ए भाय जरा देख के चलो (भाग – २)

 

तीन ची स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी होती, तसे बरे चालले होते. काही महीन्यांपूर्वी जतीन ची मनसुखलाल शी ओळख झाली , हा मनसुखलाल शेअर बाजारात उलाढाली करत होता. त्याने जतीन समोर भागीदारीत एक नवा ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ व्यवसाय करण्याची योजना मांडली. यावर त्या दोघांत बरीच चर्चा झाली होती. या नव्या धंद्यात मोठी गुंतवणूक करावी लागणार होती त्याच बरोबर पूर्ण वेळ काम करावे लागणार होते. जतीनला त्याचा सध्याचा ट्रॅव्हल चा व्यवसाय बंद करावा लागणार होता.

तेव्हा’ मनसुख बरोबर भागीदारीत व्यवसाय चालू करु का?” असा जतीन चा प्रश्न होता.

 

सोबत जतीन साठी केलेला सायन चार्ट आहे:

 

होरारी चार्ट चा तपशील:

दिनांक: ०८ एप्रिल २०१७ , वेळ: २०:२५:१२ , स्थळ: नाशिक (प्रमोद नगर , ऑफ गंगापूर रोड) , अयनांश: ००:००:०० सायन , प्लॅसिडस , मीन नोड्स

 

चला आता आपण आपल्या नेहमीच्या पद्धती नुसार ‘रंगमंचा’ वरच्या ‘लठपुतळ्या’ कोण कोण आहेत त्याची यादी तयार करुयात.

 

 1. प्रश्नकर्ता ‘जतीन’
 2. मनसुख , जतीनचा व्यवसायातला भागीदार
 3. जतीन व मनसुख मधला भागीदारीचा करार
 4. जतीनचा पैसा
 5. मनसुखचा पैसा
 6. भागीदारीतला बिझनेस
 7. व्यवसायातला (भावी) नफा तोटा

आता या ‘कठपुतळ्यां’ चे प्रतिनिधी निश्चित करु.

जतीन:

प्रश्न जतीनने स्वत: विचारला आहे म्हणजे प्रथम भावा (१, लग्न स्थान) वरुन जतीन चा विचार करायचा. लग्न ११ वृश्चिक २३ वर आहे म्हणजे वृश्चिकेचा स्वामी मंगळ जतीन चे प्रतिनिधित्व करणार , लग्नात एकही ग्रह नसल्याने मंगळ एकटाच जतीन चा प्रतिनिधी , अर्थात चंद्र हा प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने चंद्राचाही विचार करणे आवश्यक आहे.

मनसुख:

मनसुख (ज्याच्याशी जतीन भागीदारी करार करणार आहे) तो सप्तम स्थाना (७)  वरुन पाहावयाचा. सप्तम स्थान ११ वृषभ २३ वर आहे म्हणजे वृषभेचा स्वामी शुक्र मनसुख चे प्रतिनिधित्व करणार , सप्तमात जर काही ग्रह असतील तर तेही मनसुख चे प्रतिनिधीत्व करतील , इथे सप्तमात मंगळ आहे , पण तो आधीच जतीन चे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याला आता मनसुख चा प्रतिनिधी मानता येणार नाही.

भागीदारीचा करार:

कोणताही ‘करार’, ‘दस्तऐवज’, ‘संवाद’, ‘चर्चा’, ‘वाटाघाटी’. ‘समजुती चा मसुदा- Memorandum Of Understanding’ आदी बाबी त्रितिय स्थानाच्या (३) अखत्यारीत येतात. त्रितिय स्थान १० मकर ४५ वर आहे म्हणजे मकरेचा स्वामी शनी, भागीदारीच्या करारा चे प्रतिनिधित्व करणार, त्रितिय स्थानात प्लुटो आहे त्यामुळे त्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

जतीन चा पैसा:

द्वितिय (२) स्थानावरुन जतीन चा पैसा तपासायचा, द्वितीय स्थान १० धनु ३६ वर आहे म्हणजे धनेचा स्वामी गुरु, जतीनचा पैसा दाखवणार, द्वितीय स्थानात शनी आहे त्यामुळे त्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

मनसुख चा पैसा:

सप्तमावरुन मनसुख बघणार असल्याने , सप्तमाचे द्वितीय स्थान म्हणजेच अष्टम (८) स्थानावरुन मनसुख चा पैसा तपासायचा, अष्टम स्थान १० मिथुन ३६ वर आहे म्हणजे मिथुनेचा स्वामी बुध, मनसुखचा पैसा दाखवणार, अष्टमात कोणी ग्रह नाही म्हणजे बुध एकटाच मनसुख चा पैसा दाखवेल.

भागीदारीतला व्यवसाय:

जतीन आणि मनसुख दोघे मिळून जो भागीदारीतला व्यवसाय चालू करणार आहेत तो दशम स्थाना (१०) वरुन तपासायचा. दशम स्थान १२ सिंह ११ वर आहे म्हणजे सिंहेचा स्वामी रवी, भागीदारीतला व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करणार. दशमात राहु आहे पण पाश्चात्य होरारीत राहु – केतु या छाया ग्रहांना फारसे महत्व दिले जात नसल्याने इथे या राहुला प्रतिनिधित्व देता येणार नाही. रवी एकटाच भागीदारीतला व्यवसाया बद्दल सांगेल.

व्यवसायातला (भावी) नफा तोटा:

दशमाचे (१०) द्वितीय स्थान म्हणजे लाभ स्थान (११) हे या व्यवसायाचे आर्थिक यश दाखवेल, लाभ स्थान १४ कन्या १० वर आहे म्हणजे कन्येचा स्वामी बुध, व्यवसायाचे आर्थिक यश दाखवेल, चंद्र लाभात असल्याने त्याचाही सह प्रतिनिधी म्हणून विचार करणे आवश्यक आहे.

 

चला, आता आपण हे सगळे घटक एक एक करत तपासूया.

जतीन:

मंगळ एकटाच जतीन चा प्रतिनिधी सप्तमात (७) आहे म्हणजे तो सामनेवाल्याच्या (मनसुख)  कँप मध्येच आहे ! याचा अर्थ जतीन (मंगळ) , मनसुख (सप्तम स्थान) च्या कह्यात गेला आहे, ताब्यात गेला आहे.

होरारी पत्रिकेत मंगळ जेव्हा सप्तमात (७) असतो तेव्हा काही निरिक्षणें आहेत , ही निरिक्षणें वैवाहीक जोडिदारा बद्दल असली तरी ती भागीदारीतल्या व्यवहारासाठी तितकीच चपखल लागू पडतात.

“Marry in haste and repent at leisure! There is an urgency to unite with someone in a committed relationship mainly because passions have been aroused. This may be fine if there are other factors in the relationship that are both stimulating and interesting, once passion has died down. Otherwise lovers may become enemies. This is not the easiest position for committed relationships as harmonious is usually lacking. The client may find it hard to compromise. S/he does not like depending on others yet circumstances may arise where s/he is forced to take a back seat at times. Uncomfortable though it may be, it may teach her/him a sense of balance. “

 

 या मंगळाची डीग्नीटी – डेबिलीटी पाहीली तर याला पुष्टीच मिळते.

 

 

 

 

मंगळ शुक्राच्या (मनसुख) च्या राशीत, चंद्राच्या (व्यवसायातला नफा) एक्सालटेशन आणि ट्रीप्लीसीटी मध्ये ,  जतीनच्या पैशाच्या (गुरु आणि शनी) च्या टर्म आणि फेस मध्ये आणि त्याचवेळी स्वत:च्याच डिट्रीमेंट मध्ये.  व्यवसायातल्या नफ्याच्या आमिषाने हुरळून गेलेला जतीन , मनसुखच्या जाळ्यात सापडल्याने पूर्ण हतबल झाला आहे.

मनसुख:

शुक्र मनसुख चे प्रतिनिधित्व करत आहे. शुक्र पंचमस्थानात वक्री आहे ! जेव्हा एखादा प्रमुख सिग्नीफिकेटर (प्रतिनिधी) वक्री असतो तेव्हा जरुर ‘दाल में कुछ काला होता हैं !’, काहीतरी लपवून जात आहे, कोठे तरी दिशाभूल होते आहे. त्यात हा शुक्र जतीनच्या पंचम (५) स्थानात आहे, पंचम स्थान हे जुगार किंवा तत्सम स्पेक्युलेटीव्ह गुंतवणुकीचे स्थान आहे. जतीन या भागीदारीत बरेच पैसे गुंतवणार आहे , ही एक प्रकाराची जुगारी पद्धतीची गुंतवणूक तर आहेच पण मनसुख च्या प्रतिनिधी शुक्र  जतीन च्या पंचमात आणि मनसुख च्या लाभात (११) असल्याने ही गुंतवणूक जतीन पेक्षा मनसुखलाच जास्त फायदा करुन देणारी ठरेल असा अंदाज करता येतो.  हा शुक्र सध्या वक्री अवस्थेत २७ मीन ५१ वर आहे , शुक्र गतीने अगदी लौकरच २७ धनु ४७ वरील शनीच्या अंशात्मक लाभ योगात येणार आहे, शनी द्वितीय स्थानात असल्याने तो जतीन च्या पैशाचा प्रतिनिधी आहे , म्हणजेच या शुक्रा चा (मनसुख) चा जतीनच्या पैशावर डोळा आहे …जतीनचा पैसा मनसुख कडे जाणार अशी मोठी शक्यता आहे.

शुक्राची डीग्नीटी – डेबिलीटी पाहीली तर याला पुष्टीच मिळते ! शुक्र स्वत:च्या एक्स्लालटेशन मध्ये आहे म्हणजे खूप मजबूत स्थितीत आहे,  शुक्र गुरुच्या (जतीन चा पैसा) रुलरशीप (वर ते  पैशावर डोला लिहलेय ना…) , मात्र हा शुक्र बुधाच्या (मनसुख चा पैसा) डीट्रीमेंट आणि फॉल मध्ये आहे, हे जरासे आश्चर्य कारकच!

जतीनचा पैसा: 

आपण पाहीले आहे की गुरु आणि द्वितीय स्थानातच असल्याने शनी असे दोन ग्रह जतीन च्या पैशाचे प्रतिनिधित्व करतील. मुळात द्वितीय स्थानात शनी म्हणजे आनंदी आनंद म्हणायचा आणि त्यात हा शनी वक्री असल्याने पार वाट लागणार आहे हे दिसतेच आहे. जतीन चा ‘पार्ट ऑफ फॉरच्युन – फॉरच्युना ‘ अष्टम ( ८) स्थानात , हे कमी झाले म्हणून की काय जतीन च्या पैशाचा दुसरा प्रतिनिधी गुरु व्ययात (१२) आणि ‘व्हीया कंब्युस्टा’ मध्ये ! थोडक्यात काय जतीन फार मोठ्या आर्थिक संकटात आहे / जाणार आहे !

होरारी पत्रिकेत शनी जेव्हा द्वितीय स्थानात (२) असतो तेव्हा काही निरिक्षणें आहेत,

“Difficulties may arise in resources and this is a time of hard work in order to acquire sustenance and wealth. It is not possible to rely upon the benevolence of others at this time. Everything depends upon the client’s ability to plan and structure her/his working life in order to keep the wolf from doors – yet every opportunity exists however, to acquire great wealth. Each and every penny will be treasured because nothing comes easily. A serious approach to life and money may suggest misery behavior and this combination of planet and house may teach important lesson about sharing! “

 

डीग्नीटी / डेबीलीटी चा विचार करता हा गुरु , शुक्राच्या (मनसुख) च्या रुलरशीप मध्ये आणि मंगळाच्या (जतीन) डीट्रीमेंट मध्ये , म्हणजे पुरती वाट लागली !)

यातच मंगळ (जतीन) जेव्हा २७ वृषभेत येईल तेव्हा तो वक्री शनीशी नव पंचम करेल, योग नव-पंचम असला तरी शनी वक्री असल्याने या योगाची फळें अशुभच मिळणार.

मनसुख चा पैसा:  

अष्टमेश बुध मनसुखचा पैसा दाखवणार, हा बुध षष्ठम (६)  स्थानात आहे , म्हणजेच मनसुख (सप्तम स्थान) च्या व्ययात आहे.  हे काही चांगले लक्षण नाही. या आधी आपण बघितले आहे की मनसुख चा डोला जतीनच्या पैशावर आहे पण हा असा मिळालेला पैसा मनसुख ला पचेल असे वाटत नाही.

हा बुध पत्रिकेतल्या कोणत्याही ग्रहा बरोबर कसलाही योग करत नाही , पुढे जाऊन हा बुध नेपचुन , प्लुटो अशा ग्रहांशी योग करणार आहे. याचा अर्थ जतीन चा पैसा लुबाडून देखील मनसुख कफल्लकच होणार आहे.

जसा शनी जतीनच्या दुसर्‍या भावात येतो तसाच तो मनसुखच्या अष्टमात येतो , वक्री शनी अष्टमात ही अत्यंत खराब परिस्थिती आहे.

एकंदर पाहता पैशाच्या मोठा झोल होणार आहे असा कल दिसत आहे!

व्यवसाय:

एकटा रवी या व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणार आहे.  हा रवी अगदी लगेचच म्हणजे अवघ्या एक अंशात प्लुटो शी लाभ योग करत आहे. हा प्लुटो त्रितिय स्थानात आहे, हे स्थान करार मदाराचे असल्याने , रवी –प्लुटो लाभ योग हा करार होणार असा कौल देतो आहे.

रवी प्लुटो योग करार होण्याची शक्यता दाखवतो आहे पण खरेच का या दोघांत काही करार होणार आहे?  त्या साठी आपल्याला मंगळ (जतीन) आणि शुक्र (मनसुखर) या दोघांत काही  ग्रह योग होणार आहेत का ते तपासले पाहीजे. जर तसे योग होत असतील तर या दोघांत भागीदारीचा करार होईल असे म्हणता येईल.

मंगळ २१ वृषभ ०४ वर आहे तर शुक्र वक्री अवस्थेत २७ मीन ५१ वर आहे , यांच्यात लाभ योग होण्याची शक्यता आहे पण त्या साठी आपल्याला एफेमेरीज (पंचांग) तपासले पाहीजे.

 

 

 

एफेमेरीज तपासल्या असता असे दिसते की शुक्र वह्री अवस्थेत मागे मागे जाईल , म्हणजे मंगळा पासुन लांब जात राहील पण  २६ मीन ५४ वर पोहोचून शुक्र प्रथम स्तंभी होऊन मग मार्गी होईल , हे होई पर्यंत मंगळ पण पुढे येत २६ वृषभे वर येईल आणि दिनांक १५ एप्रिल २०१७ ला  (स्तंभी) शुक्र २६ मीन ५४ आणि मंगळ २६ वृषभ ५४ असा लाभ योग होणार आहे.

म्हणजे या दोघांत भागीदारीचा करार होणार…

भागीदारीचा करार होणे ही एक सुरवात असते , एक कायदेशीर प्रक्रिया / औपचारीकता , पण पुढे जाऊन हा व्यवसाय सुरु होणार असेल तर जतिन आणि मनसुख च्या प्रतिनिधींचा या रवीशी कोणता तरी ग्रहयोग व्हायला पाहीजे तसा तो आहे का?

हे तपासले पाहीजे…

 

 

क्रमश:

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. ओमकार जामसंडेकर

  बापरे सर, किती deep मध्ये जाऊन अभ्यास करता तुम्ही. एकेकाचे कार्येशत्व असे सुरेख उलगडवून दाखवणे, खरंच माना boss…👌

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.