ए भाय जरा देख के चलो (भाग – १)

 

संध्याकाळी साडे सहा ला येतो म्हणालेला जतीन साडेसात वाजले तरी आला नाही , फोन करुन आज येणार का असे विचारावे तर –  ‘नॉट रिचेबल’ !

शेवटी जतीनभाऊ आज काही येणार नाही अशी समजुत करुन घेतली आणि दुसर्‍या कामाकडे वळलो तोच आठ च्या सुमारास जतीन दारात हजर!!

जतीन च्या जागी दुसरा कोणी असता तर उशीर झाला म्हणुन अ‍ॅपॉईंटमेंट रद्द केली असती पण जतीन पडला मुकेसभाईचा करीबी रिश्तेदार आणि मुकेसभाई माझा खास दोस्त तेव्हा केवळ मुकेसभाई कडे बघून मी या लेट लतीफ जतीन चे स्वागत केले.

जतीन त्याच्या प्रश्ना बद्दल आधीच फोन वर बोललेला होता म्हणजे जतीनचा प्रश्न नेमका काय आहे याची पूर्वकल्पना असल्याने मी माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे जतीनचा कन्सलटेशन चार्ट बनवला नाही.

जतीन खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर जरा इकडचे तिकडचे बोलून मी लगेच जतीनच्या प्रश्नाकडे वळलो.

जतीन ची स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी होती, तसे बरे चालले होते. काही महीन्यांपूर्वी जतीनची मनसुखलालशी ओळख झाली , हा मनसुखलाल शेअर बाजारात उलाढाली करत होता. त्याने जतीन समोर भागीदारीत एक नवा ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ व्यवसाय करण्याची योजना मांडली. यावर त्या दोघांत बरीच चर्चा झाली होती. या नव्या धंद्यात मोठी गुंतवणूक करावी लागणार होती त्याच बरोबर पूर्ण वेळ काम करावे लागणार होते. जतीनला त्याचा सध्याचा ट्रॅव्हल चा व्यवसाय बंद करावा लागणार होता.

तेव्हा’ मनसुख बरोबर भागीदारीत व्यवसाय चालू करु का?” असा जतीन चा प्रश्न होता.

 

अशा पद्धतीचे अनेक प्रश्न मी पूर्वी बघितले असल्याने मला त्यात विषेष असे काही वाटले नाही.

मी कॉम्प्युटर वर जतीन च्या प्रश्ना साठीची ‘प्रश्न कुंडली’ तयार केली. या वेळेला के.पी. पेक्षा , पाश्चात्य होरारी वापरायचे ठरवले.

के.पी. कालनिर्णया च्या बाबतीत अनेक पटीने सरस असली तरी के.पी. मध्ये वर्णनात्मक भाग फार कमी मिळतो.

इथे जतीन ला निर्णय घ्यायचा आहे आणि ‘घटना कधी घडेल’ याच्या बद्दल फार उत्सुकता नाही, घेत असलेला निर्णय बरोबर का चूक याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
अशा कामाला पाश्चात्य होरारी सारखे दुसरे चांगले साधन नाही!

सोबत जतीन साठी केलेला सायन चार्ट आहे:

 

 

होरारी चार्ट चा तपशील:

दिनांक: ०८ एप्रिल २०१७ , वेळ: २०:२५:१२ , स्थळ: नाशिक (प्रमोद नगर , ऑफ गंगापूर रोड) , अयनांश: ००:००:०० सायन , प्लॅसिडस , मीन नोड्स

कॉम्प्युटर चा स्क्रीन वरची पत्रिका पाहताच लक्षात आले , साडेसहाला येणारा जतीन आठ वाजता का आला !

प्रश्नशास्त्र मोठे अजब आहे, अगम्य आहे. जातकाला जर खरी तळमळ असेल आणि प्रश्न ही तितकाच जोखमीचा असेल तर जातक नेमका अशा वेळी प्रश्न विचारतो की त्या क्षणाच्या ग्रहमानात त्या प्रश्नाचे उत्तर असतेच असते, म्हणजे जातक प्रश्ना सोबत त्याचे उत्तर ही घेऊन येत असतो. तज्ञ ज्योतिषाचे काम मग ते उत्तर जातकाला वाचून दाखवायचे इतकेच असते!

जतीन साठी केलेला होरारी चार्ट पाहताच मला पुन्हा एकदा याची खात्री पटली.

जतीन ठरल्याप्रमाणे साडे सहाला आला असता तर त्या वेळेचा चार्ट वेगळा असता आणि त्यातून जतीन च्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसते (मी साधारण सात च्या सुमाराचा एक चार्ट बनवून याची खात्री करुन घेतली आहे!) कारण काहीही असो जतीन चक्क दीड तास उशीर करतो या मागे नियतीचाच संकेत होता याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही.

हजारोंच्या घरात प्रश्न कुंडल्या तपासल्या नंतर माझ्या हे एक लक्षात आले आहे की , जातका ला त्याचे भविष्य कळावे ही साक्षात नियतीची योजना असावी लागते, तशी ती असली की कोणत्या ना कोणत्या मार्गाने जातकाला त्याचे भविष्य काय आहे याचे मार्गदर्शन मिळतेच मिळते आणि नियतीच्या मनत नसेल तर मात्र जातक कितीही प्रयत्न करु दे , अगदी भारीतल्या भारी ज्योतिषा कडे गेला तरी जातकाला सांगीतले गेलेले भविष्य हमखास चुकते.

असो. आपण आता जतीन च्या पत्रिके चा अभ्यास करुयात.

(वेस्टर्न) होरारी कुंडली मांडली की सर्वप्रथम तपासायच्या गोष्टीं ज्याला ‘Considerations before judgment’ म्हणतात,  त्या अशा:

१) अर्ली / लेट असेंडंट
२) चंद्र व्हाईड ऑफ कोर्स
३) लग्न स्थानातला किंवा सप्तमातला शनी
४) ‘व्हिया कंबुस्टा’ मध्ये कोणता ग्रह आहे का ?

तसे जुन्या ग्रंथां मधुन इतर अनेक कन्सीडरेशन्स लिहून ठेवेलेली आहेत पण ती फारशी महत्वाची नाहीत. अर्थात ह्या वर दिलेल्या कन्सीडरेशन्स पैकी काही लागू पडत असतील तरी केवळ त्याचे निमित्त करुन कुंडली बाद करायची किंवा प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून केस बंद करायची नसते. ह्या कन्सीडरेशन्स ने केवळ एक सावधगिरीची सुचना (वार्निंग) दिलेली असते ती लक्षात ठेऊन पुढचे अनॅलायसीस करावे.

अर्ली / लेट असेंडंट: ‘लेट असेंडंट’ डीग्रीज ( साधारणे २७ ते ३०) , ‘अर्ली असेंडंट’ डीग्रीज (साधारण ० ते ०३)

जेव्हा लग्न बिंदु ‘लेट असेंडंट’ असतो तेव्हा काही संकेत असतात ….

“परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे. आणखी एक अर्थ असा निघू शकतो की जातक प्रश्ना बाबतीत फारसा गंभीर नाही , त्याने अगदी कॅज्युअली, सहज, जाताजाता , टाईमपास , चेष्टा ,ज्योतिषाची परिक्षा घेणे अशा एखाद्या उद्देशाने प्रश्न विचारला आहे. याचा ही योग्य (?) तो उपयोग करुन घ्यावा लागतो.”

जेव्हा लग्न बिंदु ‘अर्ली असेंडंट’ असतो तेव्हा काही संकेत असतात ….

“प्रश्न जरा वेळे आधीच विचारला गेला आहे , प्रश्नासंदर्भात अजून बरीच उलथापालथ होणार आहे, कदाचित कहानी में व्टिस्ट पण आनेवाला हय तेव्हा आत्ताच त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे उचित नाही किंवा उत्तर शोधताना ही ‘व्टिस्ट’ वाली बाब लक्षात घेतली पाहीजे. (आणि बर्‍याच वेळा असा व्टिस्ट आहे का आणि असल्यास तो कशा प्रकारे असू शकेल याचा अंदाज पत्रिकेतून मिळतोच मिळतो, शोधा म्हणजे सापडेल!)

प्रश्न जतीनचा आणि खिद्द जतीन नेच समोर बसुन विचारलेला आहे, लग्न बिंदु ११ वृश्चिक २३ अंशावर म्हणजे ‘लेट असेंडंट’ नाही आणि ‘अर्ली असेंडंट’ डीग्रीज पण नाही. एक काळजी मिटली.


चंद्र व्हाईड ऑफ कोर्स:

आता पुढच्या टप्प्यावर चंद्र पहायचा , चंद्र जर ‘व्हाईड ऑफ कोर्स ‘ असेल म्हणजेच चंद्र सध्या ज्या राशीत ज्या अंशावर आहे तिथे पासुन चंद्र ती राशी ओलांडे पर्यंत त्याचे कोणत्याही ग्रहा बरोबर योग होत नाहीत अशी स्थिती.
या स्थितीत दुहेरी परिणाम मिळतात:

“प्रश्ना संदर्भातली परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे असा अर्थ निघू शकतो. किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची मोठी शक्यता असते. चंद्र हा कालमापनासाठी वापरला जात असल्याने चंद्र त्याची सध्याची राशी बदले पर्यंत एक ही ग्रह योग करणार नसेल तर कालनिर्णय कसा करता येईल ?”

दुसरा परिणाम असा असतो:

“चंद्राला राशी बदलल्या खेरीज नवा ग्रहयोग करता येणार नाही म्हणजे प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडेलही (इतर अनुकूल परिस्थिती व ग्रहयोग असतील तर ) पण त्यासाठी प्रश्ना संदर्भात बरेच काही मोठे बद्ल झाल्यावरच ! आणि ते कोणते बदल हे पण पत्रिका सांगू शकते , शोधा म्हणजे सापडेल !!”.

या पत्रिकेत चंद्र कन्येत १८ अंशावर आहे , हा चंद्र कन्या रास ओलांडे पर्यंत काही ग्रह योग निश्चीत करणार आहे. (ते ग्रहयोग कोणते याचा उहापोह आपण पुढे करणारच आहोत) म्हणजे चंद्र निश्चितपणे ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ नाही! चला, ही पण एक काळजी मिटली!

 

लग्न स्थानातला किंवा सप्तमातला शनी:

सप्तमात शनी:

प्राचीन ग्रंथांतुन आणखी एक निरिक्षण नोंदवून ठेवले आहे ते म्हणजे , जर प्रश्नकुंडलीत सप्तमात शनी असला तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. सप्तमात शनी असेल तर ज्योतिषाच्या हातून कळत – नकळत चुक होते आणि केलेले भाकित चुकते!  याबाबत अनेक ग्रंथांचे वाचन करुन मी काही नोट्स तयार केल्या आहेत , त्या आपल्या समोर सादर करतो..

माझे बरेचसे वाचन इंग्रजीत असते आणि स्वाभाविकच नोट्स पण इंग्रजीत तयार केल्या जातात, आता त्याचे सुलभ मराठी भाषांतर करण्या इतपत वेळ नाही म्हणून त्या नोट्स जशा आहेत तश्या म्हणजे इंग्रजीत सादर करतो.

Saturn in 7th House

Querent is signified by the 1st house and the astrologer by the 7th.  If Saturn is in the 7th house, this means that the astrologer is going to have problems—caused perhaps by an error in arithmetic, by a poorly drawn chart, by overlooking some factors that affect the interpretation or, given that none of the relevant factors has been missed, by a faulty assessment of their meaning. The experience of many astrologers definitely goes to show that such mistakes can occur when Saturn occupies the 7h house of a horary chart; so it is not a bad idea to be extra careful if that happens. Nevertheless, it has been found in practice that such a chart still can be used effectively provided every precaution is taken.

Again, some questions have specifically to do with 7th house situations (marriage, teamwork, open enemies, etc.), so we should not reject all charts with Saturn in the 7th as impossible or dangerous to interpret. This would imply that there were no Saturnine marriage partners, enemies, and the like—which is obviously ridiculous.

Traditionalists still lay great emphasis on the “bad” side of Saturn in the 7th but experience teaches that Saturn in this house need not always be so troublesome. Caution is always advisable, but if we double-check the chart, see if we have overlooked such points as summer time, and pay extra attention to detail, that is probably sufficient. Usually we shall discover nothing more than some trifling fault or omission. The latest developments in horary astrology tend to confirm this.

Of course, there are other possibilities: for example, the client pays scant attention to the astrologer, throws the latter’s advice out of the window, or—and fortunately this rarely happens—the advice lands the astrologer in difficulties. Saturn is the planet of constraint, and astrologers who fail to abide by the moral and ethical constraints of the profession can stir up trouble for themselves—for instance, by offering medical advice they are not qualified to give. But astrologers who behave impeccably have nothing to fear in that respect from this position of Saturn.

 

लग्नातला शनी:

लग्नातला शनी तसा विघातकच. असा शनी असता जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येण्याची शक्यता असते गेला बाजार जातकाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

माझे बरेचसे वाचन इंग्रजीत असते आणि स्वाभाविकच नोट्स पण इंग्रजीत तयार केल्या जातात, आता त्याचे सुलभ मराठी भाषांतर करण्या इतपत वेळ नाही म्हणून त्या नोट्स जशा आहेत तश्या म्हणजे इंग्रजीत सादर करतो.

Saturn in 1st House

Saturn in the ascendant, and by his presence infortunates the question, causing the querent to despaire in the obtaining of it. Saturn here is afflicting the chart as a whole.

The outcome seldom  bring any good and often ends badly for the querent, but that doesn’t mean that chart should not have been judged. If Saturn was representing a lost or stolen item; found in the first and retrograde it could be said that the item would be found or returned or that the querent still had it in their possession. Saturn is often found in the ascendant in charts about kidnap and other serious crime, where it can show someone in fear for their life. Also, it can describe worry and old age, so any of these descriptions can be useful in finding radicality rather than denying it.

 

या पत्रिकेत शनी द्वितीय स्थानात आहे म्हणजे लग्न / सप्तम स्थात शनी असल्याची अशुभता नाही! अर्थात द्वितीय स्थानातला शनी काही वेगळ्याच समस्या निर्माण करतो त्या बद्दल आपण नंतर विचार करु!

 

‘व्हिया कंबुस्टा’ मध्ये कोणता ग्रह आहे का ?

व्हीया कंब्युस्टा:

व्हीया = मार्ग / रस्ता , कंब्युस्टा = ज्वलन . राशी चक्रातला १५ तुळ ते १५ वृश्चिक हा तीस अंशाचा पट्टा काहीसा घातक मानला जातो (याला कारण म्हणजे याच पट्ट्यात काही अभद्र , क्रुर स्थिर तारे आहेत) , या तीस अंशाच्या विभागात एखादा ग्रह , खास करुन चंद्र असेल तर काहीसे काळजीचे कारण असते. मानसीक विभ्रम, निर्णय क्षमते वर परिणाम, अडथळे, फसवणूक , विश्वासघात असे काही परिणाम मिळू शकतात. अर्थात फार मोठी आपत्ती अशा अर्थाने हे घ्यायचे नाही. आजच्या आधुनिक होरारी मध्ये ह्या ‘व्हिया कंब्युस्टा’ ला तितकेसे महत्व दिले जात नाही.

चंद्र व्हिया कंब्युस्टा मध्ये असेल तर त्याचा परिणाम जाणवण्या सारखा असतो, त्या तुलनेत इतर ग्रह व्हीया कंब्युस्टा मध्ये असणे कमी परिणामकारक असते , काहीसे अ-दखलपात्र.

जुन्या ग्रथांतुन या व्हीया कंब्युस्टा बद्दल अशुभ लिहले आहे पण तसा अनुभव येतोच असे नाही. त्यातही या विभागात असताना एकट्या चंद्रालाच त्रास होतो , बाकी ग्रहांना काहीही होत नाही असेही लिहले आहे.  आता चंद्र हा नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्त्याचा) प्रतिनिधी असतो, चंद्राचा संबंध मानसिक स्थितीशी असल्याने चंद्र विया कंबुस्टा मध्ये असेल तर जातकाच्या मन:स्थिती वर काहीसा परिणाम होणे स्वाभाविक आहे पण त्याने फार मोठी उथलपुथल होण्याची शक्यता नसते . जातकाच्या निर्णय क्षमते वर काहीसा परिणाम होऊ शकतो याचे भान ठेवले म्हणजे झाले.  या विषय अभ्यासताना मी काही नोट्स तयार केल्या होत्या त्यातला काही भाग आपल्या समोर सादर करतो.

माझे बहुतेक वाचन इंग्रजी मध्ये असते त्यामुळे नोट्स काढणे स्वाभाविक पणे इंग्रजीत होत असते आता या सार्‍यांचे माय मराठीत भाषांतर करणे वेळे अभावी शक्य होणार नाही , तेव्हा इंग्रजीतला हा नैवैद्य च गोड मानून घ्यावा द्येवानु  !

The Via Combusta—The Burning way or Combust Way—is the section of the zodiac between 15° Libra and 15° Scorpio, except for 23° through 24° Libra. In olden days, the Via Combusta was reputed to be the most dangerous part of the twelve signs, owing to many violent fixed stars found there. But the stars are no longer in the same place relative to the signs, so modem astrologers ignore the rule. The exception of 23° Libra through 24° Libra is understandable —these are the degrees (in our present time) containing Spica and Arcturus, thought to be fortunate stars.

Looking at the matter objectively, there is not a single reason for clinging to the Via Combusta, and certainly not for deciding that a chart is incapable of being safely judged because of it. However, it must be mentioned that, guided by personal experience, some Astrologer don’t completely abandon the Via Combusta rule. They found the effect to be similar to that of a Moon/Uranus conjunction, in which events take a sudden, unpredictable turn that is not always relished by the querent. It is also found that there is something compulsive and calamitous involved.

The fact that there is so little agreement on the rule, and that the majority of astrologers are inclined to throw it overboard, should serve as a warning to be very circumspect in its use.

या पत्रिकेत चंद्र कन्येत १८ अंशावर आहे म्हणजेच तो राशी चक्रातला १५ तुळ ते १५ वृश्चिक हा तीस अंशाचा पट्ट्या मध्ये नाही. काळजीचे कारण नाही.

मात्र:

गुरु १८ तुळ ०९ वर असल्याने तो व्हीया कंब्युस्टा मध्ये येतो. ही बाब नोंद करुन घ्यायला हवी.

लग्न बिंदू ११ वृश्चिक २३ अंशावर असल्याने तो व्हीया कंब्युस्टा मध्ये येतो. ही खास परिस्थिती मानावी लागेल. लग्नबिंदू असा बाधित असल्याने काय होते ? भोवतालच्या परिस्थितीचे आकलन होत नाही काहीशी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली असते. इथे जतिन भागीदारीत व्यवसाय सुरु करणेन या सारखा एक महत्वाचा निर्णय घेणार आहे . हा निर्णय घेताना सगळा विचार न करता काहीशी घाई गडबड होत असावी असा त्याचा अर्थ काढता येईल.

चला ,  Considerations before judgment’   तपासून झाल्या आता आपल्या प्रोसीजर प्रमाणे या खेळातले प्रमुख खेळाडू  आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित करु. या खेळात कोण कोण आहेत?

 

क्रमश:

 

शुभं भवतु

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  early -late ascendant, saturn in seventh house यांसारख्या गोष्टी फक्त पाश्चात्य होरारीलाच लागू होतात का ?
  पारंपरिक किंवा कृष्णमूर्ती यांच्या बद्दल सुद्धा असाच अनुभव आहे का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. या लेखातील किंवहुना माझ्या पाश्चात्य होरारी वर आधारीत केस स्ट्डीज मधल्या सर्वच संकल्पना पारंपरीक आणि के/पी. मध्ये वापरता येतील. वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी फार वेगळी नाही, आपला ‘गुर’ ग्रह आणि त्याक6हा ‘गुरु’ ग्रह एकच आहे , आपले ‘लाभ स्थान’ आणि त्यांचे एकच आहे , आपली ‘कन्या’ रास आणि त्यांची एकच आहे. फरक आहे तो ‘अयनांश’ चा आणि ते लोक ज्या पद्दतीने पत्रिकेचा अभ्यास करतात यात. ते लोक ट्रांसीट चा विचार जास्त करतात, दशा पद्धती ऐवजी प्रोग्रेशन्स / डायरेक्शन / रिटर्नस वापरतात, ज्योतिषशास्त्र हे मानसशास्त्रीय अंगाने वापरतात (ते बरोबर आहे!)

   तेव्हा या सर्व् कल्पना बिनधास्त वापरा, एकदा का त्याचा ‘हँग’ आला की बघा किती अभूतपूर्व माहीती बाहेर काढता येते ते! के.पी. फक्त ‘सब लॉर्ड एके सब लॉर्ड ‘ करत बसते , नुसत्या घटनांच्या तारखां काढण्यात धन्यता मानते , हे काहीसे चुकीचे आहे. ज्योतिष म्हणजे ‘घटनांच्या तारखां’ नाही हे लोकांना (ज्योतिषांना) कळेल तो सुदिन समजायचा !

   सुहास गोखले

   +2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.