मित्र हो,

सर्वप्रथम आपणां सर्वांना नविन वर्षाच्या अनेक शुभकामना!

हे नूतन वर्ष आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सुख शांतीचे व भरभराटीचे जावो. सध्या सार्‍या विश्वात घोंगावणारे ‘करोना व्हायरस’ चे जागतीक अरिष्ट दूर व्हावे आणि सकल मनुष्य जमातीची या अजगरी विळख्यातून सुखरूप मुक्तता व्हावी अशी प्रार्थना करतो.

आपल्या शुभेच्छा देतानाच, आजच्या या शुभ मुहुर्तावर माझ्या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ पद्धतीच्या ज्योतिष अभ्यासक्रमाची घोषणा करताना मला कमालीचा आनंद होत आहे.

आज पासून या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ ची नाव नोंदणी चालू करत आहे. आत्ता कोणतेही पैसे भरण्याची आवश्यकता नाही, या अभ्यासवर्गाची पहीली दोन लेक्चर्स पूर्णत: मोफत आहेत, ही दोन्ही लेक्चर्स पहा, ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ कसे असते याचा अनुभव घ्या, गोखले सर कसे शिकवतात तेही पहा, खात्री पटली तर आणि तरच या अभ्यासक्रमाच्या फी चा पहीला हप्ता भरा. तिसर्‍या लेक्चर पासून मात्र ज्यांनी पैसे भरले आहेत फक्त त्यांनाच या अभ्यासक्रमाची लेक्चर्स पाहता येतील.

हा अभ्यासक्रमा साठी आपल्याकडे डेस्कटॉप , लॅपटॉप , टॅबलेट किंवा टच स्क्रीन फोन असणे आवश्यक आहे. अर्थातच चांगले इंटरनेट कनेक्शन असणे ही अत्यंत जरुरीचे आहे, साधारण 3 ते 5 Mbps इतका तरी स्पीड आवश्यक आहेच, त्यापेक्षा कमी स्पीड असेल ( BSNL 3G !) तर मात्र हा कोर्स व्यवस्थित दिसणार नाही.

या कोर्स साठी एक लहानसे ‘अ‍ॅप’ आपल्याला डाऊनलोड करुन घ्यावे लागेल, एका चांगल्या मोठ्या नामांकित आणि प्रतिष्ठीत कंपनीने तयार केलेले हे अ‍ॅप असल्याने पूर्णत: सुरक्षीत आहे, याची खात्री करुन घेतली आहे.

आपल्या डेस्कटॉप , लॅपटॉप , टॅबलेट किंवा टच स्क्रीन फोन मध्ये बहुदा आधीपासूनच गुगलचा क्रोम ब्राऊसर इंस्टाल केलेला असेल, तो वापरुन देखील हा कोर्स पाहता येईल, किंबहुना ‘अ‍ॅप’ पेक्षाही ब्राउसर च्या माध्यमातून हा कोर्स जास्त व्यवस्थित पाहता येतो असा माझा अनुभव आहे, ‘अ‍ॅप्स’ बर्‍याच वेळा हँग होतात, क्रॅश होतात असाही अनुभव आहे.

या कोर्स साठी अगदी अत्यावश्यक नसली तरी एखादी ईमेल आयडी असणे (शक्यतो गुगल जीमेल) पण लाभदायक ठरेल कारण कोर्स बद्दलची माहीती, आमंत्रणे ही ईमेल च्या माध्यमातून देणे-घेणे कमालीचे सोपे जाते शिवाय मी पाठवत असलेल्या ईमेल्स अगदी देखण्या , वाचण्या सारख्या असतात हा भाग वेगळाच! अर्थात पुन्हा एकदा सांगतो, ईमेल असणे जरुरीचे नाही तेव्हा काळजी नसावी, ज्यांच्या कडे ईमेल आयडी नाही त्यांच्याशी  ‘व्हॉटसअ‍ॅप’ च्या माध्यमातून संपर्क साधला जाईल.

हा कोर्स तुमच्या डेस्कटॉप , लॅपटॉप , टॅबलेट किंवा टच स्क्रीन फोन वरुन कसा पहता येईल याबद्दलची विस्तृत माहिती व प्रात्यक्षीक देणारा एक व्हीडीओ मी तयार करत आहे आणि नाव नोंदणी केलेल्यांकडे तो पोहोचवला जाईल. हा व्हीडीओ आपल्या सर्व शंका कुशंकांचे निरसन करेल पण त्याहून ही जादाची माहीती हवी असल्यास मी आहेच!

या कोर्स च्या पहील्या लेक्चर मध्ये या, कोर्स ची फी ती कशी व केव्हा भरायची , या कोर्स साठी काय पूर्वतयारी आवश्यक आहे का , कोणाला हा कोर्स करता येईल याबद्दल विस्तृत माहिती दिली जाईल.

आता या अभ्यासक्रमाची नाव नोंदणी आगावू करणे आवश्यक आहे , त्या साठी आपण मला   94045 82665 या क्रमांका वर एक SMS एसेमेस पाठवा- टेक्स्ट मेसेज , लक्षात घ्या फक्त  एसेमेस करायचा आहे , या नंबर वर मला व्हॉट्सॅप मेसेजेस स्विकारता येणार नाहीत किंवा कोणतेहा फोन कॉल स्विकारता येणार नाही. या क्रमांकावर फक्त एसेमेस पाठवायचा आहे.  आपल्या मेसेज मध्ये ‘आपले नाव, आपले गाव/शहर, आपला व्हॉट्सअ‍ॅप साठीचा फोन नंबर आणि असल्यास आपली ईमेल आय डी  कळवावी’ आपले खरे नाव , खरा फोन नंबर देणे आवश्यक आहे. इथे खोटेपणा चालणार नाही. आपण पुरवलेली माहीती पूर्णत: गुप्त राखली जाईल कोणत्याही प्रकारे त्याचा दुरुपयोग होणार नाही, अन्य व्यक्तीं अथवा संस्थांना ही माहिती पुरवणे/विकणे असले घाणेरडे प्रकार माझ्या हातून कदापीही होणार नाहीत याची मी आपल्याला हमी देतो.

ज्यांची या कोर्स साठी पैसे आणि वेळ खर्च करायची तयारी आहे , ज्याच्या कडे शिकण्याची खरी तळमळ आहे आणि मेहेनत करायची तयारी आहे आणि ज्याच्या मनात शिकवणार्‍या शिक्षका बद्दल आदरभाव व श्रद्धा असेल त्यांनीच नाव नोंदणी करावी, केवळ फुकट आहे म्हणून ‘मला द्या मला द्या ‘असे करणारी भाऊ गर्दी मला नको आहे.

शुद्ध गणित , निखळ तर्कशास्त्र, शास्त्रीय विचारसरणी यावर आधारीत हा अभ्यासक्रम आहे , धार्मिकता, पाखंड, पोथ्या, जपजाप्य, शांत्या, मंत्र तंत्र, अंधश्रद्धा, बुवा/बाप्पु/स्वामी/म्हाराज/ मॉ , उपायतोडग्यांचा किळसवाणा बाजार, अमुक दोष – तमुक दोष असल्या सर्व भाकडां पासून पूर्ण अलिप्त असलेला , ‘शनी देव’ न म्हणता फक्त ‘शनी’ म्हणणारा हा अगदी नास्तीक म्हणता येईल असा अभ्यासक्रम आपल्याला खरे ज्योतिषशास्त्र काय आहे ते शिकवेल!

अगदी ख्रिश्चन , मुस्लीम धर्मीयांना देखील त्यांच्या देवा – धर्मांच्या संकल्पनांना कोणताही धक्का न लावता, कोणतीही मनाला न पटणारी तडजोड न करता, धर्माचा , श्रद्धेचा कोणताही अडसर न येता हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

कोरोना व्हायरस मुळे पुणे येथे चालू होणारा ‘प्रत्यक्ष क्लास रुम’ पद्धतीचा अभ्यासवर्ग मात्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावा लागत आहे. या कोर्स साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना त्याबद्दल व्यक्तीश: कळवत आहेच.

तेव्हा यावे, आपले सर्वांचे या अभ्यासक्रमा मध्ये सहर्ष स्वागत आहे!

शुभेच्छा

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.