चिन्मय माझ्या पुढ्यात आला त्या वेळेच्या (11:28 AM) ‘कन्सलटेशन चार्ट’ चा अभ्यास करुन चिन्मय चा प्रश्न कोणता असेल याचे काही अंदाज आपण बांधले आहेत. (भाग-१)

या ‘कन्सलटेशन चार्ट’ चा प्राथमिक अभ्यास पूर्ण होई पर्यंत मी चिन्मयला थोडा वेळ बसायला सांगीतले होते. एरव्हीही जातक आल्या आल्या लगेच प्रश्नकुंडली साठी नंबर घेऊ नये. कुठुन कुठुन लांबून जातक आलेला असतो, वाहन चालवण्याचा मानसीक थकवा, रस्त्यातले खड्डे, प्रदुषण, गोंगाट, ट्रफिक जाम या सार्‍यांमुळे नाही म्हणले तरी मनावर आणि शरीरावर बराच ताण आलेला असतो. प्रश्नकुंडली साठी नंबर घेताना जातकाचे शरीर व मन दोन्हींही स्वस्थ असणे अत्यंत जरुरीचे असते. त्यामुळे आल्या वर जातकाला स्थिरस्थावर व्हायला वाव द्या, जरा इकडचे तिकडचे बोलून वातावरण तणाव मुक्त करणे गरजेचे असते. तसेच या अवांतर बोलण्यातूनही जातकाचे व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली, देहबोली (Body language) यावरुन आपल्याला बरेच अंदाज बांधता येतात, जातक कोणत्या परिस्थितीत आहे याचाही अंदाज येतो. याचा ग्रह, भाव, अस्पेक्ट्स यांचा व्यक्ती-स्थळ-काळ-परिस्थिती सापेक्ष अर्थ लावायला खूपच चांगला उपयोग होतो.

असो.

कन्सलटेशन चार्टचा प्राथमीक अभ्यास पूर्ण होताच मी चिन्मय कडे मोर्चा वळवला.

“बोल, सायबां, काय काम काढलेस आज?”

“काका, आपल्याला माहीती आहेच की मी बेंगलोर ला ‘यययय’ या आय.टी. कंपनीत मध्ये काम करतो,  पाच वर्षे झाली या कंपनीत पण परदेशी (On site) जाण्याची संधी काही मिळाली नाही. माझ्या ग्रुप चे जवळजवळ सर्वच एकेकदा तरी परदेश वारी करुन आले, मीच काय तो एकटा ज्याला अजून संधी मिळाली नाही. दरवेळेला आश्वासन देतात आणि ऐनवेळी काहीतरी कारण सांगून दुसर्‍यालाच पाठवतात”

“अरे, होते असे बर्‍याच जणांच्या बाबतीत, हल्ली या प्रकारात कंपूबाजीचे राजकारणच जास्त चालते”

“मला ही तोच संशय आहे, शेवटी मी कंटाळून दुसरी कडे प्रयत्न करायचे ठरवले, आज माझ्या हातात त्या ‘क्षक्षक्ष’  या कंपनीची  जॉब ऑफर आहे, त्यांनी परदेशात नक्की पाठवू असे भरघोस आश्वासन पण दिले आहे”

“अरे वा, चांगलेच की, मग तुला आता अडचण कसली ?”

“काका त्यांच्या तोंडी आश्वासना वर कसा काय विश्वास ठेऊ ? त्यांच्या शब्दावर विसंबून सध्याची नोकरी सोडून तिकडे गेलो आणि त्यांनीही अशीच तोंडाला पाने पुसली तर काय? माझी अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्या सारखी व्हायची !”

“परदेशात पाठवू असे लेखी आश्वासन कोणीच देणार नाही. त्यामुळे तू म्हणतोस तसा धोका पत्करावाच लागेल त्याला ईलाज नाही ”

“पण काका, तुम्ही प्रश्नकुंडली मांडून मला मार्गदर्शन करु शकाल का, मी नोकरी बदलू का? नव्या नोकरीत मला परदेशी जाण्याची संधी मिळेल का?”

“लक्षात आले, पण एक सांग, तू अजून राजीनामा दिला नाहीस ना? किंवा सध्याच्या कंपनीत याची वाच्यता केली नाहीस ना?”

“नाही, काका, तेव्हढी काळजी मी घेतलीय. पण त्या दुसर्‍या कंपनीची ऑफर स्विकारायची असेल तर मला झटपट काहीतरी निर्णय घ्यायला हवा. नाही तर ही ऑफर हातची जाईल”

“ठीक आहे, बघू या.. काय म्हणताहेत तुझे ग्रह.”

आता जरा आपल्या ‘कन्सलटेशन चार्ट’ ने या आधीच काय कल्पना दिली होती ते आठवा जरा:

नोकरी व्यवसाया बद्दलचा प्रश्न, नोकरीत बदल, परदेश प्रवास !
‘कन्सलटेशन चार्ट’ कसा बोलका असतो ते पाहीलेत ना!

ह्यातून हेही सिद्ध होते की हा ‘कन्सलटेशन चार्ट’ कमालीचा रॅडीकल आहे, त्याच्याच अभ्यासातून आपल्या चिन्मयच्या सर्व प्रश्नांची उत्तरें अगदी चांगल्या तर्‍हेने मिळतील. आता चिन्मय चे प्रश्न व्यवस्थित कळल्यामुळे आपण पुन्हा एकदा ‘कन्सलटेशन चार्ट’ उघडूया आणि बघू या या चिन्मय अण्णांचे पुढे काय काय होणार ते.

आपल्या सोयी साठी भाग -१ मध्ये छापलेला ‘कन्सलटेशन चार्ट’ पुन्हा एकदा छापत आहे.

Chinmay K Consultation Chart

 सर्वप्रथम चिन्मय ची नोकरी बदलेल का ते पाहू.

‘कन्सलटेशन चार्ट’ मध्ये मिथुन लग्न आहे म्हणजे लग्नेश बुध आहे. तो जातकाचे प्रतिनिधीत्व करणार. त्याच बरोबर गुरु लग्नातच असल्याने तो ही जातकाचे प्रतिनिधीत्व करणार, चंद्र हा नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्ता) (नैसर्गिक) प्रतिनिधी असतो. दशम स्थान चिन्मयची नोकरी दाखवेल. दशमावर गुरुची मीन रास आहे. म्हणजे ‘गुरु’ चिन्मय च्या नोकरीचे प्रतिनिधित्व करेल.
गुरु लग्नात म्हणजे मिथुनेत 11:16 अंशावर आहे, चिन्मयचे दोन्हीही प्रतिनिधी चंद्र आणि बुध मीनेत अनुक्रमे 18:02 व 14:59 अंशावर आहेत , याचाच अर्थ मीनेत असे तोपर्यंत चंद्राचा व बुधाचा कोणताही अप्लायिंग अस्पेक्ट गुरुशी होणार नाही. याचाच सरळसरळ अर्थ , चिन्मय च्या नोकरीत बदल होणार नाही!

दशमातला रवी (चिन्मयच्या सध्याच्या नोकरीचा आणखी एक प्रतिनिधी) सध्या ‘फॉरच्युना’ च्या अंशात्मक लाभ योगात आहे , याचा अर्थ सध्याचीच नोकरी चिन्मयसाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरी बदलणे हितावह नाही.

मात्र दशमातल्या रवीचा लग्नातल्या गुरुशी 3 अंशात केंद्र योग होत आहे आणि गुरु आणि दशमातला युरेनस यांच्यातही 1 अंशात केंद्र योग होत आहे, याचा अर्थ आगामी काळात नोकरीत कमालीचा ताणतणाव राहील पण नोकरी सोडण्याची वेळ येणार नाही.

युरेनस सारखा विक्षिप्त व वादळी / धक्कादायक / अनपेक्षित घटना घडवणारा ग्रह दशमात 12:14 अंशावर आहे , तो सप्तमातल्या 13:30 अंशातल्या प्लुटो शी केंद्रयोगातच आहे, हा केंद्रयोग पूर्ण व्हायला अवघे 1 अंश 16 मिनीटे उरली आहेत. हा संकेत काही चांगला नाही. नोकरीत काही वादळी घटना घडू शकते पण ती नोकरी सोडायची नसावी कारण चिन्मय चे प्रतिनिधी त्या घटनेला कोणत्याही प्रकारे दुजोरा देत नाहीत.

आता चिन्मय चे परदेश गमन होते का ते पाहुयात.

परदेशगमन म्हणजे लांब अंतरावरचा प्रवास म्हणजे नवम भाव (9) महत्वाचा. नवम भावारंभी शनी ची कुंभ रास आहे. चिन्मय जर नजिकच्या काळात परदेशात जाणार असेल तर नवमेश शनी चा चिन्मय च्या प्रतिनिधिशी ‘अप्लायिंग -Applying’ ग्रहयोग असावयास हवा.

शनी महाराज वृश्चिकेत 22:44 अंशात आहे, चिन्मय चा प्रतिनिधी बुध मीनेत 14:59 अंशावर आहे , म्हणजे बुध मीनेत 22:44 अंशावर आला की तो शनीशी नवपंचम (120 अंश) योग करेल. म्हणजेच चिन्मय नजिकच्या काळात परदेशात जाईल. युरेनस आणि रवी (दोन्ही दशमातले ग्रह) यांची चार अंशात होणारी युती याला दुजोरा देत आहेच.

वेस्टर्न होरारी मध्ये कालनिर्णयासाठी चंद्राचा वापर करतात, चंद्र ही मीनेत 18:02 अंशात आहे , तो जेव्हा मीनेतच 22:44 अंशावर येईल तेव्हा तो वृश्चीकेतल्या शनीशी नवपंचम योग करेल. चंद्राला 4:42 डिग्रीज पुढे जायचे आहे , कालनिर्णयासाठी साधारण टाईम स्केल काय घ्यायचे ते पाहूयात.

दिवस – आठवडे – महिने
आठवडे- महिने – वर्ष
महिने – वर्ष – अनिश्चीत

चंद्र नवमस्थानात मीनेत व शनी पंचमस्थानात वृश्चिकेत आहे याचा विचार करता मध्यम स्केल निवडायचे, त्यानुसार ‘वर्षे’ हा पर्याय काही कामाचा नाही, आठ्वडे या पर्याय देखिल अगदी नजिकचा आहे , म्हणजे ‘महिने’ हा पर्याय निवडावा लागेल. शनीशी नव-पंचम योग पूर्ण करण्यासाठी चंद्राला अजून चार डिग्रीज 42 मिनिट्स लागणार आहेत म्हणजे कालनिर्णय ‘ चार महिने + 3 आठवडे ’ असा होईल. आज मार्च अखेर चालू आहे, म्हणजे चिन्मय ऑगष्ट 2014 अखेर किंवा सप्टेंबर च्या मध्या पर्यंत परदेशात जाण्याची मोठी शक्यता आहे.

कन्सलटेशन चार्ट ने चांगलाच अंदाज दिला आहे, आता आपण कृष्णमुर्ती पद्धतीने या प्रश्नांची उत्तरें शोधायचा प्रयत्न करुयात.

नोकरी बदल, परदेश गमन या सारख्या प्रश्नांची उत्तरे जन्मकुंडली पेक्षा प्रश्न कुंडलीवरुनच जास्त चांगली (अचूक) देता येतात असा माझा अनुभव आहे. चिन्मय चे पुर्वीचे प्रश्न प्रश्नकुंडली वरुनच सोडवले होते आणि ती भाकितें बरोबरही आली होती.(त्या शिवाय का चिन्मय पुन्हा माझ्याकडे येईल?)

चिन्मय ला प्रश्नकुंडली ची प्रक्रिया माहीती होतीच त्यामुळे त्याला नव्याने काही सांगावे लागले नाही.
“काका, तुम्हाला एक नंबर लागतो ना, तर घ्या 55”

“55! अगदीच स्पेशल नंबर ठरवूनच आला आहेस की काय? अरे असे चालत नाही, कारण होरारी साठी नंबर अगदी उत्स्फूर्त पणे आला पाहीजे, लकी नंबर, जुळवलेले नंबर, स्पेश्यल नंबर, आधीच ठरवून ठेवलेला नंबर असे चालत नाही”

“नाही काका, तसे काही नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचे ज्या क्षणी मनात आले त्या क्षणा पासून हा ‘55’ नंबर माझ्या मनात घोटाळत आहे”

“ठीक आहे, आपण या नंबर वरुनच प्रश्नकुंडली मांडु आणि बघू ग्रहमान कसे काय आहे ते.”

चिन्मय ने दिलेल्या ‘55’ या क्रमांका नुसार तयार केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.

 

 

Chinmay Horary Chart

दिनांक: 29 मार्च 2014, शनीवार वेळ:11:54:43, स्थळ: देवळाली कॅंप, नाशीक

होरारी क्रमांक : 55

अयनांश: न्यू के.पी. 23:57:56

सॉफ्टवेअर: के.पी. स्टार वन

प्रश्न:

“जातकाला परदेशात जायचे आहे, सध्याच्या कंपनीत अशी संधी मिळण्याची शक्यता नाही, दुसर्‍या स्पर्धक कंपनीचे आमंत्रण आहे , तिथे परदेश गमनाची संधी मिळेल असे आश्वासन दिले गेले आहे , तेव्हा केवळ परदेश गमनाची संधी मिळेल ह्या हेतुने नोकरी बदलावी का? नव्या नोकरीत परदेश गमनाची संधी मिळेल का?”

हा प्रश्न एक नाही तर चक्क अनेक प्रश्नांचे मिश्रण आहे, ते असे:

त्या दुसर्‍या कंपनीने परदेशगमनाची संधी देऊ असे आश्वासन दिले आहे पण तसे लेखी काही दिले नाही (असे कोणी देणार ही नाही हा भाग वेगळा) तेव्हा त्या कंपनीचे हे आश्वासन खरे आहे का ? ती कंपनी दिलेला शव्द पाळेल का?
चिन्यय नोकरी बदलेल का?
चिन्मयचे परदेश गमनाचे स्वप्न साकार होईल का?

ह्या सर्व अंगाने प्रश्नाचा विचार करायचा असल्यास प्रश्नकुंडलीतली खालील स्थानें पाहावी लागतील:

पहीला प्रश्न आहे “ही दुसरी कंपनी खोटे आश्वासन तर देत नाही ना?”

“आमच्या कडे परदेश गमनाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत किंबहुना आम्ही तुम्हाला लगेच परदेशी धाडू” – ही कदाचित त्या दुसर्‍या कंपनीने दिलेली भूलथाप असू शकेल / पोकळ आश्वासन असेल! हे खरे का खोटे हे ठरवायचे असल्यास त्रितिय स्थानाचा (3) सबलॉर्ड पाहवयास लागेल, तो शनी असेल किंवा शनीशी संबधित असेल तर कळलेली बातमी खोटी असते / अफवा असते , त्रितियाचा सब जर गुरु किंवा गुरु शी संबधीत असेल मात्र बातमी खरी ठरते.

बातमी / अफवा खरी का खोटी: 3 हे बातमीचे , माहीतीचे स्थान

दुसरा प्रश्न आहे चिन्मय नोकरी बदलेल का (आणि दुसरी नोकरी स्विकारेल का) ?

नोकरी सोडणे / जाणे: 1, 3, 5, 9 ही नोकरीच्या विरोधातली स्थानें

नविन नोकरी मिळणे : 2, 6, 10

तिसरा प्रश्न आहे चिन्मय परदेशात जाईल का?

परदेशगमन : 3,9,12 (कधी कधी सप्तम (7) स्थान ही सक्रिय असते)

ईच्छा पूर्ती: 11

यात आपण दशम भाव (10) व व्यय (12) हे दोन भाव मुख्य (Principle) भाव मानायला हवेत आणि बातमी / अफवा खरी का खोटी ठरवण्यासाठी त्रितिय (3) भाव विचारात घ्यावा लागेल.

प्रश्न कुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे, प्रश्न विचारता क्षणाची कुंडली मांडली आहे , तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात.

(ग्रह अनेक भावांचा कार्येश होऊ शकतो, त्या कार्येशत्वात अ ( प्रथम दर्जा ) ते फ (कनिष्ठ दर्जा) असे प्रकार असू शकतात . म्हणून ग्रहाचे कार्येशत्त्व ‘अ‍ / ब / क / ड’ अशा पद्धतीने लिहले आहे, त्यामुळे एखादा ग्रह कोणत्या भावांचा कार्येश होतो आहे आणि त्याचा दर्जा काय हे चटकन लक्षात येते. अर्थात यातले ‘अ’ दर्जाचे कार्येशत्व सर्वोत्तम हे वेगळे सांगावयास नको)

 

Chinmay Significators

चंद्र: भाग्यात (9), धनेश (2), चंद्र गुरुच्या नक्षत्रात, गुरु व्ययात (12), सप्तमेश (7) व दशमेश (10). म्हणजे चंद्राचे कार्येशत्व असे असेल .

चंद्र : 12/ 9 / 7,10 / 2

जातकाने जर प्रश्न खर्‍या तळमळीने विचारला असेल तर चंद्र जातकाच्या मनातले विचार कसे नेमकेपणाने दाखवतो ते पाहा. चिन्मय ला (काही ही करुन) परदेशात जायचे आहे ( 9,12) आणि तेही डॉलर कमवायला (2), नोकरी बदलायची आहे ती पण परदेशी जायची संधी मिळत नाही म्हणुनच , पण परदेश गमनाची ईच्छा इतकी प्रबळ आहे की 1,3,5 या नोकरी विरोधी भावांची उपस्थिती नाही. चिन्मय च्या मनात सध्या कोणते प्रबळ विचार (Dominant thought) चालू आहेत याचा दाखलाच या चंद्राने दिला आहे.

खरोखर चंद्राला मनाचा आरसा म्हणतात ते अगदी पटते. चंद्र जातकाचे मन व प्रश्नाचा रोख अगदी तंतोतंत दाखवत असल्याने ही प्रश्नकुंडली रॅडिकल आहे यात शंकाच नाही, अशी रॅडिकल प्रश्नकुंडली प्रश्नाच्या उत्तरा पर्यंत जाण्यास मदत करतेच शिवाय अशा कुंडली वरुन केलेले भविष्यकथन अगदी तंतोतंत बरोबर येते असा माझा अनुभव आहे.

आता पुढचा टप्पा.

चिन्मय चा प्रश्न नोकरी बदल आणि परदेश गमन असा दुहेरी असल्याने दशम (10) आणि व्यय (12) या दोन्ही स्थानांचे सब तपासले पाहीजेत.

चिन्मय बुवांनी चलाखीने प्रश्न विचारला आहे, याच्या उत्तराचे तीन टप्पे होणार:

सध्याची नोकरी सोडणे
नविन नोकरी स्विकारणे
परदेश गमन.

चिन्मयला डॉलर कमवायला परदेशी जायचय मग ते सध्याच्या कंपनी मार्फत किंवा दुसर्‍या कंपनी मार्फत चिन्मयला काहीच फरक पडणार नाही. अंतिम परिणाम चिन्मय परदेशात जाणे आहे हाच अपेक्षित आहे. तेव्हा मी ‘परदेश गमन’ या बाबी कडे जरा जास्त लक्ष द्यायचे ठरवले.

सर्व प्रथम पाहूया की ती दुसरी कंपनी खरे बोलत आहे की खोटे. त्रितीय (3) स्थानाचा सबलॉर्ड आहे शनी म्हणजे प्रश्नच मिटला !!

त्या कंपनीने एक पोकळ आश्वासन दिले आहे, हे आश्वासन पुर्ण होण्याची शक्यता नाही (निदान नजिकच्या काळात तरी नाही) असा संकेत मिळत आहे.

या प्रश्नकुंडलीत दशमाचा (10) सब लॉर्ड आहे मंगळ . जो वक्री आहे आणि स्वत:च्याच नक्षत्रात आहे! ‘प्रश्नाच्या संबधीत प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा’ हा नियम आपण नेहमीच तपासतो, इथे नोकरीत बदल होईल का प्रश्न असताना प्रश्न संबधीत प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री आणि वक्री ग्रहाच्या नक्षत्रात त्यामुळे नोकरीत बदल होणार नाही, चिन्मय आहे त्याच कंपनीत नोकरी करणार असा कौल मिळाला आहे.

तरीही या मंगळाचे कार्येशत्व एकदा पाहून घेऊयाच. मंगळ चतुर्थात (4), षष्ठेश (6) व लाभेश (11), मंगळ स्वत:च्याच नक्षत्रात, म्हणजे:

मंगळ: 4 / 4 / 6,11 / 6 ,11 .मंगळाची दशमावर दृष्टी !

म्हणजे कोणत्याही मार्गाने दशमाचा सब मंगळ नोकरी बदलाला अनुकूल नाही. अर्थात प्रश्न कुंडलीचा अवधी काही महिन्याचाच असल्याने, नोकरीत बदल होणार नाही म्हणजे चिन्मय आत याच कंपनीत काम करत सेवानिवृत्त होणार असे नाही तर चिन्मय नजिकच्या काळात तरी (तीन ते सहा महिने) नोकरी बदलणार नाही असा अर्थ घ्यायचा.

परदेश गमनाच्या दुसर्‍या प्रश्ना संदर्भात महत्वाचा भाव म्हणजे व्यय (12),  त्या स्थानाचा सब लॉर्ड आहे बुध. प्रश्न वेळी बुध मार्गी आहे आणि बुधाचा नक्षत्रस्वामी गुरु वक्री नाही त्यामुळे ‘प्रश्नाच्या संबधीत प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा’ हा नियम पाळला जात आहे.

आपण आता व्ययाचा सबलॉर्ड चे बुधाचे कार्येशत्व तपासू. बुध भाग्यात (9) आहे, लग्नेश (1) , चतुर्थेश (4) आहे , बुध गुरुच्या नक्षत्रात आहे, गुरु व्ययात (12), सप्तमेश (7) व दशमेश (10).

बुध: 12 / 9 / 7,10 / 1,4

बुधाच्या नक्षत्रात ग्रह नसल्याने बुध ज्या भावांचा सबलॉर्ड असतो त्या सर्व भावांचा तो प्रथम दर्जाचा कार्येश होतो, बुध व्यय (12) स्थानाचा सबलॉर्ड आहे. त्यामुळे बुध व्ययाचा प्रथम दर्जाचा कार्येश होतो आहे!बुध व्यय (12) , नवम (9) व सप्तमाचा (7) कार्येश असल्याने परदेश प्रवासाला होकार मिळाला आहे. बघा जातकाने तळमळीने प्रश्न विचारला असेल तर एकच प्रश्नकुंडली अशा अनेक प्रश्नांची एकाच वेळी उत्तरे देऊ शकते.

आत्ता पर्यंतच्या विश्लेषणातून आपल्याला हे लक्षात आले आहे की:

चिन्मयच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.
चिन्मय नजिकच्या काळात परदेश गमन करण्याची शक्यता जास्त आहे.

अर्थात या केवळ शक्यता आहेत, त्या प्रत्यक्षात येणार किंवा नाही हे आगामी काळात येणार्‍या दशा- अंतर्दशा- विदशा ठरवणार.

आता दशा – अंतर्दशा- विदशा तपाऊन ठरवूया की ह्या यातले काय काय घडणार आहे !

 

Chinmay DBAS

 प्रश्न विचारते वेळी गुरुची महादशा चालू आहे, ती 6 जानेवारी 2025 पर्यंत आहे, अकरा वर्षाचा बराच मोठा कालावधी आहे हा.

महादशा स्वामी गुरुचे कार्येशत्व असे आहे: गुरु व्ययात (12), सप्तमेश (7) व दशमेश (10). गुरु राहुच्या नक्षत्रात, राहु चतुर्थात (4).

गुरु: 4 / 12 / 4 / 7, 10  गुरुची पंचम (5), सप्तम (7) व नवम (9) वर दृष्टी.

गुरु नोकरीच्या विरोधातल्या 1, 3,5, 8 या स्थानांचा ‘अ‍ / ब/ क/ ड ‘ या पैकी कोणत्याही दर्जाचा कार्येश होत नाही, पण परदेश गमना साठीच्या व्यय (12) व सप्तमाचा (7) कार्येश होतो आहे. नवम (9) स्थानाचाही क्षीण कार्येश आहे. गुरु पंचमाचा क्षीण कार्येश आहे.

गुरुचा सब शुक्र आहे. शुक्राचे कार्येशत्व: शुक्र अष्टमात (8), व्ययेश (12) , पंचमेश (5), शुक्र मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ चतुर्थात (4), लाभेश (11), षष्ठेश (6)

शुक्र: 4/ 8 / 6,11 / 12,5

एकंदर पाहता एक नोकरी जाण्या संदर्भात पंचम (5) व नवम (9) ह्या स्थानांचे क्षीण तर परदेश गमना साठीचे व्यय (12) स्थानाचे ‘ब’ दर्जाचे असे संमिश्र कार्येशत्व आहे.

गुरु दशा स्वामी आहे , 11 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी आहे, त्यामुळे नोकरी जाणे , नोकरी मिळणे , परदेश गमन अशा तात्कालीन / वारंवार घडू शकणार्‍या घटनांसाठी महादशा स्वामी बर्‍या पैकी अनुकूल आहे आणि एव्हढ्या मोठ्या कालावधीत अशा प्रकारच्या घटना सहज घडू शकतात. थोडक्यात गुरु महादशा तीनही घटनांसाठी अनुकूल आहे.

महादशेचा कालावधी मोठा आहे तेव्हा नेमका कालावधी पाहण्यासाठी आपल्याला अंतर्दशा – विदशा तपासणे भाग आहे.

चिन्मय ने नोकरी बदलायची ठरवली तर त्याला कंपनी नियमा प्रमाणे एक महीन्याची नोटिस द्यावी लागेल,  हा नोटीशीचा कालावधी पूर्ण केल्या नंतरच तो दुसर्‍या कंपनीत रुजू होईल, तिथे गेल्या गेल्या लगेचच काही चिन्मय सायबांचे विमान उडू शकणार नाही, नव्या कंपनीत किमान एक दोन महीने तरी काम करावे लागेल, व्हिसा मिळायला सुद्धा काही वेळ लागू शकतो. हा सर्व विचार करुन मी एक वर्षाची टाइम फ्रेम डोळ्यासमोर ठेऊन आपण दशा – अंतर्दशा -विदशा पाहूयात. या पुढे जाउन पाहण्याची जरुरी नाही, लक्षात ठेवायचे ही प्रश्नकुंडली आहे त्याला एक कालमर्यादा असते / असावी.

चिन्मय ने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुरोधाने आपल्याला या क्रमाने घटनां विचारात घ्यायच्या आहेत:

चिन्मय ची सध्याची नोकरी समाप्त होणे
चिन्मय दुसर्‍या नोकरीत रुजु होणे
चिन्मय परदेशी जाणे

कदाचित चिन्मय नोकरी सोडणार नाही , आहे त्याच कंपनी तर्फे तो परदेशात जाऊ शकेल.

कदाचित चिन्मय नोकरी सोडेल , मात्र दुसर्‍या नोकरीतही त्याला परदेशी जाण्याची संधी मिळणार नाही असेही होऊ शकेल.

आपण ह्या सर्व शक्याशक्यतेचा विचार करुयात.

प्रश्न विचारते वेळी बुधाची अंतर्दशा चालू आहे ती 14 डिसेंबर 2015 पर्यंत असेल हा सुमारे पावणे दोन वर्षाचा मोठा कालावधी आहे म्हणजे चिन्मय बुवांच्या प्रश्नाचा काय तो सोक्षमोक्ष याच कालावधीत लागायला हवा.

बुधाचे कार्येशत्व आपण पाहीले आहे :

बुध: 12 / 9 / 7,10 / 1,4

बुध नोकरी बदला साठीच्या 1,5,3, 9  या पैकी लग्न (1) व नवम (9) भावाचा कार्येश आहे पण त्याच बरोबर व्यय (12) व नवम (9) व सप्तम (7) या परदेश प्रवासा साठीच्या स्थानांचा प्रबळ कार्येश होत आहे.

बुध चंद्राच्या युतीत आहे, म्हणजे चंद्राचे 12/ 9 / 7,10 / 2 हे कार्येशत्व देखील बुधाला प्राप्त झाले आहे.

बुधा चा सब आहे गुरु , गुरुचे कार्येशत्व आपण आधी पाहीलेच आहे : गुरु: 4 / 12 / 4 / 7, 10 म्हणजे बुध अंतर्दशेचा सब – गुरु हा परदेश गमनाला जास्त अनुकूल आहे.

बुधाच्या अंतर्दशेत चिन्मय परदेशात जाईल अशी जोरदार शक्यता आहे पण 3 व 5 भावांचे कार्येशत्व नसल्याने नोकरीत बदल होण्याची शक्यता अगदीच कमी आहे!

आता या अंगाने बुधाच्या अंतर्दशेतल्या विदशा तपासायला हव्यात.

सगळ्यात पहीली घटना घडायला हवी ती चिन्मय ची सध्याची नोकरी समाप्त होणे.

आता नोकरी समाप्ती कशी होईल?  प्रथम चिन्मय राजीनामा देईल. तो राजीनामा मंजूर झाला की चिन्मयचा नोटिस पिरीयड चालू होईल. हा नोटिस पिरीयड साधारण पणे एक महिन्याचा असतो. काही वेळेला तो तीन महिन्यांचाही असतो, त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख नोकरीच्या नेमणुक पत्रात असतोच. अर्थात कंपनी ने जर ठरवले तर राजीनामा स्विकारत्या क्षणीच चिन्मयला नोकरीतून मोकळे करु शकते. आणि समजा ,चिन्मयलाच जर ताबडतोब नोकरीतून मुक्तता हवी असेल तर त्याला नोटिस कालावधी च्या काळातला पगार, नुकसान भरपाई (दंड) म्हणून कंपनी कडे जमा करावा लागेल, याला नोटिस पिरीयड विकत घेणे म्हणतात. नोटीस पिरियड विकत घेणे हा मार्ग काही जण वापरत असले तरी तो मार्ग ‘ सभ्य / इथिकल‘ नाही. त्या पेक्षा रितसर नोटीस देऊन , कार्यभार दुसर्‍या पर्यायी व्यक्ती कडे सोपवून , हस्तांतरण सुरळीत पणे पार पाडून , गोडीत , कंपनीचा निरोप घेणे हे केव्हाही चांगले, त्यामुळे तुमच्या बद्दलचे मत चांगले बनण्यास / राहाण्यास मदत होते. चिन्मय ने राजीनामा दिला तो दिवस नोकरीचा समाप्तीचा नाही तर ज्या दिवशी कंपनी अधिकृतपणे चिन्मयला सेवा मुक्त करेल तो दिवस नोकरी संपल्याचा दिवस मानायचा.

नोकरी आपणहून सोडली काय किंवा कामावरुन काढून टाकले जाणे काय , त्या क्षणाला नोकरीच्या विरोधातले ग्रह कार्यांन्वित असायला हवेत. जर कामावरुन काढून टाकले गेले असले (बडतर्फी) तर शिक्षा दर्शवणारे ग्रह पण सक्रिय असायला हवे. आपण नोकरीच्या विरोधातल्या भावांचे कार्येश ग्रह कोणते ते पाहू.`

नोकरीच्या विरोधातले प्रमुख भाव 3, 5, 9

त्रितिय भावाचे कार्येश: रवी

पंचम भावाचे कार्येश: रवी / शनी / शुक्र

नवम भावाचे कार्येश: चंद्र , बुध / रवी / शनी

चिन्मय आपणहून नोकरी सोडणार असल्याने शिक्षा दर्शक भाव विचारात घ्यायची आवश्यकता नाही.

आज तारीख आहे 29 मार्च , चिन्मयला नोकरी सोडताना कंपनी नियमां नुसार एक महिन्याची नोटीस द्यावी लागणार म्हणजे त्याने अगदी उद्या जरी राजीनामा दिला तरी लौकरात लौकर 30 एप्रिल 2014 तारखेला चिन्मय सेवा मुक्त होऊ शकेल.

प्रश्न विचारते वेळी गुरु ची दशा, बुधाची अंतर्दशा आणि शुक्राची विदशा चालू आहे , जी 7 जुलै 2014 ला संपेल. या कालावधीतच चिन्मय चे एक नोकरी सोडणे व दुसरी धरणे असे काही घडते ते का ते पाहू.

शुक्राचे कार्येशत्व आपण पाहीले आहे,

शुक्र: 4/ 8 / 6,11 / 12,5

शुक्राचा सब आहे शनी. शनी पंचमात (5) आहे , अष्टमेश (8) व नवमेश (9) , शनी गुरुच्या नक्षत्रात , गुरु व्ययात (12) , सप्तमेश (7) व दशमेश (10).

शनी: 12 / 5 / 7, 10 / 8, 9

एकंदर पाहता शुक्र विदशा नोकरी सोडण्याच्या दृष्टिने किंवा परदेश गमनाच्या दृष्टीने ही अनुकूल नाही. शुक्राच्या विदशेत या दोन्ही घटना घडण्याची फारशी शक्यता नाही.

शुक्र विदशे नंतर येणार ती रवीची विदशा जी 7 जुलै 2014 ते 18 ऑगष्ट 2014 अशी आहे.

रवी दशमात (10) , त्रितीयेश (3), रवी शनीच्या नक्षत्रात शनी पंचमात (5) , अष्टमेश (8) व नवमेश (9).

रवी: 5 / 10 / 8 , 9 / 3

रवीचा सब आहे राहु , राहु षष्ठात (6) , राहु मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ चतुर्थात (4) , लाभेश (11) व षष्ठेश (6).

राहु 4 / 6 / 4. 11 /-

राहु शनीच्या युतीत, शनी: 12 / 5 / 7, 10 / 8, 9

राहु शुक्राच्या राशीत, शुक्र: 4/ 8 / 6,11 / 12,5

एकंदर पाहता रवी विदशा नोकरी जाण्याला जास्त अनुकूल आहे तर रवी चा सब राहु नोकरी सोडणे या प्रकाराला फारसा पाठींबा देत नाही. म्हणजे चिन्मय या रवीच्या विदशेत 7 जुलै ते 18 ऑगष्ट या काळात नोकरी सोडेल का ? शक्यता तर जोरदार आहे , पण नक्की काय होणार ? पण तसे काही होईल असे मला वाटत नाही कारण रवी चा सब प्रतिकूल आणि दशमाच्या सब ‘मंगळा’ ने ही नोकरीत बदल होणार नाही असा कौल आधीच दिला आहे. आता जरा ट्रांन्झीट्स चा कौल घेऊ मगच ठरवू ‘रवी’ साब चिन्मयला नोकरी सोडायला लावतात का नाही ते.

रवी विदशा 7 जुलै ते 18 ऑगष्ट अशी आहे. गुरु महादशा – बुध अंतर्दशा – रवी विदशा अशी साखळी तयार होईल. 16 जुलै ला रवी कर्केत असेल , चंद्राची रास आपल्याला चालणार नाही , रवी 17 ऑगष्ट ला स्वत:च्या सिंहेत दाखल होईल. पण रवि विदशा 18 ऑगष्ट ला संपते आहे ! बुध- रवी अशी साखळी जुळणार नाही.

रवी विदशेने कौल दिला आहे पण ट्रांसीट्स अनुकूल नाही, नोकरी सोडण्याची घटना घडणार नाही.

असे असले तरी रवी विदशा नोकरी जाण्याच्या / सोडण्याच्या दृष्टिने इतकी प्रबळ आहे हे लक्षात घेऊन मी आणखी एका अंगाने विचार केला. चिन्मय काही गंमत म्हणून नोकरी सोडणार नाही त्याला दुसरी नोकरी मिळाल्या खेरीज तो काही पहीली नोकरी सोडणार नाही. आणि पहीली नोकरी सोडल्यावर तो निवांत घरी लोळत बसणार नाही तर जितक्या लौकर शक्य होईल तितक्या लौकर तो दुसर्‍या नोकरीत रुजु होईल . म्हणजे दुसर्‍या नोकरीत रुजु व्हायचे योग ही अगदी नजिकच्या काळात असायला हवेत ना?

नवीन नोकरी म्हणजे 2, 6,10,11 ही स्थाने देणार्‍या ग्रहांची साखळी जमायला हवी. त्यासाठी या चारही भावांचे प्रबळ कार्येश कोण आहेत हे तपासून घेऊ.

द्वीतीय भावाचे बलवान कार्येश: राहु / चंद्र

षष्ठम भावाचे बलवान कार्येश: शुक्र , राहु , मंगळ

दशम भावाचे बलवान कार्येश: केतु / रवी

लाभ स्थानचे बलवान कार्येश ग्रह: मंगळ, शुक्र, राहु

चिन्मय ने सध्याची नोकरी सोडली तर तो लगेचच दुसर्‍या नोकरीत रुजु होणार , हे रुजु होणे एकतर रवी विदशेतच किंवा पुढच्या चंद्र विदशेत होईल.

रवी विदशा तर नोकरी जाण्यासाठीची आहे या विदशेत कसली दुसरी नोकरी !

पुढची चंद्राची विदशा 18 ऑगष्ट 2014 ते 26 ऑक्टोबर 2014 अशी आहे. चंद्राचे कार्येशत्व आपण आधी पाहीले आहेच ते असे आहे:

चंद्र : 12/ 9 / 7,10 / 2

चंद्राचा सब बुध : 12 /9 / 7, 10 / 1, 4

म्हणजे चंद्र विदशा काही नवीन नोकरी मिळण्यास अनुकूल नाही. पण जरा लक्ष पूर्वक पाहीले तर चंद्र विदशा परदेश गमनाला अगदी अनुकूल आहे. महादशा स्वामी गुरु , अंतर्दशा स्वामी बुध दोघेही परदेश गमनाला अनुकूल आहेच , आता विदशा स्वामी चंद्र पण अनुकूल दिसतोय.

आता जरा ट्रांन्झीट्स चा कौल घेऊया.आपली साख़ळी गुरु – बुध – चंद्र अशी आहे . 16 सप्टेंबर 2014 पर्यंत रवी सिंहेत असेल , त्यानंतर तो बुधाच्या कन्येत दाखल होईल . कन्येत रवी, चंद्र आणि मंगळ ही नक्षत्रें आहेत, आपली साख़ळी जुळण्यासाठी चंद्राचे नक्षत्र चालू शकेल. बुधाची रास – चंद्राचे नक्षत्र ही जोडी चालू शकेल.

रवी कन्येत , चंद्राच्या नक्षत्रात 27 सप्टेंबर 2014 ते 9 ऑक्टोबर 2014 या काळात असेल , चिन्मय या काळात परदेश गमन करेल.

या सगळ्या साखळीत त्रितीय (3) स्थान आलेले नाही अशी शंका येणे साहजीक आहे पण अंतर्दशा स्वामी बुध व विदशा स्वामी चंद्र दोघेही त्रितीय स्थानावर दृष्टी टाकून आहेत , त्या नात्याने ते त्रितीय स्थानाचे क्षीण का होईना पण कार्येश होतात.

हे सर्व बघत असताना मला एक बाब खटकत होती ती म्हणजे , दशा स्वामी गुरु व अंतर्द्शा स्वामी बुध चतुर्थाचे (4) कार्येश आहेत, ही बाब परदेश गमनाच्या विरोधी आहे तसेच परदेश गमना साठी जो त्रितिय (3) भाव लागतो तो सुद्धा आपल्यला त्रितिय स्थानाच्या अत्यंत कमकुवत कार्येशा द्वारा मिळाला आहे. तेव्हा मला उगाचच वाटायला लागले की चिन्मय परदेशी जाईलही पण हा परदेश दौरा लहान असेल फक्त काही महिन्यांसाठी. बुधाची अंतर्दशा संपायच्या आत चिन्मय वापस येणार.

मी जरा त्यादृष्टीने आगामी विदशा तपासायचे ठरवले.

परदेशातून परत येण्यासाठी आपल्याला 4, 11, 9 हे भाव पहावयास लागतील.

कुटुंबात / नेहमीच्या वातावरणात परत येणे: 4

व्ययाचे व्यय: 11

लांबचा प्रवास: 9

आपल्या अंदाजा नुसार चिन्मय , चंद्राच्या विदशेत , 27 सप्टेंबर 2014 ते 9 ऑक्टोबर 2014 च्या सुमारास परदेशात जाईल, चंद्राची विदशा 20 ऑक्टोबर ला संपेल. त्यानंतर मंगळाची विदशा येईल ती 13 डिसेंबर 2014 पर्यंत असेल.

मंगळ चतुर्थात (4), षष्ठेश (6) व लाभेश (11), मंगळ स्वत:च्याच नक्षत्रात, म्हणजे:

मंगळ: 4 / 4 / 6,11 / 6 ,11 .

मंगळाचा सब शनी, शनी: 12 / 5 / 7, 10 / 8, 9

म्हणजे मंगळाच्या विदशेत चिन्मय भारतात परत येण्याची शक्यता आहे.

आपली साखळी गुरु – बुध – मंगळ अशी असेल.

रवी 17 नोव्हेंबर 2014 ते 15 डिसेंबर 2014 या काळात मंगळाच्या वृश्चीकेत असेल, वृश्चिकेत बुधाचे नक्षत्र आहे, ते 3 डिसेंबर 2014 ते 15 डिसेंबर 2014 या काळात. याच कालावघीत गुरु महादशा – बुध अंतर्दशा – मंगळ विदशा – शुक्र सुक्ष्मदशा घेतली तर कालावधी येतो 7 डिसेंबर 2014 , त्याच दिवशी रवी मंगळाच्या राशीत , बुधाच्या नक्षत्रात व शुक्राच्या सब मध्ये असेल.

चिन्मय 3 डिसेंबर 2014 ते 15 डिसेंबर 2014 या काळात त्यातही 7 डिसेंबर ला भारतात परत येईल.

ताळा म्हणून आपण पुढची राहु विदशा तपासूया .

मंगळाची विदशा 13 डिसेंबर 2014 पर्यंत आहे, त्यानंतर राहु विदशा चालू होईल ती 16 मार्च 2014 पर्यंत असेल.

राहु 4 / 6 / 4. 11 /-

राहु शनीच्या युतीत, शनी: 12 / 5 / 7, 10 / 8, 9

राहु शुक्राच्या राशीत, शुक्र: 4/ 8 / 6,11 / 12,5

राहु चतुर्थाचा कार्येश आहे. याचा अर्थ राहु विदशेत चिन्मय भारतात असेल!

या सर्व अभ्यासातून मी खालील निष्कर्ष काढले:

त्या दुसर्‍या कंपनीने परदेशात पाठवू असे जे आश्वासन दिले आहे ते खरे होण्याची शक्यता नाही, ती एक अफवा आहे असे मानायला हरकत नाही.

चिन्मय नोकरी बदलणार नाही, रवी विदशेच्या काळात नोकरी बदलण्याचे विचार अगदी तीव्र होतील पण प्रत्यक्षात नोकरीत बदल होणार नाही.

चिन्मय सध्या ज्या कंपनीत नोकरी करत आहे त्याच कंपनी मार्फत तो परदेशी जाईल, हा कालावधी 27 सप्टेंबर 2014 ते 9 ऑक्टोबर 2014 या दरम्यान असेल.

चिन्मय चा हा परदेश दौरा अगदी कमी कालावधीचा असेल , चिन्मय 3 डिसेंबर 2014 ते 15 डिसेंबर 2014 या काळात भारतात परत येईल.

ही भली मोठी पोस्ट वाचताना तुम्हाला दमायला झाले असेल नाही का? आपल्याला वाचताना दम लागला असेल मग प्रत्यक्षात मी जेव्हा केस सोडवली तेव्हा मला किती थकायला झाले असेल ! दोन एक तास ह्या सगळ्यात गेले होते.

आणि आता सांगायला हरकत नाही…

या कामाचे मानधन मला अजूनही मिळालेले नाही !!

भविष्य ऐकून घेतल्यावर, आलोच जवळच्या ATM मधून पैसे काढून आणतो म्हणून चिन्मय जो गेला तो त्यानंतर आजतागायत फिरकलेलाच नाही !!!

मधल्या काळात चिन्मय अपडेट्स देत होता ते असे:

चिन्मय ने सध्याची नोकरी सोडून त्या दुसर्‍या कंपनीत रुजु व्हायचे आधीच ठरवले होते, त्यामुळे मी सांगीतलेले भविष्य त्याला पटले नाही ! (पैसे द्यायची टाळाटाळ करायचे हे एक कारण असावे) त्याने पहिल्या कंपनीत राजीनामा देण्याची तयारी केली पण त्या दरम्यानच त्या दुसर्‍या कंपनीने “राजीनामा इतक्यात देऊ नका , रिसोर्स रिस्ट्रक्चरीग चालू असल्याने नविन रिक्रूट्मेंट तीन महिने करता येणार नाही, तेव्हा होल्ड करा, गैरसोयी बद्द्ल क्षमस्व” अशा अर्थाची ईमेल पाठवली. चिन्मय चरफडत का होईना पहिल्याच कंपनीत काम करत राहीला.

तीन महीने झाले , जुलै उजाडला , रवी विदशा सुरु झाली, रवी विद्शेने खरोखरीच राजीनामा द्यायची वेळ आणली आणि चिन्मय आपला राजिनामा सादर सुद्धा केला पण त्याच्या बॉसने त्याला समजावले कारण सध्याचीच कंपनी त्याला खरोखरच परदेशी पाठवणार होती, परदेशी क्लायंट ने चिन्मय च्या नावाला अनुमती दिली होती , फक्त काही औपचारीकता शिल्लक होती. चिन्मय ने राजीनामा मागे घेतला!

ह्या सर्व बातम्या तो फोन वर देत होता पण पैशाची आठवण करुन दिल्यावर,

“देतो हो काका, पुढच्या विकेंडला जोडून सुट्टी आहे तेव्हा नाशकात येणार आहे तेव्हा आपल्याला प्रत्यक्षच भेटणार आहे, तेव्हाच देतो…”

नेट बॅकिंग ने पैसे भरता येतात असे सुचवल्यावर:

“काका, रिस्क वाटते, हल्ली सायबर फ्रॉड किती होतात”

एक ना दोन सबबी चालूच राहील्या. शेवटी कंटाळून मी नाद सोडून दिला.

चिन्मय सप्टेंबर अखेर अमेरिकेला गेल्याचे आणि दोन महिन्यात डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात भारतात परत आल्याचे मला त्याच्या वडिलांकडुन कळले (नक्की तारखां कळल्या नाहीत) , अमेरिकेला जाण्यापूर्वी चिन्मय नाशकात त्याच्या आई – वडिलांना भेटायला आला होता, पण माझ्या कडे आला नाही की त्याने फोनही केला नाही!

वर्ष झाले , चिन्मय अजूनही माझे देणे लागतोय.

‘गरज सरो वैद्य मरो’ अशी म्हण उगाचच पडलेली नाही!

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे धडाडे चौकडे दावा

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी
इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

गीत  – भा.रा. तांबे, संगीत- वसंत प्रभू ,स्वर- लता मंगेशकर , राग-देसकार

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  व्वा मजा आली तुमचे लॉजिक आणि त्याचा पडताळा बघून… या शास्त्रासाठी किती अभ्यास आणि अनुभव हवा याची पण कल्पना आली…( once again Hats off to you sir)
  btw कुठे होतात इतके दिवस? 😉 तुमच्या case studies miss करत होतो.. 🙂
  anyways.. Welcome again.. for you & your updates…
  &
  चिन्मय भाऊ हे वाचत असाल तर आता तरी payment करा कि राव…

  0
  1. सुहास गोखले

   श्री.गौरवजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद. मध्यंतरी मी एका मोठ्या सॉफ्ट्वेअए प्रोजेक्ट मध्ये व्यस्त होतो, वारंवार बेंगलोरला जावे लागले त्यामुळे ब्लॉग कडे फारसे लक्ष देता आले नाही.
   शुभेच्छा.
   सुहास गोखले

   0
 2. Bhagwan Suryawanshi

  Respetive sir,
  I am alwaes reed yours blog on my mail Reading thes blog very
  interesting & helpful
  One my request sir for my son Harikesh/Hermb can i meet perosnaly to
  you I also at nashik or give remedis on mail i pay for that
  Mu son Birth Date 01-09-2005 Time 06.10 P.M. at Manmad
  He is very active (Happer) that why lack concentrestion he is poor in
  studty hi distreb his small 4 years brother he doest mix-up another
  boys at scool and home he doest know good beveiar I already giving
  happer activaty treatment duu to tablets he becomes more lassu due to
  him we cat go our reletives and frends home
  Kinddaly request sir give us time to meet you or give predustion on mail
  waiting yours reply I hope I get right solustion from yours end
  Thanking you
  Yours faithfully
  Suryawanshi Bhagwan
  cell no – 9225904871

  0
  1. सुहास गोखले

   श्री भगवानजी,

   ‘मेडिकल समस्या’ च्या बाबतीत ज्योतिषशास्त्र कमालीचे तोकडे आहे.आपल्या मुलाच्या समस्यां ज्योतिषशास्त्रा द्वारे काही फारसे करता येणार नाही असे मला वाटते. उपाय तोडग्यांनी कोणत्याही समस्या दूर होणार नाहीत,मेडिकलच्या तर नाहीच नाही,तेव्हा त्यात वेळ आणि पैसा वाया घालवू नका, हे असले उपाय तोडगे करण्यात तुम्ही वेळ घालवत बसला तर असलेला आजार आणखी बळावेल आणि मग एक वेळ अशी येईल की ईतर वैद्यकिय उपचारही अवघड होऊन बसतील. तेव्हा आपल्या मुलाच्या समस्या योग्य त्या डोक्टरांच्या सल्ल्याने सोडवा,कोणत्याही ज्योतिषाच्या नादाला लागू नका ही कळकळीची विनंती आहे.

   आपला
   सुहास गोखले

   0
 3. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar. I was awaiting your post for a long time. Interesting case indeed but also sad to know that some people don’t care to pay. I hope Chinmay reads this and realizes his obligation to pay.
  Anyways hope to see more posts now that your workload has reduced.
  Kalave lobh asava.
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद. आपण अंदाज केला आहे तसा मीगेले काही महीने माझे सॉफ़्टवेअर चे प्रोजेक्ट आणि ट्रेनिंग असाइनमेंटस यात जरा जास्त व्यस्त होतो. मनात असूनही ब्लॉगवर लिहता आले नाही. पण आता जरावेळ मिळेल असे दिसत आहे तेव्हा आणखी नविन काही लिहण्याचा प्रयत्न करेन.

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.