‘काही बोलायचे आहे’ मालिकेतले पुढचे लेख ग्राफीक्स अपूर्ण असल्याने जराशा विलंबाने प्रकाशीत होतील. मधल्या वेळेत , पूर्वीच लिहून ठेवलेला एक लेख दोन भागात आपल्या समोर सादर करत आहे, गोड मानून घ्यावा ही विनंती’

मी माझी स्वत:ची पत्रिका फारशी बघत नाही. आता हलवाई स्वत:च मिठाई खात बसला तर मिठाई विकणार कोणाला? पण काही वेळा मला माझी पत्रिका तपासावी लागते पण माझ्या स्वत:च्या भविष्यात काय घडणार आहे ते जाणुन घेण्यासाठी नाही. भविष्य जाणायचे नाही  मग पत्रिका तरी का बघायची ?  कधी कधी पाहावी लागते  , स्वत:च स्वत:चा जातक बनून …. मीच जातक आणि मीच ज्योतिषी …

त्याचे असे झाले…

सा

धारण तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. एके दिवशी पोष्टमन ने अमेरिकेहून आलेले पार्सल हातात ठेवले, ज्याची मी गेले वीस – पंचवीस दिवस अगदी आतुरतेने वाट पहात होतो. पार्सल मध्ये हॅन्स निगमन चे ‘दि की टू युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ (The Key to Uranian AstrologyHans Niggemann ) हे पुस्तक होते! ज्योतिषशास्त्रावरची माझ्या कडे ३०० हून अधिक पुस्तकें आहेत पण हे पुस्तक मिळणे ही माझी आत्ता पर्यंतची सगळ्यात मोठी उपलब्धी होती,  हॅन्स निगमनचे हे पुस्तक कमालीचे दुर्मिळ, मुळात हे पुस्तक प्रायव्हेट  सर्क्युलेशन साठी असल्याने अगदी मोजक्या प्रतीं छापल्या गेल्या होत्या , त्यातच पुढे ‘कॉपी राईट्स’ चा काही वाद निर्माण झाल्याने हे सर्क्युलेशन थांबवण्यात आले. त्या आधी वितरीत झालेल्या काही मोजक्या प्रतीं पैकी एक माझ्या हातात पडली होती, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. अर्थात त्यासाठी मी अव्वाच्या सव्वा किंमत मोजली होती हा भाग वेगळा! आजही अधून मधून या पुस्तकाची एखादी प्रत जुन्या बाजारात विकायला येते, अगदी आजही (२१ डिसेंबर २०१६) अशी एक कॉपी फक्त ५०० डॉलर (रुपये ३५,०००) मध्ये उपलब्ध आहे! माझे नशिब चांगले असेल म्हणा पण मला हे पुस्तक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत खूपच स्वस्तात मिळाले. बहुदा विकणार्‍याला आपण काय विकतोय याची कल्पना नसावी!

‘युरेनियन’ ही ज्योतिषशास्त्रातली सगळ्यात नविन पण अतिप्रगत, अति अचूक अशी पद्धती आहे,  मी ‘अतिप्रगत, अति अचूक पद्धती’ म्हणतोय हे लक्षात घ्या! युरेनियन च्या अभ्यासाची माझी सुरवात रेनोल्ड इबर्टीन च्या ‘कोसी’ने झाली (The Combination Of Stellar Influences– Reinhold Ebertin) . हे ‘कोसी’  वाचले आणि ह्या सिस्टीम  ची ताकद लक्षात झाली.

‘कोसी’ ने मला अवाक केले होते! ज्योतिषा वरची इतकी पुस्तके वाचलीत पण ‘कोसी’ ने जेव्हढे मला वेड लावले तितके कोणत्याच पुस्तकाने नाही.

मार्था लँग वेसकॉट चे ‘आर्किटेक्टस ऑफ टाईम’ Architects of Time— Martha Lang Wescott  हे असेच दुसरे थक्क करुन टाकणारे पुस्तक! ‘कोसी’ पाठोपाठ मी ‘अल्फ्रेड विट्टेचा रुल्स फॉर प्लॅनेटरी पिक्चर्स हा ग्रंथराज वाचला (Rules for Planetary-Pictures: The Astrology of Tomorrow—-Alfred Witte. ) आणि या ‘युरेनियन’ सिस्टीम चे गारुड माझ्यावर सुरु झाले  ते आजही टिकून आहे! ‘कोसी’ आणि ‘विट्टे’ मधून युरेनियन ची थिअरी सांगण्यात आली आहे पण हे पुरेसे नाही. ही थिअरी प्रत्यक्षात / व्यवहारात कशी आणायची याचे ‘बायबल’ म्हणजे हॅन्स निगमनचे ‘दि की टू युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी’!

आता कोणतीही नवीन पद्धती शिकताना त्यातल्या नियमांची पडताळणी करण्यासाठी आपल्या स्वत:च्या पत्रिके शिवाय दुसरी चांगली पत्रिका कोणती! आपल्याला स्वत:च्याच आयुष्यात घडलेल्या सर्वच घटनां अगदि बारीक सारीक तपशीलां सकट माहिती असतात त्यामुळे नियमांचा पडताळा घ्यायला आपली स्वत:ची पत्रिका ही आदर्श पत्रिका असते. दुसर्‍या कोणाच्या पत्रिके बाबत आपल्याला एव्हढा आत्मविश्वास कधीच येणार नाही.

‘युरेनियन’ सिस्टीम चा पडताळा घ्यायचा तर अगदी अचूक जन्मवेळेची पत्रिका लागते, ‘युरेनियन’ सिस्टीम फारशी प्रचारात नाही त्यामागे हाच केवळ एक मोठा अडसर आहे!) सुदैवाने माझी जन्मवेळ अचूक आहे!युरेनियन’ सिस्टीमचा अभ्यास चालू असताना माझ्या आयुष्यात घडलेल्या बारीक सारीक घटनांचा सुद्धा तंतोतंत पडताळा येत राहीला, माझ्या आत्मविश्वास दुणावला, वाटले, चला इतके सारे बरोबर येत आहे तर भविष्यातल्या काही घटनांचा वेध घ्यायला काय हरकत आहे! खरे तर मी हे करायला नको होते पण उत्साहाच्या भरात मी वाहावत गेलो.

कॅलक्युलेशन्स करत गेलो, काही घटना ज्या अगदी नजिकच्या काळात घडू शकतील अशा हेरण्याचे काम सुरु झाले. थोड्याच प्रयत्नात मला एक अतिशय प्रॉमिसिंग प्लॅनेटरी पिक्चर सापडले… त्याचा अर्थ लावला आणि  मी नखशिखांत हादरलो, हतबुद्ध झालो, डोळ्यापूढे अंधारी पसरणे / काजवे चमकणे  म्हणजे काय याचा अनुभव घेतला मी तेव्हा… काय घटना दाखवत होते ते प्लॅनेटरी पिक्चर ? ….

मृत्यू’!  हो ‘मृत्यू’ … मी पुन्हा पुन्हा पुस्तक वाचले, त्यातली वाक्ये पहात राहीलो… अर्थ अधिक स्पष्ट होत गेला.. ‘नजिकच्या काळात मृत्यू किंवा मृत्यू सदृष्य घटना!” अशी घटना! माझ्या आयुष्यात ? कधी ? गणिते केली, ट्रॅन्सीट्स तपासली , मला नेमका कालावधी मिळाला, नेमका म्हणजे किती ? अगदी … ‘दिवस- तास ‘ असा … अमुक अमुक दिवशी संध्याकाळी आठ ते नऊ !

भारतीय पारंपरीक ज्योतिषशास्त्राचा चा चांगला अभ्यास असल्याने मला हे नक्की माहीती आहे की माझा ‘जय हिंद – जय महाराष्ट्र ‘ इतक्या लवकर नाही , म्हणजे ‘मृत्यू’ माझा नाही ! मग कोणाचा? दुसर्‍या कोणाचा असेल तर तो माझ्या पत्रिकेत का दिसावा? तो देखिल इतका स्ट्राँग?  जर्मनी मध्ये माझा एक ज्योतिषी मित्र आहे, ‘कार्ल’ त्याचे नाव,  शेवटी कार्लला सगळा डेटा देऊन त्याचे मत विचारले, त्याचा ‘युरेनियन’ चा दांडगा अभ्यास ! दोन दिवसात त्याचे उत्तर आले… मी हेरलेले प्लॅनेटरी पिक्चर अगदी अचूक होते , त्याचा अर्थ मी बरोबर लावला होता पण त्याच्या मते मी जरा टोकाचा अर्थ लावला होता… मृत्यू ही घट्ना माझ्या साठी नव्हतीच (म्हणजे माझा माझा ‘जय हिंद – जय महाराष्ट्र ‘ नाही ! ) पण मी त्या काळात  अमुक अमुक दिवशी संध्याकाळी आठ ते नऊ या काळात मृत्यू  चा अनुभव घेणार होतो, यात प्रत्यक्ष मृत्यू  पाहणे, मृत्यू ची बातमी कळणे, मृत्यू तुल्य वेदना होणे असे काहीतरी असू शकते!  कॉलेजात शिकत असताना ‘हवा टाईट ‘ असा शब्द प्रयोग करत असू त्याची आठवण झाली… खरेच हवा टाईट झाली होती. मी पुन्हा ’कार्ल ‘ ला विचारले .. बाबारे याला टॉलेरंस किती असू शकतो..म्हणजे बरोबर ठरण्याची शक्यता किंवा घटना मागेपुढे होण्याची शक्यता किती?  उत्तर आले” तीन कन्फर्मेशन्स आहेत , घटना नक्की , ०.२५ डिग्रीजचा टाईट ऑर्ब वापरला असल्याने फार मागेपुढे होणार नाही, दिवस तर बद्लणार नाहीच, वेळेत जास्तीत जास्त अर्धा तास अलिकडे – पलीकडे असा फरक पडेल म्हणजे अमुक अमुक दिवशी संध्याकाळी साडेसात  ते साडे नऊ ! एक तास जास्त मिळाला…. मज्जा कर ! आत कसली मज्जा करतोय ?

मी थोडा विचार केला , आपण ह्या परिस्थिती काय करु शकतो? हात दाखवून अवलक्षण करुन घेतलेच आहे आता जे जे होईल ते पाहाणेच माझ्या हातात आहे, मी दुसरे काय करु शकणार?

आणि एकदाचा ‘तो’ दिवस उजाडला…

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

14 प्रतिक्रिया

///////////////
 1. आन्नासाहेब गलांडे

  युरेनीयन सीस्तिम v/s पांर. भारतीय ज्योतिष. बघुया कशी कुस्त्ती होतिया!
  आनी हो, “कार्ल” ला पन हे सांगा.
  ता. क.- दु धारी तलवार कशाला म्हनतात ते याला.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अण्णासाहेब ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा लेख रंजक वाटला याचे समाधान आहे. या लेखाचा दुसरा भाग बराच खुलासा करुन देईल.

   सुहास गोखले

   0
 2. Suresh

  khup adhi vatayache astrology ha prakar western madhye faar uthal ani chukicha ahe ani to fakt te monthly rashi bhavishya detat (tehi sun sign varun) tevadhach maryadit ahe…
  Good to know such details about western astrology…
  hi Uranion ani KP ekmekannna Poorak ahet ka? aslyaas kahi samanata ahe ka donhimadhye?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपल्या कडे जसे राशी भविष्य असते तसेच वेस्टर्न वाल्यांचे ‘सन साईन्स’ पण वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी चांगली प्रगत आहे. सध्याच्या ज्योतिषशास्त्रात जे नविन संशोधन होते आहे ते बहुतांश या वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्येच हे मान्य करावे लागते. खासकरुन मानसशास्त्रीय अंगाने पत्रिकेचे अ‍ॅनॅलायसीस केले जाते तो भाग आपण सगळ्यांनी आवर्जुन शिकला पाहीजे.मुळात वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी चा सारा भर हा ‘कॅरेक्टर रिडिंग्ज’ वर असतो , इव्हेंट पिरिडिक्शन (लग्न कधी होईल , नोकरी कधी लागेल ) ला ते लोक फारसे महत्व देत नाही. त्यापेक्षा त्यांचे जे ‘SWOT’ अअ‍ॅनॅलायसिस असते त्याचा आपल्याला जास्त उपयोग होतो. लग्न कधी हे जाणून घेण्यापेक्षा ते लग्न सुखी असेल का किंबहुना असे लग्न सुखी करण्यासाठी मी काय करु शकतो हा प्रश्न महत्वाचा असावा. नोकरी कधी मिळेल या पेक्षा पत्रिके नुसार मी कोणत्या क्षेत्रात काम केल्यास मला जास्त समाधान लाभेल किंवा माझ्यात असे कोणते टॅलेंट आहे की जे वापरुन मी माझे आयुष्य सुखी करुन घेऊ शकेन हे जाणून घेणे जास्त महत्वाचे असावे. वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्ये याचाच जास्त वापर होतो आणि तो बरोबर ही आहे. एखाद्या विषीष्ट घटनेचा बाऊ करुन घेऊन त्याचा कालनिर्णय करत बसणे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ‘उपाय – तोडगे’ शोधत बसणे हा चुकीचा पायंडा आपल्या शास्त्रात पडला आहे. वेस्टर्न मध्ये अशा घटनेला मी कसे तोंड दऊ शकेन याचा जास्त विचार होतो आणि उपाय – तोडग्यां पेक्षा असा केलेला विचारच आपल्याला जास्त मदत करु शकतो.

   वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रॉलॉजी जी मोठ्या प्रमाणात वापरतो ती जरी कालनिर्णयाच्या बाबतीत कमकुवत असली तरी प्रश्ना संदर्भात जी माहीती वेस्टर्न अ‍ॅनॅलायसिस देऊ शकते ते आपल्या पारंपरीक आणि के.पी. द्वारा मिळवता येणे अवघड आहे (किंवबुना इव्हेंट प्रिडिक्शन च्या नादात असा प्रयत्न ही केला जात नाही , आपल्याकडे)

   युरेनस (हर्षल) , नेपच्युन सारख्या अती ताकदवान ग्रहां कडे आपले ज्योतिषी फार दुर्लक्ष करतात ही एक मोठी चूक होते आहे. पाश्चात्य अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्ये हे दोन ग्रह तर वापरतातच शिवाय अनेक फिक्स्ड स्टार्स, अरेबिक पार्ट, अ‍ॅस्ट्रॉईड शिवाय गणीताने सिद्ध केलेले ट्रांस प्लुटॉ (प्लुटॉ च्या कक्षे बाहेर) प्लॅनेट्चा पण खुबीने वापर होतो. दशा पद्धतीचा अतिरेकी (अपुरा) वापर आपल्या कडे होतो पण दशा पद्धती इतक्याच पॉवरफुल कालनिर्णय पद्धती जश्या प्रोग्रेशन्स , रिटर्न्स, डायरेक्शन्स ते लोक वापरतात , आपल्या कडे याची साधी तोंड ओळख सुद्धा नाही. ग्रहयोगांचा (अस्पेक्ट्स) वापर आपल्या कडे सुक्ष्मतेने होत नाही ही आणखी एक चूक होते आहे. ट्रांसिट्स चा सुद्धा विचार वर वरचा आणि तो सुद्धा एकांगी विचार केला जातो , (फक्त चंद्र राशी कडून , वस्तुत: लग्नावरुन पाहीलेले गोचर भ्रमण जास्त अचूक माहीती देते)

   के.पी. आणि युरेनियन मध्ये काहीही साम्य नाही. मी आधी लिहले आहे तसे के.पी. ही अत्यंत मर्यादीत आणि केवळ इव्हेंट प्रीडीक्शन साठी निर्माण केली आहे, अत्यंत नॅरो फोकस आणि महत्वाच्या अनेक घटकां कडे ( ग्रहयोग, कारकत्वे, बलाबल, वर्ग कुंडल्या) कमालीचे दुर्लक्ष केलुआने के.पी. अत्यंत मर्यादीत झाली आहे. अचूकतेच्या अतिरेकी अट्टाहासात ज्योतिष शास्त्राचा मुळ गाभा कोठेतरी हरवला आहे. त्या तुलनेत युरेनियन किंवा तत्सम पद्ती बर्‍याच विस्तृत आहेत.

   सुहास गोखले

   0
 3. Umesh

  Sir chhan
  Navin padhati mahiti milate aapalyakadun sir aapan dowsing baddal lekh lihu shakata ka kiva tyanchya book chi nave dili tar bar hoil.
  Aapale lekh he boudhik asatat.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. उमेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   डाऊसिंग पेंडुलम बद्दल मी बरेच वाचले आहे, प्रयोग केले आहेत , माझे एक चिनी मित्र आहेत त्यांनी याबद्दल मला बरीच माहीती दिली आहे, माझ्या कडे त्यांनीच भेट दिलेला उत्तम पेंडुलम सुद्धा आहे, पण या डाऊसिंग तंत्राचा उपयोग अगदी मर्यादीत असतो त्यामूळे मी हल्ली हे तंत्र फारसे वापरत नाही. मी ह्या विषयावर एक लेखमाला लिहायच्या हेतुने काही जमवाजमव केली होती, एक पायलट लेख पण ब्लॉग वर दिला होता पण वाचकांच्या अत्यल्प प्रतिसादा मुळे ती लेखमाला आवरती घेतली. वेळ मिळाला तर पुढे मागे या मालिकेतले उरलेले लेख प्रसिद्ध करन.

   सुहास गोखले

   0
 4. Santosh

  नमस्कार सुहासजी,

  युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी बद्दल थोडक्यात माहिती दिलीत (एखादा नवीन लेख) तर ह्या पद्धतीचे उपयोग कळतील आणि काही केस स्टडी पण असल्यास ह्या पद्धतीचा आवाका कळेल.
  हि पद्धत शिकण्यासाठी कोणती पुस्तके किंवा काही लिंक दिल्यात तर उपयोग होईल.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी ,

   युरेनियन अ‍ॅस्टॉलॉजी विषय गंभिर आणि किचकट आहे , त्यावर लेख लिहला तर फार थोड्या वाचकांना समजेल, मी पूर्वी अशा काही विषयांवर लेख लिहले होते पण फार्च कमी प्रतिसाद लाभतो अशा लेखनाला. या विषयावर पुस्तके ही फार कमी आहेत आणि जी आहेत ती जराशी अ‍ॅडव्हांस आहेत, पुस्तके दुर्मिळ आहेत आणि महाग आहेत किंमती दोन हजाराच्या पुढे असतात , भारतात मिळत नाहीत , परदेशातून मागवावी लागतात. तुम्ही प्रथम इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहीती वाचून समजाऊन घ्या काही समजते आहे , इंटरेस्ट येतो आहे असे वाटले तर मग अशी काही पुस्तके संग्रहात ठेवावीत असे मी सुचवतो. आणखी एक अडचण म्हणजे ही पद्धती वापरायला आपल्याकडे तसले सॉफ्ट्वेअर लागते त्यासाठी दहा हजार खर्च येतो. हाताने कॅलकुलेशन करणे शक्य असले तरी फार वेळ खाणारे आहे , चुका होऊ शकतात.

   मुळात ही पद्धती ‘ कॅरॅक्टर अ‍ॅनालायसिस ‘ साठी जास्त उपयोगी आहे (इव्हेंट अचूक सांगता येतात पण त्यासाठी +/- 1 मिनिटाच्या आतली जन्मवेळ लागते ) पण आपल्याकडे असे ‘कॅरॅक्टृ अ‍ॅनालायसिस’ कोणाला नको असते! उपाय – तोडगे मागणारेच जास्त (सगळेच?)

   सुहास गोखले

   0
 5. Omkar Jamsandekar

  सर एकदा पेन्डूलिम आणि बाबाजींवरची लेख किंवा लेखमालिका येउ द्यात, म्हणजे अतार्किक किंवा पॅरानॉर्मल लेव्हलच्या अनुभवाविषयी, मराठी साहित्य ही समृद्ध होईल. फार नाही इतुकेचि मागणे पामराचे

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री ओमकारजी ,

   गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेले सर्व लेख आधीच लिहून ठेवलेले होते त्यामुळे लगेच पाठोपाठ प्रसिद्ध केले इतकेच. आता आधीच लिहून ठेवलेले लेख संपले, नविन काही इतक्यात येईल असे वाटत नाही कारण सध्या माझ्या वेबसाईट चे राहीलेले काम पूर्ण करायच्या गडबडीत आहे , इंग्रजी ब्लॉग चे पुनरुज्जीवन करत आहे त्यात बराच वेळ जात आहे , ही कामें पूर्ण झाले की मागचे काही अपूर्ण लेख नक्की पूर्ण करेन थोडी प्रतिक्षा करायला लागेल.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.