“मला वाटते तुमची जन्मवेळ बरीच चुकीची नोंदवली गेली आहे, मोठी चुक आहे..”

“किती?”

“१२ तास !”

“क्काय !”

“हो, चक्क संध्याकाळचा  जन्म असताना सकाळचा जन्म असे नोंदवले गेले आहे”

“अहो काय बोलता! एव्हढी मोठी चूक कशी शक्य आहे?”

“अशा काही केसेस मी हाताळल्या आहेत. त्यावरुन सांगतो, अशा चुका होतात , मूळ वेळ बरोबर लिहली जाते पण त्याच्या पुढे AM / PM लिहायचे विसरतात”

“माझ्या बाबतीत असे काही झाले असण्याची शक्यता नाही”

पुढे चालू ….

या लेखाचा पहीला भाग:

असे जातक येती — २ (भाग – १)

 

“तु

मची जन्मवेळ ८:२३ ऐवजी बारा तासानी पुढची म्हणजे  २०:१८ घेतली तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्याच घटना जुळत आहेत. तुमचे शिक्षण, व्यवसाय, तुमच्यात असलेले ‘य’ हे व्यंग, तुम्हाला झालेला मोठा अपघात , तुमच्या आई – वडिलांचा मृत्यू, वडिलांच्या नोकरी मुळे सतत झालेले स्थान बदल, तुम्ही काही काळ केलेली सरकारी नोकरी आणि नंतर नोकरी सोडून स्वतंत्र प्रॅक्टीस सुरु करण्याची घटना, तुमचा आंतरजातीय विवाह, तुम्हाला मिळालेला शासकिय सन्मान, तुमच्या परदेश वार्‍या , तुमच्या मुलीचा जन्म .. सगळ्या घटना अचूक जुळत आहेत. आता तुमची माहीती असलेली किंवा त्या ‘XXXX’ नी शुद्ध केलेली जन्मवेळ घेतली तर यातल्या कशाबश्या तीन घटना मॅच होतात त्याही ओढून ताणून , बादरायण संबंध जोडला तरच !”

मी या दोन्ही जन्मवेळां प्रमाणे तयार केलेला घटना – ग्रहमान इ, चा  तौलनिक तक्ता प्रिंट करुन त्यांच्या समोर ठेवला, आणि म्हणालो …

“तुमचा ज्योतिषाचा अभ्यास आहे, समजेल तुम्हाला.“

त्या तक्त्याकडे काहीशा अनिच्छेनेच बघत डॉक्टर साहेब म्हणाले…

“तुम्ही सांगताय खरे, पण मला हे अजुनही पटले नाही”

डॉक्टर साहेबांना समजाऊन सांगणे / पटवून देणे मला शक्य होते पण हे करायचे तर मला त्यांच्या साठी ज्योतिषाचा क्लासच उघडावा लागला असता. मी माझ्या अनुमानाशी ठाम होतो तर तिकडे डॉक्टर साहेबांचा माझ्यावरचा अविश्वास दिसत होता.  आता या वेळी जातकाला काही समजावत बसणे हा वेळेचा अपव्यय ठरला असता ,  आगामी काळच याबाबतीत निर्णय देईल.

थोडा विचार करुन मी म्हणालो…

“ठीक आहे ,  मी असे करतो, तुमच्या प्रश्नाच्या  बाबतीत तुमच्या सध्याची सकाळी ८:२३ ही जन्मवेळ प्रमाण मानून  दोन प्रिडीक्शन्स देतो , आणि मी सुचवत असलेल्या AM  ते PM असा बदल करुन केलेल्या रात्रौ ८:१८ या जन्मवेळे नुसार ची पण दोन प्रिडिक्शन्स   देतो. आगामी काळच ठरवेल नक्की कोणती जन्म वेळ बरोबर आहे ते,  ज्या वेळे नुसार चे भविष्य बरोबर आले ती तुमची खरी जन्मवेळ ! चालेल?”

काहीशा नाखुशीनेच डॉक्टर साहेब म्हणाले…

“ठीक आहे , तसे करुयात..”

मी दिलेले दोन्ही प्रेडिक्शन्सचे सेट घेऊन डॉक्टर साहेब निघुन गेले.

साधारण वर्ष लोटले, आणि ते डॉक्टर पुन्हा एकदा माझ्या समोर येऊन उभे राहीले.. मला आठवले हे ते AM  ते PM वाले  डॉक्टर !

“या डॉक्टर साहेब, बर्‍याच दिवसांतून येणे झाले”

“मी तुमची माफी मागायला आलो आहे”

“माफी ? कशा बद्दल ? माझ्या लक्षात आले नाही”

“वर्षापूर्वी मी आपल्या कडे आलो होतो, तेव्हा माझ्या जन्मवेळे बद्दल आपला काहीसा वाद झाला होता, तुम्ही माझी जन्मवेळ बारा तासांनी चुकली आहे AM  ते PM घोटाळा झाला आहे असे म्हणत होता. पण मला ते तेव्हा अजिबात पटले नव्हते.. वाद टाळाण्याच्या हेतुने आपण दोन्ही जन्मवेळां घेऊन प्रत्येकी दोन प्रिडीक्शन्स दिली होती”

“हो, माझ्या आत्ता लक्षात आले,  मग काय झाले त्याचे ?”

“काय होणार , आपण रात्रौ ८:१८ ची वेळ घेऊन केलेली दोन्ही भाकितें अगदी तंतोतंत बरोबर आली आहेत. आपले अभिनंदन!”

“मला खात्रीच होती”

“पण सर, एक सांगू, तुम्ही सुचवलेल्या जन्मवेळे नुसार चे पहीले भाकित बरोबर आले तरीही माझा विश्वास बसला नव्हता.

तेव्हा वाटले पडली असेल बोला फुलाला गाठ! पण म्हणून जन्मवेळेत बारा तासांची चूक झालेली आहे हे मला मला मान्य नव्हते”

“मग?”

“पण आपण सांगीतलेले दुसरेही भविष्य अगदी तसेच बरोबर आले तेव्हा मी अस्वस्थ झालो, एव्हाना आपल्या ज्ञानावर , कौशल्यांवर माझा विश्वास बसला होता पण तरीही मनाची खात्री पटत नव्हती. कोठेतरी उगाचच वाटत होते माझ्या जन्मवेळेत एव्हढी मोठी चूक नाही होणार. शेवटी मी याचा छडा लावायचेच ठरवले.”

“म्हणजे दुसर्‍या कोणा के.पी. वाल्याला भेटलात की काय ?”

“छॅ , एकदा हात दाखवून अवलक्षण करुन घेतले आहे ते बास , आता मी तुमच्या शिवाय दुसर्‍या कोणाकडे जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही”

“धन्यवाद, पण तुम्ही नेमके केलेत तरी काय ?”

“माझे वडील आर्मीत होते , त्यांचे लुधियानात पोष्टींग होते , माझा जन्म लुधियानाचा. माझ्या जन्मानंतर अवघ्या सहा एक महिन्यांतच माझ्या वडीलांचे दिल्लीला पोष्टींग झाले, त्यानंतर कधी लुधियानाला जाण्याची वेळच आली नाही, ती गेल्या महीन्यात आली, एका मेडीकल कॉन्फरंसच्या निमित्ताने”

“मग पुढे?”

“माझा जन्म लुधीयानातल्या गोविंद स्वरुप मेमोरियल हॉस्पीटल मध्ये झाला होता हे नक्की माहीती होते, मी तिथे जाऊन काही रेकॉर्ड मिळते का याचा तपास केला पण दुर्दैवाने इतके जुने रेकॉर्ड त्यांच्या कडे उपलब्ध नव्हते. लुधियानात आम्ही व्हिक्टरी क्रॉस कॉलनीत रहात होतो हे पण माहीती होते , मी तिथे गेलो , वाटले त्यावेळच्या आमच्या शेजार्‍यांपैकी कोणी हयात असेल तर त्यांना विचारुन काही माहीती मिळते ते पहावे. पण त्यावेळची गावाबाहेर असलेली लहानशी कॉलनी आता एका मोठ्या उपनगरात गडप झाली आहे. तिथे काय तपास लागणार? मी जवळजवळ नाद सोडूनच दिला होता पण लुधीयानाच्या शेख मार्केट मध्ये शॉपींग करताना अचानक मला ‘रॉयल गन मार्ट’ दिसले, आणि मला माझ्या वडिलांचे बोलणे आठवले. माझे वडील आर्मी मध्ये असल्याने त्यांना गन्स  चा मोठा शौक, त्यांच्या बोलण्यात या ‘रॉयल गन मार्ट’ आणि त्याच्या मालकाचा म्हणजे ‘ख्रिस्तोफर रॉड्रीक्स’ चा नेहमी उल्लेख असायचा, ते दोघे चांगले मित्र होते. मी रॉयल गन मार्ट मध्ये चौकशी केली,  दुकानाचे नाव तेच असले आता ते गन्स ऐवजी स्पोर्ट्स गुड्स एक्स्पोर्ट मध्ये आहेत. ख्रिस्तोफर रॉड्रीक्स  वयोमाना नुसार थकल्यामुळे आता दुकानात येत नाहीत , त्यांचा मुलगा व नातू व्यवसाय बघतात. मी ख्रिस्तोफर रॉड्रीक्स  च्या घरी जाऊन त्यांना भेटलो,  म्हणजे तसा माझ्या जन्मतारखे संदर्भात नाही तर केवळ माझ्या वडिलांचे मित्र म्हणून. “

“तुमची पण कमाल आहे!”

“खरी कमाल तर पुढेच आहे, ख्रिस्तोफर रॉड्रीक्स वय असेल ८५ च्या आसपास पण अजून म्हातारा ठणठणीत ! मी माझी ओळख करुन दिल्यावर त्यांना एकदम गहीवरुन  आले. माझे वडील आणि  ते एकदम जानी दोस्त होते, घरी सारखे येणे जाणे होते. बोलता बोलता मीच माझ्या जन्मवेळेचा विषय काढला , तेव्हा ते म्हणाले , त्यांना आठवतेय , त्या दिवशी संध्याकाळी माझे वडील त्यांना भेटले होते , बाळंत वेदना सुरु झाल्यामुळे माझ्या आईला ‘गोविंद स्वरुप दवाखान्यात’ (डीलीव्हरी साठी ) दाखल करुन  डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणायला माझे वडील मार्केट मध्ये आले होते! … बस म्हणजे माझा जन्म रात्रीचा ८:१८ चा , सकाळचा नाही,  माझी खात्रीच पटली !”

“चला , कसा का होईना खुलासा झाला ना “

“हो पण तुम्ही तर हे तुमच्या अभ्यासा वरुन आधीच अचूक सांगीतले होते !”

“हो, असा अनुभव येतो काहीवेळा”

“ती  रुलींग प्लॅनेट्स सिस्टीम बंडल आहे !”

“असे म्हणू  नका, रुलिंग प्लॅनेट्स चा काही उपयोग निश्चित आहे पण सध्या ज्या तर्‍हेने रुलीग प्लॅनेट्स वापरले जात आहेत किंवा त्यांचा अतिरेकी उदो उदो करत , आंधळा विश्वास ठेवला जातो आहे ,  ते चुकीचे आहे इतकेच”

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद उमेशजी,

   क्लासेस चे ६०% व्हीडिओज रेकॉर्ड झाले आहेत विडिओ पायरसी होऊ नये म्हणून इनक्रिप्टेड स्ट्रीमिंग सर्वर पाहीजे. त्याच्या साठी थांबलोय. आधी ज्या सेक्युअर , इनक्रिपटेड सर्वर वरुन हे व्हीडिओज होस्ट केले जाणार होते तिथे मोठ्या तांत्रिक अडचणी येत आहेत , त्यातीन मार्ग निघतोय असे वाटत होते तोच मधल्या काळात त्यांनी होस्तींग चार्जेच तिप्पट केले , टर्मस कंडीशंस बदलल्या , त्यामुळे आर्थिक गणित फिसकटले ! त्यातून मार्ग काढणे चालू आहे. बघुया कसे काय जमते ते.

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   हो शरयु ताई , प्रयत्न तर चालू आहेत … ज्योतिष शिकवावे कसे तर असे (आणि ज्योतिष शिकावे तर ते असे!) असे लोकांनी म्हणले पाहीजे हे लक्ष्य ठेऊन अगदी परिपूर्ण कोर्स डिझाईन केला आहे, कोर्स चा सिलॅबस, कंटेंट, डिटेल्स, सादरीकरण, म्युझीक, टायतल्स, सक्रिप्ट्स , फोटॉग्राफी अत्यंत दर्जेदार ठेवायचा प्रयत्न केला आहे.

   सुहास गोखले

   0
 1. Santosh

  सुहासजी,

  तुमच्या ज्योतिष क्लास साठी शुभेच्छा.
  हा ज्योतिष क्लास कोणत्या शाखेशी संबधित आहे, म्हणजे KP, पारंपारीक किंवा वेस्टर्न ?
  आणि क्लास नंतर जर काही प्रश्न असल्यास ते तुम्ही कसे सांगणार?

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   क्लास ‘बेसीक्स’ वर आहे , त्यात ज्योतिषातल्या मूलभूत , पायाभूत गोष्टी शिकवल्या , पक्क्या करुन घेतल्या जातील , एकदा त्या समजल्या की मग पुढे शिकणे सोपे होते. या कोर्स मध्ये के.पी. चे बेसीक मोड्युल समाविष्ट आहे , वेस्टर्न होरारी मोड्यूल ऑपशन आहे (त्याचे जादाचे पैसे भरावे लागतील). कोर्स चालू असताना आलेल्या सर्व शकांचे निरसन केले जाईल ईमेल द्वारा. काही खास बाबतीत फोन द्वारा शंका निरसन केले जाईल. हा बेसिक कोर्स असल्याने यात नवमांश , अष्टकवर्ग इ बाबीं नसतील. दशा पद्धती असेल पण फक्त विशोत्त्ररी दशाच शिकवली जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ‘प्रॅक्टीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅडव्हांस अ‍ॅस्टॉलॉजी ‘ असे दोन कोर्स उपलब्ध करुन दिले जातील.

   ह्या कोर्स ज्या निमिताने मी माझे स्वत:चे डॉमेन नेम असलेली , इमेल आयडी असलेली नवी कोरी वेब साईट पण लॉन्च करत आहे , माझा ब्लॉग ह्या नव्या साईट वर अधिक आकर्षक स्वरुपात वाचायला मिळेल, ह्या नव्या साईट वर एक छोटास डिस्कशन ग्रुप असेल तिथे ज्योतिश विषयक चर्चा करता येईल, कोडी , क्विज स्पर्धा आयोजित होतील. लेख प्रकाशीत होतील.

   सुहास गोखले

   0
 2. Santosh

  धन्यवाद सुहासजी,

  हा कोर्स नक्कीच अभ्यासपूर्ण असेल ह्या बद्दल शंकाच नाही.

  एक अवांतर प्रश्न, नवमांश शिकण्यासाठी तुम्ही काही पुस्तक किंवा स्टडी मटेरियल सुचवू शकाल का? ज्या मध्ये खरचं प्रॅक्टीकल माहिती असेल.

  आपला आभारी,
  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   माझ्या माहीतीतल्या काही पुस्तकांची नावे सुचवत आहे , यातली काही मी वाचली आहेत, काही माझ्या संग्रहात सुद्धा आहेत.

   NAVAMSA IN ASTROLOGY (First Edition, 2015) Paperback – 2015 by CHANDULAL S. PATEL
   Predicting through Navamsa & Nadi Astrology 1996 by C S Patel
   Comprehensive predictions through Divisional charts by VP goel, sagar publications
   नवमांश रहस्य श्री. म.दा,भट
   Splendour of Vargas by Justice SN kapoor
   Secret of vargas by krishna kumar, alpha publications
   Shadvarga phalam by Krishna Kumar (Hindi), alpha publications
   Varga chakra by sanjay rath, sagar publications

   श्री.म.दा. भट यांच्या पुस्तका पासुन सुरवात करा, मग चंदुलाल पटेल यांचे पुस्तक वाचा . बाकीची पुस्तके त्यानंतर …

   माझे मत विचाराल तर बेसीक्स अगदी रॉक सॉल्लीड्ड होत नाहीत, साध्या क्षेत्रकुंडली वरीन (ग्रहयोग वापरुन) सांगीतले आडाखे बरोबर येत नाहीत तो पर्यंत नवमांश , इतर वर्ग कुंडल्या , अ‍ष्टकवर्ग , सर्वतोभद्र चक्र असल्या फंडात पडू नका , या वर्ग कुंडल्यां काही खास कामासाठी वापरल्या जातत, जसे आपल्या कडे आय स्पेशॅलिस्ट , इ.एन.टी , गायनॅक, आर्थोपेडीक असे एम.डी. डॉक्टर असतात तशा या स्पेशलाईज्ड कुंडल्या आहेत त्या अशा सरसकट वापरु नये. आणि हे सर्व एम डी डॉक्टर पहिल्यांदा साध्या ताप खोकल्याचे एम बी बी एस डॉक्टर होतात आणि नंतर मग स्पेशलायझेन करुन एम डी होतात, तसे आधी साधे डॉक्टर व्हा , चांगले डॉक्टर व्हा , चार पेशंट ना बरे करा मग एम डी ला अ‍ॅडमीशन घ्या!

   भविष्य बरोबर येण्यासाठी हे इतके अ‍ॅडव्हांस काही लागतेच असे नाही. नवमांशा जोरावर अचूक भविष्य सांगता आले असते तसे असते तर सध्या धुमाकुळ घालत असलेले . ‘नवमांश रत्न’ क्लासेस घेत गावोगाव फिरत बसले नसते , त्यांचा घरासमोर मैलभर लांबीचा क्यू लागला असता ! घरबसल्याच इतके काम (आणि पैसे) मिळाले असते की क्लास घ्यायला कशाला ‘खाजवायला’ सुद्धा फुरसत मिळाली नसती ! पण ते तसे नाही म्हणून क्लास घेत फिरत बसलेत !

   बाकी आपण काय ते ठरवा.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.