मी थोडा विचार केला , आपण ह्या परिस्थिती काय करु शकतो? हात दाखवून अवलक्षण करुन घेतलेच आहे आता जे जे होईल ते पाहाणेच माझ्या हातात आहे, मी दुसरे काय करु शकणार?

आणि एकदाचा ‘तो’ दिवस उजाडला…

पुढे चालू….

आजचा दिवस ‘स्पेश्यल!’

मी

तसा अस्वस्थ असलो तरी नित्यकर्मे नेहमी प्रमाणेच चालू होती त्यात कोणताही खंड पडला नाही की बदल झाला नाही. त्या दिवशीच्या माझ्या दोन्ही अ‍ॅपॉईंटमेंटस पण व्यवस्थित पार पड्ल्या.  काय होणार ही उत्सुकता होती आणि जे घडणार ते अशुभ असण्याची शक्यता असल्याने  जरासा तणाव होता हे मान्य करावेच लागेल, शेवटी मी पण माणूसच आहे ना? पण घाबरुन उगाच देव पाण्यात ठेवले नाहीत , देवा पुढे बैठक मारुन नाही बसलो ,  बाकी कर्मकांड  जपजाप्य , पोथी असले काही करत बसलो नाही. कोणाही महाराज, स्वामी, बुवा , बापू यांवर कधीच विश्वास नसल्याने त्यांना कोणाला साकडे घालणे  शक्यच नाही. जे काही व्हायचे ते होईल आणि जे माझ्या हातात  नाही त्याची मी काळजी का करु?

बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले , अजून ही काही अप्रिय घडले नव्हते, दरम्यान दोन तीन वेळा फोनची घंटी वाजली पण घाबरायला / दचकायला वगैरे काही झाले नाही.  संध्याकाळी मी नेहेमी सारखा टू व्हिलर वरुन जॉगींग ट्रॅक ला गेलो, आज स्पेशल दिवस,  वाहन चालवू नये असे क्षणभर डोक्यात आले सुद्धा पण त्याला जुमानले नाही. ग्राऊंड वर जाऊन नेहमीचे दहा राऊंड तर मारलेच शिवाय आज स्पेश्यल (?) दिवस म्हणून दोन राऊंड जास्तच मारले, होऊ दे खर्च !! जॉगींग ट्रॅक वर स्टेट  बँकेचे कर्णीक बर्‍याच दिवसांनी भेटले म्हणून त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन घरी परत आलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते ….आपली वेळ आहे ती ७:३०  ते ९:३०  ! म्हणजे आता प्रतिक्षा फक्त अर्ध्या एक तासाची !

घरच्या लायब्ररीच्या रॅक वरुन   रॉबर्ट चल्डीनी चे Influence: Science and Practice – Robert B. Cialdini चे पुस्तक बाहेर काढले. हे माझे अत्यंत आवडते पुस्तक, कितिही वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही. पुस्तक वाचता वाचता किती वेळ गेला ते कळलेच नाही,  मध्येच मी घड्याळ्यात पाहिले तेव्हा चक्क ८:१० झाले होते! अरे लक्षातच आले नाही … आपला टाइम चालू झाला म्हणायचा.. आत्तापर्यंत धीराने घ्यायचा आव आणला असला तरी आता मात्र किंचितशी धडधड जाणवायला लागली!

“ प्रत्यक्ष मृत्यू  पाहणे, मृत्यू ची बातमी कळणे, मृत्यू तुल्य वेदना होणे”

यातले काय होऊ शकेल?

मी घरातच होतो, मस्त हातात पुस्तक घेऊन खुर्चीत बसलो होतो,  कोण माझ्या समोर दम तोड्णार ? हे शक्य नाही! मृत्यू तुल्य वेदना … मला ? खुर्चीत बसल्या बसल्या असे काय घडणार ज्यामुळे मला अशा वेदना होणार ? हार्ट अ‍ॅटॅक .. शक्य नाही मला तसला काहीही त्रास नाही…मी सहजच डोक्यावरच्या काँक्रीट स्लॅब कडे पाहीले .. आता हा स्लॅब कोसळला तर ? उगाचच हसायला आले!

मृत्यूची बातमी ! करेक्ट ! हीच एक शक्यता .. आणखी काय होऊ शकते ? काहीही होणार नाही……पण काही झाले तर काय …कोणाच्या मृत्यूची बातमी ? आता प्रतिक्षा फक्त फोनची…त्या बातमीची… मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते किती खरे आहे हे पटले… किती नावे क्षणार्धात डोळ्या समोर आली… हा ? नाही नाही त्याला काय धाड भरलेय.. त्यापेक्षा तो दुसराच असू शकेल..असले  नाही नाही…हे मी काय विचार करतोय.. दुसर्‍याच्या मृत्यूचा विचार … मी का करतोय… .अरे एक साधे भाकित ते ..फक्त एक अंदाज… एक शक्याशक्यता …याहुन जास्त त्याचा काय आणि किती विचार करायचा … होऊ दे काय व्हायचे ते ..मी समर्थपणे हाताळेन ते …

मनाला बरीचशी स्वस्थता वाटली …

पुस्तक वाचन चालू ठेवले , चार – पाच पाने वाचून होतात न होतात तोच जरा तहान लागल्या सारखी वाटली म्हणून पाणी प्यायला किचन मध्ये गेलो, पाणी पिऊन बाहेर आलो….. मधल्या ड्राईंग रुम मध्ये माझा मुलगा चि. यश टी.व्ही. पाहात होता.. कुठले तरी इंग्रजी चॅनेल चालू होते. टी.व्ही. मध्ये मला फारसा इंटरेष्ट नाही, बातम्यां पलीकडे फारसा टी.व्ही. पण बघत नाही, त्यामुळे टि.व्ही. वर सध्या काय चालले असते ते मला माहीती नसते. त्यात चि.यश ची चॅनेल्स कोणती ते कसे कळणार?

पण आज का कोण जाणे , माझे टी.व्ही. कडे लक्ष गेले.. आणि माझे पाय जागच्या जागी खिळले… डोळे सताड उघडे ठेवून अगदी डोळ्याची पापणी सुद्धा न लवता मी टी.व्ही. स्क्रीन कडे पाहात राहीलो.. काय चालू होते टी.व्ही. स्क्रीन वर ?… तो टी.व्ही. स्क्रीन माझे भविष्य खरे ठरवत होता!

त्या टी.व्ही. च्या चमकणार्‍या पडद्यावर दिसत होता एक ‘मृत्यू चा खेळ’ ! एक जराजर्जर वृद्ध व्यक्ती शेवटचे आचके देत होती.. शेवटची प्राणांतिक धडपड चालू होती… आणखी एक दोन आचके… घशातून निघालेली काळजाचा थरकाप उडवणारी  घरघर ….पुन्हा एकदा आणि आता शेवटचा असा दीर्घ आचका … कलंडलेली मान … आ वासलेला जबडा .. नि:ष्प्राण  डोळे … मृत्यू ने झडप घातली होती , क्षण दोन क्षणाचा खेळ झाला आणि मग सारे कसे शांत शांत!

हो, मी प्रत्यक्ष मृत्यू  होताना पाहीला होता….अगदी माझ्या डोळ्यांनी  पण टी.व्ही. च्या स्क्रीन वर … !

भविष्य खरे ठरले… ते असे… आश्चर्यकारक रित्या…तेव्हा घड्याळात बरोबर ८:२३ वाजले होते!

नंतरच्या काळात केलेल्या अशा अनेक प्रयोगांच्या तपशीलवार नोंदी माझ्याकडे जपून ठेवलेल्या आहेत. ‘युरेनियन’ पद्धती काम करते, पडताळे देते यात शंकाच नाही.

मी स्वत: इंजिनियर असल्याने काहीसा शास्त्रीय पिंड आहेच, त्यामुळे कोणतीही गोष्ट आंधळेपणाने किंवा ‘बाबा वाक्यम प्रमाणं’ अशी स्विकारत नाही. या सगळ्या प्रयोगा नंतर मला वारंवार याची खात्री पटत गेली की जर ‘युरेनियन’ पद्धती देत असलेली प्लॅनेटरी पिक्चर्स काळजीपूर्वक तपासून , त्यांचा सुसंगत अर्थ लावता आला तर ८०% कॉम्बॉनेशन्स / प्लॅनेटरी पिक्चर्स आपल्याला भविष्यतल्या घट्नांचा अचूक अंदाज देतात आणि त्यांचा पडताळा ही मिळतो. खरेतर हे प्रमाण १००% असायला हवे पण काही केसेस मध्ये असा प्रत्यक्ष पडताळा मिळतोच असे नाही, अनेक अप्रत्यक्ष मार्गाने हा पडताळा मिळाल्यावाचून राहात नाही. जसे मला वर सांगीतलेला पडताळा टी.व्ही. च्या माध्यमातून मिळाला होता. मी तपशीलवार ठेवलेल्या नोंदी सांगतात की असा अप्रत्यक्ष पडताळा अनेक मार्गाने मिळत असतो, फक्त ते लक्षात येणे काहीसे अवघड असते.

काही मासलेवाईक उदाहरणेंच द्यायची तर:

प्लॅनेटरी पिक्चर्स नी दर्शवलेली घटना माझ्या आयुष्यात घडली नाही पण माझ्या जवळच्या / परिचयाच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडली आणि तसे काहीही ठोस कारण नसताना त्या व्यक्तीने ती घटना मला आवर्जुन कळवली! का ?

चार – पाच वेळा अशा दर्शवलेल्या घटना , समोरच्या टी.व्ही. स्क्रिन वरच्या घट्नांतून सामोर्‍या आल्या ! तसेच काहीवेळा तशा घटना मी वाचत असलेल्या कथा / कांदंबरीत घडताना वाचल्या ! काही वेळा हे काम वृत्तपत्रातील एखाद्या बातमी ने केले होते.

आणि काही वेळा ह्या प्लॅनेटरी पिक्चर्स नी दर्शवलेल्या घटनां मला पडलेल्या स्वप्नां मधून  घडताना दिसल्या !

काही वेळा या घटना काहीसा वेगळ्या अंगाने , मानसिक द्वंद्वाच्या रुपात समोर आल्या! काही वेळा तरल भावनांच्या आंदोलनांच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या , काही वेळा निष्कारण झालेल्या गैरसमजांच्या माध्यमातून पडताळा मिळाला.

ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा किती जवळचा संबंध असतो हेच त्यातून सिद्ध झाले. सर्वच अनुभव भौतीक मिती ( फिजिकल प्लेन) मध्ये मिळतील असे नाही तर मानसिक आंदोलने / ताणतणाव / भाव भावनांतला बदल (सायकॉलॉजीकल प्लेन) आणि बौद्धीक संप्रेरणां (इंटलेक्चुअल प्लेन) मधून घटना घडत असतात, फक्त आपल्याला त्याची जाणिव होईल इतक्या त्या उठावदार नसतात किंवा हवा , पाणी, अन्न, ध्वनी , वृत्तपत्रें, टी.व्ही. चॅनल, राजकाणी, फेसबुक , व्हॉट्सॅप अशा असंख्य प्रकाराने होत असलेल्या प्रदुषणाने आपल्या सगळ्याच संवेदना बोथट झालेल्या असल्याने आपली मानसिक क्षमता हे अनुभव घेऊ शकत नाही.

यावर मी बरेच प्रयोग केले, अनुभव घेतले निरिक्षणं नोंदवली. इबर्टीन,, विट्टे, निगमन, रॉबर्ट हॅन्ड , मार्था या लोकांनी जे अजोड संशोधन करुन ठेवले आहे त्याचा पुन्हा पुन्हा पडताळा येत राहीला.

जे डोळ्याला दिसते तेव्हढेच विश्व नसते , आपल्या अनुभवाची, जाणीवेची व्याप्ती त्याहुनही बरीच खोल आणि विस्तृत असते आणि युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी सारखी पॉवरफुल टूल्स ह्या अनुभवांचा देखील वेध घेऊ शकतात हे यातून सिद्ध होते.

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. vaikhari vaidya

  Hi yogayogachi goshta vaatate.Tumhi ha prasang airvi pahun visrunhi gela asta pan bhavishya mahiti aslyane sangati laavlit ase zale ka??

  0
  1. सुहास गोखले

   वैखरीजी,

   माझा हा लेख मला आलेल्या भविष्याचा पडताळा म्हणून लिहला आहे. मी एक अभ्यास म्हणून स्वत:चेच ज्योतिसः पाहीले होते , प्रसंग अभद्र होता त्यामुळे तो खरा ठरतो का याबद्दल उत्सुकता होती, ग्रहांचे परिणाम शारीरीक, मानसीक , भावनिक आणी परामनसीक अशा अनेक पातळ्यांवर काम करते आणि दाखले देते हेच मला सांगायचे होते. . बाकी तुम्ही लिहले आहे तसे ‘योगायोगाची गोष्ट वाटते’ याला मला काहीही प्रतिवाद करायचा नाही असेच बोलायचे तर सगळे ज्योतिसशास्त्र या ‘योगायोगाची गोष्ट ‘ ‘बोला फुलाला गाठ’, ‘कावळा बसला आणी फांदी मोडली’ या गटात टाकता येईलच ना? मी जे लिहतो पुरेशा गांभिर्याने लिहतो, मुळात या ज्योतिषशास्त्रात काहीतरी दम आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे

   अभिप्रया बद्दल धन्यवाद
   सुहास गोखले

   0
 2. संतोष

  नमस्कार सुहासजी,

  https://suhasgokhale.wordpress.com/2017/02/01/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/comment-page-1/

  मागे तुम्ही comment मध्ये लिहिल्याप्रमाणे कृपया युरेनियन पद्धतीच्या लिंक पाठवलं का? माझ्या इमेल ला पाठवल्या तरी चालेल.

  आपला आभारी,
  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   युरेनियम अ‍ॅस्ट्रॉलॉजीबाबत अडचण ही की ह्या विषया बाबतची स्पेशल माहीती सहसा ओपनली उपलब्ध नसते ! पुस्तके फार कमी आहेत, बरीचशी आऊट ऑफ प्रिंट आहेत , जी जुनी पुस्तके उपलब्ध आहेत ती अवाच्यासव्वा महाग आहेत , एका पुस्तकाची किंमत 500 डॉलर (35000 रुपये!) असते. युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी बद्दलची खरी (अस्सल) माहीती. खास नोट्स, प्रायव्हेट एडीशन पुस्तके, केस स्ट्डीज , प्रोप्रायटरी डायल्स इ गोष्टी फक्त खास गोटातल्या व्यक्तींनाच उपलब्ध होतात, अशा खास गोटात प्रवेश मिळणे सहज शक्य नसते. त्यामुळे ‘ युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ असे गुगल सर्च केला तर जे काही मिळेल त्यावरच समाधान मानावे लागते.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.