A tire kicker is someone who’s going to ask, and ask and ask, with very little chance of them ever paying for your services. A tire kicker is a low baller, a time waster and a constant danger to any independent worker.

जसे मी ज्योतिषांचे अनेक बरे वाईट अनुभव घेतले आहेत तसे जातकांचे ही !

मी जेव्हा ज्योतिषांना भेटत होतो आणि एकेक विचित्र अनुभव घेत होतो तेव्हा वाटायचे हे लोक असे का वागतात? यांच्यात इतका तुसडे पणा का? पैशा बाबतीत हे लोक इतके बद्दल आग्रही का? यांचा समोरच्या माणसावर इतकाही विश्वास नाही का?

पण जेव्हा मी स्वत:च या ज्योतिषाच्या व्यवसायात उतरलो आणि एक एक जातकांचे अनुभव मिळायला लागले तेव्हा ते ज्योतिषी तसे का वागत होते याची उत्तरें मला आपोआपच मिळाली !

उदाहरणच द्यायचे तर:

त्यावेळेचे बरेच ज्योतिषी “आधी पैसे भरा मगच काय ते बोलतो” असा पवित्रा घ्यायचे , तेव्हा राग यायचा पण आज कळते आहे की ते ज्योतिषी बरोबर वागत होते, अनेक वेडेवाकडे , फसवणुकीचे अनुभव आल्यानेच त्यांचे वागणे तसे बनले असावे.

गेल्याच आठवड्यातले हे दोन अनुभव.

एका जातकाने फोन केला , जातका कडे काहीशी काळजीची परिस्थिती निर्माण झाली होती, या जातकाने माझ्या कडून पुर्वी एकदा मार्गदर्शन घेतले असल्याने तसा परिचय होता. जातकाचा प्रश्न तात्कालीन असल्याने प्रश्नकुंडली म्हणजेच होरारीच्या माध्यामातून सोडवणे योग्य होते.

माझा जातकाशी जेव्हा पहिल्यांदा संपर्क होतो (फोन , ईमेल, प्रत्यक्ष भेट) त्या अचूक वेळेची एक पत्रिका मी बनवतो, त्याला कन्सलटेशन चार्ट म्हणतात. या चार्ट बद्दल मी पूर्वी बरेच लिहले आहे ,

(माझे पूर्वीचे काही लेख: घोसला का घोसला, तुटून जाती रेशीम गाठी इ. लेख वाचावेत

खोसला का घोसला (भाग – 1) : एक केस स्ट्डी

तूटून जाती रेशीमगाठी ! (भाग-१) )

या वेळेस ही असा चार्ट जातक फोन वर बोलत असतानाच बनवला होता, चार्ट बराच आश्वासक होता (उत्तर देण्याच्या क्षमतेच्या दृष्टीने) त्यामुळे मी जातका कडुन वेगळा होरारी नंबर (१ ते २४९ मधला) न घेता त्या टाइम चार्ट वरुनच उत्तर शोधायचे ठरवले.

अर्थात असे असले तरी त्याला काही वेळ लागणार होता , त्या वेळी हातात असलेली कामें प्रथम पूर्ण करायची होती , याचा विचार करुन मी जातकाला त्याच दिवशी संध्याकाळी उशीरा फोन करायला सांगीतले. त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत मी जातकाचे काम पूर्ण करुन ठेवले होते , पण जातकाचा फोन काही आला नाही! त्या दिवशी नाही , दुसर्‍या दिवशी नाही, तिसर्‍या दिवशीही नाही, आता तो येणारही नाही.

कदाचित ज्या प्रश्नासाठी जातकाने माझ्याशी संपर्क केला होता त्याबाबतीत असे काही तरी घडले असेल की जातकाला त्याचे उत्तर आपोआपच मिळाले असावे त्यामुळे मला फोन करायची आवश्यकता त्याला वाटली नसावी. तसे असेल ही पण इकडे मी जे दोन तास खर्चुन जातका साठी काम केले होते त्याचे काय? जातकाचा प्रश्न सुटला याचे समाधान आहेच पण माझ्या मेहेनतीचे काय ? ते असेच वाया गेले समजायचे का? बरे , प्रश्न आपोआपच सुटला आता ज्योतिष मार्गदर्शनाची गरज नाही असे किमान कळवायचे तरी पण कशाला फोन करायचा फोन केला तर पैसे मागतील असा विचार करुन जातकाने फोन केला नसावा. त्याने पैसे वाचवले पण मी फटका खाला त्याचे काय ?

याच आठवड्यात अगदी असाच दुसरा अनुभव आला ..

इथेही हीच कहाणी, जातकाने फोन करुन अगदी काकुळतीने येऊन प्रश्न विचारला होता . हा ही जातक पूर्वी येऊन गेला असल्याने , पैसे कोठे जातात असा विचार करुन मी काम पूर्ण केले , त्यात माझे असेच दोन तास गेले. ज्या दिवशी या जातकाने संपर्क साधला होता त्या दिवशी संध्याकाळी मी एका महत्वाच्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती च्या महत्वाच्या प्रश्नावर काम करणार होतो, आणि त्यासाठी सलग वेळ लागणार होता , मी जातकाला बजावले होते , मी सांगीतलेल्या वेळातच फोन करा आणि फोन करणे जमणार नसेल तर मला न चुकता तसे कळवावे , मी द्सरे काम सुरु करणार आहे त्यात मला कोणताही खंड नको आहे. आज जमणार नसल्यास उद्या बोलता यईल पण फोन करणार नसल्यास किमान एसएमेस पाठवून कळवाच.

पण याही जातकाने फोन केला नाही, फोन करत नसल्याचे कळवले नाही, त्याला ही आता चार दिवस झाले , जातकाने अद्यापही फोन केलेला नाही. जातकाची अडचण लक्षात घेऊन महत्वाची कामे बाजूला ठेवून दोन तास केलेली मेहेनत मात्र अक्षरश: पाण्यात गेली !

अनेकदा लोक फोन करतात , बराच वेळ बोलत वेळेची नासाडी करतात , बहुतेक वेळा आडून आडून काही फुकट भविष्य पदरात पडते का हे तपासत असतात. कोणत्याही व्यापारात , व्यवसायात आलेल्या ग्राहकांना माल दाखवणे , मालाची माहीती देणे, मालाची किंमत सांगणे असे करावेच लागत , मला ही अशा फोन कॉल्स नाही म्हणता येत नाही पण तास – तास भर फोन वर पिडून नंतर गायब होणे या प्रकाराला काही आळा घालावा या निष्कर्षा वर मी आलो आहे.

प्राथमिक माहीती इ. साठी दहा बारा मिनिटांचा कॉल पुरेसा आहे पण याहुन जास्त बोलणे वाढते आहे (जातक टायर किकर आहे !) असे दिसल्यास याहुन जास्त चर्चा करायची असल्यास आधी पैसे भरुन माझे ग्राहक व्हा मगच काय ते बोलू असा पवित्रा घेणे नाईलाजाने का होईना भाग पडत आहे.

म्हणून मी आता नियमच करत आहे , आधी पैसे भरा मगच काम सुरु करतो.

प्री पेड सिम ला नाही का ‘आधी टॉक टाईम चा रिचार्ज मारा मगच काय बोला ते बोला’ असे असते तसेच हे काहीसे.

मान्य आहे , काही खर्‍या (जेन्युईन) जातकांना हे खटकेल, काहींना हे अपमानस्पद वाटेल (जसे मला एके काळी वाटत होते) पण माझाही नाईलाज आहे , काही वेळा सुक्या बरोबर ओलेही जळते म्हणतत ना?

अशी ही जातकांची तर्‍हा…

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

11 प्रतिक्रिया

///////////////
 1. pramod bhelose

  बरोबर आहे…पैसे दिल्यानंतरच माणसाला मोल कळते
  बाकि ‘खोसला का घोसला’ वाचले ..खुपच छान अभ्यास आहे तुमचा.
  प्रमोद

  0
  1. सुहास गोखले

   श्री.प्रमोदजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ‘गरज सरो वैद्य मरो’ म्हण उगाचच प्रचलित झाली नाही .त्यामुळेच ‘आधी पैसा टाका मगच तोंड उघडतो’ असा रोखठोक पवित्रा कोणी घेतला तर त्यात वावगे काहीच नाही.

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   माझ्या व्य्वसायात कोणताही कच्चा माल नाही , माझा ‘वेळ’ हीच मोठी गुंतवणूक असते. मझ्या व्यवसायाचे स्वरुपच असे आहे की मी हताखाली माणसें ठेऊन काम डेलेगेट करु शकत नाही ,माझा प्रत्येक तास / मिनिट हे प्रॉडक्टीव्ह असलेच पाहिजे असा माझा प्रयत्न असतो.

   सुहास गोखले

   0
 2. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar,
  I think this policy is perfectly understandable. I remember one article ‘Kala Jya Lagalya Jeeva’ in which mentioned that you were not paid despite repeated reminders.
  Kalave Lobh Asava,
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,
   सप्रेम नमस्कार,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपल्या सारखे समजून घेणारे सुज्ञ फार कमी . मुळात लोकांना ज्योतिष ( सॉफ्ट्वेअर , म्युझीक ) फुकटच हवे असते , पैसे देताना कुरकुर करतात किंवा पैसे घेतले तर समस्या सोडवली पाहीजे असा सौदा असतो.

   खरेतर ज्योतिष हा व्यवसाय सरळ , प्रामाणिक पणे (उपाय – तोडग्यांचा व्यापार न करता) केला तर दोन वेळचे पोट ही भरणार नाही. माझे पोट व्यवसायावर नक्कीच अवलंबून नाही, त्यामुळे काही वेळा वाटुन जाते ही सर्व कन्सलटेशन्स बंद करुन ज्योतीष शिकवणे , ज्योतिषावर संशोधन याला वेळ द्यावा . निदान पुढच्या पिढीला / समाजाला काहीतरी दिल्याचे समाधान तरी लाभेल.

   सुहास गोखले

   0
 3. स्वप्नील

  खरे आहे सुहासजी लोकांचा दृष्टीकोनच वेगळा आहे जोतिष आणि जोतीशांकडे पाहायचा . वकील, डॉक्टर यांचे कडे हवे तितके पैसे मोजतील पण जोतीशाना फी द्यायची झाले तर हात अकडता घेतात .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,

   कह्रे आहे , पण इथे मुद्दा आहे दिलेला शब्द पाळण्याचा . मी उल्लेख केलेल्या दोन्ही केसेस मध्ये , दोन्ही जाताकांनी मी मागत असलेले मानधन मान्य केले होते , मी त्यांचे काम करुन ठेवले होते आता त्यांनी शब्द पाळायला हवा होता.

   सुहास गोखले

   0
  2. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी ,

   आपले अनुमान बरोबर हे , पण इथे मुद्दा आहे दिलेला शब्द पाळण्याचा . मी उल्लेख केलेल्या दोन्ही केसेस मध्ये , दोन्ही जाताकांनी मी मागत असलेले मानधन मान्य केले होते , मी त्यांचे काम करुन ठेवले होते आता त्यांनी शब्द पाळायला हवा होता.

   सुहास गोखले

   0
 4. Anant

  श्री. सुहासजी,

  एकदम उत्तम निर्णय.
  ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना काही वाईट वाटणार नाही. जे उगाच या गोष्टीचा बाऊ करतील त्यांच्यासाठी तुमचा वेळ खर्च करण्याची गरजच नाही.

  धन्यवाद.
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   धन्यवाद.

   काय होते असे वाईट अनुभव येतात मग काही कठोर निर्णय घ्यावे लागतात . अर्थात जर पूर्वीचा अनुभ्व चांगला असेल मी ही “आधी पैसे मग सेवा’ असा आग्रह धरणार नाही , तसे तारतम्य बाळगावे लागतेच.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.