आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना त्यांचा एक ग्राहक (जातक) म्हणून भेटलेलो आहे. काही वेळा नुसती चौकशी केलीय तर काही वेळा चक्क पैसे मोजलेत. पुण्यातल्या तर जवळजवळ सर्वच नावाजलेल्या ज्योतिषांचा मला अनुभव आहे. पॉश बिल्डिंग मधले वातानुकूलित ऑफिस, सेक्रेटरी, संगणक, आजूबाजूला मदतनीस, शिकाऊ ज्योतिष विद्यार्थी असा पूर्णं व्यावसायिक सेटअप असलेल्या हाय टेक ज्योतिषांकडे गेलोय आणि बोळकंडीतल्या, कुबट, अंधार्या जागेत, मिणमिणत्या पिवळ्या गुल्लोबच्या उजेडात (?), धुळीने…