दुसरा दिवस उजाडला.
अॅडलीची साक्ष संपल्याने आता सरकारी वकिलांनी बाईंना विटनेस बॉक्स मध्ये बोलावले.
सरकारी वकिलांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
“मिस अॅडॅम्स, तुमच्या वर ‘तुम्ही फ़ॉरच्युन टेलींग करता’ हा आरोप आहे हे आपल्याला मान्य आहे ?”
“नाही”
पुढे चालू …
“मिस अॅडॅम्स, तुमच्या वर ‘तुम्ही फ़ॉरच्युन टेलींग करता’ हा आरोप आहे हे आपल्याला मान्य आहे ?”
“नाही”
“पण आपण तर उघडपणे लोकांना त्यांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे सांगता ह्याला फ़ॉरच्युन टेलींग’ म्हणता येणार नाही का?”
“नाही, मी जे सांगते ते फॉरचुन टेलींग नाही. मी लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या घटना घडतील हे सांगत नाही तर त्यांना त्यांच्या आयुष्यात येऊ शकणार्या संधी, आव्हाने , अडी अडचणीं बद्दल अवगत करते , त्याचा उपयोग करुन व्यक्ती आयुष्याचे नियोजन करु शकते”
“हा मुद्दा जरा स्पष्ट करुन सांगाल का?”
“क्लायंट बरोबरच्या बैठकीच्या सुरवातीलाच मी स्पष्ट पणे बजावते , ग्रह-तारे जे दर्शवतात तेच मी सांगणार आहे , त्यात माझ्या पदरचे काहीही नसेल. क्लायंटला काही सांगत असताना मी नेहमीच “ग्रह असे सुचवतात’ अशा प्रकाराची शब्द योजना करत असते. आणि मी हे पण सांगत असते की “नक्की अमूकच घडेल’ असे कोणताही ज्योतिषी सांगू शकणार नाही. कोणी मला विचारले या वर्षी म्हणजे १९१४ मध्ये माझा विवाह होईल का? तर माझे उत्तर असेल,. तुझा विवाह नक्की १९१४ मध्ये होईल की नाही हे मला माहीती नाही, तुला विवाहाची संधी आहे पण तु लग्न करशील का नाही हे मी सांगु शकत नाही. ज्योतिषशास्त्र केवळ ‘विवाहाची शक्यता’ / ‘संधी आहे ’ इतकेच सांगू शकेल पण तू खात्रीने बोहोल्यावर चढशील हे मात्र कधीच सांगू शकणार नाही. नक्की काय होणार आहे हे मलाच माहीती नाही तर तसे मी माझ्या क्लायंट ला कसे सांगेन? प्रतिकूल ग्रहस्थिती असेल काळजी घ्या आणि जेव्हा अनुकूल ग्रहस्थिती असेल तेव्हा त्याचा लाभ उठवा असेच मी सांगते”
बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे:
“I explain in the beginning I simply give what is shown by the stars. If I read for a client I always say “This is indicated” and I always explain that no astrologer can conscientiously say that any one thing will happen. Sometimes a lady will say “Will I be married in 1914?” I say, “I don’t know whether you will or not. I think you have an opportunity to but whether or not you will I can’t tell. Astrology does not indicate you are going to be hauled to the altar. I am very careful to say what will occur, because I don’t know. In fact, I simply say, “This is likely to be, guard against it, if it is bad. If it is good, make the most of it.”
“म्हणजे काय शेवटी आपण आगामी काळात होणार्या घटनां बद्दलच बोलत आहात, मग हे फॉरच्युन टेलींग नाही का?”
“नाही, ‘विवाहाची संधी’ आहे हे सांगणे म्हणजे ज्योतिष आणि तेच मी सांगते आणि ‘विवाह होणारच ’ हे सांगणे म्हणजे फॉरचुन टेलींग , जे मी करत नाही “
“ग्रेट, शब्दांचा असा चलाख वापर हाच काय तो आपल्यात आणि एखाद्या फ़ोरच्युन टेलर मधला फरक असावा. पण जो शब्दाचा खेळ करत आहात त्यावरुन तुम्ही ‘फॉरच्युन टेलर नाही’ हे पुरेसे सिद्ध होत नाही”
“माझे ऑफीस इतर कोणत्याही बिझनेस सारखे आहे, कोठेही धार्मिक किंवा मंत्रतंत्राचे वातावरण किंवा त्याचा आभास नसतो. मी स्वत: एखाद्या बिझनेस वुमन सारखा पेहेराव करुन माझ्या क्यालंट समोर असते. मी कोणत्याही प्रकारे माझ्या कडे एखादी दैवी किंवा अन्य अनामिक शक्ती , सिद्धी असल्याचे सांगत नाही किंवा तसा समज होईल असे काहीही करत नाही , वागत नाही”
“मान्य , ज्यांना फॉरच्युन टेलर मानले गेले आहे त्यांच्यात आणि तुमच्यात हा पण एक फरक आहे, पण तुमची डिलिव्हरी मेथड आणि बिझनेस मॉडेल जरी वेगळे असले तरी पण शेवटी तुम्ही तुमच्या क्लायंट ला काय सांगता हे महत्वाचे , आणि ते अजुनही ‘फॉरच्युन टेलींग’ या सदरात मोडते असा आमचा आरोप आहे”
“‘फॉरच्युन टेलींग’ ला कोणताही आधार नसतो, त्याच्या मागे कोणतेही शास्त्र किंवा सिद्धांत नसतो, ती विद्या , जर त्याला विद्या म्हणायचेच झाले तर, नियमबद्ध / सुत्र बद्ध करता येत नाही, दुसर्याला शिकवता येत नाही. या उलट मी जे काही सांगते त्याला गणित , खगोलविज्ञान आणि तर्कशास्त्र यांचा भक्कम आधार असतो.”
“गणित आणि तर्कशास्त्र ?”
“हो गणित , तर्कशास्त्र आणि खगोल विज्ञान “
“म्हणजे पुन्हा तेच , माळा, कवट्या , हाडे, अंधार , क्रिस्टल बॉल, पडदे, सुगंध, मंत्र, याच्या ऐवजी जरा वेगळ्या प्रकाराने म्हणजे गणित , तर्कशास्त्र आणि खगोल विज्ञान अशी नावे घेतली जात आहेत पण शेवटी ते सगळे फॉरच्युन टेलींग नाही का?”
“मी गणित , तर्कशास्त्र आणि खगोल विज्ञान ही नावे दिखाव्या साठी घेत नाही तर प्रत्यक्षात त्यांचा वापर माझ्या कामात होत असतो”
या इथे जजसाहेबांनी हस्तक्षेप केला..
“ मिस अॅडॅम्स , आपण जे काही सांगता आहात म्हणजे गणित , तर्कशास्त्र आणि खगोल विज्ञान असे मोठे दाखले देत आहात , प्रत्यक्षात तुम्ही त्यांचा वापर कसा करता , आपली अनुमाने कशी काढ्ता हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल “
“येस मिलॉर्ड “
बाईंनी कोर्टाच्या परवानगीने ज्योतिष , गणित , तर्कशास्त्र आणि खगोल विज्ञान यावरचे असंख्य संदर्भ ग्रंथ कोर्टात आणले.
मग पत्रिका म्हणजे काय ती तयार करताना गणित आणि खगोल विज्ञानाची कशी मदत घेतली जाते हे बाईंनी विस्ताराने सांगीतले.
पुढच्या टप्प्यात ग्रहांची भ्रमणे मुळ पत्रिकेवर सुपर इंपोज कशी केली जातात , त्यांचा अर्थ लावताना तर्क शास्त्राचा वापर कसा आणि किती केला जातो हे बाईंनी अनेक कुंडल्या समोर सोडवून दाखवत समजाऊन सांगीतले. आणलेल्या अनेक ग्रथांची साक्ष देण्यात आली . हे एक शास्त्रच आहे आणि ते एका भक्कम पायावर उभे आहे, हवेतल्या गप्पा नाहीत असे बाईंनी ठासुन सांगीतले.
बाईंचे घणाघाती प्रेझेंटेशन पाहून सारे कोर्ट थक्क झाले …
या ठिकाणी बाईंच्या वकिलाने , जॉर्डन ने बाईंचे १९१२ सालचे एक पॅमफ्लेट कोर्टा समोर सादर केले आणि कोर्टाच्या परवानगीने त्याचे वाचन केले.
त्या पॅमफ्लेट मध्ये लिहले होते..
“ …. general indications for 1912 indicated that for a period of three years, from July 7, 1912, the planet Saturn would be in Gemini, which sign rules the United States, and recalled that every war from which our nation had suffered in the past had occurred during a period when this sign was afflicted, and counseled that our diplomatic relations should be carefully handled. It is significant that the war in Mexico and the great upheaval in Europe are within the limit of this warning….”
जॉर्डन म्हणाला
“या पॅमफ्लेट मधल्या मजकुरातुन एकच गोष्ट सिद्ध होते आहे की माझ्या अशीलाने कोणत्याही प्रकाराचे ‘फॉरच्युन टेलिंग’ केलेले नाही. उलट पॅमफ्लेट मधली विधानें अत्यंत जबाबदारीने केलेली असुन त्यामागे कोणत्या खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय तत्वांचाआधार आहे हे स्पष्टपणे नमूद केले आहे”
पुढे जाऊन , जॉर्डन ने बाईं कडे आलेल्या जातकांची भली मोठी यादी आणि त्यांच्या कडून मिळवलेली प्रशस्तीपत्रके कोर्टा समोर सादर केली यात त्यावेळच्या हाय प्रोफाईल अमेरिकन व्यक्ती होत्या, अब्जाधीश व्यक्ती होत्या, सिनेकलावंत, संगीतविश्वातले मोठे तारे, राजकारणी , उद्योगपती , बँकर्स अशा नामवंतांचा समावेश होता, उदा: J.P. Morgan, Charles Schwab, successive presidents of the New York Stock Exchange; and actors and singers like Tallulah Bankhead, Mary Garden, and Enrico Caruso.”
जॉर्डन म्हणाला
“मिलॉर्ड या यादी कडे एक वरवरची नजर टाकली तरी एक लक्षात येते ते म्हणजे या यादीतली नावे अमेरिकेच्या ईलाईट्स गटात मोडतात. ह्या व्यक्ती ‘फॉरचुन टेलर्स’ कडे जाणार्यातल्या नाहीत. आपण कोणाला भेटतो , काय बोलते याचा दहा वेळा विचार करुन कृती करणार्या या व्यक्ती अशा उगाचच कोणा एका फॉरचुन टेलर कडे जाणार नाहीत , एखादी व्यक्ती जाणे आपण समजू शकतो पण सगळ्या नाहीत”
पण सरकारी वकील चांगलाच खमक्या होता. त्याने पुन्हा बाह्या सरसावल्या…
“म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे किंबहुना तुम्ही असा दावा केला आहे की आकाशातल्या ग्रह- तार्यां कडे पाहात, कागदावर चित्र विचित्र आकृत्या काढून आणि काही बाही गणिते करुन तुम्ही हे अंदाज व्यक्त करत असता”
“हो, मी ज्या आकृत्या चितारते त्याला होरोस्कोप म्हणतात आणि त्यातली अगम्य चिन्हे हे आकाशातल्या ग्रह-तार्यांची असतात आणि गणिते म्हणाल तर आकाशातले ग्रह व त्यांची भ्रमणे यांची असतात, हे सारे खगोलशास्त्र आहे, अशीच गणिते आपल्या वेधशाळा रोजच करत असतात”
“आणि हे सगळे करुन तुम्ही फॉरच्युन टेलींग करता ?”
“मी त्याला फॉरच्युन टेलींग म्हणत नाही”
“मग ते काय आहे”
“अंदाज”
“फॉरच्युन टेलींग म्हणा किंवा अंदाज शेवटी दोन्ही एकच ना?”
“नाही”
या इथे जजसाहेबांनी हस्तक्षेप केला..
“तुम्हाला असे म्हणायचे आहे की जगातल्या कोणाही व्यक्ती बद्दल तुम्ही असा अंदाज देऊ शकता“
“अगदी नक्की”
“असा अंदाज देण्यासाठी आपल्याला काय लागते”
“पैसे!”
(कोर्टात हशा पिकला)
“ऑर्डर ऑर्डर , शांत रहा”
कोर्टात शांतता पसरल्यावर जज नी शांतपणे डोळ्यावरचा चष्मा काढला , खिशातल्या रेशमी हातरुमालाने त्याच्या काचा पुसल्या, चष्मा डोळ्या समोर धरुन काचा स्वच्छ झाल्याची खात्री करुन घेऊन चष्मा पुन्हा डोळ्यावर चढवला.
जज आता काय बोलणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले.
जज नी टेबलाच्या ड्रॉवर मधुन एक लहानशी डायरी काढली , डायरीतली काही पाने उलटून ते एकाएकी थांबले .
चष्मा नाका वर घेऊन त्यांनी बाईं कडे रोखुन बघितले …
जज काय बोलणार या बद्दलची उत्सुकता आता शिगेस पोहोचली होती..
क्रमश:
शुभं भवतु
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019
अफलातून
कुतुहल वाढले
धन्यवाद श्री अविनाशजी
सुहास गोखले
going good.. also please reply to my other comment
धन्यवाद श्री कौशलजी
आपली दुसरी कोणती कॉमेंट आहे , माझा डॅशबोर्ड तर एक ही पेंडींग़ कॉमेंट दाखवत नाही
सुहास गोखले
आमचीही उत्सुकता शिगेला पोहोचली!
धन्यवाद श्री प्राणेशजी
सुहास गोखले
सुहास जी
प्रत्यकारी अनुवाद, योग्य (उत्कंठावर्धक)ठिकाणी क्रमश: , आपण प्रदिर्घ गुढ कांदबरी, टिव्ही मालिका नक्कीच लिहू शकता.
फक्त तेव्हढा तो बटेश अाणि बाबजी पण पूर्ण करा की
धन्यवाद श्री संदीपजी , त्या दोन लेखमाला पुर्ण करणार आहे
सुहास गोखले
nice, avadla, uttammmmmmm……!
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले