हो, काल माझ्या वेबसाईट वर चक्क अतिरेकी हल्ला झाला!

मालिशियस अ‍ॅक्टीव्हीटि दिसत आहे अशी ईमेल मला मिळाला होता तेव्हा मी कंसलटेशन मध्ये होतो  त्यामुळे ताबडतोब लक्ष देता आले नाही.

पण वेळ मिळताच ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषीत करुन ताबडतोब कार्यवाही सुरु केली. असे काही होऊ शकते याची कल्पना असल्याने अशा वेळी नेमके काय करायचे याची ‘लिस्ट’ आमच्या कडे तयार होतीच.

तांत्रीक दृष्ट्या आमची वेबसाईट जास्तीत जास्त अभेद्य करण्याचा प्रयत्न जरुर केला आहे पण सध्या आमचे वेबसाईट च्या दुसर्‍या टप्प्यांचे टेस्टिंग चालू असल्याने काही सिक्युरीटी फिचर्स तात्पुरती स्थगित ठेवली होती आणि नेमका त्याचाच गैरफायदा उठवण्यात आला ….

तसे नुकसान काहीच झाले नाही , आमच्या कडे संपूर्ण ब्यॅक अप असल्याने साईट ताबडतोब  मूळ पदावर आणता आली, पण सगळे निस्तरण्यात नाहक वेळ गेला.

या कामी आमच्या वेब होस्टिंग सर्व्हिस प्रोवायडर ‘नेमचीप’ आणि आमचे सीडीएन पार्ट्नर ‘क्लाऊड्फेअर’ यांनी अत्यंत तत्परतेने  मदतीचा हात दिला , या दोन्ही संस्थाचे आभार.

चांगल्या लोकांच्या कंपनीत राहण्याचा हा एक फायदा!

वेबसाईट सुमारे चार तास ‘मेंटेनंन्स मोड’  मध्ये होती , त्याकाळात वेबसाईट ला भेट देणार्‍या वाचकांची काहीशी गैरसमज झाली त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

शुभं भवतु

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  Dear Suhas,

  Your website got hacked ??!!!

  Some people do not have better things to do in life, unfortunately. ” Asur ” mentioned in hindu puranas are such people only.

  Happy defending from extremist attack !!!

  – Sudhanva

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.