महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) मध्ये ‘रामा’ नामक युवक रहात आहे.

या ‘रामा’ चा मोठा भाऊ ‘शिवा’ मुंबईला नोकरी करतो.

रामा आणि शिवा सख्खे भाऊ त्यामुळे …..

रामा आणि शिवा कनेक्टेड आहेत

शिवा चा रूम पार्टनर आहे ‘’गोविंदा ‘ आता शिवा आणि गोविंदा रूम पार्टनर्स त्यामुळे दोघे ही ‘कनेक्टेड’

रामा शिवाशी कनेक्टेड आणि शिवा गोविंदाशी कनेक्टेड म्हणजे पर्यायाने

रामा आणि गोविंदा कनेक्टेड आहेत

ह्या गोविंदाच्या बायकोच्या आते बहिणीच्या चुलत नणंदेच्या लांबच्या नात्यातला कोणी रमेश , हा रुमी झुनझुनवाला याचा कार ड्रायव्हर आहे.
म्हणजे एक नोकर या नात्याने रमेश रुमी झुनझुनवालांशी कनेक्टेड

गोविंदाच्या बायकोच्या आते बहिणीच्या चुलत नणंदेच्या लांबच्या नात्यातला असे नाते असल्याने रमेश आणि गोविंदा कनेक्टेड !

रमेश शी कनेक्शन असल्याने ओघानेच गोविंदा आणि रुमी झुनझुनवाला पण कनेक्टेड

गोविंदा आणि शिवा आधीच कनेक्टेड त्यामुळे शिवा आणि रुमी झुनझुनवाला कनेक्टेड

रामा आणि शिवा भाऊ – भाऊ म्हणून कनेक्टेड म्हणून

रामा आणि रुमी झुनझुनवाला कनेक्टेड आहेत

आता पहा…

रुमी झुनझुनवालांची बहीण शिरीन अमेरिकेच्या भारतातल्या वकिलातीत नोकरी करते

रुमी आणि शिरीन बहिणी बहिणी म्हणून कनेक्टेड

म्हणून रुमी आणि रमेश आधीच कनेक्टेड त्यामुळे रमेश आणि शिरीन कनेक्टेड

म्हणून गोविंदा शिरीन कनेक्टेड

म्हणून शिवा शिरीन कनेक्टेड

म्हणूनच

रामा आणि शिरीन झुनझुनवाला कनेक्टेड आहेत !

आता शिरीन अमेरिकन वकिलातीत नोकरी करते त्यामुळे ती तिथल्या सर्वोच्च अधिकारी मार्क पॉवेल यांच्याशी  नोकर – साहेब या नात्याने कनेक्टेड आहे.

शिरीन आणि मार्क पॉवेल कनेक्टेड

म्हणून रुमी आणि मार्क पॉवेल कनेक्टेड

म्हणून रमेश आणि मार्क पॉवेल कनेक्टेड

म्हणून गोविंदा आणि मार्क पॉवेल कनेक्टेड

म्हणून शिवा आणि मार्क पॉवेल कनेक्टेड

म्हणून रामा आणि अमेरिकेच्या भारतातल्या वकिलातीत मधले सर्वोच्च अधिकारी मार्क पॉवेल कनेक्टेड आहेत !!

आता हे मार्क पॉवेल अमेरिकन सरकारचा प्रतिनिधी त्यामुळे ते अमेरिकन सरकारशी म्हणजेच Secretary of State शी म्हणजेच मायकेल पोम्पीओ यांच्याशी कनेक्टेड

शिरीन आणि मार्क पॉवेल आधीच कनेक्टेड म्हणून

शिरीन आणि मायकेल पोम्पीओ कनेक्टेड

म्हणून रुमी आणि मायकेल पोम्पीओ कनेक्टेड

म्हणून रमेश आणि मायकेल पोम्पीओ कनेक्टेड

म्हणून गोविंदा आणि मायकेल पोम्पीओ कनेक्टेड

म्हणून शिवा आणि मायकेल पोम्पीओ कनेक्टेड

म्हणून रामा आणि अमेरिकन सरकारचे Secretary of State मायकेल पोम्पीओ कनेक्टेड आहेत !!!

आता मायकेल पोम्पीओ हे अमेरिकेचे Secretary of State असल्याने ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप शी कनेक्टेड आहेत

म्हणून मार्क पॉवेल आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून शिरीन आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून रुमी आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून रमेश आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून गोविंदा आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून शिवा आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड

म्हणून रामा आणि डोनाल्ड ट्रंप कनेक्टेड आहेत !!!!!!!!!

म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या खुटाळवाडी (बुद्रुक) चा रामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी , डॉनाल्ड ट्रंप शी कनेक्टेड आहे !!!!!!!!!!!!!! 


आहे की नाही कनेक्शन ची धमाल !


आता तुम्ही म्हणाल हे काय लिहिलेय ?

सांगतो अगदी बैजवार सांगतो…

 

कै कृष्णमूर्तींनी  ‘कृष्णमूर्तीं पद्धती ‘ नामक एक ज्योतिष पद्धती विकसीत केली , पण या पद्धतीत काही दोष , उणीवां, त्रुटीं , विसंगती आहेत त्या मात्र त्यांच्या हयातीत दूर झाल्या नाहीत.

आपल्या पद्धतीत काही दोष , उणीवां, त्रुटी , विसंगती आहेत कै कृष्णमूर्तींना माहिती नव्हते असे कसे होईल ? त्यांना निश्चितच याची चांगली कल्पना होती आणि त्या त्यांना दूर करता आल्या नसत्या असे मानणे तर शुद्ध वेडेपणाचे ठरेल. पण त्या दोष , उणीवां, त्रुटी , विसंगती दूर करायच्या राहूनच गेल्या हे मात्र खरे.

कदाचित त्या वेळेला कै कृष्णमूर्तीं द्विधा मन:स्थितीत असावेत असे त्यांच्या नंतरच्या काही लिखाणातून जाणवते. काय असावी ही द्विधा मन:स्थिती ?

कै कृष्णमूर्तींना आपल्या पद्धतीत काही दोष , उणीवां, त्रुटी , विसंगती दूर करायच्या असत्या तर त्यासाठी त्यांना  पुन्हा काही वर्षे संशोधनात घालवावी लागणार होती, आणि त्याच वेळी आपल्या पद्धतीचा प्रचार / प्रसार करायचा , या पद्धतीवर होत असलेले हल्ले परतवायचे / वाद विवादांचे खंडन करायचे, प्रशिक्षण देऊन नवे अभ्यासक तयार करायचे , विद्यार्थी घडवायचे , पुस्तके लिहायची  हे पण डोंगरा एव्हढे काम पुढे होतेच त्याला ही काही वर्षे खर्चावी लागणार होती. संशोधन आणि प्रसार ही दोन कामे एकाच वेळी करणे अशक्य होते, त्या दोन पैकी एकाचीच निवड करावी लागणार होती.

कै कृष्णमूर्तींनी पद्धतीत आणखी नवे संशोधन करणे  / त्रुटी दूर करणे या पेक्षा पद्धतीचा प्रसार करणे / आक्षेप दूर करणे यालाच जास्त प्राधान्य दिले असे दिसते.
कदाचित कै कृष्णमूर्तींनी असा विचार केला असावा की आपण या पद्धतीचा प्रसार करून . प्रशिक्षण देऊन नवे अभ्यासक तयार करू आणि आपल्या पश्चात हे अभ्यासक या पद्धतीतल्या सध्याच्या उणीवां , त्रुटी निश्चित दूर करतील

ह्या पद्धतीची उत्तम जाण असलेले अभ्यासक आधी तयार व्हायला हवेत म्हणून त्यांनी या दोष , उणीवां, त्रुटीं , विसंगती कडे काहीसे दुर्लक्ष करून या आपल्या नव्या पद्धतीचा प्रचार केला , प्रचार झाला नक्की , काही अभ्यासक तयार पण झाले पण हे अभ्यासकच पुढे जाऊन दोष , उणीवां, त्रुटीं , विसंगती दूर करतील अशी भाबडी अपेक्षा कै कृष्णमूर्तींना होती ती मात्र पूर्ण झाली नाही , त्यांना जे  वाटले होते / अपेक्षीत होते तसे मात्र झाले नाही, कारण या तथाकथित अभ्यासकांनी तसे काही ही केले नाही, हे सर्व होई पर्यंत कृष्णमूर्ती दिवंगत झाले . त्यांनी जे अभ्यासक तयार केले त्यांनी मग ‘बाबा वाक्य प्रमाणम’ असे घोकत रामाच्या पादुकांना (कृष्णमूर्तींनी लिहिलेल्या सहा रिडर्स ना) सिंहासना बसवून वाटचाल चालू केली.  ‘कृष्णमूर्ती रिडर्स प्रमाणम ,  बस्स बाकी कुच्च बोलनेकाच नाय . याचा असा अतिरेक झाला की ज्योतीर्विद ‘कृष्णमूर्तीं’ चे चक्क ‘ छे (६), छे (६) रीडर्स वाले बाबा ‘ कधी झाले ते कोणाला कळलेच नाही !

काळ पुढे सरकला एव्हाना केपी अभ्यासकांची दुसरी पीढी तैयार झाली होती, पहिल्या फळीतले ‘भरता सारखे रामाच्या पादुका सिंहासना वर ठेवून राज्यकारभार करणारे ‘ अभ्यासक आता मागे पडले आणि मग हे दुसर्‍या फळीतले संशोधक पुढे सरसावले त्यांनी या कृष्णमूर्ती पद्धतीची मनाला येईल तशी कत्तल केली, नियमांचा चुकीचा अर्थ लावत , वाट्टेल तसे तर्कट लढवत या कृष्णमूर्ती पद्धती रुपी इमारतीला कशीही भगदाडे पाडून , आपल्या वेड्यावाकड्या बेढब विटां लावायला सुरुवात केली , संशोधनाच्या नावाखाली काहीही खपवले जाऊ लागले.

इंटरनेट चा प्रसार जसा वाढत गेला तशी फेसबुक , व्हॉट अ‍ॅप , यु ट्युब सारखी सशक्त (आणि फुकट) सोशल मिडिया माध्यमे सहजगत्या उपलब्ध झाली आणि मग काय या तथाकथित संशोधकांना रान मोकळे मिळाले.

कोणीही उठावे , आपला एक कळप तयार करायचा आणि एखादी ‘सुधारीत केपी’ पद्धती विकसित केल्याची राणा भीमदेवी गर्जना करायची आणि हजारो रुपये फी घेऊन एका दिवसात हे असले तर्कट लोकांच्या गळ्यात उतरवायला सुरवात करायची असा खेळ सुरू झाला ! ‘अ‍ॅडव्हान्स’ , ‘सुधारीत ‘, ‘एक्स्टेंडेड ‘ अशी गोंडस नावे दिलेल्या अर्ध्या कच्च्या पद्धतींनी थैमान घालायला सुरवात केली. एक – दोन भाकिते बरोबर आली की झाली संशोधन , झाली नवीन पद्धती विकसीत . एक – दोन भाकिते काय कशीही बरोबर येऊ शकतात हो, अगदी छापा – काटा केला तरीही ५०% वेळा उत्तर बरोबर येऊ शकते.

जिथे आजच्या काळातही जन्मवेळ नोंदवताना ५ मिनिटांची चूक सहज होऊ शकते तिथे ‘+/- 2 सेकंदात’ अचूक जन्मवेळ अत्यावश्यक असणारी सब-सब’ सारखी पद्धती तयार होते , सगळेच बोलाची कढी बोलाचा भात !

बाकी जन्मवेळ शुद्धीकरणा खाली जे काही चालले आहे त्या बद्दल मी आधीच्या लेखात लिहिले आहेच.

सुरवातीला लग्न स्वामी , चंद्र नक्षत्र स्वामी, चंद्र राशी स्वामी आणि दिन स्वामी असे चारच रुलिंग प्लॅनेट होते पण उत्तरें जुळवता येत नाहीत म्हणून आता लग्न नक्षत्र स्वामी, त्याचा सब, चंद्राचा सब, लग्नात असलेलेल ग्रह, लग्नावर दृष्टी टाकणारे ग्रह अशी एक एक खोगीर भरती सुरू झाली आणि मग सगळे नऊ च्या नऊ ग्रह रुलिंग प्लॅनेट म्हणून येऊ लागले , आता काय करायचे?

जातकाने दिलेल्या होरारी नंबर वरूनच , म्हणजे पत्रिकेचा कोणता अभ्यास न करताच एका सेकंदात भविष्य कथनाचा मटका लावायला सुरवात झाली, फक्त आणि फक्त रुलिंग प्लॅनेट चा उथळ, स्वैर , बेताल गैरवापर करत कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देण्याची माकड चेष्टा सुरु झाली आणि दुर्दैवाने त्याला माना डोलावल्या जावू लागल्या !

‘एका महिन्यात ‘ नव्हे ‘एका दिवसात ‘ नव्हे ‘एका तासात’ झटपट ज्योतिषी होऊ पाहणार्‍या हौशा गवश्या नवश्यांं ची नवी पिढी याला बळी पडू लागली.

एखाद्या शास्त्राची / पद्धतीची अधोगती कशी होते / केली जाते याचे हे एक उत्तम उदाहरणच ठरावे !

मूळच्या केपी वर ही जी काही बांडगुळे निर्माण झाली आहेत ना , त्यांच्यात एक समान सूत्र आहे ते म्हणजे ‘कनेक्शन’ थिअरी / इंटरलिंंक्स थिअरी. म्हणजे याचा सब त्या दुसर्‍या भावाशी (पत्रिकेतले स्थान. घर) कोणत्याही बादरायण नात्याने कनेक्टेड आहे आहे , हा सब त्या ग्रहाशी कनेक्टेड / ईंटरलिक्ड  झाले .. ईव्हेंट प्रॉमिस्ड , डायरेक्ट ‘कार्येश च!

सब ने कनेक्सन / इंटरलिंक होत नाही चिंता नको ‘सब सब’ ने पाहा .. त्याने ही कनेक्सन / इंटरलिंक नाय म्हणता मग नक्षत्रस्वामीचा सब ,  सब चा नक्षत्रस्वामीचा सब , त्याने ही जमत नसेल तर सब- सब – सब लेव्हल जाऊ .. हुडका जरा …  काहीतरी कनेक्सन / इंटरलिंक मिळणारच , हाय काय आणि नाय काय !!

त्यामुळेच वरच्या कथेतल्या रामाचे जसे डॉनाल्ड ट्रंप शी कनेक्सन प्रस्थापीत झाले तसे हे लोक कोणाचेही कनेक्सन कोणाशीही घडवून आणतात. राशी स्वामी, नक्षत्रस्वामी, सब , सब-सब, सब च्या नक्षत्रस्वामी , नक्षत्रस्वामीचा सब, त्या सब चा नक्षत्रस्वामी, नक्षत्रस्वामीच्या नक्षत्रस्वामीच्या सब चा सब सब , असे बरेच पर्याय असल्याने कोठे ना कोठे , कसे ना कसे कनेक्सन मिळणारच ! काय बिशाद आहे ‘कनेक्सन / इंटरलिंक ’ नाही म्हणायची ! यांचे काम झाले !

या कनेक्सन / इंटरलिक्स चा वापर करून मग हे लोक काहीही सिद्ध करुन दाखवतात …

याचे हे कनेक्सन त्याचे ते कनेक्सन अशी माळ लावत अगदी ‘बुंदी पाडल्या सारखी ‘ ‘विवाह होईल’ ‘नोकरी लागेल’ ‘परीक्षेत इतके % मार्क्स पडतील’ अशी भाकित पाडायची आणि भाकीत चुकले की ‘हे कनेक्सन किंवा ते कनेक्सन नव्हते म्हणून असे झाले ‘ असे केवीलवाणें स्पष्टीकरण द्यायला पण मोकळे ! कनेक्सन काय कशी ही प्रस्थास्थित करता येतील आणि तोडता पण येतील अगदी आपल्याला जशी पाहिजे तशी !

आणि मजा म्हणजे हे संशोधक या सगळ्या कनेक्सन वाल्या थिअरी कागदा वरच चालवून दाखवतात, ताळा पडताळा फक्त घडून गेलेल्या घटनांच्या पोष्ट मॉर्टेम नेच देतात, ते सोपे असते ना ! घटना घडून गेली आहे आता फक्त कोणते ना कोणते ‘कनेक्सन’ दाखवून , घटना जुळवून दाखवली की झाले काम , अशा गप्पा मारायला काय जाते !

हे प्रकरण इथेच थांबले नाही तर आपली तथाकथित पद्धती जास्त आधुनिक आहे , अचूक आहे याचा दावा करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आता मूळ प्रो के एस कृष्णमूर्ती च्या ‘कृष्णमूर्ती पद्धतीला’ ‘ ओल्ड केपी’, ‘ ट्रॅडिशनल केपी ‘ असे म्हणायला ( का हिणवायला ?) सुरवात केली आहे.

कृष्णमूर्ती पद्धती एकच आहे आणि ती प्रोफेसर के एस कृष्णमूर्तीं नी सांगीतलेली, शुद्ध स्वरुपातली कृष्णमूर्ती पद्धती , त्यात ट्रॅडीशनल, अ‍ॅडव्हांस, एक्स्टेंडेड , मॉडीफाईड , इनरिच्ड असे काहीही नाही , बाकीचे सारे कृष्णमूर्ती पद्धतीत मोडत नाही . कृष्णमूर्ती पद्धतीची कोणतीही शाखा नाही जाहीरात बाजीला फसू नका !

आणि शेवटी यातून जे होऊ नये तेच झाले , या सगळ्या भुलभुलैयात , मूळ कृष्णमूर्ती पद्धतीचा गळा केव्हाच घोटला गेला आहे ! या ‘कलकलाटात मुळ कृष्णमुर्ती पद्धती नेमकी काय होती हेच आता हुडकायला लागत आहे , दुर्दैव त्या कृष्णमूर्तींचे आणि त्यांनी मोठ्या कष्टाने विकसीत केलेल्या ‘कृष्णमूर्ती पद्धती’ चे !

रामा रामा कनेक्सन हुई गवाँ रे …..  हाय रे दैया !

 

‘कनेक्सन हुई गवा’ हे फक्त कोणा ज्योतिष पद्धती पुरते मर्यादीत नाही, एखादी पत्रिका सोडवताना (पोष्ट मॉर्टेम स्ट्डी) देखील हा कनेक्शन चा खेळ जराश्या वेगळ्या पद्धतीने खेळलेला आढळतो.

म्हणजे होते काय “एखाद्या जातकाची पत्रिका तपासताना त्याचा विवाह केव्हा झाला आहे हे माहीती असेल तर काहीही करुन ,  कशाचाही कशाशीही बादरायण संबंध जोडून , नियमांची वाट्टेल तशी ओढाताण करून , वेळ प्रसंगी स्वत:चे नियम तयार करून , येन केन प्रकाराने विवाहाची तारीख आणि (असे !) जुळवलले ग्रहमान/ ग्रहयोग ‘ अशी सांगड घालून दाखवली जाते.

पत्रिका आणि घटना माहीती असेल तर मग ती कशीही सिद्ध करता येते! In Astrology you can prove / disprove anything in any way असे बोलले जाते ते उगाच नाही एखाद्या नवशिक्या विद्यार्थ्याने उत्साहाच्या भरात , अपुर्‍या ज्ञाना मुळे , अनुभव नसल्याने  मुळे असे काही बादरायण संबंध जोडले तर आपण समजू शकतो पण इथे नावे देत नाही पण या शास्त्रातली बडी बडी धेंडे , ज्योतिष मार्तंड ,  केपी सम्राट  देखील त्यांच्या व्याख्यानातून , पुस्तकांतून , मासिकातल्या लेखां मधून असले उद्योग करताना आढळतात.

जाऊ दे , हा विषयच असा आहे की जितके लिहावे तितके कमीच पडेल..

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण या ‘कनेक्सन / इंटरलिंक्स ‘ च्या खेळात या शास्त्राची दैना होते आहे त्याचे वाईट वाटते.

हाय  रे दैया , कनेक्सन हुई गवा रे !

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री गोरक्षनाथजी

   धन्यवाद

   अगदी खरे आहे , केव्ळ प्रसिद्धी साठी पैसे लुबाडण्यासाठी या लोकांनी या शास्त्राला वेठीस धरले आहे , असल्या काहीतरी भाकड थिअरी उभ्या करायच्या आणि मग गावोगाव गारुड्या सारखा खेळ दाखवत पैसे कमवायचे

   0
 1. Tejraj Kinkar

  Good Morning Sir….

  Awesome analysis.
  But statements are contradictory,
  At the time you say “there are corrections needed in KP” and then you say “ALL corrective efforts done by ppl are hopeless”.

  Request you to be more precise regarding these waste theories,

  Initially i started following KP (with very little knowledge about paramparic). As an engineer, started keeping track of results. Then I was introduced to 4 STEP. Success ratio was was too small.

  Now finding myself lost somewhere inbetween.

  Your blog n fb group always encourages to think differently.
  Need more guidance from you.

  Thank you

  0
  1. सुहास गोखले

   श्री तेजराज जी ,

   धन्यवाद

   सर्वप्रथम एक खुलासा करत ‘होपलेस’ हा शब्द तुमचा आहे माझा नाही तेव्हा मी जे लिहलेच नाही ते माझ्यावर लादू नका.

   माझ्या लिखाणात आपल्याला वाटली तशी कोणतीही विसंगती / विरोधाभास नाही.

   केपी मध्ये काही त्रुटी आजही आहेत , यादी देता येईल , त्यावर चार तासाचे लेक्चर देण्या इतकी माहीती / पुरावे वे माझ्या कडे आहेत पण वेळे अभावी शक्य नाही, तेव्हा मी उगाच गंमत म्हणून काही विधाने करणार नाही याची खात्री बाळगा. दुसरे माझा केपी वर राग आहे असे ही नाही कारण केपी मधला जो भाग चांगला आहे तो मी रोज माझ्या व्यावसायीक कामात वापरत असतो, माझ्या या ब्लॉग वरच्या केस स्ट्डीज पाहील्या तर तुमच्या ते लक्षात येईल. तेव्हा केपी वर चिडून मी केवळ टीका करायची म्हणून टीका केली असा गैरसमज करून घेऊ नका , उलट केपी ही मर्यादीत अंगाने का होईना एक चांगली ज्योतिषपद्धती आहे असे मी आज ही म्हणतो हे पण समजून घ्या.

   आता केपी मधल्या त्रुती दूर करायचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण ते चुकीच्या दिशेने झाले असे म्हणता येईल किंवा ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांचा तेव्ह्ढा वकूब नव्हता असे म्हणता येईल. पहील्या पिढीतले केपी अभ्यासक पारंपरीक ज्योतिषाची उत्तम जाण असलेलेल ज्योतिषी होते पण केपी का पारंपरीक या संभ्रमातच स्वत:चा वैचारीक गोंधळ करुन घेत राहीले. दुसर्‍या पिढीतल्या केपी अभ्यासकांनी (जे सध्या फेसबुक, युट्युब , व्हॉटॅस अ‍ॅप वर धुमाकूळ घालत आहेत) पारंपरीक चा पाया बळकट न करताच एकदम केपी ला (सोप्पी म्हनून असेल कदाचित) हात घातला, त्यामुळे केपी तल्या समस्यांंचे त्यांना आकलन झालेच नाही. आणी झाले तरी त्या सम्स्या दूर करायला जे ‘संशोधक मटेरियल;’ लागेत ते त्यांच्या कडे कधी नव्हतेच. म्हणूनच मूल समस्या बाजूला ठेवून हे लोक केपी ला फाटे फोडू लागले .उदाहरण द्यायचे तर ‘ सब सब आणी इंटरलिंक्स’ चा वापर ही केपीतल्या त्रुटी मधली दुरुस्ती कधीच असू शकत नाही , सध्याच्या ‘सब’ च्या कॉन्सेप्ट मधल्या उणीवा दूर करायला हव्या असताना त्याच्य कडे दूर्लक्ष करुन सब सब लेव्हल गाठणे म्हणजे आधीचा प्रॉब्लेम दहा पटीने वाढवल्या सारखा झाले.

   माझी टीका आहे ती या अपुर्‍या ज्ञानावर , अपुर्‍या अनुभवा वर , अर्ध्या कच्च्या संशोधनावर काहीतरी तर्कट रचून नवी थिअरी मांडल्याचा दावा करायचा आणि त्याला ‘सुधारीत केपी’ म्हणायचे ह्या वृत्ती वर आहे , हा फरक समजाऊन घ्या. हे असे होते कारण या तथाकथित संशोधकांना स्वत:च्या नाववर काही करता येत नाही , प्रसिद्धी साठी , मान्यते साठी त्यांना केपी च्या नावाचा / ब्रॅन्ड चा (गैर) वापर करावा लागतो यातच सर्व आले, स्वतंत्र पणे , ठामपणे उभे राहायची ताकद यांच्या कडे नाही यालाच मराठीत ‘बांडगुळ” म्हणतात

   कै कृष्णमूर्ती हयात असताना केपी मध्ये ज्या उणीवा होता त्या आजही तशाच आहेत किंवा केपी मधल्या ज्या बाबतीत संशोधन व्हायला हवे होते ते झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

   मला वाटते आपल्याला खुलासा झाला असावा.

   सुहास गोखले

   +1
   1. Tejraj Kinkar

    Shri. Suhas Ji,

    Thank you for the response.

    Yes. I agree with each word of you.

    But my problem is I AM CONFUSED. Being new comer in this field, I am finding it too frustrating with confusing rules and so called SUDHARIT KP.

    I am in touch with you/ your blog with one clear intention ie TO IMPROVE MY SKILL SETS.

    Seeking guidance from you,

    Truly yours
    Tejraj

    0
    1. सुहास गोखले

     श्री तेजराज जी ,

     धन्यवाद

     माझे मत असे आहे की आपण जर नविन अभ्यासक असाल तर केपी जशी कै कृष्णमूर्तींनी सांगीतली तशी शिकून घ्या , त्या साठी इंग्रजीत कै चंद्रकांत भट आणि मराठीत कै हसबे , कै शहासने यांची पुस्तके वाचा ( केपी रिडर्स च्या वाटेला सध्यातरी जाऊ नका) , बाकी ते 4 स्टेप 3.5 स्टेप, कस्पल इंटरलिंक्स यांच्या नादाला लागू नका , त्यांच्या भडक प्रचाराला , खोट्या दाव्यांना फसू नका , सब सब थिअरी कागदा वर चांगली वाटली तरी त्याचा व्यवहारात उपयोग करणे अशक्य आहे कारण त्या साठी आवश्यक असलेली +/- 2 सेकंदातली जन्मवेळ आपल्याला कधीच भेटणार नाही. जन्मवेळ शुद्धीकरण साठी या जगात अशी एकही पद्धती आस्तीत्वात नाही की जी तुम्हाला +/- 2 सेकंडात अचूक जन्मवेळ हूडकून देईल तेव्हा ज्या पद्धती ना अशी अत्यंत अचूक जन्मवेळ लागते त्या पद्धती निदान सुरवातीच्या काळात तरी टाळा .

     केपी मध्ये सब वापरले जातात पण समस्या ही की सब साधारण पणे दोन एक मिनिटांत बदलू शकतात तेव्हा सब वापरायचे असतील तर जन्मवेळ 2 मिनिटांत अचूक आवश्यक असते हे पण बर्‍याच वेळा शक्य नसते , तेव्हा नक्षत्र पद्धती ही जन्मकुंडली पेक्ष प्रश्न कुंडली लाच जास्त योग्य आहे (कारण प्रश्न कुंडली चा टाईम आपणच घेत असल्याने तो अगदी सेकंदा इतका अचूक मिळू शकतो)

     पारंपरीक आणि केपी मधल्या काही चांगल्या गोष्टी यांचा एकत्र वापर केलात तर जास्त लाभ होईल. मी सध्या तेच करत आहे.

     शुभेच्छा

     सुहास गोखले

     0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.