या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:

उपाय- तोडगे नको – १

गोष्ट १९६४ सालातली आहे,  एका (त्या काळच्या) प्रख्यात सहकारी बँकेत कमा करणारे श्री. केशवराव श्रीधरशास्त्रींना ज्योतिषविषयक मार्गदर्शना साठी भेटले,   केशवरावांची पत्रिका  काळजीपूर्वक अभ्यासल्या नंतर श्रीधरजी म्हणाले …

“केशवराव , सांभाळा , एक मोठे गंडांतर येणार आहे !”

“कसले, केव्हा ?”

“आर्थिक संकट आहे असे वाटते आहे, खोटे आळ /आरोप, फसवणूक , मोठी बदनामी, नाचक्की,  पोलिस केस , अटक अशा बर्‍याच घटनां संभवतात”

“बापरे, पण हे केव्हा ?”

“ट्रान्सीट्स व डायरेक्शन च्या हिशेबाने इथून पुढे १८ – २० महीन्याच्या आसपास”

“यातून सुटका ?”

“नाही… हे भोग आहेत ते भोगूनच संपवायचे आहेत..”

“पण मी माझे काम तर अगदी सचोटीने करत असतो, कुणाच्या अध्यात ना मध्यात मग माझ्या बाबतीत हे असे का आणि कसे ?”

“केशवराव ,   ‘माझ्या वाट्याला हे का’ याचे उत्तर तुम्ही केलेल्या कर्मात आहे आणि ‘कसे’ म्हणाल तर ही घटना हे केवळ निमित्त आहे , तुम्हाला जे भोग भोगायचे त्याचे एक एक साधन ”

“पण मी न केलेल्या कर्माची फळे का भोगावीत?”

“मी काहीच केले नाही हा तुमचा गैरसमज आहे, जे अशुभ फळ तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या संचित कर्मा वर आधारीत आहे,  या जन्मात तुम्ही वाईट कर्मे केली नसतील पण संचित कर्म आपल्या अनेक जन्मां मधल्या बर्‍या – वाईट कर्मांचा हिशेब असतो.”

“शास्त्रीजी एक स्पष्ट विचारतो, हे अशुभ फळ भोगायचे आहे आणि  हे जर टाळता येत नसेल तर आधी कळून तरी काय तरी फायदा?”

“केशवराव , तुमचा प्रश्न बरोबर आहे , हे भोग आहेत , कर्माची फळें आहेत ,  टाळता येणे शक्य नाही पण त्याची पूर्व सुचना असेल तर आपल्याला फळांची तिव्रता कमी करता येते किंवा ती फळे मिळण्याचा कालावधी आपल्याला अनुकूल असा मागे-पुढे करता येऊ शकतो आणि काही अपवादात्मक स्थितीत फळांचे स्वरुप बदलताही येते”

“मी  कोणते उपाय केले म्हणजे हे संकट टळू शकेल”

“केशवराव , कोणतेही उपाय-तोडगे संकट टाळू शकत नाहीत”

“पण मग आत्ताच तुम्ही म्हणालात  की फळांची तिव्रता कमी करता येते …”

“हो , तसे करता येते पण त्यासाठी जे करावे लागते त्याला ‘उपाय- तोडगे ‘ म्हणत नाहीत..”

“मग ते काय ?’

“चांगले कर्म”

“म्हणजे जप करणे, पूजाविधी करणे अशी धार्मिक कामेच ना?”

“नाही, जप, पूजा ही जरी धार्मिक कामे असली तरी त्यांचा इथे उपयोग होणार नाही..”

“मग मी करायचे तरी काय?”

“चांगली कामे ज्यामध्ये येतात: खरे बोलणे, दुसर्‍याला निरलस पणे मदत करणे, फळांची अपेक्षा न धरता आपले नेमुन दिलेले काम चोखपणे करणे, सत्पात्री दान करणे, सतत सकारात्मक (Positive) विचार करणे , कोणाचेही अशुभ न चिंतणे, रुग्णसेवा करणे, माता पित्यांचा – गुरुजनांचा सन्मान ठेवणे, अनाथ / अपंगां साठी काही चांगले काम करणे , सचोटीने वागणे , समोरच्या व्यक्तीचे / परिस्थितीचे कारण नसताना मूल्यमापन न करणे (non judgmental)..इत्यादी”

“हे एक प्रकाराचे उपाय तोडगेच नाही का?”

“नाही, त्यात मोठा फरक आहे. उपाय तोडगे म्हणजे परमेश्वराला लाच देण्या सारखे आहे  . उपाय तोडग्यात देवाण घेवाण असते , फळांची अपेक्षा असते . एक सौदा असतो, ज्यात फक्त स्वत:चाच विचार केलेला असतो. अत्यंत स्वकेंद्रित प्रकार आहे.  त्यातून चांगले कर्म निर्माण होणार नाही पण मी सुचवलेली चांगली कामें जर मनात कोणतीही इच्छा न ठेवता , फळांची अपेक्षा न ठेवता केली तर आणि तरच चांगली कर्में निर्माण होतात. आणि ही चांगली कर्मेच तुम्हाला उपयोगी पडतील.“

केशवरावांनी श्रीधरशास्त्रींचा सल्ला मनापासुन स्विकारला आणि त्यानुसार आपल्या आचार – विचाराची दिशा बदलून चांगल्या कर्मांचे प्रमाण वाढवले . त्याचे फळ त्यांना अर्थातच मिळाले !

श्रीधरशास्त्रींनी सांगीतल्या प्रमाणेच घडले. अगदी १८ – २० महीन्याच्या आसपास, केशवराव ज्या सहकारी बँकेत काम करत होते तिथे भ्रष्टाचाराचे एक प्रकरण उघडकीस आले. केशवरावांनी एक नवा पै चाही भ्रष्टाचार केलेला नसला तरी ते त्यात गोवले गेले. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली.

त्या चौकशी समितीच्या अध्यक्षांनी केशवरावांना बोलावून घेतले:

“केशवराव, संशयितांच्या यादीत तुमचे नाव आहे. खरेतर तुमचे नाव ह्या यादीत कसे आले याचे मलाही आश्चर्य वाटले. आपण असले कृत्य करणार नाही याची मला खात्री आहे, आपल्याला यात निष्कारण गोवले गेले आहे असे माझे वैयक्तीक मत आहे”

“अहो पण मी काहीच केलेले नाही, सगळे कुभांड रचले आहे माझ्या विरुद्ध ..”

“केशवराव, प्रत्यक्षात कागदोपत्री पुरावाच ग्राह्य धरला जातो… तुम्हाला यात अडकवायचे ह्याच हेतुने अत्यंत सफाईनी कागदपत्रे रंगवण्यात आली आहेत , पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. माझा ही नाईलाज आहे , आपल्या बाबतीत असे घडायला नको होते .. ”

“मग आता काय ?”

“मी काहीही करु शकत नाही ..नियमाप्रमाणे मला हा अहवाल मुख्यालयाला पाठवायला लागणार आणि ह्या अहवाला नंतर जी काही कारवाई होणार ती टाळणेही माझ्या हातात नाही, पण मी एक करु शकतो तुमच्या साठी ”

“काय ?”

“हा अहवाल आज पाठवायच्या ऐवजी उद्या दुपारी पाठवू शकतो”

“त्याने काय फरक पडणार आहे ?”

“तुमच्याकडे आजची संध्याकाळ व उद्याची सकाळ आहे त्याचा लाभ उठवता आला तर पहा..”

“म्हणजे नेमके काय करु मी”

“खोटा असेल पण घोटाळ्यातला तुमच्या दाखवलेल्या सहभागाचा विचार करता , हिशेबाने रुपये ८,००० ,  (सुहास: हे १९६६ सालचे ८,००० आहेत म्हणजे आजच्या काळातले ५,००,००० !) , उद्या सकाळी बँकेच्या तिजोरीत भरले तर आपले नाव यादीतून काढता येईल. अर्थात यादीतले नाव गेले तरी बँक काही कारवाई करणारच पण मोठी बदनामी, अटक, तुरुंगवास असे होणार नाही ”

“पण मी काहीही केलेल नसताना पैसे का म्हणून भरायचे आणि  मी पैसे भरणे म्हणजे एक प्रकारे न केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्या सारखेच नाही का?”

“केशवराव , यावर मी काही बोलू शकत नाही, आता तुम्हीच विचार करा आणि काय ते ठरवा”

”पैसे भरायचे म्हणले तरी इतक्या कमी कालावधीत मी हे इतके पैसे मी कसे काय जमवू शकेन ?”

“ते तुमचे तुम्ही बघा. उद्या सकाळ पर्यंत पैसे भरलेत तरच आपले नाव त्या अहवालातून कमी होईल आणि पुढे होणारी कारवाई टळू शकेल. मला आपल्या बद्दल काही वाटले म्हणून होईल ती मदत करतोय पण यापेक्षा जास्त मला काही करता येणार नाही, माझे  हात बांधलेले  आहेत. “

केशवरावांना काय करावे ते सुचेना , एकीकडे ह्या भ्रष्टाचाराशी कोणताच संबंध नसताना त्यांना निष्कारण गोवले गेल्याचा संताप, तर दुसरी कडे चलाखीने निर्माण केलेल्या खोट्या कागदपत्रांमुळे मान अडकली गेल्याचे वैफल्य. पैसे भरुन मोकळे व्हायचे त्यांच्या स्वाभिमानाला पटत नव्हते . आपण काहीही केलेले नसताना पैसे भरायचे म्हणजे सरळसरळ  गुन्हा केला हे कबूल केल्या सारखेच .. असे का करायचे .. आपण निष्कलंक आहोत ,  आपली बाजू  सत्याची आहे,  देव आपल्या पाठीशी आहे.  वेळ पडली तर सुप्रिम कोर्टा पर्यंत केस लढवू पण खोटा आळ लावून घेणार नाही …

त्या तिरमिरीत  ते ऑफीस मधून बाहेर पडले ते सरळ जोशी वकिलांच्या ऑफिस मध्ये पोहोचले. अ‍ॅडव्होकेट जोशी त्यांचे चांग़ले मित्र होते, त्यांनी  केशवरावांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले , थोडा विचार करुन ते म्हणाले…

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  नेहमी प्रमाणे उत्सुकता …!! खरच भोग हे भोगावेच लागतात .आपलेच ओठ आणि आपलेच दात ! काय करणार !! फक्त आपला दृष्टीकोन / वर सांगितलेल्या बाबी आणि अध्यात्मिक बैठक तो भोग सहन करण्यास ताकद देऊ शकते किवा तीव्रता कमी करू शकते ! म्हणूनच संतानी जोतिष वगरे बघण्यावर विशेष भर न देता नामस्मरण किवा इतर अध्यात्मिक साधना करून या जन्म मरणाच्या चक्रातूनच मुक्त होण्याचा सल्ला दिला .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   आपल्या थोर संत-महात्म्यांनी बरोबरच सांगीतले आहे , ज्योतिषाच्या आहारी जाऊच नये पण अधून मधून ग्रहांचा कानोसा घेऊन आयुष्याचे प्लॅनिंग करायला काहीच हरकत नाही.

   सुहास गोखले

   0
  2. bhagwat

   स्वप्नीलजी ,
   एक परोपकार ईश्वराच्या एक हजार नामापेक्षा श्रेष्ठ आहे ,म्हणून नामस्मरणापेक्षा परोपकार करावे म्हणजे भोगाची तीव्रता कमी करू शकते ,

   0
   1. सुहास गोखले

    श्री. भागावतजी ,

    बरोबर आहे , नामस्मरणाचे लाभ मान्य करुन देखिल असे म्हणावेसे वाटते की ‘नामस्मरण’ हे स्वकेंद्रित आहे Selfish, आपल्या पुरते बघण्या सारखे आहे , दुसर्‍यासाठी काही नाही, परोपकार (कदाचित हा शब्द चुकीचा ठरेल , द्य्सर्‍याला मदत हा शव्द जास्त बरोबर आहे) दुसर्‍याचा विचार होतो, ‘मी’ पण कमी व्हायचे असेल तर दुसर्‍याला नि:स्वार्थी भावनेने मदत करण्या सारखे चांगले साधन दुसरे नाही.

    सुहास गोखले

    0
 2. bhagwat

  सुहासजी ,तुम्ही चांगले कर्म करा म्हणून सांगितले त्याचविषयी मला हि काही सांगावेसे वाटते.
  खरेतर माणसाची योनी हि कर्मयोनी आहे. येथे कर्म करून प्रारब्ध शुद्ध करायचे असते. दान, परोपकार ,ईश्वरभक्ती करून माणूस आपल्या प्रारब्धातील वाईट भाग टाळू शकतो .पण आजकाल दान(अंध, अपंग, वृद्ध या लोकांना ) फार कमी करतात. परोपकार तर फार कमी करतात .खरेतर एक परोपकार ईश्वराच्या एक हजार नामापेक्षा श्रेष्ठ आहे ज्यावेळेस महिर्शी व्यासांनी अठरा पुराणे लिहिली व नारदाला वाचायला दिली त्यावेळेस नारद म्हणाले, ”व्यास मुनीजी मला येवेढे अठरा पुराणे वाचायला वेळ नाही, तुम्ही मला या सर्व पुराणातील सार सांगावे” त्यावर व्यास म्हणाले ” अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् | परोपकाराय पुण्याय पापाय परपीड़नम ||” तुलसी दास जी कहते हैं कि “परहित सरिस धर्म नहि भाई | परपीड़ा सम नहि अधमाई ||” दूसरे की भलाई से बड़ा कोई पुण्य नही और दूसरे की बुराई से …बडा पाप नाही, म्हणून परोपकार करा.. परंतु लोक फक्त तेवढी ईश्वरभक्ती करतात. जोपर्यंत दान व परोपकार करत नाही तोपर्यंत प्रारब्ध्शुधी होत नाही .फक्त ईश्वरभक्ती करून काही होत नाही.मग लोक म्हणतात ” आम्ही देवाचे एवढे करतो तरी पण आम्हाला त्रास का होतो “( स्वामी दत्तावधूत यांच्या पुस्तकातून )

  +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.