बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो:

“उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”

बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक कुंडली मी तयार केली ती सोबत छापली आहे.

दिनांक: ११ जुलै २०१९, वेळ: ०९:१०:४७ स्थळ: नाशिक शहर (19N59 , 73E48)

ही (प्रश्न) कुंडली, सायन भावचलित, रिजिनोमोनटॅनस हाऊस सिस्टीम आणि मीन नोड्स अशी आहे.

 

 

 

आता पर्यंत केलेल्या अ‍ॅनालायसीस वरून आपण एक प्राथमीक अंदाज बांधू शकलो आहे तो म्हणजे:

“गर्भधारणा झाली आहे हे जाणून घेण्यासाठी ही उद्याची तपासणी असू शकते”

पण इथेही आपल्याला शंका आहेत, कारण आजकाल ‘गर्भ राहिला आहे का नाही’  हे तपासण्याच्या टेस्ट अगदी सोप्या, रुटीन असतात आणि अशा टेस्ट बद्दल खास वेळात वेळ काढून एखाद्या ज्योतिषाला विचारावे अशी काळजी करण्याची परिस्थिती नक्कीच नसते!

मग असे असताना देखील ‘गर्भ धारणा झाली आहे का नाही?” या  टेस्ट बद्दल प्रश्न का विचारला असावा?

पत्रिकेतली ग्रहस्थिती गर्भधारणा, संतती या बद्दल सुचवत असली तरी व्यवाहारीक पातळीवर विचार करता ह्या असल्या टेस्ट साठी बाई मला प्रश्न विचारतील हे पटत नव्हते.

गुंता सुटला म्हणे पर्यंत तो पुन्हा वेगळ्या रुपात सज्ज झाला म्हणायचा!

मी पुन्हा पत्रिकेत डोके खुपसले, अजून काही दिसते का, अजून काही सापडते का? ग्रहस्थितीचा , ग्रहयोगांचा आणखी काही नवा अर्थ लावता येईल का? एखादा घटक नजरेतून निसटला का? सारे पुन्हा तपासायला लागलो.

सामान्यत: प्रश्नकुंडली समोर असते तेव्हा मी आपले नेहमीचे रवी, चंद्रादी ग्रह आणि त्यांच्यात होणारे पाच प्रमुख योग इतपतच सिमित राहतो. अरेबीक पार्ट्स, फिक्स्ड स्टार्स (स्थिर तारें), मीड पॉईंट्स असे अन्य घटक वापरायची सहसा वेळ पडत नाही. पण आता हा गुंता पाहता या इतर मार्गांचाही अवलंब करावा लागणार अशी चिन्हे दिसायला लागली.

आता आपला रोख ‘संतती / गर्भधारणेची शक्यता’ असा आहे.

सगळ्यात प्रथम माझा नजरेत भरला तो म्हणजे ‘रेग्युलस’ हा फिक्स्ड स्टार (स्थिर तारा)! सध्या हा स्थीर तारा ०० कन्या ०५’ ३१” अंशावर  आणि या पत्रिकेचा लग्न बिंदू  २९ सिंह ५४ वर आहे! केव्हढा विलक्षण योगायोग असावा हा! ‘रेग्युलस’ अगदी म्हणजे अगदी लग्नबिंदूवरच आहे अवघे ११ कलांचे अंतर!

हा ‘रेग्युलस’ स्थिरतारा अगदी स्पेशल आहे, या तार्‍या बद्द्ल प्रख्यात ज्योतिर्विद विवियन रॉबसन ने नोंदवलेले निरिक्षण असे आहे:

If Rising (On Ascendant) : Great honor and wealth, but violence and trouble, sickness, fevers, acute disease, benefits seldom last, favor of the great, victory over enemies and scandal, yet still, whatever of all this happens, it signifies that the Native shall die an unhappy death; or at least that all his honors, greatness and power shall at last suffer an eclipse and set in a cloud. If, out of anger or hurt, the person takes revenge, then as promised with all Royal Stars, there is a falling from grace.
Influence of fixed stars differs from that of planets in being much more dramatic, sudden and violent fixed stars may elevate from poverty to the extreme height of fortune or vice versa whereas the planets do not do so.”

[हे बघत असताना मला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रंप यांची पत्रिका आठवली, श्री डोनाल्ड यांचा जन्मलग्न बिंदू   २९ सिंह ५७ वर आहे आणि रेग्युलस त्यांच्या जन्मवेळे नुसार २९ सिंहेवरच आहे!]

म्हणजे बाईंना मोठा सन्मान पण त्याच बरोबर हातात आलेले यश निसटून जायची पण शक्यता.

बाई तर श्रीमंत गटात मोडणार्‍या, बरेच मान सन्मान आत्ता पर्यंत मिळाले असतील पण सध्या आपण प्रश्नकुंडली बघत आहोत त्यामुळे अगदी अलीकडच्या काळात झालेले/ होणारे योगच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्या अंगाने पाहता बाईंना नुकताच एखादा मोठा सन्मान मिळाला असावा किंवा मिळण्याची शक्यता आहे!

या वळणावर मला राहावले नाही, मी बाईंना तसे विचारले देखील.

“नाही हो तसा मोठा सन्मान, यश असे काही गेल्या दोन एक वर्षात मिळालेले नाही, नाही म्हणायला दोन अडीच वर्षा पूर्वी आमच्या महीला सोसायटीची अध्यक्षा झाले होते वर्षभरासाठी तोच काय तो सांगता येण्याजोगा सन्मान”

प्रश्नकुंडलीतला रेग्युलस सन्मान सांगत आहे , बाई नाही म्हणत आहेत , पण रेग्युलस चुकणार नाही तो सन्मान दिल्या शिवाय राहणारच नाही फक्त तो बाईंना माहीती नसेल इतकेच. असे काय असू शकते मग?

‘मातृत्व’!

मातृत्व ही कोणत्याही स्त्री साठी एक फार मोठा सन्मान असतो! आपण गर्भधारणेच्या अंगाने विचार करत आहोत त्यात हा ‘मातृत्वाचा सन्मान’ चपखल बसतो!

विषय गर्भधारणेचा असल्याने ‘गर्भधारणे’ संदर्भातले काही महत्त्वाचे मानले जाणारे मीड पॉईंट मी तपासले.

MA/JU: Joy of work. Fortunate acts or accomplishments. Joyous happenings. Betrothal. Fortunate deed. To create something. To produce. Propagation, pregnancy, generation, children, fruits and births. Lucky deed. Enthusiastic action, which often imbues what one does with the possibility of success. The midpoint between Mars and Jupiter literally denotes a successful (JU) activity (MA), a fortunate event and is very frequently found in times of happiness or success. It’s one of the possible marriage and childbirth indicators.

मंगळ – गुरु मीड पॉईंट १० तूळ ५४ वर येतो आणि त्याचा ९ कर्क १२ वरच्या शुक्राशी १ अंशात केंद्र योग होत आहे म्हणजे दीप्तांशाचा विचार करता हा योग सध्या चालू आहे असेच समजता येईल.

या मीड पॉईंट शी शुक्राचा केंद्र योग होतो आहे त्याबद्दल COSI मध्ये असा उल्लेख आहे:

“Mars/Jupiter = Venus : harmonious sex expression, richly perceptive faculties and feelings, creative faculties, creative artistic activity, urge to beget children, Procreation caused by love, birth. Fortunate decision in love and marriage”

SO/MO: The hour of the day. Temperament of the mind. The relation of a man to a women. Man and woman (husband and wife). Marriage, patents, friendships, partnerships.

Sun/Moon midpoint is a very sensitive point in relationships.  In  chart analysis, when a focal point (i.e. a planet or an Angle) is in a hard aspect with the Sun/Moon midpoint, the planet or the Angle often becomes the catalyst for our deepest need fulfillment & creative self-expression.

रवी- चंद्र मीड पॉईंट १४ कन्या २७ वर येतो आणि त्याचा १५ धनू ५८ वरच्या संततीकारक गुरू शी अवघ्या १ अंश ३१ कलां मध्ये केंद्र योग होणार आहे, म्हणजे दीप्तांशाचा विचार करता हा योग सध्या चालू आहे असेच समजता येईल.

या मीड पॉईंट शी गुरूचा केंद्र योग होतो आहे त्याबद्दल COSI मध्ये असा उल्लेख आहे:

“Sound mental and emotional disposition, desire for joint endeavor, for self-expression and possessions, Happy relationship, joint success, marriage, shared happiness, birth

असे एका पाठोपाठ एक खणखणीत दाखले मिळताच ‘गर्भधारणे’ बद्दलचा माझा कयास अधिकच बळकट झाला.

जसा जसा मी अधिक विचार करू लागलो तसे तसे ‘गर्भधारणा’ हा मुद्दा अधिकच प्रकर्षाने पुढे यायला लागला. काही खुलासे आपसूकच व्हायला लागले, आत्ता पर्यंत पत्रिकेत जे जे बघितले त्याचे धागेदोरे जुळायला लागले!

प्रथम मी काही गृहीतके मांडली:

१) बाईंचे वय माझ्या अंदाजानुसार ३० च्या पुढे पण चाळीशीच्या आत, म्हणजे अजूनही गर्भधारणेची आशा असू शकते, या वयात प्रयत्न केले तर गर्भधारणा शक्य ही असते.

२) बाई आजारा बद्दल, टेस्ट बद्दल चकार शब्द काढत नाहीत म्हणजे ते आजारपण म्हणा किंवा टेस्ट म्हणा त्यांना गुप्त ठेवायची आहे, त्याची वाच्यता होऊ द्यायची नाही आहे. किंवा त्या बद्दल काही बोलताना त्यांना कमालीची लाज म्हणा, स्त्री सुलभ संकोच वाटत असावा. जर ही या वयात नको असलेली गर्भधारणा / अपघाताने घडून आलेली गर्भधारणा असेल तर असे वाटणे शक्य आहे.

या गृहीतकांच्या आधारे मी काही अनुमानें काढली ती अशी:

१) प्रश्न बाईंच्या आरोग्या संदर्भात नक्कीच आहे पण आजारा बद्दल कोणते ठोस अनुमान काढण्या सारखी ग्रहस्थिती दिसत नाही.

२) त्याच वेळी पत्रिकेतली ग्रहस्थिती विचारलेल्या प्रश्नाचा बाईंच्या अपत्याशी संबंध आहे असे पण सुचवत आहे.

३) बाईंचा आजार आणि अपत्य यांचा मेळ घातला तर बाईचा प्रश्न गर्भधारणे संदर्भात असावा असा एक तर्क करता येईल. कदाचित गर्भधारणा झाली असावी असा शंका आल्याने, आपण नक्की गर्भवती आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठीच उद्याची वैद्यकीय चाचणी असण्याची शक्यता असू शकते.

४) ‘गर्भवती आहे की नाही’ या सारख्या एका सामान्य, रुटीन चाचणीच्या निकाला बद्दल कोणी ज्योतिषाला विचारत बसणार नाही म्हणजेच ही उद्याची चाचणी ही गर्भधारणे संदर्भातली असली तरी ती एक स्पेशल चाचणी असेल जी सहसा केली जात नाही.

५) अशी स्पेशल, सहसा न केली जाणारी गर्भधारणा चाचणी फक्त आणि फक्त कृत्रिम गर्भधारणेचे प्रयत्न चालू असतात तेव्हाच केली जाते.

आजकाल जे ‘आय व्हि एफ IVF’ तंत्रज्ञान वापरले जाते त्या प्रक्रियेत अशा स्पेशल चाचण्या केल्या जातात

६) सध्याच्या काळात ‘आय व्हि एफ IVF’ तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तसा बराच होत असला तरी अजूनही अशी ट्रीटमेंट घेत आहे असा जाहीर उल्लेख करणे आपल्या समाजात काहीसे लज्जास्पद मानले जाते, अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते म्हणजे आपल्यात मोठा दोष आहे याची कबुली देत आहोत असा लोकांचा समज आहे आणि अशा समजातूनच बाई चाचणी कशा बद्दल आहे या संदर्भात एक अक्षरही बोलत नव्हत्या, त्यांना ह्या ‘आय व्हि एफ IVF’ बद्दल काही वाच्चता करायची नसावी.

इथे एक एक असभ्य विचार मनात आला, मी असभ्य म्हणत असलो तरी समाजात अशा घटना हर दिन घडत असतात, आपण वृत्तपत्रांतून वाचत असतोही. असेही असू शकते ते पंचम (५) स्थानाचा संबंध चोरट्या प्रेमप्रकरणाशी, अनैतिक संबंधाशीही जोडता येईल आणि अशा चोरट्या प्रकरणातून गर्भसंभव होतो ही आणि त्याची कोणी वाच्यता करणार नाही! पण मी ही शक्यता धुडकावून लागली, आणि दुदैवाने असे काही पुढच्या अ‍ॅनालायसिस मध्ये दिसले तरी त्या बद्दल काहीही न बोलता, सभ्यपणाने चक्क माघार घेऊन, “पत्रिके वरून सध्या काहीही सांगता येत नाही, क्षमस्व,” असे सांगत बाईंना परत पाठवायचे असे ठरवले.

७) ‘आय व्हि एफ IVF’  मध्ये यशाची शक्यता तशी कमी असते आणि कदाचित बाईंनी पूर्वी केलेले ‘आय व्हि एफ IVF’ चे प्रयोग अपयशी ठरले असावेत आणि या खेपेला असेच अपयश येईल की काय अशी त्यांना कमालीची धास्ती होती आणि त्या धास्ती पोटीच त्या माझ्या कडे प्रश्न विचारायला आल्या होत्या!

या इथे पर्यंत आल्या नंतरच बाईंचे नेमके वय काय हे विचारणे आवश्यक वाटल्याने मी तसा प्रश्न त्यांना विचारला.

बाईंचे वय ३४ आहे कळताच माझ्या वर केलेल्या सर्व अंदाजाला पुष्टीच मिळाली, कारण आय व्हि एफ IVF साठी ३४ वय सुयोग्य आहे कारण या वेळे पर्यंत नैसर्गिक मार्गाने संतती होण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झालेले असतात आणि एक शेवटचा उपाय म्हणून ते जोडपे ‘आय व्हि एफ IVF’ कडे वळलेले असते!

बाईंनी बहुदा चुकीचा प्रश्न विचारला आहे! “फर्टीलिटी ट्रीटमेंट यशस्वी होईल का?  असा प्रश्न त्यांनी  विचारायला हवा होता का?

पुन्हा एकदा खात्री करून घेण्याच्या हेतू ने मी धाडस करत बाईंना विचारलेच-

“माझा प्रश्न काहीसा अप्रस्तुत वाटेल पण विचारणे भाग आहे म्हणून विचारतो, आपल्याला मुले बाळे किती आहेत आणि किती वर्षांची आहेत”

“याचा इथे काही संबंध आहे?”

“अर्थातच, त्या शिवाय मी हा खासगी प्रश्न विचारणार नाही”

“दुर्दैवाने आम्हाला मूलबाळ काहीच नाही”

आता तर मला ‘आय व्हि एफ IVF’ ची शक्यता जास्त वाटायला लागली.

“फर्टीलिटी ट्रीटमेंट यशस्वी होईल का?  अशा प्रश्नांची उत्तरें पूर्वी दिली असल्याने मला या फर्टीलिटी ट्रीटमेंट बद्दल माहिती होती.

फर्टिलिटी ट्रीटमेंट बरीच गुंतागुंतीची असते. यात अनेक टप्पे असतात. आणि प्रत्येक टप्प्यावर अनेक चाचण्या (टेस्ट्स) केल्या जात असतात.

टप्पा पहीला: Preparation for an IVF Cycle – Testing and Ovarian Stimulation

An evaluation of your uterus and fallopian tubes to make sure there are no issues that require surgical repair. Pre-Fertility drugs for IVF are usually injected, and you’ll be frequently monitored using hormonal testing and vaginal ultrasounds for the best result. Once an ultrasound determines you have a sufficient number of large enough follicles and your estrogen level is at the right level, you’ll receive a trigger shot of hCG or other medication cycle testing includes hormonal evaluation to assess thyroid function and ovarian reserve, screening both partners for sexually transmitted infection, and a semen analysis of the male partner.

हा टप्पा अगदी प्राथमिक असतो, इथे जरी बर्‍याच चाचण्या केल्या जात असल्या तरी ह्या चाचण्यांच्या निकाला बाबत ज्योतिषाला प्रश्न विचारला जाणार नाही.

टप्पा दुसरा:   Egg Retrieval

The fluid from the follicles – that contains the egg – is suctioned by the IVF physician through small tubing and into a test tube. The test tube is then handed to an embryologist who uses a microscope to find the egg in each test tube of follicular fluid. All the details of the eggs are carefully recorded. The number of eggs produced and removed are influenced by a patient’s age, ovarian reserve, response to ovarian stimulation and, occasionally, the ability to access the ovaries with the needle

या टप्प्यावर एक लहानशी सर्जिकल प्रोसीजर केली जाते पण कोणती विशेष महत्त्वाची टेस्ट केली जात नाही. बाईंना कदाचित या ‘सर्जिकल प्रोसीजर’ बद्दल विचारायचे असेल का? शक्यता वाटत नाही. टेस्ट वेगळी सर्जिकल प्रोसिजर वेगळी.

टप्पा तिसरा: Fertilization

Once eggs reach the lab, experts examine them to determine maturity and quality. Mature eggs are transferred into a special culture medium, placed in an incubator and within a few hours of egg retrieval are fertilized with sperm.

या टप्प्यावर पेशंटची कोणती तपासणी केली जात नाही, जे काही घडते ते पेशंटच्या अनुपस्थितीत, डॉक्टरांच्या लॅब मध्ये, त्या मुळे बाईंचा प्रश्न (म्हणजे टेस्ट बद्दल) या तिसर्‍या टप्प्या संदर्भात नक्कीच नसेल.

टप्पा चौथा: Embryo Transfer
Following fertilization, the IVF team and the couple determine exactly when embryo transfer will take place – anywhere between 1 and 6 days but usually 3-5 days after egg retrieval. However, if the decision is made to do genetic testing, first a biopsy is taken from the embryo, almost always on culture day 5 or 6. Usually 3 to 8 cells are sent for testing performed at an outside lab, while the embryos are frozen and remain in the IVF laboratory. After receiving the genetic test results, the selected embryo is chosen, thawed and transferred into the uterus, usually within 1 to 2 months after the egg retrieval.

या टप्प्यावर पेशंटची कोणती तपासणी केली जात नाही, जे काही घडते ते पेशंटच्या अनुपस्थितीत, डॉक्टरांच्या लॅब मध्ये, त्या मुळे बाईंचा प्रश्न (म्हणजे टेस्ट बद्दल) या चौथ्या टप्प्या संदर्भात नक्कीच नसेल.

टप्पा पाचवा: Pregnancy Test

About 12 days after an embryo transfer, you’ll have a blood pregnancy test. If a pregnancy is confirmed, you’ll be followed with blood tests and eventually, ultrasounds, to confirm viability and whether there’s a multiple pregnancy. If the pregnancy appears normal at 9-10 weeks, you’ll be referred back to your obstetrician!

हा अंतिम पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो, इथे ज्या चाचण्या (टेस्ट्स) केल्या जातात त्याच्यावरून ती स्त्री गर्भवती आहे का नाही? म्हणजेच आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट यशस्वी झाली का नाही ते समजते.

मी अंदाज केला, यातल्या प्राथमिक टप्प्यावरच्या टेस्ट साठी बाई माझ्याकडे प्रश्न विचारायला नक्कीच येणार नाहीत

त्या बहुदा या ट्रीटमेंटच्या शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्या वर असतील आणि उद्या करण्यात येणारी टेस्ट ही ‘गर्भधारणा झाली की नाही?” याची अंतिम चाचणी असेल.

या चाचणी साठी शक्य असले तरी कोणी ५० रुपयांचे प्रेगन्न्सी किट वापरणार नाही! ती स्त्री ह्या साठी तिची ट्रीटमेंट जिथे चालू आहे त्या आय व्ही एफ सेंटर मध्येच जाणार ना?

म्हणजे उद्या जी टेस्ट बाई करून घेणार आहेत त्याचा नतिजा ‘गर्भधारणा झाली / नाही झाला’ यातला एक असणार.

आय व्हि एफ ची एकंदर प्रक्रिया पाहता गर्भधारणा झाली असेल तर बाई आत्ता प्रश्न विचारत आहेत त्या क्षणाच्या आधीच झाली असणार, याचाच अर्थ आता आपल्याला


‘मला गर्भधारणा झाली आहे का? Am I pregnant?”

अशा प्रश्नाचे उत्तर हुडकायचे आहे!

नीट लक्ष द्या, आपल्याला ‘गर्भधारणा होईल का?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही तर ‘गर्भधारणा झाली आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे,

आता आपल्या या होरारीचे सारे चित्रच पालटले,   ते दोन अर्थाने:

१) बाईंचा खरा प्रश्न काय असावा याचा अंदाज आल्याने या प्रश्नाचे उत्तर कसे मिळवायचे याची रणनीती (Strategy)  ठरवता येईल.

२) बाईंचा प्रश्न ‘टेस्ट चा निकाल काय असेल?’ अशा भविष्यात काय घडणार आहे ते जाणून घेण्याच्या हेतूने विचारला गेला असला तरी आपल्याला मागे काय घडले त्याचा म्हणजेच गर्भधारणा झाली आहे किंवा नाही,  याचा शोध घ्यावयाचा आहे!

हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जरा लक्ष देऊन वाचा!

सामान्यत: ज्योतिष म्हणजेच ज्याला आपण भविष्य असे म्हणतो त्याच्या अर्थच मुळात पुढील काळात घडणारी घटना असा आहे! म्हणजे ज्योतिषाकडे लोक येतात ते पुढच्या काळात काय घडेल हे जाणून घेण्यासाठी. ‘नोकरी कधी मिळेल?’, “लग्न कधी होईल”. “परदेशी जाण्याची संधी मिळेल का?’ अशा स्वरूपाचे प्रश्न असतात मग ज्योतिषी पण आगामी ग्रहमानाचा वेध घेऊन अशी घटना घडण्याची शक्यता आहे का नाही हे तपासत असतो. जे आधी घडून गेले आहे त्या बद्दल कोण कशाला विचारेल, कारण उघड आहे, जे घडून गेले ते आपल्याला माहितीच असते. परीक्षेचा निकाल कळल्या नंतर कोणी ज्योतिषाला परीक्षेचा निकाल काय लागेल म्हणून विचारेल का?

मात्र इथे तसे नाही.

इथे आपल्याला अगदी उलट असे म्हणजे एखादी घटना घडून गेली आहे का नाही हे तपासायचे आहे.

बाईंच्या या प्रश्नाबाबत बोलायचे तर ‘गर्भधारणा होणे’ ही घटना त्यांच्या आयुष्यात अगदी नजिकच्या काळातच घडली आहे का नाही हे तपासायचे आहे. इथे ‘नजिकच्या काळात’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा, कारण सरळ आहे, गर्भधारणा झाली आहे का हे साधारण महिना भरात म्हणजे त्या स्त्रीची मासिक पाळी चुकली की आपोआपच कळते , निसर्गच सांगतो, त्या साठी कोणती टेस्ट लागत नाही की ज्योतिषी! म्हणजे आपल्याला प्रश्न विचारल्याच्या आधीचा फक्त  काही दिवसांचाच कालावधी तपासायचा आहे, जास्तीतजास्त वीस दिवस आधीचा!

आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पुन्हा लक्ष देऊन वाचा!!

इथे आपल्याला घडून गेलेल्या घटनेचा शोध घ्यावयाचा असल्याने पत्रिकेतले ग्रहयोग पण घडून गेलेलेच पाहावे लागतील कारण सरळ आहे, घडून गेलेले योग घडलेल्या घटनां सांगतात (आणि पुढच्या काळात घडणारे योग भविष्यातल्या घटनां सांगतील!) हे जरासे नेहमीच्या होरारी अ‍ॅनालायसीस च्या उलट आहे हे लक्षात ठेवा.

गर्भधारणा झाली आहे का?

आपल्याला गर्भधारणा झाली आहे हेच ठरवायला पाहिजे. त्या शिवाय आपल्याला बाईंच्या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे देता येणार नाही, टेस्ट कशाची आहे हे सांगून काही फायदा नाही कारण बाईंना ते आधीच माहिती आहे, आता बाईंना जाणून घ्यायचे असेल ते ही ट्रीटमेंट यशस्वी होऊन गर्भधारणा झाली आहे किंवा नाही या बाबत.

आता गर्भधारणा झाली आहे का नाही हे ठरवायचे कसे?

 

क्रमश: 

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.