श्री XXXXXX,
सप्रेम नमस्कार
आपण आपला शब्द पाळला नाहीत याचा खेद होतो, मागे काही कटू अनुभव आल्या मुळे मी ‘आधी पैसे मग काम’ असे धोरण अवलंबले आहे , पण आपल्या बाबतीत मी अपवाद केला होता तो केवळ आपण पैसे भरतो काम चालू करा असे ठोस आश्वासन दिले म्हणुनच .
आपल्या शब्दावर विसंबून मी काही तास खर्च करुन आपल्याा प्रश्ना संदर्भातला माझा मार्गदर्शन पर रिपोर्ट तयार करुन ठेवला पण आपण माझे मानधन जमा केले नाहीच पण त्या संदर्भात कोणताही संपर्क ही साधला नाही.
काही काळ वाट पाहून अख्रेर मी आपल्याशी या बाबतीत संपर्क साधून आपल्याला आठवण करुन दिली होती तेव्हा ही आपण पैसे भरतो असे बोलला होता. दुर्दैवाने हे ही आश्वासन आपण पाळले नाहीत , मानधन आजच्या तारखेलाही जमा झालेले नाही.
मानधनाची रक्कम तशी अगदी किरकोळ या सदरात मोडण्या सारखी आहे तरीही आपल्या आर्थिक किंवा अन्य अडचणी मी समजू शकतो पण तशा परिस्थितीत न पेलणारी आश्वासने तरी का द्यावी? ते ही अनावधनाने झाले असे असले तरी या बाबतीत किमान आपणहून संपर्क साधून खुलासा करण्याचा साधा शिष्टाचार सुद्धा आपण पाळला नाही याचा खेद होतो.
या सगळ्या प्रकरणात माझे काही मौल्यवान तास आणि मेहेनत वाया गेली हे खरे पण ‘आधी पैसे मग काम आणि याला आता कोणालाही सवलत द्यायची नाही / अपवाद करायचा नाही’ हा एक चांगला धडा आपल्या कडून शिकायला मिळाला हे काय कमी आहे. आणि हा ‘असला’ धडा एका ‘चित्पावना’ कडून शिकायला मिळावा हे मी माझे भाग्यच समजतो.
आपण मानधन जमा केले नसल्यामुळे मी आपल्या साठी तयार केलेला रिपोर्ट पाठवू शकणार नाही तरी सुद्धा मी आपल्या साठी तयार केलेली आपली जन्मपत्रिका आपल्याला माझ्या कडून भेट म्हणून पाठवत आहे.
आणि एक , कृपया आता मानधन भरु नका, मी आपल्याला माझी सेवा पुरवणार नाही.
शुभेच्छा
आपला
सुहास गोखले
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020