आपल्याला एव्हाना माहिती झाले असेल की आपण काहीही खाल्ले की त्याचे ग्लुकोज (साखर) मध्ये रुपांतर होते आणि हे ग्लुकोज रक्तवाहीन्यां मार्फत शरीरातल्या सर्व पेशीं पर्यंत पोहोचवले जाते. हे ‘ग्लुकोज’ आपल्या सर्व पेशी इंधन म्हणून वापरतात त्यामुळे पेशींना सतत ह्या ग्लुकोज चा पुरवठा होणे आवश्यक असते.

पण इथे एक मेख मारून ठेवली गेली आहे आणि ती म्हणजे रक्तातले हे ‘ग्लुकोज’ आपल्या पेशींना सहजासहजी मिळत नाही, प्रत्येक पेशीच्या बाह्य आवरणा वर एक ‘ग्लुकोज लॉक’ (कुलूप) असते ते खोलल्या शिवाय रक्तातले ग्लुकोज पेशींना घेता येत नाही. निसर्गाने हे असे का केले आहे याला ही काही कारणें आहेत पण त्याचा आपण नंतर विचार करू !

आता जर पेशींना हे रक्तातले ग्लुकोज मिळायचे असेल तर हे ग्लुकोज लॉक’ (कुलूप) कोणीतरी खोलले पाहीजे ! निसर्गाने त्याचीही सोय करून ठेवली आहेच . हा ताला खोलायचे काम ‘इन्शुलीन’ नामक एक संप्रेरक करतो. हे इन्शुलीन तयार करण्याचे काम आपल्या शरीरातल्या ‘पॅनक्रियाज’ नामक लहानश्या ग्रंथी कडे असते. आपण जेव्हा खाण्याचा पहीला घास घेतो तेव्हा तोंडातल्या ‘लाळे’ मार्फत आपल्या मेंदू ला संदेश जातो आणि मेंदूला हे कळते की ‘खाणे’ सुरु केले आहे , थोड्याच वेळात त्याची साखर (ग्लुकोज) तयार होणार आहे आणि हे ग्लुकोज पेशींना देण्यासाठी ‘इन्शुलीन’ नामक किल्लीची जरूरी पडणार आहे ! मग मेंदू ‘पॅनक्रियाज’ कडे ‘इन्शुलीन’ ची ऑर्डर नोंदवतो. या ऑर्डर नुसार ‘पॅनक्रियाज’ इन्शुलीन तैयार करतात आणि हे नव्याने तयार झालेले इन्शुलीन रक्तात मिसळले जाते , म्हणजे रक्तात साखर येते तेव्हा त्याच्या निपटारा करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे इन्शुलीन त्या सोबत असतेच.

या इन्शुलीन च्या साह्याने पेशींच्या बाह्य आवरणावरचे कुलूप खोलले जाते आणि रक्तात दाखल झालेली ही नवी साखर ( ग्लुकोज) पेशींना मिळते , पेशींना इंधन मिळते आणि त्या आता नव्या जोमाने काम करू लागतात. साखर अशी वाटली गेल्याने , काही खाल्या नंतर वाढलेली साखर पुन्हा एकदा नॉर्मल पातळी वर येते आणि सारे सामसुम होते !


ज्याला मधुमेह नाही त्या व्यक्तीच्या बाबतीत हे असे बिन तक्रार , बिन बोभाट होतेच असते पण जेव्हा मधुमेह होतो तेव्हा मात्र वांधे होतात , हे वांधे दोन प्रकाराने होतात :

१) पहिल्या प्रकारात , रक्तात साखर दाखल होते , त्याच बरोबर ‘पॅनक्रियाज’ ने तैयार केलेले ‘इन्शुलीन’ पण दाखल होते पण आपल्या पेशीं मध्ये या ‘इन्शुलीन’ बद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झालेला असतो , याला ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ म्हणतात त्यामुळे पुरेसे ‘इन्शुलीन’ असतानाही पेशींच्या बाह्य आवरणावरचे कुलूप खोलले जात नाही ! अर्थात ताला खुलत नसल्याने रक्तात पुरेशी साखर असूनही ती पेशींना मिळतच नाही !

हा ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ हेच खरे मधुमेहाचे मूळ कारण आहे ! आणि मधुमेहावर नियंत्रण मिळावायचे असेल तर प्रथम हा ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ कमी केला पाहीजे ! एकदा का हा ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ कमी झाला की तुमची रक्तातली साखर अगदी छान , हेल्दी पातळीवर राहील यात शंकाच नाही , नब्बे (90) वाला बाबा हेच तर करत आहे !!

२) दुसर्‍या प्रकारात , रक्तात साखर दाखल होते , पण त्या साखरेचा निपटारा करण्यासाठी आवश्यक असलेले इन्शुलीन मात्र पुरेश्या प्रमाणात तैयार होत नाही, म्हणजे ‘पॅनक्रियाज’ ची इन्शुलीन तैयार करण्याची क्षमता खूप कमी झालेली असते. याचा परिणाम म्हणून रक्तात साखर आहे पण पुरेसे इन्शुलीन नसल्या मुळे फक्त काही पेशींची कुलपे खोलली जातात बाकीच्यांची कुलपे उघडतच नाहीत ! अर्थात सगळे ताले खुलत नसल्याने रक्तात पुरेशी साखर असूनही काही पेशींना साखर मिळतच नाही !

शेजारच्या चित्रात पहा :

ज्याला मधुमेह नाही त्याच्या शरीरात पुरेसे इन्शुलीन तयार होते आणि पेशी पण ते आनंदाने स्विकारतात आणि रक्तातल्या वाढलेल्या साखरेचा बिनबोभाट निचरा होतो.

टाईप – १ प्रकाराच्या मधुमेहात मुळात इन्शुलीन तयारच होत नसल्याने जीवावर बेतते ! या रोग्यांना सक्तीने बाहेरुन ( इंजेक्शन वाटे) इन्शुलीन घ्यावेच लागते , त्याला पर्यायच नसतो. ( तसे केले नाही तर हा रोगी दगावतो) , टाईप – १ वाल्यांना इन्शुलीनचे इंजेक्शन हाच एकमेव उपचार आहे , दुसरे काहीही करता येत नाही.

टाईप – २ प्रकाराच्या मधुमेहात इन्शुलीन तयार होते (किंबहुना जरुरी पेक्षा जास्तच तैयार होते !) पण काही कारणां मुळे शरीरातल्या पेशीं मध्ये ह्या इन्शुलीन साठी विरोध (तिरस्कार) निर्माण होतो, रक्तात इन्शुलीन असून देखील ते वापरता येत नाही. साखरेचा निपटारा कमी होतो, रक्तात साखर साठत राहतो. या रोग्यांना तोंडाने घ्यावयाची औषधे आणि आजार फार वाढल्या नंतर बाहेरुन ( इंजेक्शन वाटे) इन्शुलीन द्यावे लागते. इन्शुलीन अवरोध (Insulin Resistance) कमी करता येतो आणि तसा तो कमी झाल्यास मधुमेहावर उत्तम नियंत्रण मिळवता येते . रक्तातली साखर अगदी हेल्दी व्यक्ती सारखी ठेवता येते. ‘बाबा’ ची आहे !!

  

‘इन्शुलीन रेझीस्टंस’ का निर्माण होतो, कसा निर्माण होतो ही मोठी जटील थिअरी आहे, बाबा त्याबद्दल एक सविस्तर (बोअर !) प्रवचन झोडेल. पण आत्ता एकच सांगतो ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ कमी करणे शक्य आहे आणि हाच तुमच्या मधुमेहा वरचा ईलाज आहे .

तुम्ही मधुमेहाची म्हणून जी काही औषधे / इंजेक्शनें घेत आहात त्यांनी ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ कमी होणार नाही , उलट ह्या उपयांनी ‘इन्शुलीन रेझीस्टंस ’ वाढतो आणि मधुमेहावर्चे नियंत्रण दिवसेंदिवस अधीक कठीण होत जाते ! डॉक्टर लोक्स ऐकताय ना?

‘पॅनक्रियाज’ ची इन्शुलीन तैयार करण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे अशा मधुमेह्यांच्या बाबतीत मात्र उपचार कठीण असतात, यांना बहुतेक वेळा बाहेरून (इन्जेक्शन द्वारे) इन्शुलीन घ्यावे लागते, यांतल्या काही लोकांच्या बाबतीत ‘पॅनक्रियाज’ ची इन्शुलीन तैयार करण्याची क्षमता हल्लू हल्लू वाढवता येऊ शकते !

अर्थात इन्शुलीन रेझीस्टंस ’ कमी करणे किंवा ‘पॅनक्रियाज’ ची इन्शुलीन तैयार करण्याची क्षमता वाढवणे हे मोठे कष्टाचे , चिकाटीचे काम आहे , हा काही एका रात्रीत , तीन दिवसात घडणारा चमत्कार नाही , की ‘अमुक तमूक जडी बुट्टी ‘ खाऊन हे होत नाही, कारले / मेथी / जांभळाच्या बिया / गुडमार असले काही खाऊन होत नाही की प्राणायाम / मंडुकासनाने होत नाही (तो एक डोला बारीक दाढीवाला बाबा काहीही सांगत असला तरी ऐकू नका !)

या साठी प्रचंड मेहेनत घ्यावी लागते, ती कोणती / कशी या साठी ‘नब्बे (90) वाले बाबाची प्रवचने ऐकली पाहीजेत’, खरे ना?

शुभंं भवतुु  

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. SANDIP

  बऱ्याच लोकांची दुकान बंद करणार तुम्ही. असो एक शंका ही जी काही आकडेवारी म्हणजे बिपीचे आकडे, शुगर चे आकडे ह्याची सत्यता कितपत असते. कारण आत्ता पर्यंत पेशंटचे वय+ 100 बीपीचा आकडा अोके. आत्ता एकदम 120/80 च पाहीजे. कठीण आहे. असो लेख माला कष्टपूर्वक आहे. धन्यवाद.

  0
  1. सुहास गोखले

   श्री संदीपजी ,

   धन्यवाद , बीपी च्या आकड्यां बद्दल मला फारसे सांगता येणार नाही पण शुगर चे आकडे नक्कीच विश्वासार्ह्य आहेत , नॉर्मल शुगर म्हणजे किती असावी हे आजवर काही करोड लोकांच्या शुगरच्या रिडिंग्ज चा अभ्यास करून ठरलेले आहे , जास्त शुगर म्हणजे किती हा काहीसा वादाचा मुद्दा आहे पण साधारण पणे फास्तींग शुगर 100 च्या आत असावी आणि जेवणा नंतर दोन तासांची शुगर 125 ते 140 च्या आत असावी असे मानले जाते ते बरोबर वाटते . अर्थात पेशंट्चे वय , स्त्री – पुरुष , जेनेटीक्स , इतर आजार , घेत असलेली औषधे , व्यसनें या सार्‍यांचा परीणाम विचारात घ्यावा लागतोच

   सुहास गोखले

   0
 2. Prashant

  Dear Suhasji,
  I did not get a chance to check your blog over the last 3 days. And today I was thrilled to see 3 new articles. Diagrammatic explanation makes it very easy to understand and your article is short and concise to read for people who may have a small attention span. Also thanks for stating the facts very candidly that yoga pranayam and bitter gourd etc. may not work on insulin resistance. There is a lot of misconception related to diabetes. My mother came across a lady who believes that jaggery does not cause any problems but only white sugar does. My mother could not convince her that jaggery and sugar are one and the same when it comes to diabetes and are equally harmful. Besides this, lot of self styled vaidyas and yoga gurus are compounding the misconceptions in people’s mind.

  I don’t know what are the measures taken by the health ministry of both state and central governments to control diabetes. Does diabetes come under the scope of preventive and social medicine at all? Anyways I hope more and more people read your articles and take control of their health.

  Thanks,
  Prashant

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.