झोंबी कॉकटेल !   ट्राय करणार ?

मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती !

साहीत्य:

 1. ३०  मिलि अ‍ॅप्रीकॉट ब्रँडी
 2. ३० मिली साधी  रम
 3. ३० मिलि गडद / जमैकन रम
 4. ३०  मिलि  लिंबाचा रस (ताजा)
 5. एक चहाचा चमचा ग्रेनाडाईन ( अल्कोहोल विरहीत बार सिरप)
 6. ३० मिलि  संत्र्याचा रसा (ताजा)
 7. ३० मिलि बकार्डी  १५१ रम( खच्चून  ७५% अल्कोहोल  , प्रुफ लेव्हल १५१ बाय व्हॉल्युम ,  बकार्डी  लिमिटेड ऑफ हॅमील्टन यांनी बनवलेली)
 8. सजावटी साठी एक चेरी आणि संत्र्याचे काप.

ग्रेनाडाईन सिरप  इथे भ्येटेल

बाकी  रम आणि ब्रँडी कोठे  भेटेल  हे मी आता सांगायाला हवे काय ?  ( आम्ही चांगले ओळखतो  तुम्हाला !)

बर्फ़ , कॉकटेल शेकर आणि हाय बॉल गिलास तुमच्या कडे असणारच !

कृती:

 1. हलकी आणि कडक रम , ब्रँडी सहीत कॉकटेल शेकर मध्ये घ्या ,  लिंबाचा रस  आणि चमचाभर ग्रेनाडाइन सिरप टाका,  आता कंटाळा येई पर्यंत हलवा , हात दुखायला लागले  की  थांबा.
 2. आता एक ‘हाय बॉल’ ग्लास घ्याचा ,  त्याच्या बुडात बर्फाचा चुरा टाका (थोडाच टाका  ! हे कॉकटेल  हाये बरफ का गोला नै !) आता  शेकर मधले  तीर्थ हल्लू हल्लू  ‘हाय बॉल ‘ ग्लास मध्ये  ओतुन घ्या ….  ते हल्लु ह्ल्लु च पायजे बर्का , घाई गडबड कराल  तर होतील लाखाचे बारा हजार …झाले का?
 3. हां  , आता वर संत्राचा रस टाका , उलीसा , जास्त नाय , अजुन १५१ वाली ड्ब्बल कड्ड्क  रम टाकायची हाये हे धेनात ठेवा…  हंगाश्शी  …
 4. आता  टाका वरतुन १५१ वाली ड्ब्बल कड्ड्क  रम , किति?  हे काय विचारणं झाले काय ?  तुम्हाला  केव्हढी झ्येपेल त्याच्या अंदाजानुसार  (कमी – जास्त झाल्यास मी जबाबदार नाय हां आधीच  सांगून ठ्येवतो.. मागाहून खंप्लेंट चालणार नै)  .
 5. वर एक चेरी आणि  संत्र्याचे काप लावा ,  किती  काय  विचारताय  ,  येक दोन किती पण लावा हो, नैतरी पिताना (ढोसताना) हे काढून फेकूनच देत्यात , पण सर्व्ह करताना लई  झ्यॅक दिसतंय !

झाले तैय्यार ,  मग मर्दा  कसली वाट बघताय ?  होऊ दे  चांगभले !

(यालाच विंग्रजीत चिअर्स म्हणतात असे ऐकलय बुवा!)

सुहास


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  Seems like you found a solution to increase web traffic to your blog :))…..recipe mast….will try it sometime.

  0
  1. सुहास गोखले

   हा हा हा हिमांशूजी ,

   येक बेव कन्सलटंट भेट्लाय !

   असो, ते कॉकटेल जालीम आहे , ते 151 फ्र्फ , जपूनच, आधिच सवध केलेय नंतर म्हणू नका की…

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  सुहास जी शेजारी तो सांगाडा वैधानिक इशा-यासाठी ठेवलाय काय ? बाकी आम्हाला यातलं काही विशेष कळत नाही . पण रेसेपी एकदम कडक !!

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्निलजी ,

   तो सांगाडा ‘निर्वाणाचे’ प्रतिक आहे!
   मुळात हे कॉकटेल खास ‘हॉलोविन’ साठी बनवले आहे , त्यामुळे हाडाचे सापळे, चेटकीणी असले काही तरी लागतेच.

   कॉकटेल ट्राई करा …. अगदी इंस्टंट रिलिफ भेटेल बघा तुम्हाला…

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.