ए भाय जरा देख के चलो (भाग – ३)

 

तीन ची स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी होती, तसे बरे चालले होते. काही महीन्यांपूर्वी जतीन ची मनसुखलाल शी ओळख झाली , हा मनसुखलाल शेअर बाजारात उलाढाली करत होता. त्याने जतीन समोर भागीदारीत एक नवा ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ व्यवसाय करण्याची योजना मांडली. यावर त्या दोघांत बरीच चर्चा झाली होती. या नव्या धंद्यात मोठी गुंतवणूक करावी लागणार होती त्याच बरोबर पूर्ण वेळ काम करावे लागणार होते. या साठी जतीनला त्याचा सध्याचा ट्रॅव्हल चा व्यवसाय बंद करावा लागणार होता.

तेव्हा’ मनसुख बरोबर भागीदारीत व्यवसाय चालू करु का?” असा जतीन चा प्रश्न होता.

सोबत जतीन साठी केलेला सायन चार्ट आहे:

होरारी चार्ट चा तपशील:

दिनांक: ०८ एप्रिल २०१७ , वेळ: २०:२५:१२ , स्थळ: नाशिक (प्रमोद नगर , ऑफ गंगापूर रोड) , अयनांश: ००:००:०० सायन , प्लॅसिडस , मीन नोड्स

 

आता पर्यंतच्या विश्लेषणा वरुन आपल्या लक्षात आले आहे ते असे:

 1. जतीन ची परिस्थिती अत्यंत खराब आहे, जतीन मनसुखच्या भूलथापांना बळी पडत आहे.
 2. जतीन च्या पैशावर मोठी आपत्ती येणार आहे , जतीनचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 3. तुलनात्मक दृष्ट्या मनसुख खूपच चांगल्या अवस्थेत आहे आणि भागीदारीच्या बहाण्याने जतीन ला फसवण्याच्या कामगिरीला (?) पूर्ण सक्षम आहे.
 4. मनसुख च्या पैशा बद्दल संभ्रम आहे म्हणजे जतीन कडून पैसा हडप करण्यात मनसुख यशस्वी ठरला तरी तो पैसा त्याला पचणार नाही. ‘हपापाचा माल गपापा’ असे काही तरी होण्याची शक्यता आहे. पण आपला क्ल्यायंट जतीन , त्याचे काय होणार हे महत्वाचे, मनसुख चे काय होते हे काहीसे दुय्यम आहे.
 5. ग्रहयोग हे सुचित करत आहेत की जतीन आणि मनसुख भागीदारीचा करार अंमलात आणणार आहेत.

आता पुढचे अ‍ॅनॅलायसीस करुयात….

या दोघांत भागीदारी होणार याचा आणखी एक पुरावा म्हणजे शुक्र (मनसुख) आणि मंगळ (जतीन) यांच्यात होणारा लाभ योग. पत्रिकेत शुक्र वक्री अवस्थेत २७ मीन ५१ वर आहे पण लौकरच तो २६ मीन ५४ वर मार्गी होतो आहे , त्यानंतर लगेचच शुक्र २६ मीन ५५ वर येईल तो पर्यंत मंगळ ही मार्गी गतीने २६ वृषभ ५५ वर येईल आणि या दोघांत लाभ योग होईल. म्हणजेच या दोघांत नुसता भागीदारीचा करार होणार!

पण असा भागीदारी करार होणे ही एक सुरवात असते , एक कायदेशीर प्रक्रिया / औपचारीकता , पण पुढे जाऊन हा व्यवसाय सुरु होणार असेल तर जतीन आणि मनसुख च्या प्रतिनिधींचा व्यवसायाचा प्रतिनिधी रवीशी कोणता तरी ग्रहयोग व्हायला पाहीजे तसा तो आहे का? हे तपासले पाहीजे…

रवी (व्यवसाय) १८ मेष ५७ वर आहे म्हणजे त्याचा २१ वृषभ ०४ वर असलेल्या मंगळा (जतीन) शी प्रत्यक्ष (डायरेक्ट) योग होत नाही (या दोघात ३० अंशाचा अर्ध लाभ योग होणार आहे पण हा अगदीच फुटकळ योग असल्याने पाश्चात्य होरारीत याची दखल घेतली जात नाही). इतर कोणत्या म्हणजे ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट ‘ / ‘कलेक्शन ऑफ लाईट ‘ या मार्गांनी या दोघात कोणता योग होतो हे पाहिले असता असे दिसते की.  चंद्र ‘ मांडवली करुन ट्रान्सलेशन ऑफ लाईट ची भुमिका बजावत आहे.

चंद्र १८ कन्या ५७ वर आला की त्याचा १८ मेष ५७ वरच्या रवी शी षडाष्टक (१५० अंश) योग आहे , हा योग तसा विघातकच आहे पण विचारात घेतला पाहीजे. चंद्र तसाच पुढे जाऊन २१ कन्या ०४ वर आला की त्याचा २१ वृषभ ०४ वर असलेल्या मंगळाशी नवपंचम योग होणार. म्हणजे अप्रत्यक्ष रितीने का होईना रवी (व्यवसाय) आणि मंगळ (जतीन) यांच्यात योग होणार.

म्हणजे जतीन चा व्यवसायाशी संबंध येणार आहे.

आता मनसुख (शुक्र) आणि व्यवसाय (रवी) यांच्यात काही योग होतात का ते पाहू.

शुक्र (मनसुख) २७ मीन ५१ वर वक्री अवस्थेत आहे याचाही १८ मेष ५७ वर असलेल्या रवी शी कोणताही प्रत्यक्ष (डायरेक्ट) योग होणार नाही. तर कोणत्या म्हणजे ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट ‘ / ‘कलेक्शन ऑफ लाईट ‘ या मार्गांनी या दोघात कोणता योग होतो हे पाहिले असता असे दिसते की.  चंद्र ‘ मांडवली करुन ट्रान्सलेशन ऑफ लाईट ची भुमिका बजावत आहे.

चंद्र १८ कन्या ५७ वर आला की त्याचा १८ मेष ५७ वरच्या रवी शी षडाष्टक (१५० अंश) योग आहे , हा योग तसा विघातकच आहे पण विचारात घेतला पाहीजे. चंद्र तसाच पुढे जाऊन २७ कन्या ५१ वर आला की त्याचा २७ मीन ५१ वर असलेल्या शुक्राशी प्रतियोग योग होणार. म्हणजे अप्रत्यक्ष रितीने का होईना रवी (व्यवसाय) आणि शुक्र (मनसुख) यांच्यात योग होणार.

म्हणजे मनसुख चा व्यवसायाशी संबंध येणार आहे.

याचा सरळ सरळ अर्थ जतिन आणि मनसुख यांच्यात भागीदारीतला करार होणार , व्यवसाय सुरु देखील होणार पण चंद्राच्या मांडवलीतले ग्रहयोग षडाष्टक आणि प्रतियोग पाहता हा व्यवसाय चालण्याची शक्यता  ‘ना’ के बराबर है !

आत्ता पर्यंतचे सर्व घटक आपल्याला हे सुचित करत आहेत की ‘जतीन – मनसुख’ भागीदारी व्यवसाय क्षणभंगुर ठरेल आणि ह्या सर्व उलाढालीत जतीन चे आर्थिक नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे.

हा चार्ट इतका बोलका आहे की आणखी काही विश्लेषण करायची गरजच नाही. असा विचार करुन मी फौटनपेन चे टोपण बसवले (नाहीतर शाई वाळते!) आणि जतीन ला हा निष्कर्ष सांगणार इतक्यात मी थबकलो, पत्रिका जरी इतका साफ कौल देत असली तरी आपल्याला घाई गडबड करुन चालणार नाही. मला असे वाटले की पत्रिकेच्या अभ्यासात अजून काही  घटक तपासायचे राहीले आहेत ते केल्या शिवाय निष्कर्ष काढणे बरोबर किंवा शास्त्राशी प्रामाणीक ठरणार नाही. या जादाच्या घटकां द्वारा आधी काढलेला निष्कर्ष बदलायची शक्यता जरी कमी असली तरी एकदा खात्री करुन घेतलेली बरी म्हणून मी पुन्हा पत्रिकेत डोके खुपसले.

होरारीत चंद्राला फार महत्व आहे, चंद्र हा प्रश्नकर्त्याचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतो, चंद्र घटना केव्हा घडणार याचा अंदाज देतो, चंद्राच्या स्थिती वरुन जातकाची मन:स्थितीचा काहीसा अंदाज मिळू शकतो. आणि चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्या पासुन ते चंद्र त्या राशीतून बाहेर पडे पर्यंत त्याने केलेले ग्रह योग आपल्याला जातकाच्या आयुष्यात  , खास करुन प्रश्ना संदर्भातल्या जातकाच्या हालचाली, आजूबाजूची परिस्थिती या बद्दल बर्‍या पैकी अंदाज देतात. चंद्र त्या राशी आल्यापासुन ते चंद्र आत्ता ज्या अंशावर आहे त्या अंशा वर येई पर्यंत चंद्राने केलेले ग्रहयोग आपल्याला प्रश्न विचारायच्या आधीच्या काळात (नजिकच्या) काळात घडलेल्या घटनां बद्दल सांगतात तर चंद्र आत्ता ज्या अंशावर आहे तिथून चंद्र ती रास ओलांडे पर्यंत होणारे सर्व ग्रह योग आपल्याला आगामी काळात (नजिकच्या) घडणार्‍या घटनां बद्दल अंदाज देतात.

या पत्रिकेतला चंद्र १८ कन्या ३४ वर आहे म्हणजे  चंद्र कन्येत आल्या पासुन (०० कन्या ००) ते चंद्र त्याच्या सध्याच्या स्थितीत म्हणजे १८ कन्या ३४ वर येई पर्यंत झालेले ग्रहयोग ‘ प्रश्न विचारायच्या पूर्वी घडलेल्या घटना’ दाखवतील तर चंद्र आत्ता आहे त्या स्थितीतून पुढे जात कन्या रास ओलांडे ( २९ कन्या ५९) पर्यंत होणारे ग्रह योग ‘आगामी काळात घडणार्‍या घटना’ दाखवतील.

चंद्र कन्येत आल्या पासुन त्याने केलेले ग्रह योग:

 

०४ वृषभ ४४ वर असलेल्या बुधाशी नवपंचम योग (चंद्र : ०४ कन्या ४४)

बुध हा या पत्रिकेत व्यवसायातला नफा आणि मनसुख चा पैसा दाखवतो. व्यवसाय अजून सुरुच झाला नसल्याने ह्या योगाचा विचारलेल्या प्रश्ना शी काही संबंध जोडता येत नाही.

 

१३ मीन ०३ वर असलेल्या नेपच्युन शी प्रतियोग ( चंद्र: १३ कन्या ०३)

नेपच्युन ग्रह मानसिक गोंधळ, फसवणूक , भूलथापांचा कारक आहे जतीन चा झालेला वैचारीक गोंधळ झालेला यातुन दिसत आहे , कोणाच्या (मनसुख च्याच ,आणखी कोणाच्या?) भूलथापांना, मार्केटींग ला बळी पडला आहे. फसवणूकीला सुरवात झाली असण्याची शक्यता.

चंद्र सध्याच्या स्थिती पासुन ते कन्या रास ओलांडे पर्यंत होणारे ग्रह योग:

 

१९ मकर २१ वर असलेल्या प्लुटो शी नवपंचम ( चंद्र: १९ कन्या २१ )

प्लुटोचे फळ नेहमीच ‘विनाश आणि नव निर्माण’ असे असते म्हणजे एखाद्या गोष्टीचा विनाश होतो आणी एका नव्या गोष्टीची निर्मिती होते. इथेही तेच होणार असे दिसते , जतीन चा सध्याचा व्यवासाय बंद होणार (विनाश) आणि भागीदारीतला नवा व्यवसाय (नवनिर्मीती) चालू होणार! याचा अर्थ ही भागीदारी होणार तर !!

 

२१ वृषभ ०४ वर असलेल्या मंगळाशी नवपंचम योग (चंद्र : २१ कन्या ०४)

या योगाचा विचार आपण आधीच केला आहे.

१९ मकर २१ वर असलेल्या प्लुटो नवपंचम योग (चंद्र : १९ कन्या २१)

चंद्र जतीन / व्यवसायातला नफा/तोटा  आणि प्लुटो = करार असा विचार आपण आधीच केला आहे , या दोघांत भागीदारी करार होणार याची आणखी एक पुष्टी मिळाली.

 

२७ मीन ५१ वर असलेल्या शुक्राशी  प्रतियोग  ( चंद्र: २७ कन्या ५१ )

२७ धनु ४७ वर असलेल्या शनी शी केंद्र योग  ( चंद्र: २७ कन्या  ४७ )

हे होणारे दोन योग अगदी जवळ जवळ आहेत ,  एकाच वेळी घडणार असे म्हणले तर फार चुकणार नाही.

चंद्राचा वक्री शनी शी होणारा घातक केंद्रयोग (शनी धन स्थानात आहे हे लक्षात घ्या) , मोठे आर्थिक नुकसान दाखवते तर चंद्रा चा शुक्राशी (मनसुख) प्रतियोग (हा पण घातकच) म्हणजे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात त्यातला प्रकार!

 

चंद्राचे हे योग पाहील्या नंतर मला जतीन च्या पुढे काय वाढून ठेवले याचा अंदाज आला:

 

“हे बघ जतीन, या भागीदारीच्या फंदात पडू नको, मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. जवळ जवळ बरबादीच होण्याची शक्यता आहे. “

“काय?”

जतीन जवळजवळ किंचाळलाच!

“हे बघ जतीन , ही समोरची पत्रिका मला जे सांगत आहे तेच मी तुला सांगतो आहे, केवळ तुला बरे वाटावे म्हणूण काही मी खोटे खोटे सांगणार नाही,  तुझी मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे , मोठे आर्थिक नुकसान’ तेव्हा जरा विचार करुन निर्णय घ्यावा’

“असे कसे काय म्हणता, गेले सहा महीने आम्ही दोघे या प्रोजेक्ट वर काम करत आहोत, जवळ जवळ सगळे फिक्स झाले आहे, मनसुख आमच्या लांबच्या नात्यातला आहे , दगा फटका करणार्‍यातला नाही”

“जतीन, तु म्हणतोस तसे झाले तर चांगलेच आहे , पण ही पत्रिका तसा कौल देत नाही, आगे खतरा आहे असेच चित्र दिसत आहे. तेव्हा तू जरा नीट विचार करुन , खातरजमा करुन घेऊनच पाऊल उचलावेस, किमान सध्याचा धंदा तरी बंद करु नको आणि मोठी आर्थिक गुंतवणूक पण करु नको , निदान अगदी सुरवातीला तरी नको”

“मला पटत नाही ,मी मनसुख ला चांगला ओळखतो, तो फसवणार्‍यातला नाही. धंदा म्हणले की नफा-तोटा आलाच पण भागीदारा कडून फसवणूक , बरबादी  असे जे आपण सांगता आहात ते मला सगळे चुकीचे वाटतेय”

“हे बघ मी माझ्या शास्त्राशी प्रामाणीक आहे आणि माझे सर्व ज्ञान, कौशल्य आणि अनुभव वापरुन मी हे रीडींग दिले आहे, हे रिडींग चुकले तर मला आनंदच आहे. पण मी ‘बरोबर का चूक’ हे येणार काळच ठरवेल. मी माझे काम केले आहे, निर्णय तुलाच घ्यावयाचा आहे , तेव्हा माझ्या कडून तुला खुप खुप शुभेच्छा आणि पुढे काय काय होते हे कळवावे ही विनंति”

“बघू’

असे तिरसटा सारखे बोलून, खांदे उडवत काहीसा निराश जतीन निघून गेला.

हा अनुभव नेहमीच येतो, लोकांना कायम चांगले , शुभ असे भविष्य ऐकायचे असते , किंवा त्यांना जे घडावे असे वाटते तेच ज्योतिषाने सांगावे किंवा त्यांनी जो निर्णय आधीच घेतला आहे तो बरोबरच आहे असे ज्योतिषाने सांगावे अशी अपेक्षा असते , त्या विपरीत असे काही ज्योतिषाने सांगीतले की जातक नाराज होतो. ज्योतिषी चुकीचा, भाकड, भोंदू , बेअक्कल ठरवला जातो.

असो.

गेल्या महिन्यात , गणपती साठी जरा शॉपिंग करायला चतुर्वेदींजींच्या दुकानात होतो, पेमेंट करत असताना , बोलता बोलता चतुर्वेदींनी समोर रस्त्यावरुन जाणार्‍या एका व्यक्तीला ‘ ओ जतीन सेठ’  अशी हाक मारली, हा तोच ‘जतीन’ माझ्या कडे येऊन गेला होता ! हाके सरशी जतीन वळला पण चतुर्वेदीं समवेत मला बघताच लगेच पाठ फिरवून लगबगीने गर्दीत मिसळून गेला !

जतीन ने माझ्याकडे बघून तोंड चुकवले यातच मी काय समजायचे ते समजलो!

पण तरीही एक उत्सुकता म्हणून विचारलेच..

“अरे ये तो xxxx xxxxx वाले जतीन भाई लगते है शायद”

“जी बिल्कुल, क्या आप जानते है इन्हे”

“उनके रिश्तेदार मुकेसभाई मेरे अच्छे दोस्त है. मुकेसभाई बोल रहे थे के जतीन ने कोई मनसुखलाल के साथ बडा बिझनेस शुरु किया है  xxxx xxxxx  नामसे”

“क्या बिझनेस .. कैसा बिझनेस , ये बेचारा जतीन तो पुरा का पुरा डुब गया , वाकाई दिवाला निकला उसका”

“क्यों क्या हुवा”

“क्या होने वाला था? अरे वो बंदा मनसुख, जतीन को २०-२५ लाख का चुना लगाके भाग गया”

….

मी काहीच बोललो नाही…

 

समाप्त

 

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  उत्तम केस स्टडी बद्दल खूप खूप धन्यवाद !

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. मी इतके रक्त आटवून लिहतो ते वाचणारा , समजून घेणारा आणि आवर्जुन अभिप्राय देण्याची तसदी घेणारा आपल्या सारखा निदान एक तरी अभ्यासु वाचक आहे हा मी माझा बहुमान समजतो.

   जो लेख अवघ्या पाच मिनिटांत वाचुन होतो त्यामागे माझी दिवसभराची मेहेनत असते ह्या वरुन लक्षात येईल की एखाद्या अशा खपून लिहलेल्या लेखाला अत्यल्प वाचकावर्ग लाभताना दिसला की किती निराशा होते.

   असो, आपल्या सारखे काही मुठभर का होईना वाचक आहेत तो पर्यंत मी लिहण्याचे थांबवणार नाही.

   पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.

   सुहास गोखले

   +1
 2. pramod bhelose

  Khupach Chaan…..patrikecha sarva bajune abhyas karun khup chaan bhavishya saangitale. evadhe confidence pane saangun sudha tyane vishwas thevla nahi….

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रमोदजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. ‘ दैव देते आणि कर्म नेते ‘ , ‘विनाश काले विपरित बुद्धी ‘ असे जे म्हणले जाते त्यात म्हणुनच तथ्य आहे .

   सुहास गोखले

   +1
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  फारच छान. संपूर्ण चार्ट आणि महत्वाच्या सर्व गोष्टी एकदम खुबीने सांगितल्या आहेत. आम्ही जरी हे भाग १० मिनिटात वाचले तरी ते आम्हाला समजावे म्हणून तुम्ही घेतलेले कष्ट जाणवितात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी ब्लॉग च्या माध्यमातून केस स्ट्डीज लिहतो त्या ज्योतिषाच्या अभ्यासकांना उपयोगी पडाव्यात अशा हेतुने लिहलेल्या असतात त्यामुळे प्रत्येक स्टेप खुलासेवार असते , जे निष्कर्ष काढले आहेत ते नक्की भक्कम लॉजीक वर असतात , उगाच हवेतुन काढलेले काही नसते. प्रश्न समजाऊन घ्यायची, पत्रिका सोडवायची म्हणून एक रीत असते , ती स्टेप बाय स्टेप समजाऊन सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. अर्थात ज्योतिष विद्या अशी एखाद्या साच्यात / पॅटर्न / ठोकताळे / फॉरम्युला मध्ये बसवता येत नसते , आजही मला काही हजारांत पत्रिका सोडवायचा अनुभव असूनही समोर आलेली प्रत्येक पत्रिका मला एक आव्हानच असते.

   पाश्चात्य ज्योतिष शास्त्रा बद्दल आपल्या कडच्या ज्योतिषांत एक तुच्छतेची भावना असते! त्यांना काय येते . आमच्या कडून उचलेगिरी करुन तर त्यांचे शास्त्र बनले आहे इ. वस्तुत: उचले गिरी आपल्या कड्च्या ज्योतिषांनी केली आहे हेच सत्य आहे ! वर्णनात्मक भाग , घटनांचे बारीक सारीक कंगोरे पाश्चात्य ज्योतिष शास्त्राच्या अंगाने विचार केल्यासच चांगले समजतात. पत्रिकेचा आणि जातकाचा मानसशास्त्रीय अंगाने विचार करणे ही तर पाश्चात्यांची खासीयत आपल्या कडे या गोष्टीला तर चक्क फाट्यावर मारले आहे. मी स्वत: दोन्ही पद्धतींचा अभ्यास करतो त्यामुळे या दोन्हीं मध्ये चांगले काय टाकावू काय याचा काहीसा अंदाज आहे. आपल्याकडे पाश्चात्य ज्योतिष्शास्त्राचा अभ्यास कोणी करत नाही त्यामुळे यावर लिखाणही होत नाही , मी ती उणीव भरुन काढायचा अल्पसा प्रयत्न करत असतो. आपल्या सारखे काही जाणकार वाचक जेव्हा अशा विषयावरच्या लिहाणाला पोहोच देतात तेव्हा केलेल्या मेहेनतीचे समाधान वाटते.

   मला लिहावेसे वाटले, लिहले बास्स, हे लिहलेले कितीजण वाचतील कोण जाणे, कोणाला किती उपयोगी वाटेल हे सांगता येणार नाही.

   सुहास गोखले

   सुहास गोखले

   0
 4. ओमकार जामसंडेकर

  एखाद्या पाश्चात्य विद्यापीठात Masters शिक्षणाला जशी केसस्टडी असावी अन संबंधित प्रोफेसरने अत्यंत रंजकतेने व अभ्यासू वृत्तीने त्यातले एक एक मुद्दे, sub points focus करून Analyse-discuss करावे तसा अनुभव असतो, आपले लेख वाचताना. एखाद्या ज्योतिष विद्यार्थ्यासाठी आपला ब्लॉग गंगोत्री ठरू शकतो. 👌💐 जियो.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री ओंकारजी,

   मला शिक्षकी पेशा अनुवंशिकतेने लाभला आहे , माझ्या मुख्य व्यवसाय शिक्षकी पेशा हाच आहे. त्यामुळे माझ्या बोलण्या-चालण्यातूण, लिखाणातून ‘शिक्षक’ डोकावताना दिसतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.

   ज्योतिष विषयावरच्या मराठी लिखाणात ‘केस स्ट्डीज’ हा भाग अभावानेच हाताळला गेला आहे, पुस्तकी पोपट्पंचीच जास्त आहे, हे म्हणजे पाण्यात पोहायचे कसे याचे पुस्तक वाचण्या सारखे आहे . प्रत्यक्षात पाण्यात उडी मारल्या शिवाय , नाका -तोंडात पाणि गेल्या शिवाय पोहायाला येत नाही तसे , पत्रिका हातात घेऊन त्या सोडवल्या शिवाय ज्योतिषज्ञान आत्मसात होणार नाही. या केस स्ट्डीज च्या माध्यमातून मी ‘पत्रिका कशी अभ्यासायची’ याचे सोदाहरण प्रात्यक्षीक देण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे इतकेच.

   आपल्या सारख्या जाणकांचा अभिप्राय येतो तेव्हा घेतलेल्या कष्टाचे सार्थक होते. मी जे लिहले त्याचा इतरांना थोडा जरी लाभ झाला तरी भरुन पावले.

   सुहास गोखले

   0
 5. Vanmala Dongre

  अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन पण शेवटी दैव देते आणि कर्म नेते हे खरे आहे

  0
  1. सुहास गोखले

   सुश्री वनमाला ताई,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद , आपण म्हणता तसेच बर्‍याच वेळा होताना दिसते , एक ज्योतिषी म्हणून मी मार्गदर्शन करु शकतो, दिशा दाखवू शकतो, आगामी धोके दाखवू शकतो पण त्याचा योग्य उपयोग करुन घेणे / न घेणे जातकाच्याच हातात असते , घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण पाणी शेवटी घोड्यालाच प्यायचे असते तिथे आपण काही करु शकत नाही.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.