निवांतपणे चष्म्याच्या काचा पुसुन , चष्मा डोळ्यावर स्थानापन्न करत ज्योतिषीबुवा म्हणाले..
“नास्तिक दिसताय… चालायचेच .. पण पटेल , एक न एक दिवस पटेल हे सगळे तुम्हाला”
“इथे मी आस्तीक आहे का नास्तीक हा प्रश्नच उद्भवत नाही, मी एक प्रश्न विचारला होता , त्याचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय उत्तर आहे हे मला जाणुन घ्यायचे होते , तुम्ही एकतर ते उत्तर दिलेच नाहीत वरतून ग्यानबाची मेख काय, नियति काय, सेंट्रीफ्युगल फोर्स काय , रस्सीखेच , गॉगलच्या काचा, दगड आणि धोंडे ! काहीही तोंडाला येईल ते सांगत सुटलाय”
“काय बोलता आहात गोखले तुम्ही ? मी काहीच भविष्य सांगीतले नाही ? अहो मग इतका वेळ मी काय सांगत होतो?”
“हे जे ठोकळेबाज , दोन्ही डगरींवर हात ठेवणारे , अंदाजपंचे दाहोदरसे असे जे काही सांगताय त्याला तुम्ही भविष्य म्हणता ? कमाल आहे ! शनवारवाड्या समोरचा एखादा पोपटवाला कुडमुडा सुद्धा याहुनही बरे भाकित अवघ्या ५ रुपयांत करेल ! तुम्ही तर चक्क ५१ रुपये घेतलेत वाजवून , निदान त्याला साजेसे असे काहीतरी नीट अभ्यास करुन सांगा ना !”
“अहो, कोणाशी तुलना करता आमची?”
“तुमचे नाव ऐकून आलो होतो आणि आता हे असले काही तुमच्या कडून ऐकायला मिळाल्यावर तुलना होणारच ना ? मी बघतोय अगदी सुरवाती पासुन शेवट्पर्यंत सगळेच चुकीचे , असंबद्ध आणि गोलमगोल ”
“ज्योतिषात नक्की , ठोस असे काही नसते..”
“मला माहीती आहे , ज्योतिष शक्याशक्यता – प्रोबॅबलीटीज सांगते पण म्हणून तुम्ही अव्वाच्या सवा पैसे घेऊन काहीही थातुमातुर सांगत सुटायचे ? इतकी वर्षे ज्योतिषात घालवल्या नंतर सुद्धा पत्रिकेचा नीट अभ्यास करुन , आत्मविश्वासाने , एकच एक ठाम असे उत्तर का देत नाही ? जास्तीतजास्त काय होईल ? उत्तर चुकेल , हरकत नाही, चुका सगळ्यांच्याच हातुन होतात. पण उत्तर चुकेल या भीतीपोटी तुम्ही सगळ्याच शक्यता वर्तवून मोकळे झालात, छापा ही तुमचाच आणि काटा ही तुमचाच , आता यातले काही तरी एक होणारच मग परत तुम्ही म्हणायला मोकळे ‘बघा , मी सांगीतले होते तसेच झाले की नाही’ ! ते अभिप्राय / पडताळे दाखवताय ते असेच मिळवलेत का? “
“रागावू नका गोखले , शास्त्राच्या म्हणुन काही मर्यादा असतात ना?”
“या शास्त्राला मर्यादा आहेतच, मी कोठे त्या अमान्य करतोय , पण शास्त्राच्या मर्यादा माहीती असताना , ज्या प्रश्नांची उत्तरे या शास्त्रा द्वारे देता येणार नाहीत ती देण्याचा घाट का घालता? सरळ या प्रश्नाचे उत्तर मला देता येत नाही म्हणुन मोकळे का नाही झालात? आणि काय हो, उठसुठ त्या महाराजाचे नाव घेत असता , तुमच्या तोंडून बोलणार्या या अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराजाला कसल्या आल्यात शास्त्राच्या मर्यादा फिर्यादा ?
“आता तुम्हाला कसे समजावयाचे?”
“त्याची गरज नाही”
“गोखले , खरे तर असले प्रश्न आम्ही जन्मकुंडली वरुन सोडवतच नाही, असल्या प्रश्नाला प्रश्नकुंडली सगळ्यात बेस्ट !”
“मग प्रश्नकुंडलीच मांडायची होती ना? त्यात कोणती अडचण होती, मी तर काही अडवले नव्हते ना?”
“त्याचे काय आहे , गोखले, एकाच बैठकीत आम्ही दोन्ही कुंडल्या तपासत नाही”
“प्रश्नकुंडली का जन्मकुंडली हा चॉईस तुमचाच होता, शेवटी मला प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशी मतलब होता ना?”
“गोखले तुम्ही असे करा, बाहेर सांगून एक नविन अपॉईंट्मेंट घ्या, आपण कृष्णमुर्ती पद्धतीने तुमचा प्रश्न तपासू, एकदम अॅक्युरेट उत्तरें मिळतात”
“कृष्णमुर्ती पद्धती ? हे आधीच का नाही केले ? आता परत नविन अपॉईंटमेंट घ्या म्हणताय म्हणजे परत नव्याने पैसे भरायचे का ?”
“हो, तशी आमची सिस्टीमच आहे , तसे प्रश्नकुंडलीला मी कमी मानधन घेतो, प्रश्नकुंडली बनवणे आणि उत्तर देणे असे दोन्ही मिळून फक्त १०० रुपये”
“निर्लज्जपणाचा कळस आहे हा ! काही नको, झाले तेव्हढे बास झाले , तुम्हीच म्हणाला होतात ना ‘पुण्याचे ज्योतिषी वाईट नाहीत” आता काय सांगू मी लोकांना?”
“तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढताय”
“ओ बास्स करा, आता जादा वाद विवाद नको. येतो मी ”
मी पुण्याचा नाही , मी पुणेरी नाही तरी यावेळेला मात्र मी तो कुप्रसिद्ध पुणेरी तुच्छतेचा भाव तोंडावर आणत त्या ज्योतिषीबुवां कडे एकदाच बघितले…
जाताना त्या लाकडी फळकूटाच्या पार्टीशनला कचकचीत लाथ घालत असा काही दरवाजा उघडला की त्या आवाजाने दचकून छाया थरथर कापत , उभी राहीली होती.
कसेबसे बुट पायात सरकवले . धाड्धाड जिना उतरत रस्त्यावर आलो…
एक दीर्घ मोकळा श्वास घेतला …
फुटपाथ वरचा तो दिव्याचा खांब मला का कोणास ठाऊक एकदम सुंदर दिसायला लागला !
समाप्त…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहासजी,
एकदम बच्चन style ने दरवाजा वर लाथ मारलीत 🙂 , ह्या ज्योतिष महाशयां विषयी खरोखर उत्सुकता निर्माण झाली आहे नक्की कोण होते.
बाकी लेख मला एकदम उत्कृष्ट आणि उत्कंठावर्धक होती.
बाकी ग्रहयोग मालिकेला कधीचा मुहूर्त आहे 🙂 तुम्ही नक्की पुस्तक लिहा ग्रहयोगावर मराठी मध्ये फारस लेखन नाही ह्या विषयावर.
संतोष
श्री. संतोषजी,
अभिप्रयाबद्दल धन्यवाद.
अहो त्यावेळेचे माझे वयच (२४) अॅग्री यंग मॅन वृत्तीला साजेसेच होते.
असो, ग्रहयोगावरचे पुस्तक ७० % लिहून तयार आहे , प्रकाशकाशी चर्चा चालूच आहेत. पुस्तक येणार आहे म्हणून लेखमाला पूर्ण केली नाही , लेखमाला वाचली तर पुस्तक कोण विकत घेणार ?
सुहास गोखले
खरच असले जोतीशी भेटले तर काय मार्गदर्शन करणार ? आता पुढच्या अनुभवाच्या प्रतीक्षेत . ते बंगाली बाबांचे पण सांगाना..!!
श्री स्वप्नीलजी ,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
khup chan… ekun kaay tar asha lokankade janyapurvi tya vishyababat thodi mahiti asleli bari…
श्री. प्रमोदजी, अभिप्राया बद्दल धन्यवाद.
चांगला – वाईट ज्योतिषी ओळखणे तसे अवघडच आहे , पण काही बाबीं कडे लक्ष ठेवले तर हे समजणे सोपे जाते. मी वेळ मिळालातर केवळ ‘वाईट ज्योतिषी कसा ओळखावा ‘ या विष्यावर एक लेख लिहायचा प्रयत्न करेन . बाकी एक नवा विषय सुचवल्या बद्दल मन:पूर्वक आभार !
सुहास गोखले
मस्त! असेच ज्योतिषी जास्त आहेत. तुमच्या सारखे फारच कमी आहेत. तुमचे भविष्य एकदम तंतोतंत असते. पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे.
सई इंगळे
सईजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
सगळेच लेख उत्कृष्ट लिहलेत सर
आणि बाकी तुमच्या लेखनशैलीला तर तोडच नाही
श्री सुभाषजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद
सुहास गोखले
Shri. Suhasji,
Solid !!
I can visualize you storming out their while Chaya looking at you with fearful face.
BTW – how is your new machine working ?
Best wishes for future writing.
Warm Regards,
Anant
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
त्यावेळेचे (१९८७) चे माझे वय (२४) तसेच होते , अॅंग्री यंग मॅन ! राग त्या ज्योतिषावर होता , बिच्चार्या दरवाजावर निघाला. त्या ज्योतिषाचे भविष्य चुकले असते तरी मला त्याचे काही वाटले नसते त्याने प्रामाणिक प्रयत्न केले याचे उलट कौतुक केले असते.
मुळात तो ज्योतिषी कोणी महान नव्हताच पण स्वत:चा टीर्या बडवून घ्यायची कला त्याला चांगली अवगत होती.
असो.
माझे नविन मशीन उत्तम चालू आहे , सॉलीड स्टेट ड्राईव्ह ने चांगलाच फरक पड्तो.
सुहास गोखले