आज ‘अ‍ॅमेझॉन किंड्ल’ ची खरेदी.

साधेच मॉडेल घेतले ( ८ व्या पिढीचे , बेसीक, ६ इंच, व्हाईट ट्रीम) , कमाल कि चीज आहे, अगदी पुस्तक हातात धरुन वाचतोय असा फील येतो. मी रोज बरेच वाचन करतो आणि कॉम्प्युटर / टबलेट चे स्क्रीन फार प्रखर , भगभगीत वाटतात, डोल्याला त्रास हो  , त्या तुलनेत हे किंड्ल म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल , भन्नाट कल्पना , आवडली आपल्याला. हे उपकरण जरी अ‍ॅमेझॉन च्या ‘किंडल’ या बुक फॉरमॅट साठी तयार केलेल असले तरी बाकी इतर फॉरमॅट मधली पुस्तके आणि डॉक्युमेंट्स पण वाचू शकते (काही मर्यादा पडतात) , त्यासाठी https://calibre-ebook.com  या वेबसाईट वरुन मिळणारे अ‍ॅप डाऊन लोड करा , हे अ‍ॅप फुकट आहे , लायसेंस लागत नाही. हे अ‍ॅप वापरुन कोणत्याही  फॉरमॅट  (उदा: पी.डी.एफ)   मधेल पुस्तक / डॉक्युमेंट ‘किंडल’ फॉरमॅट मध्ये रुपांतरीत करता येते !

माझ्या कडे मराठीतली बरीच डोक्युमेंट्स आहेत , वर्ड फॉरमॅट मध्ये,  कॅलीबर वापरुन किंडल मध्ये आणले , अत्यंत सुबक रुपांतर झाले…

marathi-on-kindle2a

(फटू भयाण आला आहे त्या बद्दल स्वारी  ,  कारभारणीच्या मायक्रोमॅक्स फोन वरुन गडबडीत काढला आहे , नाहीतर ह्ये असला फटू माझ्याच्याने कंदी निघेल का? कै तरीच काय)

स्कॅन केलेले डॉक्युमेंट पण चांगली रुपांतरीत होतात… एकंदर काय , पुस्तके वाचायला इतके चांगले उपकरण दुसरे नाही. पी.सी. वर , लूप्टॉप वर , टॅबलेट वर किंवा सेल फोन वर काःई वाचणे म्हणजे डॉल्यावर अत्याचारच असतो. किंडल चा ई-लिंक स्क्रिन खास वाचण्यासाठी डीझाईन केलेला असल्याने त्याला ग्लेअर नाही, कमालीचा थंडावा आहे , सुबक फॉन्ट्स आहेत त्यामुळे वाचणे हा एक सुखद अनुभव होतो. किंड्ल मध्ये सुमारे १००० पुस्तके मावत असल्याने तुमची आख्खी लायब्ररी त्यात मावू शकते .

एकदा प्रत्यक्ष हाताळून बघाच……..याच्या स्क्रिन चे तंत्रज्ञान वेगळेच आहे . LED बेस्ड पिक्सेल नाहीत तर इंक पिगमेंट वर आधारीत डॉट्स आहेत त्यामुळे अगदी कोणत्याही प्रकारे ग्लेअर येत नाही, भर दुपारी बारा वाजता . कडकडीत उन्हात धरुन सुद्धा वाचता येते. स्क्रिन काळा- पांढरा असल्याने पुस्तक वाचणे हाच एकमेव उपयोग आहे.

‘डोळ्याला अजिबात त्रास होत नाही ‘ हेच याचे युनिक सेलिंग फिचर! बाकी जे लोक फारसे वाचत नाहीत (पुस्तके इ) त्यांना याचा उपयोग नाही , मी दिवसाकाठी १०-१५० पाने वाचतो (म्हणजे मला ती वाचावीच लागतात! पापी पेट का सवाल है !) तेव्हा असले काही समोर असणे हे डोल्याच्या तब्बेती साठी अत्यावश्य्कच आहे.

दुसरा एक आक्षेप म्हणजे या किंडल वर किंडल फॉरमॅट मधलीच पुस्तके वाचता येतात, पण तसे नाही इतर अनेक फॉरमॅट मधाला मजकूर ही वाचता येतो. त्यासाठी मोफत मिळणारे कॅलीबर नावाचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. मी माझी अनेक वर्ड डॉकयुमेंट्स किंडल फॉरमॅट मध्ये आणली , उताम रुपांतर . पी.डी.एफ पण वाचता येतात (काय मर्यादा / उणीवा जरुर आहेत) , त्यासाठी पी.डी.एफ -> किंडल असे करण्या पेक्षा पी.डी.एफ -> वर्ड -> किंडल असे रुपांतर केले तर जास्त चांगले दिसते असा माझा अनुभव आहे.

माझ्या दृष्टीने याचा मोठा फायदा म्हणजे आता मी कोठेही बसून (अगदी टॉयलेटच्या सीटवर सुद्धा ! तसा मी ‘तिथे’ बसून वृत्तपत्र वाचतो म्हणा !) पुस्तक वाचतो, टेरेस् वर खुर्ची टाकून , आंब्याच्या झाडाखाली (घरी दोन डेरेदार अंब्याची झाडे आहेत !) , जिन्याच्या लॅडिंग मध्ये , गारव्यात ,लोड + सतरंजी + भाजलेले शेंगदाणे, सोबत मांजर (माझी आवडती जागा आणि इस्टाईल !) , व्हरांड्यात रॉकिंग चेअर वर बसून … अनेक पर्याय आहे जे पी.सी. / टॅबलेट साठी शक्य नव्हते!

जय हो !


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद अमितजी,

   सहकार्या बद्दल धन्यवाद. मी आजच २५ एक पुस्तके किंडल फॉरमॅट मधली अ‍ॅमेझॉन वरुन विकत घेतली आहेत ती वाचायलाच मला काही महीने लागतील.
   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.