आपण हे ढोसलेत का ? साधी सुधी मार्टिनी
एकदम सोपी , चिअरफुल …. ट्राय करणार ?
मग घ्या लिहून साहीत्य आणि कृती !
साहीत्य:
- ८० मिलि जीन ( नवशिक्यां साठी ) किंवा ८० मिली वोडका (पहुंचे हुए इन्सानों के लिए !)
- २० मिलि व्हाईट व्हेरमॉथ वाईन ( हलकी , फळे /पाने / रुट्स / झाडाच्या सालीं इत्यादींचा स्वाद असलेली वाईन)
- ६ बर्फाचे क्युब्स
- ३ – ४ हिरवी ऑलिव्ह फळें
कृती:
- स्वच्छ धुवुन , कोरडा केलेला (आणि रिकामा ) मार्टीनी गिलास फ्रिज मध्ये गारे गार व्हायला ठेऊन द्या .
- किमान पाचेक मिण्टं तरी गिलास गार गार झाला पायजे असे बघा.
- .जीन / वोडका आणि व्हेरमॉथ वाईन एका कॉकटेल शेकर मध्ये (हल्लू हल्लू !) घ्या, त्यातच बर्फ़ाचे ६ तुकडे सोडा (पुन्हा हल्लू हल्लू !) , आणि सुमारे अर्धा मिनीट शेक करा किंवा हलक्या हाताने ढवळा.
मला विचाराल तर ‘हलक्या हाताने ढवळणे ‘ चांगले , असे केल्याने बर्फाचे पाणी होत नाही आणि ते पाणी मिसळले जाऊन ड्रिंक सपक / फिके होणार नाही ! - ( दोन्ही येक येक डाव करुनशान बघा , आणि ठरवा आपल्याला काय सुट होते ते !)
- आता फ्रिज मधला गारे गार गिलास बाहेर काढा आणि शेकर मधले चैतन्य पेय (फक्त चैतन्य पेय , बरफ नाही घ्यायचा ) गिलासात अल्ल्लाद पणे ओता.
- वरतून सजावटी साठी हिरवी आलिव्ह फळे वापरा , फटूत दावल्या प्रमाणे.
अशी पण दिसते ‘मार्टीनी’
आणि अशी पण …
लग्गेच ढोसा , थांबू नका , गरम मार्टीनी चांगली लागत नाsssssssssय !
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
कडक. वीकेंड जोरात चालु झालेला दिसतोय. व्होड्काचा चाहता नाही मी पण कधी ट्राय करीन रेसीपी.
श्री. हिमांशुजी
मार्टीनी च घेतली नाही का व्होडका वाली मार्टीनी घेतली नाय .. काय ह्ये राव .. त्ये कै नै लगूलग़ ट्राई माडी आण्णा..
(आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)
सुहास गोखले
आम्ही बियरचे चाहते. अजुन कोवळे वय आहे ना. मधुन मधुन मार्गारीटा किंवा मोहीतो चा आस्वाद घेतो.
हिमांशुजी, मस्त ! सुरवात होणे महत्वाचे ! (पण ते बियर चे घरी म्हैतैय का ? खळ्ळ खट्याक ची भिती असते !)
सुहास गोखले
म्हन्जे काय….आपले लपवुन छपवुन काय नाय…बायकोमान्य असते सगळे
हिमांशु , ह्ये एक बरां करतां तुमी… बायकूक समदा संगीतलेनी की काय तरास नाsssssssssssय … रवळनाथांन तुका समजुतदार बाईल दिली आसांत .. पर तू येकलाच पी हां … तेका ह्ये अस्ला काय देवूक नाय… ते बरा दिसत नाssssssय , काय समजलेनी ?
सुहास गोखले
Solid Post on Friday evening – now weekend is started 🙂
Ideally, vodka martinis should be stirred, not shaken.
James Bond Style – Shaken not Stirred is better for regulars, Cheers.
-Anant
श्री. अनंताजी
स्टीर केले तर बर्फाचे पाणी होत नाही व ड्रिंक डायल्यूट होत नाही असा फंडा आहे पण..पण… शेक केले की स्पिरीट्स मोकळे होतात, त्यात हवा मिसळली गेल्यामुळे ‘स्पार्क’ (बबल) येतात, काहीतरी केमिकल् लोच्या होतो त्याने ड्रिंक ची खुमारी वाढते !! दोन्ही येकेक डाव करुण पाहा ..फिल दि डिफरान्स …
(आता दर शणीवारी कॉक्टेल किंवा तत्सम ड्रींक ! लोकास्नी आवडतय आसं आपला सद्या म्हनत होता …)
सुहास गोखले
आम्हाला यातलं काही कळत नाही सुहास जी , पण as a medicine म्हणून किरकोळ शरीरयष्टी असेल तर तब्बेत सुधारण्यासाठी कोणती प्यावी हे जर सांगाल काय ?
श्री. स्वप्नीलजी,
हे असले काहि ‘तब्बेत सुधारण्या साठी नै … !” , पण एक निखळ आनंद घेण्यासाठी आहे हे !
सुहास गोखले