अरविंदजींचा ज्योतिषशास्त्रावर म्हणले तर विश्वास होता म्हणले तर नाही. म्हणजे दिवसा उजेडी ज्योतिषाला कडाडून विरोध तर रात्री मागच्या दाराने ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असा दुटप्पीपणा होता! माझ्या कडे ते आले तेच मुळी ज्योतिष हे शास्त्र नाही, थोतांड आहे , बकवास आहे अशी भुमिका घेऊनच…

“माझा काही विश्वास नाही..”

“ठीक आहे , आपला ज्योतिषशास्त्रा वर विश्वास नाही मग माझ्या कडे का आलात ?”

“एकदा खरे-खोटे काय त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे मला!”

“तुमचा विश्वास नाही ना झाले तर मग , खरे-खोटे ठरवायच्या भानगडीत तरी कशाला पडता, त्याने काय फरक पडणार आहे ? ज्यांचा विश्वास आहे, ज्यांना या शास्त्राचा पडताळा आला आहे, ते लोक आमच्या कडे येतच राहतील. ज्योतिषी आणि ज्योतिषशास्त्र अशा लोकां साठीच आहे”

“एखाद्याचा या शास्त्रावर विश्वास असला काय किंवा नसला काय, तुमच्या ग्रहतार्‍यां मध्ये फरक थोडाच पडणार ते सगळ्यांना सारखेच! पत्रिका त्याच , गणितं तीच  , लॉजीक तेच  , तुमची प्रोसेस पण बदलणार नाही , मग ज्योतिषावर विश्वास असायला हवी ही अट कशाला? विश्वास असण्याचा ज्योतिष बरोबर येण्याशी – न येण्याशी काय संबंध?”

अरविंदजी एकदम ‘अंनिस’ स्टाईल बोलत होते. अर्थात हे मला नविन नाही कारण अशा बर्‍याच ‘अंनिस’ वाल्यांशी माझ्या चकमकी झालेल्या आहेत.  अशा अनुभवातून मी एक शिकलो आहे ते म्हणजे या मूर्खांच्या तोंडाला लागायचे नाही, यांना काही पटवूत देत बसायचे नाही. ना आगा ना पिछा, ना कोणता अभ्यास , हे निघाले वाद – विवाद घालायला. त्यांच्या कडे जरी रिकामा वेळ असला तरी माझ्याकडे नसतो ना! आणि वेळ असला तरी असल्या फालतु वादविवादात तो कशाला खर्च करु, मनोरंजनाचे किती तरी चांगले मार्ग समोर आहेत ना!

आत्ताही मी तेच ठरवले , ह्या कोणा अरविंदजींशी वाद घालण्यात वेळ दवडणे मला परवडणारे नव्हते, मी शांतपणे त्यांना सांगीतले..

“अरविंदजी, या विषयाचा मी दहा पेक्षा जास्त वर्षे अभ्यास केला आहे ,  दिवस दिवस वाद घालू शकेन इतकी क्षमता राखून आहे मी, पण म्हणून  येईल त्या व्यक्तीशी या विषयावर  वाद- विवाद घालत बसायला मला  वेळ नाही, आपण ज्योतिष विचारायचे आहे म्हणून फोन केलात म्हणून मी तुम्हाला अपॉईंटमेंट दिली आहे, वाद – विवाद घालण्या साठी नाही हे लक्षात घ्या. आपल्याला जर ज्योतिषशास्त्रा द्वारे काही मार्गदर्शन  हवे असल्यास आपण बोलू अन्यथा आपण यावे हे बरे”

“तुम्ही तर एकदम रागावलात, माझा वाद – विवाद घालायचा हेतु नाही, मी त्यासाठी आलोच नाही, पण एक शंका होती मनात म्हणून विचारले इतकेच. “
“ठीक आहे , आपण आता मुद्द्याचे बोलू , आपल्याला कोणत्या बाबतीत मार्गदर्शन हवे ते सांगीतल्यास मला काम करता येईल”
….

अरविंदजींचा प्रश्न होता ‘प्रमोशन कधी मिळेल? लागोपाठची दोन वर्षे ह्या प्रमोशन ने त्यांना हुलकावणी दिली होती , या वर्षी तरी प्रमोशन मिळावे अशी त्यांची इच्छा होती…

असे प्रश्न मी नेहमीच प्रश्नकुंड्लीच्या माध्यमातून सोडवतो,  जन्मकुंडलीची साक्ष पण घेतो पण मुख्य भर प्रश्नकुंड्लीवरच असतो.

प्रश्नकुंड्ली साठी  काही निकष मात्र पूर्ण व्हावे लागतात त्यातला महत्वाचे म्हणजे जातकाची नियत! जातक खरोखरीचा मार्गदर्शन घ्यायला आला आहे का ज्योतिषाची टिंगल ट्वाळी करण्या साठी , परीक्षा घेण्यासाठी हे तपासावे लागते, दुसरा निकष म्हणजे जातकाचा प्रश्न खर्‍या तळमळीचा आहे की  उगाच आपले खडा टाकून बघितल्या सारखा प्रश्न विचारला जात आहे, हे पण तपासावे लागते.

या दोन्ही अंगाने विचार करता , अरविंदजी आणि त्यांचा प्रश्न चक्क ‘नापास’ झाले होते पण अरविंदजी माझ्या समोर आलेल्या वेळेचा ‘कन्सलटेशन चार्ट’ काहीसा अनुकूल कौल देत होता म्हणून मी पुढे जायचे ठरवले.
अरविंदजींचा ज्योतिषशास्त्रा वर विश्वास नाही किंवा त्यांना या बाबत शंका आहेत अशा परिस्थितीत जातका कडून होरारी नंबर घेण्यापेक्षा मी ‘कन्सलटेशन चार्ट’ वापरुनच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे ठरवले.
‘कन्सलटेशन चार्ट’ चा अभ्यास करताच माझ्या लक्षात आले की जातकाची प्रमोशन ची इच्छा पूर्ण होणार आहे, ती ही अगदी लवकरच, आणखी थोडे अ‍ॅनॅलायसिस करुन मी अरविंदजींना सांगीतले…

“आपले रखडलेले प्रमोशनचे काम होणार, अडीच महीन्यात , आज  नोव्हेंबर ची सत्तावीस  तारीख त्या हिशेबाने ची साधारण फेब्रुवारीच्या दुसर्‍या  आठवड्यात. एखादा आठवडा मागे – पुढे होऊ शकतो पण जे होईल ते फेब्रुवारीतच “

‘अंनिस’ वाले झाले म्हणून काय, झालेला आनंद अरविंदजी लपवू शकले नाहीत पण क्षणात त्यांनी सावरले. आपला ‘अंनिस’ वाला मुखवटा  पुन्हा एकदा तोंडावर चढवत म्हणाले ….

“नक्की, गॅरंटी देताय ?”

“अरविंदजी , ज्योतिषात गॅरंटी वगैरे काही नसते , आपले आयुष्य अशा कोणत्याच ‘गॅरंटी / वॉरंटी ‘ सहीत येत नाही, मात्र आयुष्यात अगणित संधीं आणि शक्यता आपल्यासाठी वाट पहात असतात. आमचे शास्त्र ह्याचाच अंदाज देत असते. ज्योतिष हे फक्त शक्याशक्यता probabilities सांगू शकते. ही या शास्त्राची मर्यादा आहे असे समजा वाटल्यास. हा सांगीतलेला कालावधी आपल्याला अनेक बाबतीत लाभदायक ठरेल असे ग्रहमान आहे, प्रमोशन मिळाले नाही तरी कोणता ना कोणता तरी आर्थिक लाभ, मान- मरातब, नोकरीत काही चांगल्या घटना , आगामी प्रगतीचे काही संकेत मिळणे असे काही तरी घडेल”

“तुम्ही सगळेच कव्हर केलेत”

“नाही , अरविंदजी ‘सगळेच’ हा जरा चुकीचा शब्द वापरला आहे तुम्ही, मी तुम्ही आजारी पडाल, अपघात होईल, नविन घर खरेदी कराल, बायको भांडून माहेरी जाईल , मुलाला हव्या असलेल्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळेल, लॉटरी लागेल, मेव्हण्याचे दारुचे व्यसन सुटेल, घरच्या मांजरीला ३ पिल्ले  होतील …  अशा दहाबारा शक्यता एकाच वेळी वर्तवल्या असत्या तर तुमचे म्हणणे बरोबर ठरेल पण मी ज्या शक्यता वर्तवल्या आहेत त्या फक्त एका नेमक्या क्षेत्रा बद्दल … तुमच्या नोकरी संदर्भात!  आणि त्या  सगळ्या घटना आर्थिक लाभ , मानमरातब, चांगली बातमी अशा शुभ घटना आहेत, याला सगळेच कव्हर केले’ असे म्हणता येणार नाही. आणि हे लक्षात घ्या , मी अगदी नि:संदिग्ध , खणखणीत शब्दात भाकित केले आहे,  काही ज्योतिषी  बोलतात तशी  ‘प्रमोशन मिळेल किंवा नाही ही ‘ अशी गुळमुळीत  , दोन्ही डगरींवर हात ठेवणारी भाषाही नाही वापरली ”

“ठीक आहे , नोव्हेंबर संपत आलाच आहे, तुम्ही फेब्रुवारी म्हणता आहात म्हणजे घोडा मैदान फार लांब नाही”

“हो, येणारा काळच ठरवेल मी सांगीतलेले बरोबर आले की नाही, तो पर्यंत वाट पाहाणेच आपल्या हातात आहे नाही का?”

“बघू या काय होते ते”

“नक्की,  पण माझी एक विनंती आहे, जे काही होईल ते सांगा, अगदी माझे भाकित चुकले तरी सुद्धा. कारण अशा चुकलेल्या भाकितां मधूनच मी बरेच काही शिकत असतो”

“म्हणजे मी गिनिपिग आहे , माझ्यावर प्रयोग करताय…”

“तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात… ज्योतिष सोडा, कोणत्याही क्षेत्रात असे पोष्ट मार्टेम अ‍ॅनॅलायसिस केले जातेच , आपल्या चुका कोठे झाल्या हे त्यातून लक्षात येते आणि शास्त्रे  विकसीत होत असतात, आता राहीला विषय गिनिपिग चा.  त्या मुक्या बिचार्‍या प्राण्याला पकडून पिंजर्‍यात ठेवून नाना तर्‍हेचे प्रयोग केले जातात , हाल हाल होतात आणि जीव सुध्दा जातो ह्या असल्या क्रुर प्रयोगात,  आणि हे सगळे कोणी ज्योतिषी नाही तर तुमचे विज्ञानवादी , बुद्धी प्रामाण्य वादी शास्त्रज्ञच करत असतात ना? इथे , तुम्ही आपण हून माझ्या कडे आला आहात , मी काही तुम्हाला पकडून आणलेले नाही कि कोणती जबरदस्ती केलेली नाही, सारा स्वेच्छेचा , खुषीचा मामला होता , खरे ना”

“सॉरी, मी गिनिपिग हा शब्द वापरायला नको होता”

“असू दे. ते विसरा आता. काय होते ते सांगा, इतकीच विनंती आहे. शुभेच्छा !”

अरविंदजी निघून गेले.

नोव्हेंबर पार पडला, डिसेंबर संपला , जानेवारी गेला. फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात

अरविंदजींचा फोन आला…

“गोखले, मोठ्या गप्पा मारत होतात ते… काहीही झाले नाही तुम्ही सांगीतल्या प्रमाणे, ना प्रमोशन , ना पगार वाढ, ना चांगली बातमी, सगळे दिवस भाकड गेले.. तुमचे भविष्य १००% चुकले , आता बोला!”

“अरविंदजी, ग्रहमाना नुसार हा काळ आपल्याला अनुकूल होता, अजूनही आहे , मी वर्तवलेल्या घटनां पैकी काहीतरी घडायला हवे होते , मला जवळजवळ खात्रीच होती आणि अजुनही आहे. “

“अहो कसल्या खात्रीच्या बाता मारताय, काहीही झालेले नाही आणि होणार पण नाही”

“अद्याप काही घडलेले नाही हे मान्य पण काहीही होणार नाही असे कसे म्हणू शकता? फेब्रुवारी महीना अजून संपायचा आहे, अजून शक्यता आहे  ना”

“आमच्या इथे प्रमोशन इ. बाबी जानेवारीत ठरतात आणि फेब्रुवारीत अनाऊंसमेंट होतात देखील, तशा त्या झाल्या पण आहेत , माझे नाव त्या लिस्ट मध्ये नाही , म्हणजे माझा या वर्षीचा पण चान्स गेला, आता वर्षभर थांबावे लागणार”

“तुम्ही प्रमोशन्स ‘फेब्रुवारी’ मध्येच अनाऊन्स करतात म्हणालात ना ?  ही माहीती  तुम्ही आपल्या मागच्या मिटींग मध्ये दिली नव्हती, पण मी हे माहीती नसताना तुम्हाला ‘फेब्रुवारी’ चे पहीले दोन आठवडे बोललो होतो म्हणजे कोठेतरी ग्रहयोगांचा कौल पकडता आला होता मला”

“त्याचा काय उपयोग? मिळाले का मला प्रमोशन ? नाही ना? म्हणजे भविष्य चुकले , आता सारवासारवी करु नका”

“मी सारवासारवी करत नाही. आपण फेब्रुवारी संपे पर्यंत वाट पाहू मग बोलू”

“आता काही होणार नाही, प्रमोशन जाहीर झाली आहेत त्यात बदल होणार नाही किंवा त्यात नविन कोणती नावे जोडली जाणार नाहीत, माझा चान्स गेला तो गेलाच, संपलेय सगळे”

“मी पुन्हा एकदा आपली त्यावेळेची पत्रिका तपासतो, माझ्या नजरेतुन काही निसटले होते का . काही चुकले होते का याचा शोध घेतो. जर काही लक्षात आले तर मी आपल्याला सांगतो”

“काय उपयोग त्याचा आता. तुम्हीच शोध घेत बसा, मला काय फरक पडणार आहे त्याने. भविष्य चुकलेय तुमचे”

“मला अजूनही वाटते आपण फेब्रुवारी महीना संपे पर्यंत वाट पाहू तरीही काही घडले नाही तरच माझे भविष्य चुकले असे म्हणता येईल”

“ तुम्हीच बसा वाट बघत … “

फोन कट झाला.

मी काहीसा अस्वस्थ झालो. मी परत अरविंदजींचा तो चार्ट समोर घेतला, अनेक मार्गांनी, पद्धतींनी पुन्हा पुन्हा अ‍ॅनॅलायसिस करुन बघितले पण सगळ्यांचे उत्तर एक सारखेच म्हणजे ‘फेब्रुवारीचे पहीले दोन आठवडे ‘ असेच येत होते. इतकी सारी कनर्फमेशन्स असताना , अपेक्षीत घटना का घडली नाही याचे मला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. भविष्य बरोबर आले नाही तर नाही , होते असे काही केसेस मध्ये पण किमान  ते का चुकले याचे कारण तरी कळायला हवे होते. पण काहीच क्लूज हाताला लागले नाहीत , नाईलाजाने मी ती केस बंद केली.

मार्च महीन्याच्या अखेरीस अरविंदजींचा पुन्हा फोन आला…

“अहो , ज्योतिष शिरोमणी , फेब्रुवारी केव्हाच संपला आता तर मार्च पण संपत आला, काहीही घडले नाही तुम्ही सांगीतल्या प्रमाणे! आता तरी कबूल कराल का तुम्ही सांगीतलेले भविष्य चुकले “

“ठीक आहे मी मान्य करतो  माझे भविष्य चुकले ,  मी सदैव १००% बरोबर येईन असा दावा कधीच करत नाही. आपल्या बाबतीतही तसा कोणताही दावा केलेला नव्हता. ‘कायम बरोबर, कायमच यशस्वी ‘ असा दावा डॉक्टर, वकिल करत नाहीत, सचिन तेंडुलकरने केला नव्हता, इतकेच काय नासा , इस्रो चे शास्त्रज्ञ पण असा दावा करत नाहीत. कारण सर्वच क्षेत्रात , सर्वच कार्यात थोडी तरी अपयशाची शक्यता असतेच ना. मी आपल्याला सांगीतलेले भविष्य बरोबर आले नाही  याचा मला खूप खेद आहे , तुम्हाला जितके वाईट वाटले तितकेच मलाही वाईट वाटते. मी आपली त्या वेळेची पत्रिका पुन्हा पुन्हा तपासली आहे पण माझ्या अ‍ॅनॅलायसिस मध्ये अशी कोणतीही चूक झालेली दिसली नाही. मी सांगीतले तसे घडायला हवे होते पण ते का घडले नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. “

“जाऊ दे ना राव,  आता कितिही अ‍ॅनॅलायसिस करुन काय उपयोग, पेशंट दगावल्यावर तो कशाने मेला यावर चर्चा करुन काय उपयोग? मला काही सांगू नका… कळले तुमचे ज्योतिष”

“ठीक आहे ,  तरीही आवर्जुन फिडब्यॅक दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्याला भावी वाटचालीं साठी शुभेच्छा देतो”

यावर काहीही न बोलता अरविंदजींनी फोन आदळला…

समोर आलेल्या पत्रिकेचा पूर्ण अभ्यास करुनच मी भाकितें करत असतो असे असले तरी  वर्तवलेली सगळीच भाकितें बरोबर येणार नाहीत, काही वेळा चुकणार ह्याची मला सदैव जाणीव असते किंबहुना हही शक्यता गृहीत धरुनच मी काम करत असतो. तरीही एखादे भविष्य चुकले तर मनाला क्लेश होणार ना? त्यात अरविंदजीं सारख्या व्यक्तिच्या बाबतीत तरी हे घडायला नको होते याची मोठी खंत मनाला लागून राहीली. चालायचेच व्यवसाय म्हणले की अशा काही अप्रिय घट्नां होतच राहणार अशी मनाची समजुत घालून घेतली .

पण असे व्हायचे नव्हते … अरविंदजीच्या बाबतीत ग्रहांनी अचूक कौल दिला होता आणि तो हेरण्यात मी कोठेही कमी पडलो नव्हतो !
एप्रिल महिना सुरु होतो न होतो तोच अचानक अरविंदजींचा पुन्हा फोन आला..

“मी तुमची माफी मागायला फोन केला आहे”

“माझ्या लक्षात आले नाही”

“ते नाही का माझ्या प्रमोशन बद्दल मागे मी आपल्याला विचारले होते?”

“हां, ते हो, पण माझे त्याबाबतीतले भविष्य चुकले होते ना? तुम्हाला प्रमोशन मिळाले नाही असे काही झाले होते”

“सॉरी, मी तेव्हा खूप निराश झालो होतो, प्रमोशन मिळाले नाही त्याचा सगळा राग तुमच्या वर काढला, तेव्हा मी तसे बोलायला नको होते”

“अरविंदजी, मी आपली तेव्हाची परिस्थिती समजू शकतो, आपण तेव्हा जे बोललात ते स्वाभाविकच होते, मी सांगीतलल्या प्रमाणे काहीही घडले नाही त्याचा राग येणे , वैफल्य येणे चूक नाही, तसे पाहीले तर चूक माझ्या कडून झालेली होती असे म्हणायला पाहीजे आणि  माझे भविष्य चुकले हे मी मान्य पण केले होते. आता तुम्ही कशाची माफी मागता? “

“तुमचे भविष्य अजिबात चुकले नाही ,  १०० % बरोबर आले आहे!’

“पण प्रमोशन झाले नाही असे तुम्हीच तर म्हणाला होतात ना ?  मग भविष्य बरोबर आले कसे म्हणता? मला समजले नाही”

“त्याचे असे झाले , प्रमोशन साठी माझी निवड झाली होती  पण काही तांत्रीक अडचणीं मुळे फेब्रुवारी च्या यादीत माझे नाव समाविष्ट झाले नव्हते. पण कालच मला हेड ऑफिस कडून पत्र मिळाले, मला प्रमोशन मिळालेले आहे आणि ते कालपासुन नव्हे तर  फेब्रुवारीच्या  १० तारखेपासुन ! म्हणजे आपण जे फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात प्रमोशन होईल असे जे भविष्य वर्तवले होते ते १००% बरोबर आले , आपले अभिनंदन आणि अज्ञानातून, रागाच्या भरात मी जे काही वेडे वाकडे बोललो त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो”

“अभिनंदन ! चला म्हणजे घटना मी सांगीतलेल्या कालवधीतच घडली होती तर फक्त आपल्याला ती उशीरा कळली इतकेच !”

“हो , पण त्यामुळे मी केव्हढा मोठा गैरसमज करुन घेऊन बसलो ना!”

“होत हो असे काही वेळा त्यात काय, तुमच्या जागी मी असतो तर माझी प्रतिक्रिया ही फार वेगळी नसती, असो , ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही हा वाद बाजूला ठेवला तरी  हे जे काही आहे त्याचा पडताळा येतो, प्रचिती मिळते हे तरी पुन्हा एकदा सिद्ध झाले”

“हो, माझी तर खात्रीच पटली”

“म्हणतात ना चमत्कारा शिवाय नमस्कार नाही, असो , आपल्याला शुभेच्छा आणि कधी काळी मदत लागलीच तर सांगा…   बंदा हाजिर है”

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. suniljog

  dear Suhas,

  I always read your articles with great interest. However, during the last
  2-3 months could not read due to my busy schedule (?).
  Your study in the field is not doubt systematic and scientific, deep rooted
  with an insight of the subject which wide ocean.

  I remembered the days when I used to go to Dilip Pardeshi”s home.
  His mother was master in Kundali reading while Father was good palmist.
  Both used to argue vehemently on various topics and I was mute spectator.

  I remember one day Dilip’s mom asked me my horoscope.
  I handed over. The moment I showed her she asked me only 3 questions which
  were like straight piercing into my life

  1 Did you have eye problem in childhood ?
  Had there been a slight change in Griha, you would have been blind Sunil
  I was shocked with the correct reading

  2 You must be liking perfums and nice clothing and lavish life style
  I could not hide – she just smiled and uttered – Dont shy my lad ! How may
  affairs did you have ? again stumped

  3 I asked only one question : I am worried about my future, job what will b
  in my lap ?
  She said you will be well placed on a good position (for me a 40% graduate )
  and most of all you will have very good life partner. For which again I was
  doubtful due to my family background as you know !

  All the three predictions were told in a fraction of seconds. she always
  treated me as her second son. Nice soul

  This all remembered because of your article Ase Jatak Part 3

  Nice and thoughtful writing. I like your writing style no doubt your
  predictions are way above it.

  regds

  2017-01-26 10:37 GMT+05:30 सुहास गोखले :

  > सुहास गोखले posted: ” असे जातक येती … ३ अरविंदजींचा ज्योतिषशास्त्रावर
  > म्हणले तर विश्वास होता म्हणले तर नाही. म्हणजे दिवसा उजेडी ज्योतिषाला कडाडून
  > विरोध तर रात्री मागच्या दाराने ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असा दुटप्पीपणा
  > होता! माझ्या कडे ते आले तेच मुळी ज्योतिष हे शास्त्र ना”
  >

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुनिलजी ,
   आपण भरभरुन दिलेल्या अभिप्रया बद्दल धन्यवाद. आपल्या सारख्या रसिकां कडून अशी दाद मिळणे सोपे नाही आणि आज मला ती दाद मिळाली या सारखे दुसरे मोठे समाधान नाही.
   कै. दीलिप परदेशींच्या मातोश्रीं बद्दल ऐकून आहे पण त्यांना भेटण्याचा कधी योग आला नाही. पण आपण लिहले आहे तसे आश्चर्य कारक भविष्य वर्तवणारे काही लोक मी स्वत: अनुभवले आहे. काहींचा अभ्यास असतो तर काहींना जात्याच ही दैवी देणगी असते.
   ज्योतिषशास्त्र हे तसे दिशादर्शक शास्त्र आहे , ह्या शास्त्राच्या म्हणून अशा काही मर्यादां आहेत त्या जाणून त्या मर्यादेतच राहून काम केले तर चांगले रिझल्ट्स मिळतात असा माझा अनुभव आहे.
   हे शास्त्र फिजिक्स , केमिस्ट्री सारखे नाही यात थोडा दैवी अंश आहे , काही अनाकलनिय गोष्टी आहेत ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही किंवा दिले तरी विज्ञानवाद्यांना पटणारे नसते.
   मला जे अनुभव येत गेले ते मी शब्दबद्ध करुन आपल्या सार्‍यां समोर ठेवायचा प्रयत्न करत असतो. विषय तसा तांत्रिक असल्याने , अनेक संकल्पना , व्याख्या , शब्द प्रयोग या विषयचा गंधही नसलेल्यांना समजणार नाहीत त्यामुळे अशा विषयावरचे लेखन ‘समजले तर पाहीजे पण किचकट पण होऊ नये’ अशी एक तारेवरची कसरतच असते.
   मी प्रयत्न करत राहीन , आपले मोलाचे अभिप्राय माझा उत्साह वाढवत राहतील.

   सुहास गोखले

   0
 2. आन्नासाहेब गलांडे

  सुहासजी,शमस्व पन नबब ओफ xxxx चे पुढे काय झाले.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. आण्णासाहेब,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. ‘काहि बोलायचे आहे…” चे पुढचे दोन्ही भाग तयार आहेत , त्याचे किरकोळ एडीटिंग व ग्राफिक्स अपूर्ण आहे पण एक – दोन दिवसात ते भाग प्रकाशीत करत आहे. माझी लिखाणाची पद्धत अशी की मी मझे लेख माझ्या आवाजात रेकॉर्ड करतो. नंतर माझा मुलगा चि. यश ते सवडीने मराठीत टाईप करतो, लागणारी चित्रे , पत्रिका इ, ग्राफिक्स / ड्राईंग तयर करतो. प्रुफ रिडींग होते मी फ्क्त फायनल चेक करतो. मी असे पुढचे दहा – बारा लेख रेकॉर्ड करुन ठेवले आहेत यथावकाश सगळे प्रकाशीत होतील.

   सुहास गोखले

   0
 3. Anant

  श्री. सुहासजी,

  नेहमी प्रमाणे सुरेख लेख.

  आपले जातकाकडून अभिप्रायाबद्दल आग्रह व त्यामागील कारण याबद्दल ही एक खूप चांगली सवय आहे.
  कॉर्पोरेट जगातील लीडरशिपचे कोर्सेस हाच मुद्दा मांडतात, “फीडबॅक घेणे”.
  आपल्या अभ्यासावर व पद्धतीवर प्रचंड विश्वास त्यामुळे चूक कुठे झाली हे जाणून घ्यायची तळमळ अगदी छान मांडली व आमच्या पर्यन्त पोचली.
  या काही वैशिष्ठपूर्ण गोष्टीमुळे तुमचे वाचन आवडते व त्यामागील तुमच्या कष्टाला मनापासून अभिवादन.
  तुमचे अनुभव शब्दबद्ध करुन आम्हाला तुम्ही फार मोठया साहित्याची ओळख करून देत आहात.

  “विषय तसा तांत्रिक असल्याने , अनेक संकल्पना , व्याख्या , शब्द प्रयोग या विषयचा गंधही नसलेल्यांना समजणार नाहीत त्यामुळे अशा विषयावरचे लेखन ‘समजले तर पाहीजे पण किचकट पण होऊ नये’ अशी एक तारेवरची कसरतच असते”

  तुमच्या या कसरतीला आमचे लाख लाख धन्यवाद.

  तुमचे लेख वाचायला उशीर झाला तरी अभिप्राय नक्की देणार.
  या व्यतिरिक्त काही मदत करू शकलो तर जरुर सांगा.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय हे नेहमीच उत्साह वाढवणारे असतात.

   ज्योतिषशास्त्र जे नियम – आडाखे वापरते त्याचे तीन भाग आहेत १> इंटेईश्युन वर आधारित बनवलेले इम्पीरिकल रुल्स यांना सिद्धता नाही पण पडताळ येतो. २> तर्का (लोजीक) वर आधारीत नियम / आडाखे हे ग्रह – भाव – राशी यांच्या कारकत्वाचा (स्पेशॅलिटीज) मेळ घालून तर्काने बनवले जातात ३> निरिक्षण व पॅटर्न मॅचींग करुन , अनुभवातून .

   यातले तिसर्‍या कॅटेगोरीतले नियम किती इफिकसी ने काम करतात हे पाहण्यासाठी भविष्य वर्तवले त्याचा पडताळा घेणे अत्यावश्यक आहे, मी अशा नियमांचा आणि त्यांच्या इफिकसी चा डेटा बेस बनवत आहे जेणे करुन केवळ मलाच नव्हे तर पुढच्या पिढितल्या ज्योतिष अभ्यासकांना यांचा उपयोग होईल.

   मराठीत सध्या होते असलेले एकसुरी ज्योतिष विषयक लेखन वाचूनच कंटाळलो होतो म्हणून ज्योतिष हा विषय जरा नव्या स्वरुपात आणि जास्त रंजक पद्धतीने मांडायचा प्रयत्न करत आहे , सध्याचे माझे काही लेख हे साधारण ‘फोरेन्सीक अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ प्रकराचे आहेत , हा प्रकार हाताळणारा मराठीतला मी पहीला लेखक असेन !

   बाकी स्पष्ट वक्ते पणाच्या नावाखाली फटपळ, शिवराळ आणी कमालीची अश्लील , दर्पोक्ती ची भाषा सातत्याने वापरुन मोठी गर्दी खेचणारे काही मराठी ज्योतिष विषयक ब्लॉग आहेत ना ! तसे लिहणे तर मला अगदी सोपे आहे पण आपला तो प्रांत नव्हे !

   असो. आपले अभिप्राय वाचले की उभारी मिळते , नविन लिहावे , पुन्हा लिहावे अशी प्रेरणा मिळते यातच सगळे काही.

   सुहास गोखले

   0
 4. आन्नासाहेब गलांडे

  सुहासजी,
  काय सांगू. खूप आतुरतेने पूढील भागाची वाट पाहतोय.
  बाकी तुमचया लेखन कषटा साठि नम्र अभीवादन.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अण्णासाहेब,

   सध्या काही ट्रेनिंग़ प्रोग्रॅम्स मध्ये बिझी आहे , या आठवड्या अखेर मोकळा होईन.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.