या लेखमालेतले पहीले लेख इथे वाचा:

उपाय-तोडगे नको – १

उपाय-तोडगे नको – २

उपाय-तोडगे नको – ३

 

केशवरावांची पत्रिका जेव्हा तपासली तेव्हा श्रीधरशास्त्रींना काय दिसले होते ?

“आर्थिक संकट आहे असे वाटते आहे, खोटे आळ /आरोप, फसवणूक , मोठी बदनामी, नाचक्की,  पोलिस केस , अटक अशा बर्‍याच घटनां संभवतात”

आता या केवळ संभावना आहेत , शक्याशक्यता आहेत , कर्माची फळे आहेत म्हणा.  श्रीधरशास्त्रींनी ह्या घटनां केव्हा घडतील याचा अंदाज ही दिला होता:

“इथून पुढे १८ – २० महीन्याच्या आसपास”

हे सगळे सांगताना श्रीधरशास्त्रींनी दोन तंत्राचा वापर केला होता.

स्टॅटीक अ‍ॅनालायसिस:   यालाच ‘नाताल प्रॉमिस’असेही म्हणतात किंवा आपण ‘विधीलिखीत’ म्हणतो ते. या अ‍ॅनॅलायसिस द्वारे जातकाच्या आयुष्यात काय घडू शकते यांचा अंदाज येते , काहीश्या विनोदाने म्हणता येईल की ‘सरड्याची धाव कोणत्या कुंपणा पर्यंत आहे ‘ हे जाणता येते. हे विधीलिखित म्हणजे आपल्या कर्माची कोणती फळे कश्या पद्धतीने मिळतील याचा अंदाज असतो.

ज्यांच्या के.पी. चा अभ्यास आहे त्यांना हे लगेच लक्षात येईल की “ग्रह त्याच्या स्थाना प्रमाणे आणि भावेशत्वा प्रमाणे कोणती फळे द्यायची हे ठरवतो (Source) आणि त्या ग्रहाच्या नक्षत्रास्वामीच्या स्थान व भावेशत्वा प्रमाणे ही फळें कोणत्या मार्गाने मिळतील हे ठरते (Means / Fructification) . म्हणजे समजा एखाद्या ग्रहाच्या स्थिती आणि भावेशत्वा नुसार जातकाला ‘पैसा मिळणार’ हे ठरले तर त्याच ग्रहाच्या नक्षत्रस्वामी च्या स्थिती आणि भावेशत्वा नुसार  हा पैसा कोणत्या मार्गाने म्हणजे लॉटरी लागून, लाचलुचपत, गुप्तधन, जुगार, कोणाच्या मृत्यू पत्रानुसार, कर्ज  उभारुन, मेहनत –मजुरी करुन,  लग्ना हुंडा म्हणून,  विमा किंवा तत्सम नुकसान भरपाई,  पारितोषीक / सन्माननिधी इ. मार्गाने मिळणार आहे याचा अंदाज येतो.

पण या स्टॅटीक अ‍ॅनालायसीस मुळे घटना कोणती व कशी याचा बोध होत असला तरी ही घटना नेमकी केव्हा घडेल (का घडणार ही नाही) याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला ‘डायनॅमीक अ‍ॅनालायसिस’ करावे लागते. हे डायनॅमीक अ‍ॅनालायसिस करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर होत असतो. त्यात ‘ग्रह गोचरी- Transits’  ,’दशा पद्धतिं –विशोत्तरी , योगीनी, त्रिभागी, अष्टोत्तरी  कालचक्र इ’, प्रोग्रेशन्स , डायरेक्शन्स, रिटर्न्स असे अनेक मत प्रवाह आहेत. बर्‍याच वेळा  दोन किंवा तीन पद्धतींचा  एकत्रित विचार करुनच निर्णय करावा लागतो. के.पी.  मध्ये ग्रह गोचरी + विशोत्तरी दशा असे कॉम्बो वापरले जाते.

 

इथे लक्षात घ्या, स्टॅटीक असो वा डायनॅमीक अ‍ॅनालायसिस , आपण ग्रहांचा विचार जरी करत असलो तरी ग्रह घटना घडवून आणत नाहीत, वर मी ग्रहांची फळे असा शब्दप्रयोग केला आहे तो केवळ लिखाणाच्या सोयी साठी ,   प्रत्यक्षात हे ग्रह कोणत्या घटना कशा व केव्हा घडणार याचे केवळ संकेत – Signal / Indicator आहेत,घटना घडवण्यात त्या ग्रहांचा कोणताही हात नसतो. ग्रहांकडे घटना घडवण्याची ताकद नसते . आणि म्हणूनच कोणत्याही ग्रहाचा अगदी शनी चा देखील जप करुन काही होणार नाही,शनीच्या पायाशी लीन होऊन , नाक घासून , तेल –तीळ- उडीद  असल्या वस्तू वाहून काहीही होणार नाही !

मग या घटना कोण ठरवते ?  त्या मागे एखादी अज्ञात शक्ती असावी एव्हढाच तर्क  सध्या करता येईल. ही जी काही अज्ञात शक्ती आहे त्या शक्तीला आपले हे उपाय –तोडगे समजत नाहीत. या उपाय तोडग्यांची लाच ती शक्ती स्विकारत नाही, म्हणूनच ह्या कोणत्याही उपाय – तोडग्यांनी तुमच्या पुढ्यातल्या समस्या दूर होणार नाहीत. कोणाही पंतांनी, बुवांनी, बाबांनी , महाराजांनी, स्वामींनी , कोणीही , कितीही आव आणून सांगीतले तरी त्यावर विश्वास ठेवू नका ही माझी कळकळीची विनंती आहे.

आता आपण पुन्हा विधिलिखीता कडे येऊ. इथे घटनां लिहलेल्या असतात हे तर आपण जाणले पण गंमत अशी आहे की इथे फक्त घटनांचा स्थूल मानाने उल्लेख असतो , त्यातले बरेचसे तपशील लिहलेले नसतात. ’प्रवास होईल’  ही घटना लिहलेली असेल पण प्रवास कशासाठी, प्रवास किती अंतरावरचा,  कोणत्या मार्गाने , प्रवास सुखकर का त्रासदायक असे अनेक तपशील दिलेले नसतात. नेमका इथेच आपल्याला थोडीफार मोकळीक आहे , निर्णय स्वातंत्र  (FreeWill) आहे . मूळ घटना ‘प्रवास ‘ ही अशी आहे ती आपण टाळू शकत नाही पण वर लिहले आहे तसे त्यातले बारीक सारीक तपशील आपण स्वत:च ठरवू  शकतो, तेव्हढे निर्णय स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले असतेच. पण बर्‍याच वेळा होते काय की हे असे स्वातंत्र्य  आहे हे आपल्याला माहितीच नसते त्यामुळे आपण आपल्या बुद्धीने काही बाही निर्णय घेत असतो आणि बर्‍याच वेळा नेमके चुकीचे निर्णय घेऊन बसतो!  “दैव देते आणि कर्म नेते ‘ किंवा ‘ विनाशकाले विपरितबुद्धी’ असे जे आपण म्हणतो हे याच साठी!

मी मघाशी त्या कोणा अज्ञात शक्तीचा उल्लेख केला, ती शक्तीच आपल्या आयुष्यात होणार्‍या घटना ठरवत असते. त्या शक्तीला ‘उपाय- तोडग्या’ची भाषा समजत नाही.त्या शक्तीला समजतात ती तुमची ’चांगली- वाईट कर्मे’.

आपण होणार्‍या घटना टाळू शकत नसलो तरी केवळ ह्या चांगल्या (अथवा वाईट) कर्माच्या बळावरच आपण या घटना  काहीशा कमी त्रास दायक होतील असे बघू शकतो.

केशवरावांनी नेमके हेच केले. पण मुळ घटना ते टाळू शकले का ?  नाही, घटना घडलीच. पण केशवारावांनी मधल्या काळात  काही चांगली कृत्ये केली त्यामुळे त्या घटनेची तिव्रता ते कमी करु शकले , ते कसे:

केशवरावांवर अफरातफरीचा आळ आला. अहवालात नाव लिहले गेले.पण केशवरावांच्या चागल्या कृत्यांमुळे पुढची बदनामी , चर्चा, पोलिस केस, तुरुंगवास इ  कटू / अपमानस्पद बाबीं टळल्या.

जर केशवरावांनी चांगली कामे केली नसती तर काय झाले असते?

चौकशी समितीच्या अहवालातील त्यांचे नाव कायम राहीले असते , बँकेने ताबड्तोब त्यांना चौकशी पूर्ण होई पर्यंत निलंबीत केले असते , पोलिस कंम्प्लेंट झाली असती,  पुढे मागे अटक , कोर्ट कचेरी, शिक्षा असे सर्व झाले असते , मोठी जाहीर बदनामी झाली असती, थोडक्यात केशवराव आयुष्यातून उठले असते. चांगल्या कामामुळे हे सर्व टळले , जीवावर बेतलेले बोटांवर निभावले म्हणतात ना तसे.

पण हे होते असताना , मूळ घटनेचे पडसाद अनेक मार्गाने होत राहीले , कसे:

केशवरावांना सक्तीच्या रजेवर जावे लागले , ही रजा मेडिकल लिव्ह म्हणून धरली गेली त्यामुळे त्याचे नंतर सेवानिवृत्तीच्या वेळी ड्बल रेट ने होणारे ‘इनकॅशमेंट’ होणार नाही, म्हणजेच आर्थिक नुकसान. थोडा काळ का होईना मोठा मन:स्ताप,  संशयाचा फेरा. आणि न केलेल्या अपराधाची अशी बळजबरीने कबूली द्यावी लागल्याची खंत जी पुढे आयुष्यभर लागत राहणार आहे, डोक्यावर कर्ज चढले, रावबहादुर आणि चौकशी समितीचा अधिकारी केशवरावांच्या मदतीला धाऊन आले पण त्यांची मदत घ्यावी लागल्याने आता केशवराव आयुष्यभर या दोघांचे मिंधे झाले. केशवराव अगदी धुतल्या तांदुळा सारखे स्वच्छ चारित्र्याचे होते पण आता  या दोन व्यक्तीं पुढे त्यांची मान कायमची झुकली गेली.

समजा केशवरावांची चांग़ली कामे काहीशी कमी पडली  असती तर काय झाले असते:

चौकशी अधिकार्‍याने केली ती मद्त मिळाली असती पण जोशी वकीलांनी ‘तुमची बाजू निर्दोष आहे , काही काळजी करु नका , मी तुमची केस लढवतो, तुम्हाला सन्मानपूर्वक आरोपमुक्त करवतो’  असा सल्ला दिला असता ,  त्यामुळे चौकशी, पोलिस केस, कोर्च कचेरी हे सर्व प्रकार आणि बदनामीही तेव्हढीच झाली असती.

किंवा असेही झाले असते ,   चौकशी अधिकार्‍याने केली ती मद्त मिळाली असती , जोशी वकीलांनी पण “पैसे भरा, सुटका करुन घ्या’ असा योग्य तो सल्ला दिला असता पण  केशवरावांना त्या अल्प अवधीत पैसे जमा करता आले नसते , कोणी रावबहादूर  त्यांच्या मदतीला धावला नसता आणि दोन व्यक्तींची मदत होऊन सुद्धा , अटक, बदनामी झालीच असती.

सुदैवाने केशवरावांनी योग्य आणि पुरेश्या चांगल्या कर्मांची पुण्याई जमा केली आणि ही अशुभ घटना  ते सौम्य करु शकले.

पण लक्षात ठेवा घटना टाळता येणारच नाहीत पण त्या काहीशा सौम्य करता येतील किंवा त्यांचा मायना बदलता येईल एव्हढेच आपल्या हातात असते. आणि म्हणून त्यासाठीचा –  उपाय- तोडगे नाही चांगले कर्म करा !

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

15 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  बरोबर सुहास जी कोणीतरी म्हंटलेले आठवले Watch only indicate time म्हणजे घड्याळाचे काटे फिरवून आपण वेळ पुढे ढकलू शकत नाही . त्याच प्रमाणे ग्रह हे घटनेचे Indicators असतात . त्यांची शांती करून आपण घटना बदलू शकत नाही .पण मग या रत्नांची सांगड ग्रहांशी पूर्वीच्या ग्रंथात का घातली असेल ? त्यामागे काय Logic असेल ? काहींचे म्हणणे आहे कि ग्रहांची Cosic Rays चा माणसांवर परिणाम होतो . मग दशम स्थानातील ग्रहांचा जसा थेट परिणाम होतो तसा अष्टम किवा शष्ट स्थानातील ग्रहांचा नाही म्हणून त्यांच्या कारकत्वात कमतरता निर्माण होते मग जसे एखादे Vitamin कमी पडले तर रोग होतो तसे त्या ग्रहाची रत्ने वापरली तर थोडा वाईट परिणाम कमी होतो वगरे . असे होत असावे का ?अर्थातच याचे उत्तर नाही असे आहे हे माहित आहे . पण काही पुस्तकात काही अनुभवांसह रत्नाचे परिणाम दिले आहेत . (ह.मो.गांधी यांचे पुस्तक ) मजा म्हणजे सदरील लेखक हे नास्तिक आहेत व त्यांचा पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर विश्वास नाही )

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   मी आधीच लिहले आहे , या रत्नांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यातून काही किरण वगैरे बाहेत पड्ता असले तरी त्याचा प्रभाव आपल्यावर होण्यासाठी तो खडा अत्यंत शुद्ध असावा लागेल १२०० रुपयांच्या खड्य्तात ही पॉवर नाही. लोकांना जो काही परिणाम जाणवतो , अनुभव येतो तो केवळ प्लॅसीबो इफेक्ट मुळेच अन्य कोणत्याही कारणांनी नाही. मुळात ग्रह काही करत नसल्याने एखाद्या ग्रहाचा म्हणून मानला गेलेला खडा मग तो कितीही चांगला असला तरी काय उपयोग.
   मी आधी सांगीतले आहे की पूर्वीच्या काळी हे उपाय सुचवले जात होते ते लोकांना धीर येण्यासाठी , थोडे कालहरण करण्यासाठी , खड्यांमुळे घटना घडणार नाहीत, अशुभ टळणार नाही हे नक्की.

   अभिप्राया बादल धन्यवाद.

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  सुहास जी नीलमणी विषयी तर खूपच बाऊ करून ठेवलाय समाजात . मी वापरून पहिला होता नीलमणी पण मला काहीच अनुभव आला नाही ना Possitive ना Nigetive त्यामुळे आपले म्हणणे पटते .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   खडे वापरुन भविष्य बद्लात नाही, किंबहुना इतर कोणत्याही उपायांनी ते बदलता येणार नाही. चांगली कर्मे केली तर आघात / नुकसान सौम्य होते इतकेच.

   सुहास गोखले

   0
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  केलेले चांगले कर्म व त्याचे मिळणारे फळ यामधील वेळ कशावर अवलंबून असतो ?
  आता मिळालेले फळ हे पूर्व संचित कर्मांचे की या जन्मातील कर्माचे – असा कुठे संबंध लावता येत नाही ?
  त्यामुळे नेहमी चांगलेच कर्म करणे आपल्या फायद्याचे आहे.
  खूप छान झाली ही मालिका.
  उद्या कोणत्या मालिकेचा पुढील भाग का नवीन काही वाचायला मिळणार याची उत्सुकुता आहे.

  धन्यवाद ,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण आपले कर्म करत राहावे फळाची अपेक्षा धरु नये हेच खरे.

   सुहास गोखले

   0
 4. Umesh

  Nehami pramane sundar. Karmala jivanat khup mahatv aahe.
  Nehami chagali karma karat rahile pahije.
  Aani Konya yekachi vat pahat aahe. Kadhi lihat aahet vat pahatoy.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संदीपजी,

   सध्या एका मोठ्या ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये बिझी आहे , पुढच्या आठवड्यापासून नविन लेख लिहणे शक्य होइल.

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नील,

   सायबां, जरा इतर कामात बिझी आसां, ज्योतिषा सांगून पोट नाय भरतेलो , इतर कामां करुक होया मियाक तेच्याच मागे आसा.. हयसर दम खावा द्येवानु , टायम भेटेला की लिवताय , काय समजलीव ?

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.