गेल्या काही लेखांतून मी ‘उपाय-तोडग्यां’बाबत बरेच लिहले आहे.

मुळात उपाय-तोडगे हे ‘वेदने वर घातलेली एक हळूवार फुंकर’ अशा अर्थाने सुचवले जात होते. जातकाला धीर यावा, संकटांशी सामना करण्यासाठी थोडे मानसिक बळ मिळावे एव्हढाच लहान हेतु त्यात होता,  चौपाटीवरचा भेळवाला भैया जसे “बस्स, हो रहां है , आपही का काम चल रहा है। ‘ असे बोलून वाट पाहाणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाला  खूष करुन टाकतो, त्यातलाच हा प्रकार आहे.

 प्रत्यक्षात हे उपाय-तोडगे आपल्या समस्या कधीच दूर करु शकत नाही. तुमच्या समस्या दूर करायची कसलही ताकद त्या उपाय –तोडग्यात आणि ते सुचवणार्‍या ज्योतिषात कदापीही नसते हे ध्यानात घ्या.

मध्यंतरी माझ्याकडे आलेल्या एका जातकाने दुसर्‍या एका जाहीरातबाज ज्योतिषाच्या अनुभव सांगीतला..

माझा जातक ‘त्या’ ज्योतिषाच्या समोर  बसला होता , जातकाची समस्या ‘आर्थिक ‘ होती, हा जाहीरातबाज ज्योतिषी,उपाय- तोडगे स्पेशालिस्ट तर होताच शिवाय ”जर त्याने सांगीतलेले उपाय त्याच्या कडूनच करुन घेतले नाहीत तर ‘समस्या’ आणखी वाढ्तील’ अशी धमकीपण द्यायचा ! जातकाची समस्या काय ? त्याची पत्रिका काय सांगतेय हे काही न बघताच धाडधड उपाय – तोडग्यांचा मारा सुरु झाला. हे ‘धमकी वजा’ बोलणे चालू असतानाच त्या ज्योतिषीबुवांना एक फोन आला,  आत्तापर्यंत ‘मी यंव , मी त्यंव , मी समस्या कशा चुटकी सरशी दूर करतो, याला कसा फायदा झाल , त्याचे कसे भले केले  अशा रसाळ गप्पा मारणार्‍या त्या ज्योतिष्याची क्षणात ‘भिगी बिल्ली” झाली ! अक्षरश: रडवेल्या स्वरात , गयावया करत फोन वर बोलू लागली..

“हो ,साहेब, मी कोठे पळून जातोय का… तुमचा पै न पै फेडणार पण सध्या जरा इतर हि बर्‍याच  अडचणीं चालू आहेत… माणूस आहे तिथे थोडे कमी जास्त होणारच ना … घ्या सांभाळून  लेकराला… थोडीतरी मुदत द्या.. असे उघड्यावर आणू नका … अब्रु जाईल  माझी..“

फोन होताच जातकाने विचारले..

“का हो दुसर्‍याच्या समस्या सोडवायच्या एव्ह्ढ्या गप्पा  मारल्या तुम्ही मग स्वत:च्या समस्यां सोडवण्यासाठी का नाही केला एखादा’जालिम तोडगा’ ? तुम्हाला स्वत:च्याच समस्या सोडवता येत नाहीत तिथे माझ्या समस्या कशा काय सोडवणार हो ?”

ज्योतिषाने गुळमुळीत उत्तर दिले…

“अहो ह्या नशिबाच्या गोष्टी असतात, प्राक्तनात लिहले आहे तेच होणार ना..मी ही माणूसच आहे”

“प्राक्तनात लिहले आहे तेच होणार ना , मग उपाय –तोडग्यांनी नशीब बदलायच्या गोष्टी का करता …तुम्ही मला उपाय-तोडगे का सुचवता… ?”

“विश्वास असेल तर करा उपाय-तोडगे..”

“अहो तुमचा जिथे स्वत:वरच विश्वास नाही , आणि दुसर्‍याला विश्वास ठेवायला शिकवताय “

ज्योतिषी निरुत्तर झाला आणि मग अशा वेळी जे होते तेच झाले … इतका वेळ अगदी कमावलेल्या व्यावसायीकतेने , मधाळ भाषेत बोलणारा तो ज्योतिषी एकदम ‘अरे – तुरे ‘ वर आला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागला !!

उपाय – तोडगे ज्या मर्यादीत अर्थाने सुचवले जात होते त्याच अर्थाने वापरले तर जातकाला काहीसे मानसीक बळ  मिळू शकते .. परत नव्याने प्रयत्न करायची प्रेरणा मिळते … अडचणीचा काळ धीराने सहन करायची  ताकद मिळते , पण पण .. हा काही मूळ समस्येवरचा इलाज नाही… उपाय – तोडग्यांची निर्मिती तुमच्या समस्या सोडवायच्या हेतुने केलीच नव्हती !

पोथी वाचून, खडे वापरुन, माळा घालून , विधी करुन , यंत्र बाळगून कोणालाही , कोणताही लाभ होत नाही. उपाय , तोडगे कधीच काम करत नाहीत , त्याचा झालाच उपयोग तर तो थोडेसे मनोबल वाढण्या कडे होतो जसे “आता मी हा उपाय करतोय ना मग माझे सगळे चांगले होईल” .

पण मनाची ही उभारी मुळात आतूनच यायला हवी , या तात्पुरत्या मलमपट्टीने मुळे वेदनेला थोडाफार आराम मिळतो हे जरी काही प्रमाणात (Placebo effect) खरे असले तरी त्याने मूळ दुखापत कधीच बरी होणार नाही.

ज्योतिषशास्त्र आपले प्रारब्धाचे भोग किती आहेत ते सांगते.  प्रारब्ध भोगण्यासाठीच आपला जन्म असतो. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. विधीलिखीतल्या या गोष्टी टाळता येत नसतात हा वळसा बर्‍याच जणांना कळत नाही आणि कळला तरी पेलवत नाही.  रिमोट कंट्रोलच्या जमान्यात आपल्या पुढ्यातल्या समस्या देखील अशाच रिमोट द्वारे दूर व्हाव्यात अशी भ्रामक अपेक्षा धरली जाते.आणि मग अशा उपाय -तोडग्यांचा शोध घ्यायला सुरवात होते.

लोक शॉर्ट्कट मारायच्या हेतुने उपाय तोडगे विचारतात. तेथेच त्यांची फसवणूक व्हायला सुरवात होते.आयुष्याची लढाई आपल्यला एकट्यालाच लढायची असते त्यातले खाचखळगे समजाऊन घ्यायला ज्योतिषशास्त्राची मदत घ्या, उपाय – तोडगे मागण्या साठी नाही.आयुष्याच्या या लढाईत या असल्या कुबड्यांची मदत घेऊ नका , त्याने आज कदाचित तुमच्या पुढच्या समस्या सुटली असे क्षणीक वाटेल ही पण उद्याचे काय?

उपाय – तोडगे (त्याचा उपयोग असो वा नसो ) माणसाला पांगळे करुन टाकतात. मग अडचणीं वर मात करण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी व्यक्ती शनी मंदिरात रांग लावते, किंवा एखादा ग्रहाचा जप करत बहुमोल वेळ व संधी वाया घालवते.

मी यापूर्वी ही लिहेल आहे आज पुन्हा लिहतो… आपल्याला आयुष्यात भोगाव्या लागणार्‍या सर्व सुख- दु:खा मागे ‘कर्माचा सिद्धांत’ आहे. संततीचा अभाव, जन्मजात असलेले शारीरीक व्यंग, गंभीर स्वरुपाचे मानसीक रोग या सारख्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते .

या जन्मात योग्य ती चांगली कर्में करुन पूर्वजन्मात केलेल्या / पूर्वजांनी केलेल्या वाईट कर्मांची काही प्रमाणात भरपाई करता येते. इथे मी ते खडे , पूजा , यंत्रे याबद्दल बोलत नाही आहे , तसा गैरसमज करुन घेऊ नका. माझा रोख चांगल्या कृत्यांकडे आहे जसे की:

 1. खरे बोलणे.
 2. दुसर्‍याला निरलस पणे मदत करणे.
 3. फळांची अपेक्षा न धरता आपले नेमुन दिलेले काम चोखपणे करणे
 4. सत्पात्री दान करणे.
 5. सतत सकारात्मक (Positive) विचार करणे.
 6. कोणाचेही अशुभ न चिंतणे.
 7. रुग्णसेवा करणे.
 8. माता पित्यांचा – गुरुजनांचा सन्मान ठेवणे.
 9. अनाथ / अपंगां साठी काही चांगले काम करणे.
 10. सचोटीने वागणे.
 11. समोरच्या व्यक्तीचे / परिस्थितीचे कारण नसताना मूल्यमापन न करणे (non judgmental)

मी या अशा चांगल्या सात्वीक कामां बद्दल बोलतोय.

या अशा चांगल्या कामांनी आपण आपल्या पदरात पडू घातलेल्या वाईट फळांच्या बाबतीत:

 1. अशुभ फळे काही प्रमाणात टाळू शकतो.
 2. काहींची तिव्रता कमी करु शकतो.
 3. काही फळें मिळण्याचा कालावधी, आपल्याला अनुकूल असा मागे-पुढे करु शकतो.

म्हणजेच ‘अशुभ’ फळ अटळ असेलही कदाचित पण ते केव्हा आणि कशाप्रकारे भोगायचे याचा विकल्प आपल्याला मिळालेला असतो.ज्योतिषशास्त्रा द्वारे आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन मिळू शकते.

ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते , ग्रहांचा कानोसा घेऊन प्रयत्नांची दिशा ठरवा पण प्रयत्न हे असलेच पाहीजे , ते अधिष्ठान सुटता कामा नये.

जन्मपत्रिकेतले ग्रह आणि गोचरीचे ग्रह आणि प्रोग्रेशन्स ग्रह यांच्या संयोगाने अनेक एनर्जी फिल्ड्स तयार होत असतात. प्रत्येक व्यक्तीची त्या एनर्जी फिल्डस ना प्रतिसाद द्यायची याची स्वत:ची अशी एक खास शैली असते , ती प्रथम जाणुन घेऊन मग त्या सर्व गोचरीचे ग्रह आणि प्रोग्रेशन्स ग्रह यांचा परिणाम त्या व्यक्तीवर कसा आणि किती होऊ शकेल ते ठरवता येते आणि एकदा हे लक्षात आले की  अनुकूल परिस्थितीचा जास्तीत जास्त लाभ कसा उठवता येईल आणि प्रतिकूलतेत कमीतकमी हानी कशी होईल ते बघणे सहज शक्य होते.

पण असे जरी असले तरी जन्मपत्रिकेच्या अभ्यासवरुन या बाबतीत चांगले मार्गदर्शन करणे वाटते तितके सोपे नाही. हे काम पेलायला त्या ज्योतिर्विदाचा अभ्यास , व्यासंगही तितक्याच तोलामोलाचा लागतो. ज्योतिषशास्त्रा च्या अभ्यासा बरोबरच मानसशास्त्र , परामानसशास्त्र या सारख्या विषयांचाही सांगोपांग अभ्यास लागतो. त्याच्या जोडीला इंट्यूईशन ची मदत घ्यावी लागत असल्याने काही आधात्मिक बैठक, गुरुकृपा असणे हे ही आवश्यक असते.  प्रत्यक्षात होते काय, आजकाल कोणीही उठतो आणि स्वत:ला ज्योतिषी म्हणवू लागतो, अभ्यास नाही, व्यासंग नाही, साधना आराधना नाही, गुरुकृपा नाही. त्यामुळे मी जे वर लिहले आहे त्यातले काहीही या असल्या लोकांना सांगता येणार नाही.

.मी स्वत:ला फार भाग्यशाली समजतो की मला अल्पकाळ का होईना कै. श्रीधर शास्त्री मुळ्यां सारखा गुरु लाभला. त्यांनी मला ‘गुरु अमूक भावात..म्हणून ही फळें..” असे ‘कुक बुक ‘ पद्धतीचे ज्योतिष शिकवले नाही.त्यांनी  ज्योतिष म्हणजे नेमके काय ते समजाऊन सांगीतले, या शास्त्राचा योग्य उपयोग कसा करुन घ्यायचा ते शिकवले. मानसशास्त्राचा उपयोग कसा आणि केव्हा करुन घ्यायचा ते सोदाहरण पटवून दिले.

उपाय – तोडगे , कर्म इ बाबतीत आम्ही बरीच चर्चा केली होती. उपाय – तोडगे आपल्या साठी घटना घडवून आणत नाहीत असे माझे जे आग्रही मत आहे ते या चर्चेच्या आधारावरच बनले आहे. शनीचा जप करणे किती भाकड आहे हे त्यांनीच मला बजावून सांगीतले होते.

तेव्हा श्रीधर शास्त्रींनी मला त्यांच्या एका जातकाच्या बाबतीत घडलेला किस्सा सांगीतला होता..

त्याचे असे झाले…

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  खरच आहे सुहास जी आपण जी बरी वाईट कर्मे करतो तीच Action & Reaction या न्यायाने भोगायला येतात . कर्मगती हि गहन आहे , सूक्ष्म आहे या गतीला पकडणे हे स्थूल गणिताने अवघड आहे म्हणून कदाचित जोतिष हे फक्त गणितासारखे Perfect येत नसून त्याच्या जोडीला आंतस्फुर्ती ची आवशकता लागते .

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद स्वप्नील जी, १००% अचूक भविष्य कोणालाच सांगता येणार नाही. ज्योतिषशास्त्र फक्त ‘शक्याशक्यता – Possibilities / Probabilities ‘ सांगू शकते.. नेमके काय घडेल हे त्या वुअक्तीच्या कर्मांवर अवलंबून असते , ज्याचा अंदाज पत्रिकेवरुन करता येत नाही.

   सुहास गोखले

   0
   1. केदार

    केदार
    म्हणजे तज्ञ ज्योतिषीसुध्दा चुकू शकतात?

    0
    1. सुहास गोखले

     श्री. केदारजी,

     चूका सगळेच जण करतात ! ज्योतिषशास्त्र हे ‘पॉसीबीलिटीज / प्रोबॅबीलीटीज ‘ सांगते ,प्रत्येक घटने साठी आपल्यापुढे ३-४ पर्याय असतात ते कोणते हे ज्योतिषी सांगू शकतो पण त्यातले नेमके काय घडेल हा भाग सांगता येत नाही, त्याची बरीच कारणें आहेत , माझे काही जुने लेख वाचलेत तर त्याबद्दल्ची थोडी कल्पना मिळेल.

     ज्योतिषी कितीही चांगला , तज्ञ , अभ्यासु असला तरी भाकिताच्या बाबतीत ७०-७५ % इतपतच बरोबर येऊ शकते. २५% भाग अद्यापही अज्ञात आहे. मुळात एखादी घटना केव्हा घडेल हे सांगणे हा ज्योतिषशास्त्रातला फक्त १०% भाग आहे , दुर्दैवाने भारतात ह्या १०% भागाला नको इतके महत्व दिले गेले आहे आणि त्यामुळेच घोटाळा झाला आहे , आणि तुम्ही विचारला तसा प्रश्न विचारला जातो !

     सुहास गोखले

     सुहास गोखले

     0
 2. Uumesh

  Suhasji
  Bhari……guru milanyasathi pan chagale karama lagate. Aani Konya yekachi Katha takanar aahet ka.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद , उमेशजी,

   हो, ‘कोणा एकाची ..’ चे पुढचे भाग टाकणार आहे ..पण फार तांत्रीक विषय असल्याने बर्‍याच जणांच्या डोक्यावरुन जाईल..

   सुहास गोखले

   0
 3. स्वप्नील

  सुहास जी आपण के. पी . चा जो बाऊ केला आहे त्याबद्दल लेख लिहिणार होतात त्याच्याही प्रतीक्षेत आहोत .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   शू ssss शू , हळू बोला , आजकाल इतके के.पी. वाले ‘नक्षत्र शिरोमणी ‘ झालेत ना की काही बोलायची सोय नाही , माझा ‘दाभोळकर ‘ करुन टाकतील !

   सुहास गोखले

   0
    1. सुहास गोखले

     स्वप्नील जी विनोदाचा भाग सोडला तरी सत्य हेच आहे की के.पी.मुळातच अर्धवट आहे , ज्योतिषशास्त्रातील काल निर्णय आणी प्रश्न शास् या केवळ दओनच अंगाचा त्यता विचार आहे पण ज्योतिषशास्त्रातले महत्वाचे घटक जसे की ‘मानस शास्त्र , अध्यात्म, कर्माचा सिद्धांत , फ्री विल यांचा त्यात विचारच होते नाही. थोडक्यात सांगायचे तर पारंपरिक ज्योतिषशास्त्र हे चौरस (गुजराथी) थाळी आहे तर के.पी. म्हणजे फक्त ‘२ मिनिटात तयार होणारी नि:सत्व मॅगी ‘ आहे . मंगी ने पोट भरते का ? समाधान मिळते का? सर्व रस मिळतात का? पोषण होते का ? आरोग्य चांगले राहते का?

     सुहास गोखले

     0
 4. स्वप्नील

  ….पण सुहास जी दाभोलकर काही गोष्टीत अभ्यास नसताना बोलायचे आपण तर अभ्यासून प्रकटता त्यामुळे कोणी काही करणार नाही ….

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   दाभोलकरांचा अभ्यास होता हे नक्की पण काही गोष्टी विज्ञानाच्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या असतात हे समजून घ्यायला ते कदाचीत कमी पडले असावेत असे त्यांच्या एकंदर आक्रमकतेने वरुन वाटते . ज्योतिषशास्त्रात काहितरी दम आहे केवळ बोलाफुलाला गाठ पडली / अंदाज पंचे दाहोदरसे असे नाही. पण या क्षेत्रात बरेच भणंग लोक आहेत त्यामुळे सगळे शास्त्रच बदनाम झाले आहे हे मात्र खरे..

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    बरोबर सुहास जी आपले म्हणणे एकदम पटले !

    0
 5. माधुरी लेले

  सत्कर्मेे हाच खरा तोडगा…अगदी १००% पटले.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद माधुरीताई.

   पण सत्कर्मे करा असे सांगीतले की ज्योतिषाला पैसे मिळत नाही ना ! काही आजारावर लंघन किंवा विश्रांतीची जरुरी असते पण डॉक्टर ने तसे सांगीतले तर पेशंट डॉक्टर ची अक्कल काढतो.. मग घ्या अ‍ॅन्टीबायोटीक्स ! असेच काहीतरी झालेय आजकाल. लोकांना जालीम नुस्के पाहीजेत , देवाला सुद्धा लाच द्यायला निघालेत !

   या ठिकाणी एक सांगावेसे वाटते , चांगल्या कर्मांची फळे चांगली आणि वाईट कर्मांची फळें वाईट असे जरी असले तरी एक चांगल कर्म आधी केलेल्या वाईट कर्माला नष्ट करु शकत नाही , फळांची वजाबाकी होत नसते , दोन्हींचे हिशेब वेगळे असतात ! आणखी एक “चांगली कर्मे करताना सुद्धा ती फळाची अपेक्षा न ठेवता केली तरच ती उपयोगी पडतील.. भगवान श्रीकृष्णांनी त्याच साठी ‘कर्मण्येंवाधिकारस्ते..’ असे म्हणून ठेवलेय … हे वाक्य मानवी इतिहासातले सर्वोत्तम वाक्य म्हणून गणले जावे इतके ते बहुमोल आहे.

   असो. होळीच्या शुभेच्छा … ब्लॉग वर भांगेची रेशीपी दिली आहे … तशी करुन घरच्यांना द्या… तुम्ही घेऊ नका … घेतलेल्यांची मज्जा बघा !!

   सुहास गोखले

   0
   1. माधुरी लेले

    सर, कर्म केल्याखेरीज जगताच येत नाही..कर्मण्येवाधिकारस्ते..तर फारच अवघड… मागिल जन्मीची कर्म काय माहिती? या जन्मातील बरीचशी तर हातात आहेत.. काही अवघड प्रसंगातून मनोधैर्य व चांगल्या कर्मांमुळेच निभाऊन गेले..असा विश्वास वाटतो.. सगळं अतर्क्य वाटतं परंतु आपण यावर चांगलं लिहीलं आहे या लेखांत. आभार..

    0
    1. सुहास गोखले

     माधुरीताई,

     अभिप्राया बद्दल धन्यवाद.

     आपण श्वास घेतो हे पण कर्मच आहे इतकेच कात आपण करत असलेला ‘विचार ‘ हे देखिल कर्मच आहे. जितके जमेल तितके चांगले वागायचा प्रयत्न करायचा.
     सुहास गोखले

     0
 6. सचिन

  Sir प्रारब्ध भोग कमी करण्यासाठी काही उपाय आहे का म्हणजे स्वामी समर्थ उपासना वैगरे

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सचिनजी,
   मी ब्लॉग च्या माध्यामातून अनेक लेख लिहले आहे ते जरुर वाचा , काही माहीती मिळेल.
   मी स्वत: कोणत्याही बुवा, महाराज, स्वामी, बापू, माँ , देवी , माता यांना मानत नाही त्यामुळे स्वामी समर्थ उपासने बद्दल मी काही भाष्य करणार नाही.
   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.