आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना त्यांचा एक ग्राहक (जातक) म्हणून भेटलेलो आहे. काही वेळा नुसती चौकशी  केलीय तर काही वेळा चक्क पैसे मोजलेत. पुण्यातल्या तर जवळजवळ सर्वच नावाजलेल्या ज्योतिषांचा मला अनुभव आहे. पॉश बिल्डिंग मधले वातानुकूलित ऑफिस, सेक्रेटरी, संगणक, आजूबाजूला मदतनीस, शिकाऊ ज्योतिष विद्यार्थी असा पूर्णं व्यावसायिक सेटअप असलेल्या  हाय टेक ज्योतिषांकडे गेलोय आणि बोळकंडीतल्या, कुबट, अंधार्‍या जागेत, मिणमिणत्या पिवळ्या गुल्लोबच्या उजेडात (?), धुळीने…

आज संगणकावर काही  सेकंदात संपूर्ण शास्त्रशुद्ध पत्रिका  तयार होते पण मी जेव्हा ज्योतिष शिकायला सुरवात केली (1984) तेव्हा संगणकाचा नुकताच चंचुप्रवेश होत होता , संगणकाचा वापर करून पत्रिका या गोष्टी आपल्याकडे प्रचलित झाल्या त्या 90 च्या दशकात. 1984 ते 1992 अशी सात वर्षे मी हाताने गणित करून पत्रिका तयार करत असे, राफेलच्या एफेमेरीज व सायंटिफिक कॅलक्युलेटर हाताशी असताना सुद्धा त्यावेळी मला एक पत्रिका तयार करायला तासभर तरी लागायचा. 1992 मध्ये मी माझा स्वत:चा पत्रिका  तयार करण्यासाठीचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहिला, अर्थात त्या वेळी संगणकाला सोयीच्या अशा ‘एफेमेरीज’ उपलब्ध नव्हत्या, खूप खटपट करून मी  ‘मोझियर ‘ अल्गोरिदम मिळवला, या व्दारे मला खूप…