संगीताला भाषा नसते असे म्हणतात, भाषा कळली नाही तरी चांगले संगीत आहे ते हृदयाला भिडतेच किंबहुना हे असे हृदयाला भिडणे हीच संगीताची खरी व्याख्या असावी.
माझे आजोळ कर्नाटक मधले आणि आई कडच्या बाजूचे बरेचसे नातेवाईकही कर्नाटकातच असल्याने लहानपणी सुट्ट्या लागल्या की बेळगाव, हुबळी , धारवाड असायचेच. १९७२ चा उन्हाळा असावा, हे गाणे मी त्या सुमारास पहिल्यांदा ऐकलेले आठवते. आजच्या सारखी टी.व्ही, इंटर नेट, यु ट्यूब, एम पी थ्री असले त्या काळात नव्हते त्यामूळे संगीत ऐकायची अगदी मर्यादीत साधने त्यावेळी उपलब्ध होती. आकाशवाणी हा त्यातला सहज साध्य आणि स्वस्त पर्याय म्हणायचा. माझे सुदैव म्हणायचे की हे (आणि अशी बरीच काही) गाणी मला हुबळीला ‘नायर प्रिंटींग प्रेस’ च्या सौजन्याने मनमुराद , हवी तेव्हा ऐकायला मिळायची. त्यांच्याकडे रेकॉर्ड प्लेअर आणि ढेड सार्या रेकॉर्ड्स होत्या.
हे गाणे मी पहील्यांदा ऐकले त्यावेळी मी असेन तिसरी – चौथीत , कन्नड भाषेचा गंध नाही (तसा तो आजही फारसा नाही) त्यामुळे गाणे काय आहे , कशावर आहे हे कळण्याचा सवालच नव्ह्ता. पण संगीताची उपजतच जाण मला लाभली आहे म्हणून असेल , हे गाणे मला फार आवडले, आणि केवळ मलाच नाही तर आख्या कर्नाटकाला आवडले आजही जवळजवळ ४५ वर्षां नंतरही हे गाणे आपली मोहीनी टिकवून आहे. आपल्या कडे जसे श्रीनिवास खळ्यांची किंवा ह्र्दयनाथ मंगेशकरांची काही गाणी ‘ऑल टाईम हिट्स’ आहेत , गाण्याच्या भेंड्या असोत की ‘सारेगमपा’ सारखे स्पर्धात्मक कार्यक्रम काही गाणीं त्यात असताततच असतात. तसेच हे गाणे पण कन्नड सारेगमप वा तत्सम रिअॅलिटी शोज मधले ‘नेहमीचे , यशवंत , गुणवंत ‘ राहीले आहे.
नंतरही अधुन मधुन हे गाणे या ना त्या स्वरुपात ऐकायला येतच राहीले आणि दर वेळी आपल्या स्वरांची जादू दाखवतच राहीले. हे माझे एक अत्यंत आवडते गाणे आहे. मी नोकरीस लागल्यानंतर जेव्हा वॉकमन खरेदी केला तेव्हा अगदी सुरवातीच्या टप्प्यात ज्या गाण्यांच्या कॅसेटस खरेदी केल्या त्यात ह्या गाण्याच्या कॅसेटचा समावेश होता. आणि घासून घासून टेप चे तुकडे पडे पर्यंत हे गाणे ऐकले आहे.
गेल्या जानेवारीत मी बेंगलोरच्या एका आय.टी. कंपनीत ट्रेनिग प्रोग्रॅम घेतला होता तेव्हा तिथे ट्रेनिंग संपल्या नंतरच्या हास्य विनोदाच्या कार्यक्रमात हे गाणे एकाने इतके सुंदर आणि हुबेहुब गायले की बस्स! माझ्या कडे ‘यामा’ चा व्यावसायिक दर्जाच्या को-बोर्ड (सिंथेसाईझर) आहे , वाद्य हा प्रकार मला कधीच वश झालेला नाही ही गोष्ट वेगळी तरी जी काही मोजकी गाणी मी ह्या कि-बोर्ड वर वाजवू शकतो त्यात हे गाणे आहे!
आज हे गाणे मी आपल्या समोर ठेवत आहे, ज्यांना कन्नड भाषा येत नाही त्यांना शब्द जरी कळले नाहीत तरी त्यातल्या तरल भावना नक्कीच कळतील इतकी ताकद या गाण्यात , त्यातल्या संगीतात जरुर आहे , आणि तशी ती आहे म्हणूनच हे गाणे गेले पंचेचाळीस वर्षे आपले गारुड टिकवून आहे. १९७१ मध्ये ध्वनिमुद्रीत झालेले हे गाणे आहे रेकॉर्डींग चा दर्जा अत्यंत सुमार आहे चालवून घ्या जरासे.
तर हे ते गाणे … आकाशवे बिल्लली मेले..
Film: Nyayave Devaru (1971)
Lead: Rajkumar, B. Saroja Devi
Music: Rajan-Nagendra
Lyrics: Chi. Udaya Shankar
Singer: P. B. Srinivas
ಚಿತ್ರ: ನ್ಯಾಯವೇ ದೇವರು
ಗಾಯಕರು: ಪಿ.ಬಿ. ಶ್ರೀನಿವಾಸ್
ರಚನೆ: ಚಿ.ಉದಯಶಂಕರ್
ಸಂಗೀತ: ರಾಜನ್ ನಾಗೇಂದ್ರ
ನಟರು: ಡಾ ರಾಜಕುಮಾರ್, ಬಿ ಸರೋಜಾದೇವಿ
ಆಕಾಶವೇ ಬೀಳಲಿ ಮೇಲೆ ನಾನೆಂದು ನಿನ್ನವನು
ಭೂಮಿಯೇ ಬಾಯ್ ಬಿಡಲಿ ಇಲ್ಲೇ ನಾನಿನ್ನ ಕೈ ಬಿಡೆನು
ನೀನಿರುವುದೇ ನನಗಾಗಿ
ಈ ಜೀವ ನಿನಗಾಗಿ
ಹೆದರಿಕೆಯ ನೋಟವೇಕೆ ಒಡನಾಡಿ ನಾನಿರುವೆ
ಹೊಸ ಬಾಳಿನ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ನಾ ಬರುವೆ
ಕಲ್ಲಿರಲಿ ಮುಳ್ಳೇ ಇರಲಿ ನಾ ಮೊದಲು ಮುನ್ನಡೆವೆ
ನೀನಡಿಯ ಇಡುವೆಡೆಯೇ ಒಲವಿನ ಹೂಹಾಸುವೆ
ಈ ಮಾತಿಗೆ ಮನವೇ ಸಾಕ್ಷಿ ಈ ಭಾಷೆಗೆ ದೇವರೇ ಸಾಕ್ಷಿ
ಇನ್ನಾದರೂ ನನ್ನ ನಂಬಿ ನಗೆಯ ಚೆಲ್ಲು ಚೆಲುವೆ
ಆಕಾಶವೇ ಬೀಳಲಿ ಮೇಲೆ ನಾನೆಂದು ನಿನ್ನವನು
ಹಸೆಮಣೆಯು ನಮಗೆ ಇಂದು ನಾವು ನಿಂತ ತಾಣವು
ತೂಗಾಡುವ ಹಸಿರೆಲೆಯೇ ಶುಭ ಕೋರುವ ತೋರಣವು
ಹಕ್ಕಿಗಳ ಚಿಲಿಪಿಲಿ ಗಾನ ಮಂಗಳಕರ ನಾದವು
ಈ ನದಿಯ ಕಲರವವೇ ಮಂತ್ರಗಳ ಘೋಷವು
ಸಪ್ತಪದಿ ಈ ನಡೆಯಾಯ್ತು ಸಂಜೆರಂಗು ಆರತಿಯಾಯ್ತು
ಇನ್ನ್ನೀಗ ಎರಡೂ ಜೀವ ಬೆರೆತು ಸ್ವರ್ಗವಾಯ್ತು
ಆಕಾಶವೇ ಬೀಳಲಿ ಮೇಲೆ ನಾನೆಂದು ನಿನ್ನವನು
इंग्रजीत भाषांतर (मी कवी असतो तर याचे सुंदर मराठी रुपांतर केले असते! असो, जर कधी वेळ मिळाला तर ते ही करायचा मानस आहे!!)
(सौजन्य: http://kannadasongtranslation.blogspot.in/2015/06/aakashave-beelali-mele.html )
Akashave beeLali mele, naanendu ninnavanu
Let the sky fall, I’m always yours
Bhoomiye bai biDali ille, naa ninna kai biDenu
Let the earth part right here, I shall never leave your hand
Neeniruvudu nanagaagi, ee jeeva ninagaagi
You are meant for me, this life is meant for you
Stanza 1
Hedarikeya notaveke, oDanaDi naaniruve
Why the frightened look, I’m here as a companion
Hosabaalina haadiyalli jothegoodi naa baruve
On our new life path, I’ll join you
Kallirali muLLe irali, naa modalu munnaDeve
Let there be stones and thorns, I’ll walk ahead of you
NeenaDiya iDuveDeyalli olavina hoo haasuve
Where you place your foot, I’ll lay flowers of love
Ee maathige manave saakshi, ee bhaashege devare saakshi
To this word mind is the witness, to this promise the God is the witness
Innaadaru nanna nambi nageya chellu cheluve
Please believe me at least now and smile, you beauty!
Stanza 2
HasemaNeyu namage indu naavu nintha thaaNavu
The wedding seat for us is the land we stand on
ThoogaDuva hasireleye shubha koruva thoraNavu
The swaying, green leaves are the holy garland
HakkigaLa chilipili gaana mangaLakara naadavu
The melodious chirping of birds is the auspicious tune
Ee nadiya kalaravave mantragaLa ghoshavu
The murmur of this river is the incantation
Sapthapadi ee naDeyayithu sanjerangu aarathiyayithu
This stroll constitutes the seven-steps of a marriage, the red of the evening sky is the Aarti
Indeega eraDu jeeva berethu swargavayithu
And now, our two lives have merged and made this a heaven.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
क्या बात है सर जी
धन्यवाद श्री. दर्शनजी
सुहास गोखले
ठीक आहे,
ते “नवाब औफ़—“चे जरा बघा.
खूप आश्वासन दिलित.
श्री. अण्णासाहेब ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपल्या भावना समजू शकतो पण एक सांगू , सध्या मी एका ट्रेनिंग प्रोग्रॅम च्या तयारीत आहे, पोटापाण्यासाठी हे करावे लागते , त्यामुळे मोकळा वेळ सापडणे अवघड आहे. काही लेखन आधीच करुन ठेवले होते ते सध्या पोष्ट करत आहे , ट्रेनिंग च्या कामातून जरा मोकळा झालो की त्या लेखमालेतले उर्वरीत भाग प्रकाशीत करेन.
सुहास गोखले