लोकप्रिय लेख

///////////////

नविन लेख

///////////////

मित्र हो, सर्वप्रथम आपणां सर्वांना नविन वर्षाच्या अनेक शुभकामना! हे नूतन वर्ष आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सुख शांतीचे व भरभराटीचे जावो. सध्या सार्‍या विश्वात घोंगावणारे ‘करोना व्हायरस’ चे जागतीक अरिष्ट दूर व्हावे आणि सकल मनुष्य जमातीची या अजगरी विळख्यातून सुखरूप मुक्तता व्हावी अशी प्रार्थना करतो. आपल्या शुभेच्छा देतानाच, आजच्या या शुभ मुहुर्तावर माझ्या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ पद्धतीच्या ज्योतिष अभ्यासक्रमाची घोषणा करताना मला कमालीचा आनंद होत आहे. आज पासून या ‘ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग)’ ची नाव नोंदणी चालू करत आहे. आत्ता कोणतेही पैसे भरण्याची आवश्यकता नाही, या अभ्यासवर्गाची पहीली दोन लेक्चर्स पूर्णत: मोफत आहेत, ही दोन्ही लेक्चर्स पहा, ‘ऑन लाईन…

या लेखमालेच्या पहील्या भागात मी जे लिहले होते ते पुन्हा एकदा लिहतो: “जे काही शिकला आहात ते प्रत्यक्ष पत्रिकेवर चालवूनच पाहीले पाहिजे त्या शिवाय दुसरा कोणात उपायच नाही. म्हणजेच एक नाही दोन नाही शंभर नाही तर चक्क हजाराच्या घरात पत्रिका सोडवल्या पाहीजेत, ताळा – पडताळा घेत राहीले पाहिजे तेव्हा कोठे या शास्त्राची जराशी (जराशी या शब्दाला अंडरलाईन करून घ्या!) ओळख होऊ शकेल.” पण हे सुरु करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यास पूर्ण करावा लागतो. या प्राथमीक अभ्यासात ग्रह, तारे, राशी, भाव आणि ग्रहयोग, कालनिर्णयाच्या बाबतीत ‘विशोत्त्तरी दशा’ इतका तरी भाग माहितीचा असणे आवश्यक आहे. आता या टप्प्यावर उगाचच नवमांशादी वर्ग कुंडल्या, अष्टकवर्ग…

ज्योतिषविद्या अत्यंत कष्टसाध्य आहे, केवळ एखादा तीन- सहा महिन्याचा क्लास करुन किंवा फुकट ज्योतिष शिकवणारा एखादा व्हिडिओ कोर्स करुन किंवा भाराभर पुस्तके वाचून, नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र अवगत होत नाही. अक्षरश: अनेक वर्षांची (अनेक वर्षांची’ याला अंडरलाईन करून घ्या !) ढोर मेहेनत त्या मागे असावी लागते. इतके करूनही ही विद्या सगळ्यांनाच अवगत होईल असे ही नाही! जसे चित्रकला, गायन वादन नृत्यादी कला, लेखन, अभिनय हे सारे गुण मूळात अंगातच असावे लागतात, रक्तात, जीन्स – क्रोमोसोम्स पातळीवरच असावे लागतात तसेच या शास्त्रात पारंगत होण्यासाठी काही विषीष्ट गुण मूळातच अंगात असतील तर आणि तरच तरच ह्या सार्‍या मेहेनतीचा, प्रशिक्षणाचा योग्य तो लाभ…

१९८८/८९ सालची गोष्ट आहे , त्या वेळी मी पुण्यात इमानेइतबारे नोकरी करत होतो, तेव्हा आम्हाला गुरूवारी साप्ताहिक सुट्टी असायची (इंडस्ट्रियल हॉली डे), असाच एक आळसावलेला गुरुवार, खरे तर त्या गुरुवारी मी माझ्या मित्रां समवेत ‘बसणार’ होतो! आठवडा भर आधी प्लॅनिंग झाले होते सगळे पण वाट लागली ! पक्याला अचानक त्याच्या बॉस ने  बिझनेस टूर वर जायला सांगीतले , त्याचा पत्ता कट झाला, मन्या चे आईवडील नेमके आदल्याच दिवशी उपस्थित झाले , झाले मन्याचे भिजलेले मांजर बनले, आणि ‘खंबा सम्राट’ विज्या दाढदुखीने त्रस्त! आता कसले ‘बसणार’ आणि कसले काय ! यकट्यानेच ‘बसण्या’त’ कसली मज्जा ? त्यात आज ‘बसायचे’ म्हणून दुसरे काहीच…

सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मी माझा ‘मान्सून धमाका’ सेल जाहीर करत आहे. आजपासून म्हणजे 10 जून पासून 23 जून पर्यंत हा सेल चालू राहील. या काळात माझी ज्योतिषविषयक मार्गदर्शन सेवा अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजे रुपये 500 एका प्रश्नासाठी उपलब्ध राहील. धमाका ऑफर संपताच माझी सेवा पूर्ववत नेहमीच्या दरात उपलब्ध राहील. आपण विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्रा द्वारे देता येतीलच असे नाही किंबहुना मला देता येतील असे नाही तेव्हा आपला प्रश्न आधी विचारा जर त्याबद्दल मला काही मार्गदर्शन करता येते शक्य असेल तरच तो प्रश्न मी स्विकारेन. शुभेच्छा आपला सुहास गोखले

माझे ज्योतिष शिकवणारे ऑन लाईन पद्धतीचे क्लासेस सध्या चालूच आहेत त्या जोडीला प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणारा एक अभ्यास वर्ग मी पुण्यात चालू करायचा विचार करत आहे. मी गेली दोन वर्षे एका बड्या सॉफ्टवेअर प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम पहात आहे. तो प्रकल्प सध्या मुंबैत चालू असला तरी लौकरच म्हणजे ऑगष्ट मध्ये पुण्यात स्थलांतरीत होत आहे त्यामुळे मला ऑगष्ट पासून मुंबै ऐवजी पुण्यात कामा निमित्त भेट घ्यावी लागणार आहे, म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस मी पुण्यात असेन, त्याचा सदुपयोग करुन पुण्यात एक ‘क्लास रुम ‘ पद्धतीचा ज्योतिष अभ्यासवर्ग सुरु करता येईल असा विचार करत आहे. त्याबद्दल मी विचार असा केला आहे; १) हा…