एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला …..

या लेखमालेतले पहिले दोन लेख इथे वाचा:

या लेखमालेचा पहिले भाग इथे वाचा:

अबब ! किती हे प्रश्न ! (१)

अबब ! किती हे प्रश्न ! (२)

अबब ! किती हे प्रश्न ! (३)

अबब ! किती हे प्रश्न ! (४)

 


ज्यो. शांताराम केणी लिहितात:


अपेक्षापूर्तीचे योग:

१) युतीयोग (Conjunction):

संबधीत कारक ग्रहांची applying स्वरूपाची युती होणे, हा अपेक्षापूर्तीचा महत्त्वाचा योग असून असा योग तनुस्थानात , केंद्र स्थानात, चर राशींतून घडणे अधिकाधिक चांगले असते तसेच हे योग करणारे ग्रह , विशेषत: युती करण्यास जात आलेला ग्रह अतिचारगतीप्रत असणे हे इच्छित गोष्ट अल्प काळात साध्य होण्याच्या दृष्टीने जास्त चांगले असते. मात्र ती युती पूर्ण होण्यापूर्वी या कारक ग्रहांशी अन्य कोणत्याही ग्रहांचा कोणताच दृष्टीसंबंध न घडणे आवश्यक असते. कारक ग्रहांचा हाच युती योग पणफर स्थानातून घडत असेल तर विलंबाने कार्यसिद्धी होते. आणि तोच योग आपोक्लिम स्थात होत असेल तर तो कार्यसिद्धी होई पर्यंत बरीच भवति न भवति होऊन कालापव्यय होत असतो व कार्यसिद्धी लाभणार्‍या समाधानात कमतरता येत असते.

खुलासा:
कोणत्याही दोन ग्रहांची युती ही त्या ग्रहांच्या नैसर्गिक आणि विशिष्ट गुणधर्मांनुसार शुभ वा अशुभ अशा उभय प्रकाराची होत असते, व शुभ युतीची फळे शुभपर्यवसायी आणि अशुभ युतीची फळे अशुभपर्यवसाची मिळतात , हा जातकशास्त्रातील एक प्रमुख नियम आहे. तथापि हा नियम प्रश्नज्योतिषास लागू आहे काय याबाबतचे निश्चित निदान आम्हास अजूनपर्यंत सापडले नसल्याने या बाबतीत मतप्रदर्शन करीत नाहीत तथापि आमची स्वत:ची कल्पना अशी आहे की, जातकांतील नियम कसा ही असला तरी प्रश्नज्योतिषात अशी युती मग ती शनि-चंद्र किंवा रवि-मंगळ अशां सारख्या ग्रहांची देखील झालेली असो, ती अपेक्षित आणि तात्कालीक कार्यसिद्धीची द्योतक असते. मग त्या कार्याचे अंतिम पर्यवसान काहीही होवो. उदाहरणार्थ भागीदारी जुळवण्याबाबतचा प्रश्न असून शनि आणि चंद्र हे त्याचे कारक आहेत असे गृहीत धरू अशा वेळी या कारकांची युती होत असेल तर “भागीदारी’ जुळणे ही जी पृच्छकाची तत्कालीन अपेक्षा होती ती साध्य होईल असा फलादेश मिळतो. मग त्या शनि-चंद्राच्या युती मुळे त्या भागीदारीचा शेवट दु:खपर्यवसायी होओ किंवा ती भागीदारी पश्चातापास कारणीभूत होओ !

२)  त्रिकोण व त्रिरेकादश योग (नवपंचम आणि लाभयोग Trine and Sextile) :

युतीच्या खालोखाल महत्त्वाचे योह कोणते असतील तर ते त्रिकोण व त्रिरेकादश हे दोन योग होत. संबधित कारक ग्रहांच्या ‘अपेक्षित – applying’ स्वरूपाचा असा योग होणे , योग करणारे ग्रह बलवान असणे, असा योग करण्यास जात असलेला ग्रह केंद्रस्थानात व चर राशीत असणे, संकल्पित योग पूर्ण होण्यापूर्वी अन्य ग्रहांच्या पापयोगात , विशेषत: क्रूर ग्रहांच्या कसल्याही दृष्टीयोगात ते न येणे, इत्यादि गोष्टी कार्यसिद्धीच्या किंवा अपेक्षापूर्तीच्या बाबतीत नेहमीच अनुकूल असतात.

३) मध्यस्थ योग (Translation Of Light):

अपेक्षित दोन ग्रहांचा युती किंवा एखादा शुभ योग इष्टकालापूर्वीच होऊन गेलेला असला म्हणजे तो योग विभक्त (Separating) अवस्थेत असला, तर त्या योगाची शुभ फळे मिळत नसतात. परंतु अशा वेळी तिसरा एखादा ग्रह मध्ये आला म्हणजे त्या दोन ग्रहां पैकी एकाशी शुभ योग करुन दूर गेलेल्या (Separating) अवस्थेत असतात दुसर्‍या ग्रहाशी एखादा आगामी ( Applying) शुभ योग करत असला तर त्या तिसर्‍या ग्रहाच्या किरणांचा किंवा मध्यस्थीच्या योगे अपेक्षित दोन्ही ग्रह परस्परांशी जोडले जाऊन त्यांच्या शुभयोगाची फळे मिळत असतात , हा योग फार प्रभावी व अचूक फलदायी असतो.

उदाहरणार्थ , धनू राशीच्या २० अंशावर शुक्र असून कुंभेच्या १५ अंशावर शनि आहे,  म्हणजे या शुक्राचा तो धनेत १५ अंशावर असताना कुंभेतल्या शनिशी त्रिरेकादशयोग ( ६० अंश , लाभ योग , Sextile) योग झाला होता , शुक्र आता त्या योगातून बाहेरही पडला आहे , हा योग प्रश्न विचारते वेळेच्या आधीच होऊन गेलेला असल्याने आता तो निरुपयोगी आहे , निष्फळ आहे. परंतु अशा वेळी समजा एक तिसरा ग्रह,  चंद्र जो मेषेत १४ अंशावर आहे , तो  प्रथम कुंभेतल्या १५ अंशावरील शनिशी  त्रिरेकादशयोग ( ६० अंश , लाभ योग , Sextile) योग करेल आणि चंद्र तसाच पुढे मार्गक्रमण करत धनेतल्या १५ अंशावरच्या शुक्राशी नवपंचम योग (Trine) करेल. म्हणजे शुक्र आणि शनी कोणत्याही योगात नसले तरी चंद्रा सारख्या तिसर्‍या ग्रहाच्या मध्यस्तीने त्यांच्यात योग प्रस्थापीत झाला, यालाच ‘मध्यस्थ योग’ म्हणतात. इथे चंद्राने शुक्र आणि शनी यांच्यात मध्यस्थी केली. चंद्राने शनि कडील प्रकाश (light) , शुक्रा पर्यंत पोहोचवला म्हणून याला Translation of Light असे म्हणतात.

मात्र इथे काही मुद्दे लक्षात घ्यायचे ते असे:

 1. मध्यस्थ ग्रह चंद्रच असला पाहीजे असे नाही, कोणताही ग्रह मध्यस्थ म्हणून काम बजावू शकतो.
 2. हा मध्यस्थ ग्रह मात्र अपेक्षित दोन ग्रहांपेक्षा जलद गतीचा ग्रह असलाच पाहीजे अन्यथा मध्यस्थी होऊ शकणार नाही. वरील उदाहरणात अपेक्षित ग्रह शुक्र आणि शनि असे आहेत या दोघांत मध्यस्थी करणारा ग्रह या दोन ग्रहांपेक्षा जलद गतीचाच असला पाहीजे.
 3. तिसरा महत्त्वाचा मुदा म्हणजे , मध्यस्थ ग्रह एका ग्रहाशी योग करुन दुसर्‍या ग्रहाशी योग पूर्ण करे पर्यंत या मध्यस्थ ग्रहाचा इतर कोणत्याही ग्रहाशी कोणताही योग होता कामा नये. वरच्या उदाहरणात चंद्राने शनीशी लाभयोग केला पण नंतर शुक्राशी नवपंचम व्हायच्या आधी या चंद्राचा एका चौथ्या ग्रहाशी कोणता योग होत असेल तर मात्र ही मध्यस्थी यशस्वी होणार नाही कारण चंद्राने शनि कडून घेतलेला प्रकाश शुक्रा पर्यंत न पोहोचता इतर योग करणार्‍या त्या चौथ्या ग्रहालाच मिळेल.

अर्थात, असा मध्यस्थ ग्रह ज्या स्थानात असेल किंवा ज्या स्थानाचा अधिपती असेल, त्या स्थानांनी दर्शित होणारी व्यक्ती मध्यस्थाची भूमिका पत्करुन , फिसकटण्याच्या मार्गावर असलेले कार्य यशस्वी करून देत असते, चंद्र हा अन्य कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त जलद व प्रभावी आणि झटपट कार्यसिद्धी करुन देणार मध्यस्थ ठरत असतो.

४) संग़्रह योग (Collection Of Light):

अपेक्षित दोन ग्रहांमध्ये कोणताच दृष्टीयोग न घडता हे उभय ग्रह मंदगती अशा तिसर्‍याच एका तटस्थ ग्रहावर स्वत:चे किरण फेकीत असले किंवा त्या तटस्थ ग्रहाने या उभय ग्रहांचा अन्योन्य संबंधा सारखा तात्पुरता आश्रय घेतलेला असेल तर अशा वेळी संग्रह योग होतो.

उदाहरणार्थ: संबधित कारक ग्रह, शुक्र आणि चंद्र आहेत. या दोघांत कोणताही योग होत नाही  पण शुक्र आणि चंद्र हे तिसर्‍या एका ग्रहाशी योग करत आहेत, म्हणजे समजा चंद्र (या उदाहरणासाठी) गुरु शी योग करणार आहे (किंवा गुरुच्या योगात आहे , योगातून नुकताच बाहेर पडला आहे) आणि नंतर शुक्र पण गुरु शी योग करणार आहे अशा परिस्थितीत  गुरु हा चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांमध्ये सामंजस्य घडवून  आणणार आहे, गुरु चंद्राचे ऐकून घेईल आणि मग शुक्राचे पण ऐकून घेणार आहे. गुरु पुढाकार घेऊन चंद्राचा प्रकाश गोळा करेल नंतर शुक्राचा पण प्रकाश गोळा करेल म्हणून याला ‘संग्रह योग’ Collection of Light म्हणतात, प्रकाशाचा संग्रह  करणारा तिसरा तटस्थ ग्रह कार्यसिद्धी व पर्ययाने पृच्छकाची अपेक्षापूर्ती करुन देत असतो.

मात्र इथे काही मुद्दे लक्षात घ्यायचे ते असे:

 1. मध्यस्थ ग्रह गुरुच असला पाहीजे असे नाही, कोणताही ग्रह मध्यस्थ म्हणून काम बजावू शकतो.
 2. हा मध्यस्थ ग्रह मात्र अपेक्षित दोन ग्रहांपेक्षा मंद गतीचा ग्रह असलाच पाहीजे अन्यथा मध्यस्थी होऊ शकणार नाही. वरील उदाहरणात अपेक्षित ग्रह शुक्र आणि चंद्र असे आहेत या दोघांत मध्यस्थी करणारा ग्रह या दोन ग्रहांपेक्षा जलद गतीचाच असला पाहीजे.
 3. तिसरा महत्त्वाचा मुदा म्हणजे , पहीला ग्रह मध्यस्थ ग्रहाशी योग करुन नंतर दुसरा ग्रह पण मध्यस्थ ग्रहाशी योग पूर्ण करे पर्यंत , या दोन ग्रहांशी आणि मध्यस्थ ग्रहांशी इतर कोणत्या ग्रहाशी कोणताही योग होता कामा नये. वरच्या उदाहरणात चंद्राने गुरुशी योग केला पण नंतर शुक्राने पण गुरुशी योग केला , हे होत असताना या तीन ही ग्रहांचा कोणा एका चौथ्या ग्रहाशी कोणता योग होत असेल तर मात्र ही मध्यस्थी यशस्वी होणार नाही कारण गुरु ने चंद्रा कडून घेतलेला प्रकाश शुक्रा पर्यंत न पोहोचता इतर योग करणार्‍या त्या चौथ्या ग्रहालाच मिळेल.

५) केंद्र योग (Square Aspect):

केंद्रयोग (९० अंशाचा योग) हा सामान्यत: अशुभ मानला जात असला तरी प्रत्येक केंद्रयोग नेहमी अनिष्टच असतो असे नाही. केंदर्योगाचे ‘कष्टसाध्य केंद्रयोग’ आणि ‘अनिष्ट केंदर्योग’ असे  वर्गीकरण केले जाते. बलवान, राशिबली स्थितीतील दोन ग्रहांचा केंद्रस्थानांतून घडणारा केंद्रयोग हा ‘कष्टसाध्य केंद्रयोग’ ठरत असतो. आणि राशिनिर्बली आणि शुभदृष्टी विरहीत ग्रहांचा केंद्रेतर स्थानांतून होणारा  केंद्रयोग हा ‘अनिष्ट केंद्रयोग’ मानला जातो, असा अनिष्ट केंद्रयोग हा  स्थिर राशींशी आणि आपोल्किम स्थानांशी निगडित असला तर तो ‘असाध्य आणि अनिष्ट फलदायी योग ‘ ठरत असतो.

प्रस्तुत प्रकरणी संबधित कारक ग्रहांचा ‘कष्टसाध्य’ स्वरूपाचा ‘अपेक्षित – Applying’ केंद्र योग होत असला तरी देखील कार्यसिद्धी आणि अपेक्षापूर्ती या बाबतीत तो योग काही अंशी चांगलाच असतो. तथापि तॉ कार्यसिद्धी होई पर्यंतच्या काळात लागोपाठ अनेक अडचणीं, कटकटीं, आणि संबधित व्यक्तींच्या मनांत परस्परां विषयी अविश्वास उत्पन्न होऊन अशा काही गुंतागुंतीस तोंड द्यावे की सरते शेवटी अतिविलंबाने मिळणारे ते अल्प यश पृच्छाकास बरेच महागात पडते.

पुढच्या भागात  आपण अपेक्षाभंगाचे योग कोणते ते पाहूयात.

 

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Ankush

  सर,
  खुपच नेमकी आणि महत्वपुर्ण माहीती मिळाली..

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.