या लेखमालेतला पहीले भाग इथे वाचा:

उपाय-तोडगे नको –  १

तोडगे- तोडगे नको – २

 

जोशी वकील म्हणाले,

“केशवराव तुम्ही असले काही करणार नाही याची मला पक्की खात्री आहे , तुमच्या चांगुलपणाचा किंवा  भोळसटपणाचा म्हणा गैरफायदा घेऊन तुम्हाला यात निष्कारण गोवण्यात आले आहे.  हा अहवाल मुख्यालया कडे गेला की कारवाई होणारच , पोलिस कंम्प्लेंट झाली तर तुम्हाला अटक होऊ शकते, वृत्तपत्रांतून बातम्या येतील”

“मग यावर मार्ग  काय ?”

“ केशवराव आपल्या पुढे दोन पर्याय आहेत , पहिला जो त्या चौकशी अधिकार्‍याने सांगीतला आहे म्हणजे बँकेत पैसे भरणे आणि दुसरा म्हणजे कोर्टात केस लढवयाची आणि आपले निर्दोषत्व शाबित करायचे ”

“ यातला कोणता मार्ग आपल्याला योग्य वाटतो”

“मी वकिल आहे , कोर्टात केस लढवणे हा माझा पेशा आहे , त्यामुळे  ‘कोर्टात केस लढवयाचा’  मार्ग माझ्या व्यवसायाचा विचार करता योग्य वाटला तरी मी तुम्हाला तो सल्ला देणार नाही, व्यवसाया पेक्षा मला तुमचे हित जास्त महत्वाचे वाटते. मला वाटते तुम्ही बँकेत पैसे भरुन मोकळे व्हावे हे उत्तम”

“म्हणजे याचा अर्थ मी न केलेला अपराध कबूल करुन पैसे भरायचे ? मी पैसे भरले म्हणजे मी मुळात पैसे अपहार केले हे कबूल केल्या सारखेच पण मी काहीच केले नाही  तर हे सारे कबूल का करायचे .. जे काही सत्य आहे ते आज ना उद्या जगा पुढे येईलच ना?  मी काहीच केले नाही , कर नाही त्याला डर कसली”

“ केशवराव मान्य आहे , तुम्ही खरे तेच बोलत आहात,  चौकशीत सगळे सत्य बाहेर येईलच,  तुम्ही निर्दोष असल्याचे शाबित होईलच पण हे सगळे होईतो आपल्याला नोकरीतून निलंबित केले जाईल. ती बदनामी काही टाळता येणार नाहीच, आणि तुम्ही निर्दोष सुटलात तरी लोकापवाद , कुजबुज कायम राहणार ती थांबवणे तुमच्या हातात नाही ..अहो मारणार्‍याचे हात धरता येतील पण बोलणार्‍याचे तोंड कसे धरणार ? हे असला लोकापवाद साक्षात श्री. प्रभु रामचंद्रांना टाळता आला नाही,भगवान श्रीकृष्णांना सुद्धा चोरीचा आळ टाळता आला नाही , तिथे आपल्या सारख्या सामान्यांची काय कथा..”

“ठीक आहे बघतो मी काय करायचे ते”

केशवराव काहीसे हताश ,उद्वीग्न होत घरी परतले,  आपण एक पैचाही अपहार केला नसताना आपल्यावर हे बालंट का आले आणि त्याहुनही न केलेल्या अपराधाची अशी अप्रत्यक्ष कबुली देणेही त्यांना मान्य नव्हते.

रात्रीचे साधारण दहा वाजले असतील , केशवरावांच्या दरवाज्यावर थाप पडली, केशवरावांच्या काळजाचा थरकाप झाला “पोलिस तर नसतील? पण दारावर पोलिस नव्हते ,  तर रावबहाद्दुर मुजुमदार होते ! रावबहादुर गावातले एक बडे प्रस्थ तर होतेच शिवाय एके काळी ते केशवराव  काम करत असलेल्या बँकेचे संचालक राहीले होते , केशवरावांची आणि त्यांची थोडीफार ओळख होती पण फार काही घनिष्ट संबंध नव्हते, त्यामुळे रावबहादुर दारात दिसताच केशवरावांना कमालीचे आश्चर्य वाटले.

“मला सगळे कळलेय केशवराव , जेव्हा हे कळले तेव्हाच मी म्हणालो होतो,  छे, केशवराव असले काही पाप कृत्य करणार नाही”

“रावबहादुर , अहो मी खरेच काहीही केले नाही, एका पै ला देखिल हात लावलेला नाही, मला फसवणूकीतून या प्रकरणात गोवण्यात आले आहे”

“केशवराव मी तुम्हाला चांगले ओळखतो, पण पुरावे असे आहेत की तुमच्या हातात काही राहीलेलेच नाही”

“मी काय करु ?”

“केशवराव,माझे ऐका, पैसे भरुन टाका  ”

“८,००० रक्कम फार मोठी आहे काही तास कशाला काही महिने अवधी मिळाला तरी इतके पैसे जमा करणे मला शक्य होणार नाही”

“मला कल्पना आहे म्हणूनच मी आपल्याला सहाय्य करायला पुढे आलो आहे , दैव दयेने ८,००० माझ्या कडे आहेत आणि इतर कोणताही विचार ना करता मी ते तुम्हाला देऊ शकतो अगदी एका तासाभरात पैसे तुमच्या हातात ठेऊ शकतो..”

“पण का? “

“केशवराव, तुमच्या वडीलांचे आमच्या कुटुंबावर अनेक उपकार आहेत .. त्याला स्मरुन मी हे करतोय. “

”पण मला हे असे पैसे घेणे प्रशस्त वाटत नाही…”

“केशवराव आपण स्वाभीमानी आहत , असे पैसे घेणे तुम्हाला कदापीही रुचणार नाही हे मला माहीती आहे पण वेळ बिकट आहे, नाही म्हणू नका,वाटल्यास हे पैसे कर्ज रुपाने मिळाले आहेत असे समजा , हे पैसे घ्या, उद्या बँकेच्या कोषागारात भरा आणि सुटका करुन घ्या.. माझे पैसे तुम्ही निवांत सवडीने फेडा , व्याज वगैरे काही नको मला, मुद्दल फेडले तरी चालेल, तुम्हाला जमेल तसे , होईल तसे फेडा, मी त्याबद्दल आपल्याला काहीच बोलणार नाही किंवा सावकारी तगादा लावणार.. हा माझा शब्द आहे .. “

”तरी पण..”’

“ केशवराव,, ऐका माझे… नाहक बदनामी होईल तुमची.. आत्ता दगडाखाली हात आहे तो सोडवून घ्या मग ज्यांनी तुम्हाला या घोटाळ्यात गोवले त्यांच्या कडे बघता येतील पण आत्ता गरज आहे ती पैसे भरुन मान मोकळी करुन घ्यायची.. म्हणतात ना ’सर सलामत तो पगडी पचास..”

“मला काय करावे तेच सुचत नाही”

“मी कल्पना करु शकतो केशवराव, वाटल्यास विचार करायला काही वेळ घ्या,  उद्या सकाळी माझ्या कारकुन पैसे घेऊन आपल्या घरी येईल, पैसे ठेऊन घ्या नाहीतर परत पाठवा, हा तुमचा निर्णय असेल… माझ्या परीने जितके करता येईल ते मी केले.. बाकी देवाची ईच्छा , येतो मी”

केशवरावांनी रात्रभर विचार केला.  शेवटी त्यांनी पैसे भरायचे ठरवले . पैसे भरले गेले , चौकशी मूळच्या अहवालात केशवरावांचे नाव संशयीत म्हणून होते ते  काढले गेले. बँकेच्या मुख्यालयाने या अहवालाची दखल घेत कारवाई सुरु केली , केशवरावंना वैद्यकीय कारण दाखवून (सक्तीच्या ) रजेवर जायला सांगीतले.  बाकीचांना मात्र अटक झाली , त्यांची वृत्तपत्रात बातमी येऊन बरीच बदनामी झाली. यथावकाश चौकशी पुर्ण झाली. केशवराव निर्दोष ठरले, दोन महिन्याच्या सक्तीच्या रजे नंतर ते कामावर रुजु झाले.

प्रकरण मिटले.

मग केशवरावांचे वाईट फळ टळले का ? नाही, अजिबात नाही , त्यांना वाईट फळांचा त्रास झाला तो झालाच. वाईट फळे मिळालीच पण जरा वेगळ्या पद्धतीने , कसे ?

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. bhagwat

  बऱ्याच लोकांना असे वाटेल कि केशवराव इतके चांगले वागूनही त्यांना संकटे का आली ? पण गोष्टीतून एक बाब लक्षात येते, ती म्हणजे केशव रावांचे संकट टाळले नाही , पण त्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी त्याचं चांगुलपणा उपयोगी आला . म्हणजे त्यांना अचानकपणे माणसे भेटून ८००० रु. जि मदत झाली तो केवळ योगायोग नव्हता , तर त्यांनी आतापर्यंत केलेय सत्कर्माचे( पुण्याईचे ) फळ होते, म्हून क्षणाक्षणाला पुण्याई वाढवत राहायला हवी .

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद भागवतजी

   आपण बरोबर जाणलेत , हाच संदेश होता ह्या लेखमालेचा , पुढच्या (शेवटच्या) भागात ह्याबद्दल लिहणार आहे
   सुहास गोखले

   0
 2. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar,
  Besides what Mr. Bhagwat was pointed out, the fact that Mr. Keshavaro met your Guruji at the right time and got to know about this crisis early is also a great coincidence.
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री.प्रशांतजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद . आपण म्हणता ते बरोबर आहे , योग्य वेळी योग्य व्यक्ती कडून योग्य तो सल्ला मिळणे हे दे नशीबात असावे लागते आणि त्याहुनही पुढे जाऊन असा मिळालेला चांगला सल्ला स्विकारुन त्याप्रमाणे वागण्याची बुद्धी होणे हे देखिल नशीबात असावे लागते.

   सुहास गोखले

   0
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  या भागासाठीचा फोटो खूप आवडला.
  छान झाली आहे ही मालिका.
  उपाय व तोड्ग्यातील फोलपणा व्यवस्थितपणे दाखवून दिला आहे.

  धन्यवाद,

  अनंत

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.