्यास मोठा लाभदायक ठरेल.

In general, people in creative professions such as art, music, TV or films seem to fare much better under Neptune influence, most likely because they’ve learned to open themselves to the Neptunian realm of creative vision.  In addition, people who serve an idealistic cause, or those who pursue spiritual studies, may also learn to integrate the Neptunian archetype within themselves in satisfying ways.

जातकाची मानसिक जडणघडण तपासण्या साठी चंद्र , बुध, नेपच्युन हे ग्रह महत्वाचे ठरतात. अर्थात जोडीला शनी आणि ( काही वेळा ) शुक्र , मंगळ ( खास करुन बुध – मंगळाचे अशुभ योग !!!!) महत्वाचे ठरतात. जातकाची जी अंदाजे पत्रिका आपण तयार केली आहे त्यानुसार बुध- शनी यांच्यात काही महत्वाचे योग होत नाहीत हा एक मोठ दिलासा आहे. मंगळाची स्थिती माहीती नाही त्यामुळे त्याच्याशी होणार्‍या योगां विचार करता येणार नाही.  शुक्र – शनी अशुभ योगाची शक्यता दिसत नाही. तेव्हा आपण बुध – नेपच्युन योगा कडे लक्ष देऊ.

बुध – नेपच्युन योग:

जातकाच्या षष्ठम स्थानात नेपच्युन असल्याने मानसीक दृष्ट्या काही अशुभ फळें मिळण्याची शक्यता आहे हे आपण पाहीले. असे जेव्हा असते तेव्हा मानसीक बाबतीत परिणाम करणारा दुसरा ग्रह म्हणजे बुध त्याचा विचार करायलाच हवा पण इथे अडचण अशी की जातकाच्या पत्रिकेत बुध नेमक्या कोणत्या स्थानात आहे हे आपल्याला माहीती नाही. पण रवीच्या स्थिती वरुन आपण अंदाज बांधू शकतो , रवी मिथुनेत ५ अंशावर आहे आणि रवी – बुधात २८ अंशा पेक्षा जास्त अंतर पडत नसल्याने हा बुध एकतर लग्नात रवी बरोबरच किंवा व्ययात किंवा धनस्थानाच्या आरंभी च्या अंशात असेल.

हा बुध व्ययात असेल तर त्याचा षष्ठम स्थानातल्या नेपच्युन शी  (राश्यात्मक) प्रतियोग होईल.

हा बुध लग्नात असेल तर त्याचा षष्ठम स्थानातल्या नेपच्युन शी  (राश्यात्मक) षडाष्टक योग होईल.

हा बुध धन स्थानात असेल तर त्याचा षष्ठम स्थानातल्या नेपच्युन शी  (राश्यात्मक) नवपंचम योग होईल.

बुध – नेपच्युन यांच्यात कोणताही योग असू दे , काही ठरावीक फळांचा अंदाज नक्की घेता येतो. या बाबतीत श्री C E O Carter म्हणतात:

“Neptune being more nearly connected with the imagination than with any other human faculty, the aspects of these two planets suggest the fertilization of the mind by the imagination, which, in its higher forms, is the creative imagination and the inspiration.

Tending to art rather than to purely intellectual manifestation.  There is kindness and gentleness, and a dislike of rough conditions and harsh conduct, for Neptune sensitizes all that it contacts.  Hence, the nervous system is delicate and the senses are able to appreciate the rarer shades of color, sound, touch and meaning.  Often there is a gift of whimsical and fanciful writing, and the sense of humor is usually well-developed.

The configuration usually indicates an astute and cunning type of person, capable of deep scheming and in fact generally hardly able to avoid some degree of deception, though not necessarily for evil purposes.  Sometimes the deception is of a quite innocent order.

It is probable that this characteristic arises from the delicate perceptions of the aspects which enable the native to divine what others will do or try to do. Sometimes it leads to easy discouragement and lack of self-confidence, because the native is too thin-skinned and worries unduly.  Sometimes the same sensitiveness causes fierce outbursts of resentful anger.  Like all Neptunian aspects, it is not easy to say in what precise way the contact will manifest; much will depend on the Rising Sign.  It is clear that lack of real self-confidence may easily induce a person to resort to deceit.

Active imagination and the insight into motives that results from sensitive perceptions may be invaluable to a man of genius or even a man of practical sense; but in the case of persons of weak judgment and understanding the same things may lead to all kinds of foolish and morbid fancies.”

हा बुध – नेपच्युन योग संशोधनाला, कलाविष्काराला पोषक, कोणत्याही बौद्धीक वा मानसिक क्षेत्रात जगावेगळी झेप देणारा असतो. साहित्यिक, संशोधक, कलाकार, कवी – काव्यरसिक, नृय/शिल्पकार , वाद्यवादक अशा क्षेत्रासाठी हा योग अत्यंत लाभदायक असतो, हा योगाने जात्याच काही दैवी देणगी लाभते त्यायोगे दृष्टांत होतात, सूचक स्वप्ने पडतात, आगामी काळात घडणार्‍या घटनांचा आधीच अंदाज येतो.

बुध- नेपच्युन लाभ / नवपंचम कोणत्याही क्षेत्रात बुद्धीचा विलास मोठ्या उत्कृष्ट्पणे होतो. तर बुध-नेपच्युन षडाषक व प्रतियोगात शुभ योगातली काही फळे मिळतात पण त्याच बरोबर मानसिक दृष्ट्या काही अशुभ फळे मिळताना दिसतात. अत्यंत भावनाशील स्वभाव, मानसिक त्रास / विकृती , अनामिक भिती, असतात चिंता-काळजी करणे, मनाचा कमकुवतपणा , भावनातिरेक, मातुल घराण्यात कोणाला तरी मानसिक विकृती अथवा वेड.

तरंगिनी बेन चा नेपच्युन षष्ठात (६) आहे , त्यामुळे मातुल घराण्यात कोणाला तरी विकृती / वेड असण्याची शक्यता जास्त आहे, बुध व्ययात (१२) असेल तर ही शक्यता जास्त बळावेल.

…..

…..

इथे पर्यंत अ‍ॅनालायसीस केल्या नंतर तरंगिनीबेन बद्दलचे अंदाज बर्‍या पैकी स्पष्ट झाले. आता एक महत्वाचा घटक तपासायचा राहीला आहे तो म्हणजे ‘संतती’

पंचमस्थाना वरिन आपण संतती विषयक काही अंदाज बांधले आहेतच. या बाबतीत अधिक विचार करायचा तर:  पंचमेश शुक्र द्वितीय स्थानात असावा असा आपला अंदाज आहे पण खात्री नाही. संतती कारक गुरु दशमात मीन राशीत आहे हे त्यातल्या त्यात बरे पण त्याच वेळी हा गुरु लग्नातल्या शनीच्या केंद्र योगात आहे आणि गुरु – हर्षल षडाष्टक योग आहे हे पण विसरुन चालणार नाही. ‘नाडी ग्रंथा’ तल्या संतती विषयक सुत्रांचा आधारे (ज्या मध्ये संततीचा विचार करताना संतती कारक गुरु चे स्थान हेच लग्न स्थान मानले जाते) आणि धन स्थानात शुक्र असेल हा अंदाज करून विचार केल्यास जातकाची प्रथम संतती कन्या रत्न दर्शवते आणि गुरुच्या प्रभावा मुळे ही प्रथम संतती स्थुल असावी असाही एक अंदाज करता येईल.  ‘नाडी ग्रंथा’ तल्या सुत्रांनुसार जातकाला किमान दोन संतती रत्ने लाभली असतील पण त्या सगळ्या मुलीच असतील, पुत्र रत्न लाभणे काहीसे अवघड आहे. पहिली संतती कन्या असेल (आणि या संततीला लठ्ठपणाची समस्या असावी).

संतती बाबतीतले भाकित नाडी ग्रंथांतील काही अद्भुत सुत्रांचा वापर करु केली आहेत, ज्यांचा नाडी ज्योतिषाचा अभ्यास आहे त्यांना हे सहज लक्षात येईल मात्र नाडी ग्रंथा बाबतीतला हा भाग मी विस्ताराने देऊ शकत नाही, कारण काही गोष्टी गुपितच ठेवलेल्या बर्‍या ! ही विद्या गुरु-शिष्य परंपरेनेच हस्तांतरीत करायची असते, षटकर्णी होऊ द्यायची नाही असे बंधन प्रत्येक नाडी अभ्यासकावर असते तसे ते माझ्यावर पण आहे.

जातकाचा शुक्र धनस्थानात आहे असे मला प्रकर्षाने वाटत होते. धनेश –पंचनेश दुहेरी अन्योन्य योग, दशमात गुरु असल्याने त्याचा या धनस्थानातल्या शुक्राशी नव-पंचम , दशमेश गुरु दशमातच या सगळ्यावरुन मला असे सारखे वाटून राहीले की जातक घर सांभाळणारी (साँस-बहु च्या मालिका पाहात, नवर्‍याचा पैसा कसा खर्च करावा ह्या चिंतेत असलेली !) गृहीणी नसावी, जातक स्वत: एखादा व्यवसाय सांभाळत असावी किंवा नवर्‍याच्या व्यवसायात मोठा सहभाग लावत असेल. धनेश पंचमात असल्याने पंचम स्थानाच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होण्याची शक्यता जास्त आहे. जातकाचा व्यवसाय ही चंद्र – गुरु – शुक्र-युरेनस- नेपच्युन यांच्या प्रभावा मुळे फॅशन , बुटीक , आर्ट, सौदर्य, आभुषणे, दागिने, महागड्या वस्तु , चैनीच्या वस्तु अशा प्रकाराचा असू शकतो किंवा शेअर्स / गुंतवणूक व्यवस्थापन अशा पद्धतीचा सुद्धा असू शकेल.

आपल्या समोर जी अपूर्ण पत्रिका समोर आहे त्यातल्या ग्रहस्थिती वरून आणि ग्रहयोगांवरुन आणखी काही भाष्य करणे बरोबर नाही कारण आपल्याला शुक्र , बुध , मंगळ यांच्या राशी माहीती नाही, जे ग्रह योग तपासले/ तपासायचे त्यांचे अंश माहीती नाहीत ही मोठी अडचण आहे त्याच बरोबर या अशा स्टॅटीक अ‍ॅनॅलायसिस ला ही स्वत:च्या अशा काही मर्यादा आहेत , म्हणजे:

जन्मपत्रिकेतली ग्रहस्थिती आणि ग्रहयोग यावरुन त्या व्यक्तीला शारीरीक ठेवण, मानसीक बैठक, स्वभाव, पैसा, नोकरी-व्यवसाय, शिक्षण, विवाह , संतती, आरोग्य, प्रवास, धार्मिक बाजू अशा अनेक बाबतीत कोणती फळे मिळू शकतील याचा एक अंदाज येतो.  यालाच आपण ‘नाताल प्रॉमिस’ म्हणतो. पण योग आहेत (नाताल प्रॉमिस आहे ) म्हणजे त्यांची फळे मिळणारच असेही नाही ! ग्रहयोगांची फळे ही काहीशी बीज स्वरुपात असतात, त्यांचा विस्तार होणार का नाही , झाल्यास कसा, हा भाग  इतर अनेक (त्यात पत्रिके बाहेरील बाबींचाही समावेश असतो) घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्यक्षात ग्रहयोगांची फळे मिळणार का नाही आणि मिळणार असल्यास केव्हा व कशी हे कळायला आपल्याला पत्रिकेचा ‘डायनॅमिक’ अभ्यास करावा लागतो. या डायनॅमिक अ‍ॅनॅलायसिस द्वारा हे नाताल प्रॉमिस प्रत्यक्षात उतरणार आहे की नाही हे समजते.  पुढच्या टप्प्यात आपल्याला हे नाताल प्रॉमिस केव्हा फलद्रूप होणार हे ठरवायचे असते त्यासाठी आपल्याला ग्रहांची गोचर भ्रमाणे तपासावी लागतात. 

 

पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थिती वरुन आणि ग्रहयोगांचा अभ्यास करुन आपण काही अंदाज बांधले आता थोडे ‘डायनॅमिक अ‍ॅनालायसीस’ करुन जातकाच्या आयुष्यात नजिकच्या काळात घडलेल्या काही ठळक घटनांचा वेध घ्यायचा प्रयत्न करणे जास्त सयुक्तीक ठरेल, त्याचा जातकावर अधिक चांगला प्रभाव पडेल.

उपलब्ध माहीती वरुन बनवलेल्या या अपूर्ण पत्रिकेवरुन जातकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनां बद्दल काही बोलावे तर फारच जनराईल्ज्ड होईल,अंशात्मक पत्रिका समोर असल्या शिवाय असे काही सांगणे योग्य नाही. गुरु, शनी, युरेनस, नेपच्युन असे मोठे ग्रह दीर्घ काळ (काही तर वर्षानुवर्षे) एकाच राशीत ठाण मांडून बसलेलेले असतात त्यांचे आपसात होणारे ग्रहयोग देखील असेच दीर्घकाळ टिकणारे असतात त्यामुळे लाखों लोकांच्या पत्रिकेत एक सारखे योग असू शकतात. पत्रिकेची खरी जडणघडण ही अशा मोठ्या ग्रहां पेक्षा चंद्र, बुध, शुक्र आणि मंगळ अशा लहान ग्रहांवर अवलंबून असते आणि नेमकी हीच माहीती उपलब्ध नाही.

संपुर्ण पत्रिका समोर नसताना हे असे काही करणे तसे धाडसाचेच पण ‘कोशिश करने मै क्या हर्ज है ।“

माझ्या हाताशी कॉम्प्युटर,मोबाईल अ‍ॅप, पॉकेट पंचांग अशी कोणतीच साधने नसल्याने  ‘डायनॅमिक अ‍ॅनालायसीस’ साठी वापरली जाणारी दशा – विदशा , डायरेक्शन्स , रिटर्नस, प्रोग्रेशन्स इत्यादी तंत्रे वापरता येणार नव्हती, फक्त गोचर भ्रमणे तपासणे इतकेच काय ते माझ्या हातात होते. माझा ज्योतिष व्यवसाय असल्याने रोज सकाळी त्या दिवसाची ग्रहस्थिती डोळ्याखालून घालणे हे माझे नित्यकर्म. ते आज रोजी केलेलेच होते त्यामुळे आजची ग्रहस्थिती मला अचूक माहीती होती , ह्या गोचरीच्या ग्रहांचा जातकाच्या पत्रिकेतल्या (जन्मस्थ) ग्रहांशी कसा संबध जोडला गेला होता/आहे हे तपासले तर आपल्याला जातकाच्या आयुष्यात नजिकच्या काळात काय काय घडले असावे / घडणार आहे याचा अंदाज बांधता येईल.

मी रोज सकाळी साधारण ८:०० च्या सुमारास माझा कॉम्प्युटर चालू करतो आणि त्यावेळची गोचरीची स्थिती नोंद करतो. हे फारसे अवघड नाही कारण एक चंद्र सोडला तर इतर कोणा ग्रहांच्या ग्रहस्थिती मध्ये रोजच्या रोज फार मोठा फरक पडत नाही , हे अगदी रोज पाहीले पाहीजे असे ही नाही प्रत्येक महीन्याच्या १ आणि १५ तारखेला अश्या ग्रहस्थितीची नोंद घेतली तरी पुरेसे असते.

आज दिनांक ११ जुन २०१७, सकाळी ८:१५ , वाजताची गोचरीची ग्रहस्थिती अशी आहे:

चंद्र धनुराशीत, बुध व सुर्य वृषभेत, शुक्र मेषेत, मंगळ मिथुनेत, गुरु कन्येत, शनी वक्री व प्लुटो वक्री धनुराशीत, केतु व नेपच्युन कुंभेत, राहु सिंहेत, युरेनस मेषेत.

आता हे गोचरीचे ग्रह आणि जातकाचे जन्मस्थ ग्रह यांची संयुक्त स्थिती अशी दिसेल.

(गोचरीचे ग्रह वर्तुळात, जन्मस्थ ग्रह वर्तुळ विरहीत.)

 

 

 

आपल्याला समजावे म्हणुन हे चित्र दिले आहे, माझा अभ्यास व सराव असल्याने हे चित्र मी माझ्या डोळ्या समोर चितारल्या सारखे निर्माण करु शकतो. पण यात काही जादू वा चमत्कार नाही, आपल्याला ही हे जमू शकेल अगदी खात्रीने. एखादी पत्रिका काही वेळ बघा आणि मग डोळे मिटून ती पत्रिका डोळ्यासमोर आणायचा (व्हिज्युलाईझ) प्रयत्न करा , सरावाने जमेल.

ही गोचरी + जन्मस्थ अशी संयुक्त (सुपर ईम्पोज्ड) पत्रिका पाहताच एक बाब लगेच लक्षात येते की लग्न, चतुर्थ, सप्तम, व्यय, लाभ या भावांत बरीच खळबळ माजलेली आहे. दशम स्थानात सामसुम आहे !

सगळ्यात प्रथम माझ्या समोर आली ती चतुर्थ स्थानातली  (जन्मस्थ) प्लुटो- (गोचरी) गुरु यांची राशात्मक युती. … गुरु- प्लुटो युती मोठे लाभ देणारी म्हणून प्रसिद्ध आहे! 

ही युती आणि इतर काही डायनॅमिक योग याब्दाल आपण पुढच्या भागात विचार करु…

 

क्रमश:

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. आण्णासाहेब गलांडे

  एक चहाच्या(काँफी)दूकानात तंरगिनी काय भेटली तूम्ही तर P.hdचा प्रबंधच सादर केला!
  धन्य तुमची!!

  0
 2. shailaja

  sir, i m provide herewith my birth details for details , i have lots of problem in my life, still it is going on. No settlement is their my marriage life is over with in 10 yrs in 2010 , financial condition is not strong . i have two kids girl 16 yrs and boy 12 yrs. please guide me . i m thinking about remarry and other question is unanswerable. Hope you r guideline will be helpful to me .

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.