सकाळीच चिन्मय चा फोन आला ..

“काका, कालच बेंगलोर हून नाशकात आलोय, आजचा एकच दिवस नाशकात आहे, जरा भेटायचे आहे, अगदी अर्जंट काम आहे, काहीही करुन वेळ द्या”
“अरे पण असे काय अर्जंट काम आहे?”

“काका ते प्रत्यक्ष भेटीतच सांगतो..”

“ठीक आहे, माझ्या कडे आज साडे नऊची एक अपॉईंटमेट आहे, ती साधारण अकरा पर्यंत संपेल , तेव्हा तू साडे अकराच्या दरम्यान ये. पण त्याहून जास्त उशीर करु नकोस कारण पुढची दुपारी दीड वाजताची अपॉईंटमेंट आहे”
‘हो काका, अगदी वेळेत येतो”

चिन्मय जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा सकाळचे साडे अकरा वाजले होते (11:28). मी चिन्मयचीच वाट पाहात होतो. चिन्मय माझ्या कडे पूर्वीही एकदा ज्योतिष विषयक मार्गदर्शन घ्यायला आला होता तेव्हा आत्ताही तो ज्योतिष विषयक सल्ला मागयलाच आला असणार हे उघडच होते पण नेमक्या कोणत्या प्रश्ना संदर्भात त्याला मार्गदर्शन हवे आहे हे मात्र त्या क्षणी मला माहीती नव्हते तरीही चिन्मय चे वय पाहता , नोकरी, परदेश गमन, विवाह किंवा घर यापैकीच काहीतरी एक कारण असणार असा तर्क सहज करता येण्यासारखा होता.

चिन्मय जेव्हा माझ्या समोर आला त्यावेळेची एक कुंडली मी मांडली. या प्रकारच्या कुंडलीला ‘कन्सलटेशन चार्ट’ म्हणतात. माझ्या कोणत्याही ‘आमने-सामने’ कन्सलटेशन ची सुरवातच कन्सलटेशन चार्ट च्या अभ्यासातून होते.

Chinmay K Consultation Chart

t29 Mar 2014,  11:28:03

Deolali : 73e50’00 , 19n57’00

Geocentric, Tropical , Placidus , True Node

Software: Online resources

कन्सलटेशन चार्ट बद्दल भारतात फारशी माहीती नाही, पण पाश्चात्य ज्योतिर्विद याचा फार खुबीने वापर करुन घेतात. या कन्सलटेशन चार्ट मधून मिळणारे बारीक सारीक तपशील केवळ थक्क करुन टाकणारे असतात !

या कन्सलटेशन चार्ट च्या अभ्यासातुन आपल्याला जातका बद्दल, जातकाच्या संभाव्य प्रश्नांबद्दल, जातकाचे व्यक्तीमत्व, त्याचे नातेसंबंध, त्याचे आरोग्य, आर्थिक स्थिती, जातकाच्या आयुष्यात नुकत्याच होऊन गेलेल्या घटनां आणि आगामी काळात होऊ घातलेल्या घटना या अशा अनेक गोष्टी बद्दल चांगला अंदाज बांधता येतो.

जरी मी जन्मकुंडली वरुन प्रश्नाचे उत्तर देणार असलो तरीही , कन्सलटेशन चार्ट ने पुरवलेली माहिती बहुमोल ठरतेच ठरते, कारण, ज्योतिष ही संकेताची भाषा असल्याने, ग्रह, राशी, भाव, योग या सार्‍या संकेताचा व्यक्ती, स्थळ, काळ , परिस्थिती सापेक्ष अर्थ लावायला कन्सलटेशन चार्टने पुरवलेली माहीती मला नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

कन्सलटेशन चार्ट चा अभ्यास आपल्या नेहमीच्या प्रश्नकुंडली सारखाच करावयाचा असतो.

चला तर मग चिन्मय साठी तयार केलेला कन्सलटेशन चार्ट काय सांगतो ते बघूया.

या चार्ट चा लग्न बिंदू 29 मिथुन 02 वर आहे म्हणजे लग्नराशीच्या शेवटच्या अंशात आहे, अशी परिस्थिती असते तेव्हा दोन शक्यता असतात:

प्रश्ना संदर्भात जातक काहीही करु शकणार नाही, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि जे जे काही होईल ते उघड्या डोळ्यांनी पाहाणे एव्हढेच काय ते जातकाच्या हातात उरले आहे.
जातक जरी प्रश्नाचे उत्तर जाणुन घ्यायला आला असला तरी , त्या प्रश्नाचे उत्तर त्याने आधीच ठरवले आहे, ह्या प्रश्नासंदर्भात काय कृती करायची हे त्याने आधीच ठरवले आहे, त्याला आता ज्योतिषशास्त्रा द्वारे फक्त दुजोरा (Confirmation) मिळते का हे पहावयाचे आहे.

मिथुन लग्न आहे. मिथुन लग्न ‘विविधता आणि सतत बदल’ दाखवते (बुधाचा गुणधर्म), त्यामुळे मिथुन लग्न उदित असताना जातकाचा प्रश्न हा कोणत्या तरी स्वरुपाच्या बदला संदर्भात असतो. या बुधाच्या दुहेरी व्यक्तीमत्वा मुळे जातकापुढे दोन पर्याय असतात आणि त्यातला कोणता निवडायचा याबद्दल त्याचा मोठा वैचारीक गोधळ झालेला असतो. ‘या दोन पर्यायां पैकी कोण्ता निवडू?’ असा प्रश्न घेऊन जातक आलेला असतो.

(इथे हे ही लक्षात घेतले पाहीजे की मिथुन जन्मलग्न म्हणजे ‘बदल’ आणि अन्य जन्म लग्न असताना ‘बदल’ नाही असा अर्थ कोणीही काढू नये. पण मिथुन लग्न असताना प्रश्न ‘बदला’ संदर्भात किंवा ‘दोन पैकी कोणता’ अशा स्वरुपाचा असण्याची शक्यता जास्त असते हा मात्र अनुभव आहे.)

मिथुन लग्न आहे म्हणजे लग्नेश बुध आहे. तो जातकाचे प्रतिनिधीत्व करणार. त्याच बरोबर गुरु लग्नातच असल्याने तो ही जातकाचे प्रतिनिधीत्व करणार, चंद्र हा नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्ता) नैसर्गिक प्रतिनिधी असतो.

साधारणत: लग्नेश, चंद्र, रवी कोणत्या भावात आहेत आणि कर्क व सिह राशी कोणत्या भावारंभी आहेत यावरुन जातकाचा प्रश्न कोणता आहे याचा अंदाज येतो.

या चार्ट मध्ये रवी दशमात (10) आहे, चंद्र नवमात (9) आहे आणि दशम बिंदू पासून अवघा एक अंश मागे आहे. म्हणजे जातकाचा प्रश्न नोकरी – व्यवसाया संदर्भातला आहे. त्यातही चंद्र अगदी लवकर भाव बदलून दशमात जाणार असल्याने प्रश्न नोकरीत बदल करण्या बाबतचा असू शकेल.

चिन्मयचा प्रतिनिधी ‘बुध’ पण नवमात (9) आहे , नवम भाव लांबच्या अंतरावरचा प्रवास तसेच उच्च शिक्षण दाखवते, याचा अर्थ प्रश्न नोकरी / व्यवसाय अथवा उच्च शिक्षणासाठी परदेश गमना संबंधी असू शकतो.

कर्क रास द्वितीय (2) भावारंभी आहे म्हणजे पैशाशी काहीतरी संबंध असणार , सिंह रास त्रितिय (3) भावारंभी आहे म्हणजे बद्ल (Change), लहान अंतरावरचे प्रवास, कुटुंबियापासून दूर राहणे, कागदपत्रे, करार-मदार अशा गोष्टी ही असू शकतील.

पैशाचा संबंध दिसल्यावर मी ताबडतोब ‘फॉर्च्युना’ कोठे आहे ते पाहीले, तो व्ययात (12) आहे. फॉरचुनाचा राशीअधिपती ‘बुध’ नवमात (9) , फॉर्च्युना ज्या भावात आहे त्याचा अधिपती ‘शुक्र’ हा देखिल नवमात (9) आहे, यावरुन प्रश्नाचा संबंध परदेशी (9,12) संस्थांशी व्यापार , करार (3, बुध) असाही असू शकतो.

माझ्या माहीती प्रमाणे चिन्मय तर नोकरी पेशातला होता , त्याचा स्वतंत्र व्यापार उदीम नव्हता म्हणजे हा संबंध नोकरी साठी परदेश गमन (3,9,12) असा ही लावता येतो.

गुरु जो चिन्मय चा आणखी एक प्रतिनिधी , लग्नातच आहे आणि कर्केत (उच्च रास) म्हणजे चिन्मय सध्या तरी फार मोठ्या संकटात नाही किंबहुना चांगल्या सुस्थितीत आहे. चिन्मय समोर काही प्रश्न उभा असला तरी अगदीच हताश , निराश किंवा अगदी निर्वाणीची / आणिबाणीची वेळ आलेली नसावी.

सामान्यत: कन्सलटेशन चार्ट मध्ये गुरु जेव्हा पहिल्या स्थानात असतो तेव्हा तो एक शुभ शकुनच मानावा कारण पहिल्या स्थानातला हा गुरु आगामी काळातल्या शुभघटना, वैभवाचा काळ दाखवतो. जातकाच्या पुढ्यात आता ह्या घटकेला काही प्रश्न असले तरी ह्या ना त्या मार्गाने जातकाला वेळेवर आणि मोलाची मदत मिळतेच मिळते आणि जातकाच्या प्रश्नाची सोडवून अतिशय आश्वासक रित्या होते , ती जातकाच्या हिताचीही सिद्ध ठरते. पण त्याच बरोबर हा गुरु जातकाचा अति आत्मविश्वास दाखवतो , नस्त्या गोष्टीचे अवडंबर सुचवतो, राईचा पर्वत केलेला असतो.

गुरुच्या धनु व मीन राशी सप्तम (7) व दशम (10) भावारंभी आहे, या वरुनही असा तर्क बांधता येतो की प्रश्न कदाचित नोकरी व्यवसाय (10), विवाह, प्रवास, भागीदार इ. (7) या संदर्भातला असू शकतो. सप्तम स्थान (7) हे सुद्धा परदेश प्रवासाचे स्थान मानले जाते.

गुरु लग्नात व सप्तमेश यावरुन प्रश्न कदाचित विवाहा संदर्भात सुद्धा असू शकेल पण दशम , नवम व व्यय स्थानांचे प्राबल्य पाहता ही शक्यता मला जरा कमीच वाटते. पण भागीदारीत व्यवसाय करु का ? असा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्या नंतर आत्ताच्या क्षणा (चार्ट टाईम) त्याने जे काही ग्रहयोग केले आहेत त्यावरुन गेल्या नजिकच्या काळात चिन्मय महाराजांनी काय काय उद्योग करुन ठेवलेत व चंद्र यापुढे रास ओलांडून जाई तो पर्यंत आणखी कोणते ग्रहयोग करणार आहे त्यावरुन चिन्मय महाराजांचे पुढील उपद्व्याप काय काय असतील याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे. जरा पाहूयाच चिन्मयबुवांचे हे उद्योग!

चंद्र नुकताच प्लुटोच्या लाभ योगातून बाहेर पडला आहे (4-33 सेपेरेटिंग) , प्लुटो सप्तमात आहे आणि मॉडर्न रुलरशीप च्या नियमांनुसार षष्ठेश आहे , या दोन भावांवरुन असा अंदाज बांधता येईल की चिन्मय चा नुकताच नोकरी (6) च्या संदर्भात कोणाशी तरी (7) बातचीत (इंटरव्हू) झाला असेल किंवा सध्याच्या नोकरीत काही मोठी खळबळनक घटना किंवा त्याचे कोणाशी तरी वाजले (प्लुटो) असणार.

चंद्र त्या आधी गुरुच्या नव-पंचम योगातून बाहेर आला आहे, (6-47 सेपेरेटिंग) , गुरु जरी चिन्मय चा को-सिग्नीफिकेटर असला तरी तो नवमेश आणि दशमेश आहे. म्हणजे नोकरी (10) आणि परदेश प्रवास (9) याबाबतीत काही आश्वासक / शुभ घटना घडली असावी किंवा अशी काही बातमी चिन्मय ला मिळाली असावी.

चंद्र नेपच्युनच्या युतीतून बाहेर पडला आहे ( 12 अंश सेप्रेटींग़) , चंद्र आणि  नेपच्युन दोघेही मीनेत म्हणजे पुन्हा एकदा ‘जल प्रवास’ म्हणजे आत्ताच्या भाषेत ‘परदेश गमन’ , पण चिन्मय आत्ता माझ्या समोर उभा आहे म्हणजे तो परदेशात नाही,  म्हणजे तो नुकताच परदेशाहून परत आलेला असलेला पाहीजे किंवा परदेश गमनासंबधी काहीतरी विचार, गोंधळ, फसवणूक (नेपचुन!) असे काहीतरी घडलेले असणार.

चंद्र अगदी लगेचच दशमबिंदू शी युती करणार आहे , म्हणजे नोकरीत बदल किंवा नोकरीत एखादी शुभ (अशुभ ही असू शकते !) घटना.

चंद्र लवकरच शनी शी (4-41 अप्रोचिंग) केंद्र योग करत आहे. शनी अष्टमेश (8) व नवमेश (9) आहे, म्हणजे विमा, प्रोव्हिडंट फंड , नुकसान भरपाई (8) आणि उच्च शिक्षण , परदेश प्रवास (9) असा योग लवकरच येण्याची शक्यता आहे. अगदी परदेश प्रवास नसला तरी रिलोकेशन, देशांतर्गत लांबच्या अंतरावर प्रवास अशीही शक्यता आहे.

ह्या सर्व गोष्टींचा मेळ घातला तर चिन्मय एक नोकरी सोडून दुसरी नोकरी धरण्याच्या विचारात आहे आणि दुसर्‍या नोकरीच्या निमित्ताने चिन्मयला दुसर्‍या गावी स्थलांतर करावे लागेल. चिन्मय चा प्रश्न परदेश गमना संदर्भात असण्याचीही मोठी शक्यता आहे असाही अर्थ निघू शकतो.

या ‘कन्स्लटेशन चार्ट’चा आणखी बराच कीस पाडता येईल (मी तर त्या साठी प्रसिद्ध आहे !) आत्ता पर्यंत केलेले विश्लेषण पुरेसे आहे , इतक्या खोलात शिरण्यापूर्वी आपण प्रथम चिन्मयचा प्रश्न काय आहे ते जाणुन घेऊयात.

एकदा का चिन्मयचा प्रश्न कोणता हे कळले की आपल्यला या ग्रहस्थितींचा अधिक चांगला अन्वयार्थ लावता येईल, तेव्हा सध्या हा ‘कन्स्लटेशन चार्ट’ जरासा बाजूला ठेऊन आपण चिन्मय शी बोलून त्याचा नेमका प्रश्न काय आहे ते जाणुन घेऊया.

हा लेख फारच मोठा होत असल्याने दोन भागात प्रसिद्ध करत आहे, या पैकी पहिला भाग जो आत्ता आपण वाचत आहात. दुसर्‍या भागात चिन्मयचा नेमका प्रश्न काय होता व त्याचे उत्तर कृष्णमूर्ती पद्धतीने कसे शोधले ते पाहूया.

दुसरा भाग लगेचच  प्रकाशीत करत आहे, पुन्हा एकदा ब्लॉगला भेट देऊन वाचावयास विसरु नका.

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. Narayan T

  Thoughtful analysis of consultation chart!!
  One question- if consultation chart can provide all this information, why cannot we use it to solve client’s problem ? Why KP is needed seperately?

  Thanks,
  NT

  0
  1. सुहास गोखले

   Hi Narayanan,

   Consultation chart is erected to know in advance about the client , his/her query , background information. This chart may or may not serve as a Horary chart , but information thus gathered through this consultation chart serves as a good starting point. Astrology is a symbolic language, planets , houses, signs . aspects all are symbols and each one has literally hundreds of meanings. Context is very important to pick up an appropriate meaning of any such symbol, consultation charts provides such ‘context, far quicker than conventional method of interrogating the client.
   fixing probable timing of an event. Though Western Horary is quite powerful while extracting finer details compared to Vedic and KP , some how it is rather weak in providing timings. Astrology is quite complex , much beyond mathematics and logic. So one has to utilize all available techniques in hand in order to arrive at a conclusion. I , sometimes use 4 methods , viz. Vedic, KP< Western and Uranian Planetary Pictures !

   Hope this helps,

   God bless you

   Suhas Gokhale

   0
  1. सुहास गोखले

   श्री.शिवाजीराव,

   आभिप्राया बदद्ल धन्यवाद. आपल्या सारख्यांच्या या अशा अभिप्रयांमुळेच तर सतत नविन काही लिहण्याची स्फूर्ती मिळत असते.

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.