चला टायम झाला मंडली !

आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास !

आपण या महीन्या पुर्ता ‘हटयोगी / नागा संण्यासी ‘ का म्हणतात ना तस्ले बणून राणार !

पोष्ट्स नैत , कामेंटा नैत , लाइक्स न्हाईत , काय पण नाय , नागा संण्याश्याला अस्ले काय पण करायची पर्मिशंनच नाय म्हणतात बोवा…

आसलं काय तर द्येवाधर्माचे …… आपल्याला तसंच वागाया पायजे बाब्बा ! ..

तेव्हा भेटू म्होरल्या वरीस मध्ये २०१९ !

तो पर्यंत ………. आपण बरे आपली चिलिम बरी !

आता आमी संण्यास घ्येणार ह्ये लोक्स ना कळावे म्हणून येक नोटीफिकेशण काय दिले , म्हणले लोक्स ना कळले पाहीजे आमचा संण्यास चालू आहे त्ये,

लोक्स तरी कस्ली बेणीं बघा, सरळ सुखाने संण्यास घ्येऊ देतील का?

सक्काळ घरनं , लोक्स यायाला लागले , काही बाही विचारायला लागले , आपला येक गरीब होऊ घातलेला संण्याशी दिस्ला म्हणूण काय पण विचारायचे ? काय ताळ नाय की तंत्र नाय, लोक्स  काय काय विचारतात ते बघा ना !

1> आपल्याला संण्यासाची प्रेरणा कोठूण मिळाली ?

कसली डोंबलाची प्रेरणा ! साला ह्या फेसबुक चे अजिर्ण झाले म्हणून संण्यास , प्रेरणा बिरणा काय नाय.

2> संन्यासाची पूर्व तयारी काय काय केली ?

अरेच्च्या , याला कसली आलीय पूर्व तयारी, ही काय युपीएस्सी ची परिक्षा हाये का पूर्व तयारी करायला !

3> ‘नागा साधू’ च का?

(डोला मिचकावत) खरी मज्जा थितेच तर हाये ना! मिडिया कव्हरेज कशाला जास्त आहे ? ‘नागा साधू ‘ की ‘शिंपल साधू’ ?

4> आणि त्या ‘चिलिमी’ च काय?

आपला टायमपास हो जावयबाप्पू  !

5> चिलिमात गांजा पण असतो का?

तर .. गांजा शिवाय चिलिम म्हंजे एकदम पुळकवणी हो, थो थो थो , यकदम डाऊनमार्केट फील येतो ना अशान !

6> पण जमैकन गांजाच का? स्वदेशी का नाही?

पतंजली गांजा आला काय बाजारात ?

7> बरे त्या चिलिमी व्यतीरिक्त आणखी काही ?

आता आली का पंचाईत्? फार चौकशा हो तुम्हाला पाव्हणं, आपण नागा साधू होणार म्हणजे बघा बाकी काय लागतच नाय, जवळ काय ठिवायचेच नाय म्हणतात ,  यकदम विरक्ती बघा, कडक नियम आणि  कायदेकाणू असतात , येक चिलिम, गांजाची पुडी, त्रिशुळ आणि कमंडलू , बास्स , बाकी काय जवळ ठिवायला परमिशनच नाय !

8> त्रिशुल कशाला तो?
बरा असतोय , शो पीस म्हणून , वरतून येक लिंबू ठिवायचे खोचून , यकदम ऑथेंटीक वाटतयं, हॅ हॅ हॅ

9> आणि सोमरस असेलच ना?

त्यो कमंडलू काय उगाच जवळ बाळगतो का काय ?

10> नाही ते ठीक आहे पण कोणता सोमरस ? ब्रँन्डेड की लोकल मार्केट ?

आम्हा संन्याशांना काय करायचे ते  ब्रँड नी फ्रिंड , आपला कमंडलू भरलेला असला म्हंजे झाले !

11> बरे मग या संन्यस्त काळात काय काय उपक्रम हाती घेणार आहात?

काय म्हणलाता? ‘संन्यस्त काळ’ ?  , बा भौ . आता ह्ये काय असते आणखी ?

12> म्हणजे या एक महिना तुम्ही जो संन्यास घेणार आहात त्या काळात आपल काय उद्योग करणार?

‘निरूद्योग’ हाच आमचा उद्योग ,  संन्यास के पहेले भी , संन्यास के बाद भी

13> आपण पुर्वी ‘एल आय सी’ त कामाला होता का?

हॅ हॅ ह , ‘एल आय सी’ त कामाला अस्तो तर संण्यास घेण्याची वेळ आली असती का?

14> आपला दाढी मिशा वाला फोटो पाहीला त्यात जरा वेगळेच दिसता तुम्ही?

म्येकप हो, बॉम्बे ! बॉम्बेचा मेक-अप आर्टिस्ट आणला. बच्चन चे गेटअप याच आर्टिस्ट्चे असतय , पैसे लई घ्येतयं ब्येणं पण काम चोख, फटूत  मी वळखू येतो का ते सांगा!  आजाबात नाय ना ?

15> संन्यास योगातून बाहेर आल्या नंतर  काय ?

नंतर काय म्हंजे ? आपले नेहमीचेच, ‘निरूद्योग’ चालू ठेवणार

16> नाही ते ठीक आहे पण एखादा नविन उपक्रम ?

येकच नवा उपक्रम , पोकल बांबूचे फटके,  केरळ मधून पेश्यल ‘रेन फॉरेस्ट ‘ पोकल बांबू आणून ठिवलेत ,
ट्रायल द्येऊ काय ?

………  ये गन्या त्ये नवीण केरळ पेश्यल पोकल बांबू आणलेत ना त्यातला येक आण रे जरा बर्‍या पैकी बघूण , पाव्हण्यांना ट्रायल देयाची हाये…

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.