होली स्पेश्यल थंडाई ( भांग युक्त ! )
ट्राय करणार ?मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती !
साहीत्य:
- चांगल्या पैकी बदाम (किती ? तुम्हाला परवडतील तितके !)
- काजू ( घ्या दोन – चार मुठी भरुन , जेव्हढे काजू वापराल तेव्हढे चांगलेच असतंय !)
- पिस्ते ( घ्या आपले अंदाजाने , बाजारात मिळणारे पिस्ते खारवलेले असतात हे लक्षात ठेवा म्हणजे झाले !)
- दालचिनी ( ही तिखट असती भाऊ , तेव्हा ब्येतानं. त्यातही श्रीलंकेतुन आयात केलेली दालचिनी …ओ हो SS मिळाली तर बघा, आपल्या देसी दालचिनीत दम नाsssssssssय !
- काळी मिरी (ही पण ब्येतानच बर का भाऊ !)
- खसखस ( किती म्हणून विचारु नका , घ्या लागेल तेव्हढी , जास्त घेतली तर काय बिघडत नाsssssssssय !
- केशर (लै महाग , झ्येपेल तितके घ्या आपलं)
- साखर ( गोड पदार्थ आहे , हयहय करु नका , घ्या पायजे तेव्हढी)
- दूध (ग्लासा मागे कप – दिड कप , किती ग्लासं ढोसणार हाईसा त्या अंदाजाने !)
- गुलाबाच्या पाकळ्या सजावटी साठी.
- येक सिक्रेट आयटेम .. नाव नै सांगत फकस्त फटू दाखवतो, ओळखा तुम्हीच ! हे कुठे भ्येटेल ? मला विचारु नका … या पोष्टच्या तळाला शोधा म्हणजे सापडेल …
कृती:
- भांड्यात पाणी उकळवा आणि त्यात बदाम ( त्यातले काही बदाम सजावटी साठी बाजुला काढून ठेवा) टाका, एक मिनीटा नंतर हे बदाम पाण्या बाहेर काढा , पाणी उकळते आहे ध्यानात असू द्या ! उगाच , हात भाजून घ्याल पाव्हणं !
- आता हे बदाम साध्या पाण्यात टाकून गार करा. बदाम ट्श्श्यू पेपर वर पसरुन कोरडे करा. आता हलक्या हाताने बदामाची साले काढा.
- हे सोललेले बदाम , काजू , पिस्ते ( त्यातले काही काजू / पिस्ते सजावटी साठी बाजुला काढून ठेवा) , दालचिनी, मिरे , खसखस , पाव कप दुध हे सगळे आयटेम मिक्सर च्या ब्लेंडर मध्ये टाकून गरा गरा फिरवा (किती वेळ ? मिक्सर गरम होऊन बंद पडे पर्यंत !).
- आता हे वाटण / गरगट्या बाहेर काढून थंड जागी तास – दोन तास ठेवा.
- आता जाड बुडाचा खोलगट तवा किंवा सॉस पॅन घ्या , त्यात हा गरगट्या ओता. त्यात उरलेले सगळे दूध टाका (थोडे मांजराला प्यायला द्या .. दुवा देईल तुम्हाला.) , वरतून बचकभर केशर टाका .
- ज्यांना सिक्रेट आयटम पाहिजे तोही ह्या मिश्रणात टाका, किती? ते तुमच्या स्टॅमीन्यावर अवलंबून आहे बघा.. सुरवातीला अर्धा गोळा एका ग्लास साठी ठीक आहे … जसा जसा स्टॅमीना वाढेल त्या प्रमाणात जादा ‘माल’ वापरा, हाय काय नाय काय .
- आता हे मिक्श्चर खाळ खाळ उकळायला लागले की त्यात वाटी भर किंवा पायजे तेव्हढी साखर टाका (दोन चमचे तुम्ही पण खा !) , आता गॅस बारीक करुन पाच मिनिटे थांबा.
- हे सगळे रसायन थंड होई पर्यंत थांबा … पुर्ण थंड झाले की , फ्रिज मध्ये ठेवा .. यकदम गारे गार झाले पाहीजे , तेव्हा ठेवा तास – दोन तास निवांत.
आता ढोसायची वेळ आली की , फ्रिज मधली थंडाई ग्लासात (किंवा चांदीच्या चषकात !) भरा.. मघाशी आपण काजू . पिस्ते , बदाम बाजूला काढून ठेवले होते ते जर एव्हाना आपण खाऊन संपवले नसतील तर , त्यांची पूड करा , किंवा बारीक तुकडे करुन घ्या आणि हे त्या थंडाई वर पसरवा. वर गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करा…
घ्या मास्तर आपली थंडाई तैयार ! हौन जौदे बं भोले नाथ !
या आयटम सोबत मिठाई लागती भाऊ ! ही घ्या , आधीच आणून ठेवली आहे …
स्पेश्यल पिस्ता लाडू
अंजीर बर्फी
धारवाडी प्येढे
मोतीचूर !
गरमागरम जिलेबी !
गुलाब जामुन
ढोसुन झाल्यावर मस्त पान पायजेल ना ? ह्ये घ्या , स्पेश्यल १२०-३००!
पान भारी हायेच पण त्यावरही येक्स्ट्राचा १२० चा गिलावा माराया लागतोय , तेच्या शिवाय किक नाsssssssय !
पान कुटुन आणलं म्हणतायसा ? ह्ये काय विचारुन रायले बे , आपले त्ये नेहमीचे …
तर मंडळी , जमला की नै होलीचा झक्कास ब्येत … !!!!!!!!!!!!!!
(ज्यांना भांग नको असेल किंवा ती झ्येपेल का नै अशी शंका असेल त्यांनी त्यो स्पेश्यय आयट्म वगळला तरी चालेल पण थंडाईची मजा त्या आयटेम शिवाय येनार नाsssssssssय! )
हां, येक विसरलोच ! त्यो स्पेश्यल आयटेम कुठे भ्येटेल म्हणतायसा ? ह्ये काय हिथे …
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
मस्तच..
धन्यवाद माधुरीताई
सुहास गोखले
Shri Suhasji,
Solid !!
With great pictures – once get hold of secret item will try it.
Cheers ( it doesn’t go with this thandai )
हौन जौदे भोले नाथ ! ( this works ).
-Anant
धन्यवाद , अनंतजी…
शिक्रेट आयटम नाही मिळत ? काय हे , तुमच्या डाऊन टाउन मध्ये 5th अव्हेन्यू असेलच ना … तिथे मर्काडो बिझनेस सेंटर च्या ब्यॅक साईडच्या गल्लीत .. एक पॉन शॉप (Pawn Shop) असेल बघा.. तिथे कोणालाही रेड जो कुठे भ्येटेल असे विचारा एमीली चा फ्रेंड (गाव वाला) आहे असे द्या ठोकून .. बाकी पुढचे सगळे ‘रेड जो’ बघुन घेईल ! ..बाकी शिक्रेट आयटम नाही मिळाला तर नुस्ते सुद्धा चांगले लागते , खसखस जरा जास्त टाकायची म्हणजे झालं .. . नै तर सरळ व्होडका घ्यायची ना लिंबू पिळून हाय काय आन नाय काय .. आपल्याला काय किक बसल्याशी मतलब !
सुहास गोखले
भांग प्यायला भीती वाटते. ऊगाच नको त्या डायमेंशन मध्ये जाऊन अडकुन पडलो तर पंचाईत! बाबाजी मंगळवारी येणार असे ऐकुन होतो.
श्री हिमांशुजी,
बिनधास्त भांग प्या कै होत नही आणि चुकून माकून दुसर्या मिति मध्ये गेलात तर तुमची भाग्यवान तुम्हाला बाहेर खेचुन आणेलच ! (हा, पण त्यासाठी आधी सुतोवाच करुन ठेवायचे जसे की एव्हड्या भांगेच्या अंमलातून उतरलो की लगेच शॉपिंग ला जाऊ !)
बाकी बाबजींचे पुढचे भाग तयार आहेत पण ते जसे आहे तसे वाचकांपुढे ठेवायचे का? याचा विचार करतोय…कारण काही गोष्टी समजून घ्यायला सुद्धा एक वैचारीक मॅच्युरिटी असावी लागते. पण प्रयत्न करतो , या विकएंड ला लिखाण पूर्ण करुन सोमवार – मंगळवार पोष्ट करेन.
सुहास गोखले
वाट बघत आहे. आपले रेसीपी डिपार्टमेंट जोरदार चालु आहे. एक फर्स्ट क्लास मिसळ पावची रेसीपी होऊन जाऊदे.
श्री. हिमांशुजी,
कॉकटेल्स माझी स्पेशॅलिटी , आमच्या सौ. मिसळ झक्कास बनवतता … त्यांना विचारुन टाकतो रेशीपी …
सुहास गोखले