सेच एकदा एका व्यक्तीची , सोयी साठी आपण त्यांना ‘अनिल भाऊ’ म्हणु,  ईमेल प्राप्त झाली, ‘माझ्या मुलीचा विवाह केव्हा होईल ?’ अशी विचारणां होती, अर्थात असे प्रश्न हाताळणे माझ्या साठी रोजचेच असल्याने मी प्रथम अनिलभाऊंना ईमेल मार्फत स्पष्ट कल्पना दिली की त्यांचा प्रश्न जरी त्यांच्या मुलीच्या संदर्भातला असला तरी याला त्यांच्या मुलीची मान्यता असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची खासगी माहीती (जन्मगाव, जन्मवेळ, जन्म तारीख)  दुसर्‍याला पुरवणे , त्या व्यक्तीच्या खासगी आणि नाजूक गोष्टी बाबत दुसर्‍याला प्रश्न विचारुन त्याचे उत्तर जाणून घेणे अशी कृत्यें त्या व्यक्तीच्या खासगीपणाचे उल्लंघन ठरते इतकेच नव्हे तर कायद्याने तो गुन्हा ही आहे, मग ती व्यक्ती एखाद्याची पती/पत्नी / मुलगा/मुलगी/आई-वडील/भाउ-बहीण अशी अगदी जवळची नातलग असली तरी. त्यामुळे ‘या सगळ्यांची माझ्या मुलीला कल्पना देऊन, तीची या प्रकारासाठी मान्यता घेतली आहे’ असा स्पष्ट खुलासा ईमेल मार्फत कळवायला सांगीतले.

“अहो, मी साक्षात मुलीचा बाप बोलतोय ना? मग तीची कसली परवानगी घ्यायची?”

“परवानगी घेणे गरजेचे आहे, लग्नाला आलेली मुलगी आहे ना,  सज्ञान आहे, कायद्यानुसार ही स्वतंत्र व्यक्ती मानली जाते”

“जरा जास्तच कायदेशीर चाललयं म्हणायचं!”

“हो, मी कायदा पाळतो, बाकीच्यांचे माहीती नाही”

“ठीक आहे आता तुमचा तसा आग्रह असेलच तर मी माझ्या मुलीशी बोलून आपल्याला कळवतो”

“हरकत नाही”

अक्षरश: अर्ध्या तासाता अनिलभाऊं नी तत्परतेने कळवले मी माझ्या मुलीशी या बाबत बोललो असुन तीची याला मान्यता आहे’.

मग मी माझे कोटेशन पाठवले व मला जी माहीती द्यावी लागते त्याबद्दलची  सविस्तर ईमेल पाठवून दिली. तसेच माझा एक ‘डिसक्लेमर’ फॉर्म असतो तोही पाठवून दिला. श्री अनिल नी माझा डिसक्लेमर मान्य करुन , माझे मानधन बँकेत जमा केले व आवश्यक ती सर्व माहीती पुरवली.

आता इथे पर्यंत तर सगळेच अगदी चाकोरीबद्ध पणे पार पडले पण खरा झटका तर पुढेच होता….

मी माझ्या कडे आलेल्या सर्व पत्रिका एका डेटाबेस मध्ये नोंदवतो (हे सॉफ्टवेअर मी स्वत: लिहले आहे!). त्याप्रमाणे अनिलभाऊंच्या मुलीची पत्रिका डेटाबेस मध्ये नोंदवताना माझ्या डेटाबेस सॉफ्टवेअर ने ‘डुप्लिकेट रेकॉर्ड’ असा संदेश दिला. म्हणजे ही नोंदवत असलेली पत्रिका या आधीच डेटाबेस मध्ये नोंदवली गेली आहे!

मी चक्रावलोच, कारण अनिलभाऊ माझ्याकडे पहील्यांदाच येत होते, तेव्हा त्यांच्या मुलीची पत्रिका माझा संग्रहात आधीच कशी काय नोंदवली गेली आहे? आता माझ्या संग्रहात अनेक मार्गानी पत्रिका येत असतात, सगळेच काही माझे जातक नसतात, माझ्या कडे येणार्‍या जातकांच्या पत्रिकां बरोबरच मी ज्योतिष ग्रुप्स, मासीकें, पुस्तके, इंटरनेट अशा अनेक मार्गांनी पत्रिका गोळा करत असतो. मी रेकॉर्ड तपासले, मला दिसले की ही पत्रिका माझ्या कडे दोन वर्षापूर्वी नोंद केली गेली आहे आणि ही पत्रिका घेऊन माझ्याकडे कोणीतरी आले होते. हे असे दोन प्रकारे होते, पहील्या प्रकारात त्या पत्रिकेवरुन भविष्य बघण्यासाठी ती पत्रिका ज्याची आहे ती व्यक्ती स्वत:  किंवा तीचे नातेवाईक येऊ शकतात, दुसरा प्रकार म्हणजे ही पत्रिका एखाद्या मुला साठी मॅच मेकीगला आली असेल.

अर्थात माझ्या डेटाबेस मधली नोंदी फार नेमक्या असतात म्हणजे-  ‘ संदर्भ : जातक (स्वत: )’ , ‘ संदर्भ : जातक (नातेवाइक – (नाते) )’; ‘संदर्भ : फोरम/पुस्तक/मासीक (नाव)’, संदर्भ : मॅचमेकिंग आपोझीट पार्टी (जातक)’ अशा प्रकाराच्या असतात. या पत्रिकेच्या बाबतीत ही नोंद ‘संदर्भ : जातक (वडील) ‘ अशी होती,  म्हणजे ही पत्रिका त्या व्यक्तीच्या वडीलां मार्फत माझ्याकडे आली होती,

म्हणजेच अनिलभाऊ पुन्हा एकदा तीच पत्रिका घेऊन माझ्याकडे आले म्हणायचे का? पण तसेही वाटत नव्हते कारण असे असते तर अनिलभाऊंच्या ईमेल मध्ये “मी मागे आपल्याला एकदा भेटलो होतो / विचारलेल होते’ इ. असा काही उल्लेख असता. दुसर्‍यांदा येणारा जातक हमखास मागच्या कन्सलटेशन चा उल्लेख करतात. इथे तसा काही संदर्भ नव्हता म्हणजे अनिलभाऊ पहील्यांदाच ही पत्रिका घेऊन माझ्याकडे आलेत! मग ही पत्रिका माझ्याकडे आणली कोणी ? अनिलभाऊ नाहीत मग दुसरे कोण?  मी याचा छडा लावायचा ठरवला.

मी जुने रेकॉर्ड तपासले तेव्हा लक्षात आले की. सुमारे दोन वर्षापूर्वी एक श्री अनिल xxxxxx  म्हणून जातक आपल्या मुलीच्या विवाहाच्या प्रश्न घेऊन आले होते. हे अनिल आणि आज आलेले अनिल एकच आहेत का?  मला प्रश्न पडला!

सुदैवाने दोन वर्षापूर्वी आलेल्या अनिलभाऊंचा सर्व ईमेल्स पण माझ्या संग्रहात होत्या. ती ईमेल आयडी आणि आजची अनिलभाऊंची ईमेल आयडी वेगळ्या होत्या. मागच्या ईमेल तपासल्या असता ‘त्या’ अनिलभाऊंचा फोन क्रमांक एका ईमेल मध्ये सापडला…

मी सरळ त्या दोन वर्षापूर्वी आलेल्या अनिलभाऊंना फोन केला..

“हॅलो, श्री. अनिल  xxxxxx का?”

“हो, बोलतोय, आपण कोण”

“मी सुहास गोखले नाशिक हून बोलतोय, दोन वर्षापूर्वी आपण माझ्या कडे ज्योतिष विचारले होते ईमेल मार्फत, लक्षात आले का?”

“हो, हो ,आले लक्षात, मी माझ्या मुलीच्या विवाह संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला होता”

“तेव्हा मी तुमच्या मुलीचे लग्न तीन वर्षां नंतर म्हणजे आजच्या तारखे नुसार अजून एक वर्षांनी होईल असे सांगीतले होते”

“हो, मला आठवतय, तुमचे भाकीत खरे ठरणार आहे असे दिसतेय, कारण दोन वर्षे आटोकाट प्रयत्न करतोय पण काही केल्या मुलीच्या लग्नाचे जमत नाही..”

“अजून एक वर्ष थांबा, होईल लग्न , चांगले योग आहेत, पण तुम्ही उगाच तोच प्रश्न पुन्हा विचारायची घाई का केलीत?”

“घाई ? मला समजले नाही”

“असे काय करता! तुम्हीच आज आपल्या मुलीची पत्रिका आणि तोच विवाह कधी या प्रश्नासाठी माझ्याकडे पाठवली आहे ना? मानधन ही बँकेत जमा केलेत!”

“मी? नाही हो, मी नाही ईमेल केली आपल्याला आणि पैसे ही भरलेले नाहीत, आश्चर्य आहे!”

“मलाही आश्चर्य वाटते, आपण आपल्या मुलीसाठी पुन्हा तोच प्रश्न मला विचारायला आलात ते आलात पण या खेपेला वेगळी ईमेल आय डी वापरलीत शिवाय आपल्या मागच्या कंसलटेशन बद्दल अवाक्षर ही नाही, असे कसे?”

“काय सांगता! अहो असे काही नाही, दोन वर्षापूर्वी आपला जो काय संपर्क झाला होता तेव्हढाच”

“तुम्ही पुन्हा माझ्याशी संपर्क साधला नसेल तर नक्कीच तुमच्या मुलीची पत्रिका आणि तोच विवाह कधी होणार हा प्रश्न घेऊन दुसरीच व्यक्ती माझ्या कडे आली आहे, इतकेच नव्हे तर ती व्यक्ती स्वत:ला तुमच्या मुलीचा बाप आहे असे सांगतेय!”

“कमाल आहे?

“नक्की आठवून पहा, कदाचित आपल्या कोणा नातेवाईकाने असे केले असेल, मी सहसा दुसर्‍याच्या वतीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही, म्हणुन त्या नातेवाईकाने ‘मीच मुलीचा बाप’ असे खोटे लिहले असेल”

“नाही, मी माझ्या कोणा नातेवाईकांना / मित्राला असे करायला सांगीतले नाही आणि माझे कोणी नातेवाईक / मित्र माझ्या अपरोक्ष असा काही उद्योग करणार नाहीत”

“असे असेल तर हे प्रकरण गंभीर आहे, असे दिसतेय की तुमच्या अपरोक्ष तुमच्या मुलीची पत्रिका घेऊन, तिच्या विवाहाचा प्रश्न कोणी दुसरीच व्यक्ती विचारत आहे!”

इथे मला दोन शंका होत्या , पहीली शंका कोणीतरी तिर्‍हाईत त्या मुलीबद्दल जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे , काही गैर हेतु , चोरटे प्रेम प्रकरण असे काहीतरी संशयास्पद असू शकेल आणि दुसरी शंका म्हणजे कोणीतरी मला डबल क्रॉस करतेय..

पहील्या शंकेचे निरसन करुन घेणे जरा अवघड होते कारण आपण सगळेच आपली माहीती कोठेही प्रकाशीत करतो मग ती कोणाच्याही  हातात पडते आणि त्या माहीतीचा दुरुपयोग होण्याची शक्यता निर्माण होते. फुकट ज्योतिष जाणून घ्यायच्या नादात अनेक सुशिक्षीत लोक आपली अशी खासगी माहीती ज्योतिष वेबसाईट, डिस्कशन ग्रुप्स, फेसबुक . व्हॉट्सॅप ग्रुप्स वर बिनधास्त शेअर करत असतात. तिथून अशी माहीती उचलून काही गैरवापर करणे सहज शक्य आहे!

पहील्या शंकेबद्दल फारसे काही करता येत नसले तरी दुसर्‍या  शंकेचे निरसन करुन घेणे सोपे होते. त्यासाठी मी अनिलभाऊंना विचारले..

“तुम्ही अगदी अलीकडच्या काळात हा प्रश्न कोणा दुसर्‍या ज्योतिषाला विचारला आहे का”

“हो, काय सांगू गोखले साहेब, माझा तुमच्या भाकितावर विश्वास असला तरी, एका वय वाढलेल्या मुलीचा बाप आहे मी शेवटी, मुलीचे लग्न अजून जमत नाही म्हणुन हताश झालोय, पार खचून गेलोय, अशा वेळी दुसर्‍या ज्योतिषाला विचारावेसे वाटले.. चुकी झाली माझी..सॉरी”

“अहो सॉरी कशाला बोलताय आणि दुसर्‍या ज्योतिषाला विचारण्यात चूक ती कोणती? दुसर्‍या , तिसर्‍या ज्योतिषाला विचारणे हे आपले व्यक्ती स्वातंत्र्यच आहे, आपण कोणतीही चूक केली नाही. पण खरेच गेला होता का दुसर्‍या कोणाकडे”

“हो, गेल्याच आठवड्यातत तर मी त्या YYYYY ला भेटलो होतो, मुलीचे लग्न कधी होईल असे विचारले होते”

“मग?”

“त्यांनी अजून उत्तर दिले नाही, गावाला जातोय, एक आठवड्याभरात कळवतो असे म्हणालेत..”

‘बरोबर आहे, ते असेच म्हणणार, कारण त्यांनी तुमच्या मुलीची माहीती मला देऊन तोच प्रश्न मला विचारलाय, माझ्या कडुन उत्तर घेऊन तेच उत्तर ते तुम्हाला त्यांचे उत्तर म्हणून देणार आहेत, तेव्हा या सगळ्याला आठवडाभर  लागणारच ना!”

“पण ते असे का करतील?”

“सोपे आहे, मी गेल्या वेळेला आपल्या कडून किती मानधन घेतले होते..”

“माझ्या नक्की लक्षात नाही पण  XXशे असतील’

“बरोबर, तेव्हा तुमच्या कडुन मी  XXशे मानधन घेतले होते, आता दोन वर्षानंतर ह्याच प्रश्नाचे मी PPशे  इतके मानधन घेतो म्हणजे फक्त शंभर रुपयांची वाढ केली आहे… तुमच्या लक्षात येते आहे का?”

“अरे हो, आत्ता लक्षात आले… त्या YYYYY ज्योतिषाने माझ्याकडून चक्क QQQ रुपये घेतले आहेत, तुमच्या सध्याच्या मानधनाच्या डब्बल, म्हणजे ते तुम्हाला PPशे इतके देणार , माझ्या कडून QQQ रुपये इतके घेणार आणि स्वत: काही न करता गाळा मारणार. मस्त धंदा आहे की! “

“हीच तर शंका आहे, ही व्यक्ती आपल्याकडून जे पैसे घेणार त्यातले निम्मे मला देणार, नंतर मी दिलेले उत्तर जसेच्या तसे किंवा किरकोळ बदल करुन तुम्हाल देणार म्हणजे मधल्या मधे काहीही न करता ती व्यक्ती इतके कमावणार“

“बापरे आता?”

“काहीही नाही, तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देऊन बसला आहात. ते काही परत मिळणार नाहीत.. “

“नाही कसे? मी माझ्या पद्धतीने या तोतया अनिलभाऊंचा समाचार घेतो, पुजाच बांधतो त्या भXXची , मी दिले त्याच्या दुप्पट पैसे वसूल करतो”

“थांबा, जरा मला प्रथम त्या तोतयाशी बोलू द्या मग तुम्हाला काय करायचे ते करा”

….

मी त्या तोतया अनिलभाऊंना इमेल पाठवून ”पत्रिकेनुसार एक गंभीर घटने’ बद्दल चर्चा करायची संपर्क साधा’ असे कळवले.

तोतया अनिलभाऊंची मेल आली ‘काय आहे ते कळवा’”,

मी पुन्हा ईमेल पाठवली “अशा गोष्टी लिहून कळवायचा नसतात, आपण या बाबतीत फोन वर बोललेले बरे!

मग या तोतया अनिलभाऊंचा फोन आला..

“गोखले सर, गंभीर आहे का, काळजीचे काही नाही ना?”

“बरेच काही आहे”

“काय ते सांगा, काही ही ऐकायची तयारी आहे आपली”

“ते सांगतोच हो, पण त्यापूर्वी मला आपल्या मुलीशी बोलता येईल?”

“तिला कशाला यात घेताय, लहान आहे, घाबरुन जाईल, मला सांगा, मी नंतर समजाऊन सांगतो तिला”

“नाही, मला तुमच्या मुलीशीच बोलायचेच आहे”

“नको, फार हळवी आहे, मनाला लावून घेईल उगाच आणि काही भलतेच करुन बसेल”

“असे काही होणार नाही”

“मी चांगले जाणतो, अहो पोटची पोर आहे माझी, ”

“नक्की का?”

“म्हणजे?”

“मी विचारतो आहे, ही मुलगी नक्की तुमचीच का?”

“गोखले, सांभाळा, भलताच आरोप करताय माझ्यावर!!”

“अस्सं, आणि मग तुम्ही जे काही भलते सलते केलेय त्याचे काय?”

“मी काय भलते सलते केलेय?”

“काय केले? वेड पांघरुन पेडगावला जाऊ नका, तुम्ही या मुलीचे बाप म्हणवत असला तरी असली बाप वेगळाच आहे , बरोबर ना?”

“काय दारु बिरु चढवून बोलताय का काय गोखले”

“मी दारु चढवली नाही, पण लौकरच तुमच्या कानाखाली चढवून द्यायला येतोय बघा..”

“धमक्या कोणाला देताय?”

“चोराच्या उलट्या बोंबा, एकतर दुसर्‍याच्या मुलीची पत्रिका घेऊन माझ्याकडे आलात , ती व्यक्ती स्वत:ची मुलगी आहे असे सांगताय, त्या व्यक्तीचा कन्सेंट घेतलाय असे खोटे सांगताय आणि माझ्या कडून भविष्य जाणून घेऊन ते मुळ जातकाला दुप्पट भावात विकताय .. खरे का नाही?”

“काही ही काय बोलताय?”

“या मुलीच्या खर्‍या बापाचे नाव आहे श्री. अनिल xxxxxx, मी कालच त्यांच्याशी बोललो आहे, त्यांनी सगळे सांगीतले आहे मला . ते तुमच्या कडे मुलीची पत्रिका घेऊन आले होते, तुमची XXवे गिरी कळल्यावर ते इतके चिडले की तुमची धुलाई करायलाच निघाले होते पण मीच थांबवले..”

तोतया अनिलभाऊंची बोलतीच बंद झाली .. फोन कट केला गेला..

मी मग खर्‍या अनिलभाऊंना  मोकळीक दिली!

मोठे खळ्ळ खट्ट्याक झाले असे ऐकले!

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  थरारक! हा प्रकार प्रश्नकुंडलीच्या लग्न स्थानावरून कळुू शकला असता का?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. प्राणेशजी ,

   “समोरची व्यक्ती मला फसवते आहे का? किंवा ‘समोरची व्यक्ती माझ्याशी खोटे बोलते आहे का?” अशा अर्थाचा प्रश्न मनात धरुन प्रश्नकुंडली मांडली तर काही सुगावा लागू शकेल किंवा व्यक्ती समोर असेल तर ती व्यक्ती येण्याच्या वेळचा ‘कन्सलटेशन चार्ट ‘ सुद्धा काही हिंट देऊ शकतो.

   पण ज्योतिष नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहावे , सगळे चांगले होणार आहे असा आशावाद असावा. तेव्हा आला जातक की तो खोटा का खरा असा नकारात्मक विचार घेऊन काही तपासायचे नाही , ज्या कामाची सुरवात अशी नकारात्मक विचारातून होते ते यशस्वी कसे काय होणार ?

   प्रश्नकुंडली सहसा अशा कामाला वापरु नये. प्रश्नकुंडलीत काही दैवी अंश आहे त्यामुळे उठसुठ प्रश्नकुंडलीचा पदर धरु नये (बरेच कृष्णमुर्ती अभ्यासक ही चूक करताना दिसतात) अती गैरवापराने ही दैवी मदत रुसुन बसते आणि जेव्हा खरोखरच गरज असते तेव्हा ती मदत उपलब्ध होत नाही. वैद्यकशास्त्रात सुद्धा प्रतिजैवकांचा (अ‍ॅन्टी बायोटिक्स) चा वापर असाच उठसुठ, आलतु फालतु कामां साठी झाल्याने आज बहुतांश प्रतिजैवके निरुपयोगी ठरली आहेत , ह्यापासुन बोध घ्यायचा .

   सुहास गोखले

   0
 2. अमित

  अरे…. असे पण होते काय ?
  असला प्रकार आत्तापर्यंत फक्त interview मध्ये होताना पहिला/ऐकला होता जिथे कंपनीचे लोक आपला न सुटणारा प्रश्र विचारायचे candidatela.
  ज्योतिष सारख्या क्षेत्रात पण असे होऊ लागले तर….

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.