लोकांशी माझा पहीला परिचय हा एक संगणकतज्ञ, एंबेडेड सिस्टीम्स स्पेशॅलिस्ट, ‘हाय एंड मायक्रोप्रोसेसर एक्सपर्ट’, ‘सॉफ़्टवेअर आर्किटेक्ट’ ,’ रियल टाईम ऑपरेटींग सिस्टीम अॅथोरिटी’, ’कॉर्पोरेट ट्रेनर’ असाच झालेला असतो पण नंतर त्यांना मी ‘ज्योतिषी’ आहे हे पण कळते तेव्हा त्यांच्या चेहेर्यावरचे झटकन बदलणारे भाव बघताना मजा वाटते.
ज्योतिष, ज्योतिषी आणि ज्योतिष विचारणे या तिनही गोष्टी इतक्या बदनाम झाल्या आहेत की मी उद्या लोकांना सांगीतले की मी , आर्थिक घोटाळा केला म्हणून पाच वर्षे येरवड्याला होतो , गेल्याच वर्षी तुरुंगातून सुटलोय .. तरी लोक मला क्षमा करतील ,आपल्या जवळ बसवतील , पण मी ज्योतिषी आहे हे कळताच लोक विषय बद्लतात आणि शक्य असले तर जागा बदलतात !
ज्योतिषा इतकेच ज्योतिष विचारणें पण बदनाम झाले आहे, ज्योतिष विचारणें कमकुवत मनाचे लक्षण मानले जाते .ज्योतिष शास्त्र काय आहे , ह्या बद्दल अवाक्षरही माहीती नसलेले लोक , ज्योतिषाशी वाद- विवाद करायला तुटून पड्तात, असे केले म्हणजे त्यांना आपण शास्त्रिय विचारसरणीचे , बुद्धी प्रामाण्याच्या पुरस्कार करणारे आहोत असे वाटत असते. वस्तुत: सायन्स या विषयाचा त्यांचा संबंध दहावीच्या परिक्षेतच संपलेला असतो. पण आव असा आणत असतात की हे डॉ. जयंत नारळीकरांचे पट्ट्शिष्यच !
पिचकार्या मारायला काय जाते ?
म्हणूनच मी उगाचच येतील त्या लल्लू पंजू शी चर्चा करत बसत नाही. “हो ,बाबा तु म्हणतो तेच खरे आहे… ज्योतिष हे थोतांड आहे …’असे हो ला हो (किंवा काहीश्या असभ्य भाषेत बोलायचे तर –बरं बाबा तुझीच xx !) म्हणायचे आणि त्याच्या आवेशातली हवाच काढून घ्यायची!
वाद घालायचाच असेल तर तो योग्य व्यक्तीशी घाला. शंकराचार्यांनी सुद्धा वाद घालायला मंडनमिश्र सारखा तोलामोलाचा प्रतिस्पर्धी निवडला, उगाच एखाद्या गल्ली बोळातल्या बाळंभट / भिकंभट शी वाद घालत बसले नाहीत!
असो, बरेच विषयांतर झाले आहे.आजच्या लेखाचा विषय आहे “अशी ही ज्योतिषांची तर्हा !” त्याबद्दल बोलू काही.
ज्योतिषी असतात तरी किती प्रकाराचे ? अनेक मार्गाने ज्योतिष सांगतात.
- जन्मकुंडलीच्या माध्यमातून (नाडी वाले यातच )
- हस्तरेषा पाहून
- टॅरो कार्ड
- अंकशास्त्र – न्युमरोलॉजी
- डाऊसिंग पेंडुलम
असे अनेक मार्ग आहेत.ह्या सगळ्यांवर लिहणे वेळे अभावी शक्य नाही , तेव्हा ‘जन्मकुंडली’ वाल्यांवरच लिहतो , कारण मी पण त्यातलाच आहे ना!
(इथून पुढे लिखाणाच्या सोयी साठी ‘ज्योतिषी’ म्हणजेच ‘जन्मकुंडली’वरुन भविष्य सांगणारा ‘ असे समजावे)
ह्या ज्योतिषाची वर्गवारी अनेक प्रकाराने करता येईल.यात दोन ठळक गट आहेत:
पैसे / मानधन न घेणारे ज्योतिषी
आणि
मानधन / फी / श्रममूल्य / यथाशक्ती खुषी (ठेवा पंचांगा वर काय इच्छा असेल तसे)
तसे पाहीले तर पैसे / मानधन न घेणारे ज्योतीषी सुमारे ९०% आहेत, आणि पैसे घेणारे १०% च्या आसपास.
पैसे / मानधन न घेणार्या ज्योतिषांत अनेक पोट प्रकार आहेत:
शिकाऊ ज्योतिषी
हौशी / छंदी ज्योतिषी
सात्विक / आध्यात्मिक ज्योतिषी
या शिकाऊ ज्योतिषी गटातही पुन्हा उपगट आहेत!
पहीला गट आहे तो म्हणजे:
एकलव्य कॅटेगोरी:
हे लोक स्वत:च पुस्तके वाचून ज्योतिष शिकण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यांच्या कडे बहुदा ‘सुलभ ज्योतिष शास्त्र’ हे सोमणांनी लिहलेले पुस्तक असते , हल्ली या पुस्तकाचा भाव थोडा कमी झाला आहे. सध्या श्री. शरद उपाध्ये यांचे एक पुस्तक ‘हॉट’ आहे असे ऐकून आहे !
याच्या पुढच्या पायरी वर श्री. व.दा. भटांचे ‘कुंडली तंत्र आणि मंत्र –भाग – १’ हे पुस्तक असते.
एखादा टेकसॅव्ही असेल तर तो पुस्तके वाचावयाच्या भानगडीत पडत नाही, ‘जय गुगल बाबा’ असा मंत्र जपत तो संदर्भ सोडून लिहलेले काही बाही वाचत बसतो आणि ह्या असल्या (?) ज्ञानाचा समोरच्या पत्रिकेवर वापर सुरु करतो. पण सोमणांचे आणि व.दा. भटांची पुस्तके कुठल्याच टोरंट वर उपलब्ध नसल्याने (अर्थातच चोरुन) डाऊन लोड करता येत नाहीत ही त्याची तक्रार (?) नव्हे संताप / थयथयाट असतोच !
याच्या पुढे जाणारे फार कमी, कारण या वेळे पर्यंत बहुतेक एकलव्य महाराजांचा उत्साह थंडावलेला असतो .ज्यांचा उत्साह अजूनही टिकलेला असतो त्यांना एव्हाना लक्षात आलेले असते की ह्या एवढ्या शिदोरीवर भविष्य सांगता येत नाही आणि सांगायचा प्रयत्न केल्यास ते साफ चुकून तोंड्घशी पडायची वेळ येते. अशी चार- पाच टेंगळे कपाळावर आली की ह्या एकलव्य बुवांचा उत्साह पुर्ण थंडावतो, पुस्तके माळ्यावर जाऊन पडतात / रद्दीत जातात आणि एकलव्य बुवा मग दुसर्या उद्योगात रममाण होतात.
पण ह्या मधल्या काळात ‘ज्योतिष थोडेफार कळतें या भ्रमात राहून , अकलेचे तारे तोडून त्यांनी काही जणांच्या तरी तोंडचे पाणी पळवलेले असते. अर्थात या एकलव्य बुवांचा एकंदर अविर्भावच असा असतो की भविष्य विचारणारा सुद्धा त्यांना फारश्या गांभिर्याने घेत नाही हा भाग वेगळा. पण हे एकलव्य बुवा जर ग्रामीण/ निमशहरी भागात असतील तर मात्र जास्त नुकसान करणारे ठरु शकतात.
बरेच एकलव्य बुवा ह्या पायरीवर ज्योतिषाला रामराम ठोकतात. फार थोडे ज्यांच्यात काही धुगधुगी शिल्लक राहीलेली असते असे , नंतर विवाहा साठी गुण मेलन करणे ( दाते पंचागात छापलेले तयार कोष्टक वापरुन ) किंवा मुहुर्त काढून देणे (कालनिर्णय मध्ये सगळे मुहुर्त आधीच दिलेले असतात, टेन्शन नाही) असे उद्योग करत राहतात.
आणि त्यातला एखादा टेकसॅव्ही एकलव्य मग नंतर इंटरनेट फुकट उपलब्ध असेल तर , इंटरनेट वरच्या ज्योतिष चर्चा ग्रुप्स / फोरम्स वर आपल्या अर्ध्या कच्च्या ज्ञानाच्या पिचकार्या मारत बसतो.
पुढच्या भागात आपण क्लास लावणार कॅटेगोरी पाहुया…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
छान.!!! हौशे, गवशे , नवशे सगळ्यांच्या त-हा मांडल्या . पुढे आणखीन वाचण्यास उत्सुक . त्यात आम्ही कुठे बसतो ते बघू .( हा ….हा…..हा….)
स्वप्नीलजी ,
अभिप्राया बदल धन्यवाद . तुम्ही कोणत्या कॅटेगोरी मध्ये बसता या बद्दल मलाही उत्सुकता आहे बरे का!
सुहास गोखले
सर आणखीन एक सांगायचे राहिले बटेश पद्धती भाग – २ अजून लिहिला नाही का ? आम्ही त्याच्याही प्रतीक्षेत आहोत
स्वप्नीलजी,
बटेश ची स्टोरी सत्य घटना आहे , सांगली तल्या बर्याच लोकांना बटेश माहीती आहे . (अर्थात मी लेखात त्याचे नाव बटेश असे वापरले असले तरी त्याचे खरे नाव वेगळेच आहे ) , त्यांना बटेश चा अंत कसा झाला हे पण माहीती आहे!
दुसरा भाग लिहणे म्हणजे सरळ सरळ जुगाराला प्रोत्साहन दिल्या सारखे होईल. त्या शिवाय बटेश ने हुडकून काढलेली पद्दती जर खुली झाली तर कदाचित भलत्याच लोकांच्या हातू पडून अनर्थ होईल असे मला वाटले म्हणून मी बटेश -2 लिहायचे नाही असे ठरवले आहे. आता भाग – 2 नाही तर भाग -1 तरी का ठेवला असे कोनी म्हणेल तर त्याला उत्तर हेच की भाग- 1 हा चांगल्या लेखनाचा , लेखन शैलीचा नमुना आहे , तो नष्ट करावयाचा नाःइ म्हनून तसाच ठेवला आहे.
बटेश -2 मी प्रकाशीत करु शकत नाही याबदल दिलगिर आहे.
सुहास गोखले
सुहासजी तुमचा हेतू योग्यच आहे हे वेगळे सांगायला नको, पण आम्ही हा भाग नक्कीच miss करतोय . भरपूर भूक लागल्यावर अर्धवट जेवल्या सारखे वाटतंय . असो. धन्यवाद !!
Sir Konya yekachi Katha pudhe jaudya. Vat pahat aahe. Tumache class suru Kara.
हो नक्की उमेशजी, या महीना अखेर व्यापातून मोकळा होतोय तेव्हा पुढे चालू करु , क्लासेसा ना जरा वेळ लागेल.
सुहास गोखले
Tumhi Class suru kele ki aamhala kalel aamhi kontya patali var aahot te kalel.
धन्यवाद उमेशजी,
शिकणे ही सतत चालणारी प्रक्रिया असते ती कधीच थांबत नाही. प्रयत्न चालू ठेवा.
सुहास गोखले
भारी आहे हा विषय .. ! मजा येईल वाचायला..!
धन्यवाद गौरवजी ,
सुहास गोखले
We have so many “after the fact astrologers”. On YouTube, I see a lot of “Vedic Astrologers” explain an event after it has occurred. From that kind of explaination it does not make sense at ll. They look at transits from lagna, moon rashi lagna, arudha lagna, from mahadasha lord. If this does not work then bhavat bhavam. By this hook or crook methodology anyone can explain any event.
हिमांशुजी,
आपले निरिक्षण आणि अनुमान अचूक आहे.
ज्योतिषातली एक मजा म्हणजे “You can prov / disprove anything is Astrology’ , “you can always find supporting planetary influence once an event has already occurred” “If you look for evidencs, you will always find it”
घटना घडल्या नंतर ती का घड्ली याची कारण मिमांसा देणे अगदी सोपे आहे ,
श्री. नरेंद मोदी अविवाहीत आहेत असे एके काळी मानले जात होते स्र्व ज्योतिषी ते अगदी पटवून सांगत होत. 2014 च्या निवडनूकां दरम्यान श्री. नरेंद्र मोदींनी मी विवाहीत आहे , माझी पत्नी जिवंत आहे असे निवेदन करताच हे सगळे ज्योतिषी तोंड्घशी पडले (अगदी भले भले ज्योतिषी आहेत यात) , आता तेच ज्योतिषी श्री. नरेंद्र मोदी विवाहीत आहेत हे त्यांच्या पत्रिकेत दिसते असे सांगत फिरत आहेत
ते युट्यूब वाले नेमके हेच करत असतात.
त्यांचा मूल हेतु हा ‘धदा वाढवणे’ हाच असतो , लोकांना ज्ञान देणे इ. सब झूठ !
सुहास गोखले