कोणत्याही व्हिडीओ ची चार प्रमुख तांत्रिक अंगे असतात :

 

 

 • A : ऑडीओ : ध्वनी
 • V : व्हिडीओ : प्रकाश चित्रण
 • L : लाईटींग़ : प्रकाश योजना
 • E : एडीटींग़ : संपादन

एखादा चांगला व्हिडीओ निर्माण करायचा तर या चारही आघाड्या सांभाळाव्या लागतात. यातली एक जरी बाजू कमकुवत राहीली तरी सगळ्या मेहेनतीवर पाणी फिरते!

मी नुकतेच माझ्या व्हीडीओ चॅनेल साठी ‘सॅमसन’ चा ‘सी ओ टू‘ हा सुपर कॉर्डीऑईड कन्डेन्सर मायक्रोफोन घेतला , या मायक्रोफोन मुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि नैसर्गिक असा ध्वनिमुद्रित होईल आणि त्यामुळे व्हिडीओ चा दर्जा उंचावेल अशी आशा आहे.

अर्थात हा मायक्रोफोन एक्क्सेलार पद्धतीचा असल्याने संगणकाला जोडण्यासाठी एक खास ‘ऑडीओ इंटरफेस’ यंत्रणा (बेरिंजर यु एम २)  पण विकत घ्यावी लागली शिवाय या मायक्रोफोन ‘ओव्हर हेड’ पद्धतीने वापरणार असल्याने , मायक्रोफोन माऊंट करायला खास ‘मायक्रोफोन स्टॅन्ड ‘ घ्यावा लागला तसेच व्हायब्रेशन्स रोखण्या साठी ‘शॉक माऊंट’ आणि ‘प-फ-भ-‘ चे उच्चार चांगले येण्यासाठी एक ‘पॉप फिल्टर’  ! अ..ब ब… बघा एक साधा  मायक्रोफोन काय घेतला पण त्या साठी हा इतका सारा फौजफाटा जमवावा लागला! मारुतीच्या शेपटी सारखी या अ‍ॅटॅचमेंट्ची यादी वाढतच आहे !

 

………………….   पण चांगले काही तरी करायची जिद्द आहे ना ! मग हौ दे खर्च !!

 

असो, या ‘सॅमसन सी ओ टू’ मायक्रोफोन च्या अनबॉक्सिंग चा एक लहानसा व्हीडीओ माझ्या ‘यु ट्युब’ चॅनेल वर प्रकाशीत केला आहे , आपण तो पाहावा आणि  आपला आपला अभिप्राय नोंदवावा अशी नम्र विनंती.

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. अण्णासाहेब गलांडे

  Vdoबघितला,छान. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तुमचा अट्टाहास मनाला सुखावतो. शुभेच्छा.

  0

 2. प्राणेश

  The product seems to be of very good quality. But would it be possible to synchronise audio and video simultaneously with this product?

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्राणेशजी

   मुळात व्हिडिओ कॅमेरा पिक्चर + आवाज असे दोन्ही रेकॉर्ड करतो पण कॅमेर्‍याने रेकॉर्ड केलेल्या ऑडीओ रेकॉर्डींग चा दर्जा अगदी सुमार असतो म्हणून हा एक्सटर्नल मायक्रोफोन आवाज स्वतंत्र रित्या रेकॉर्ड करण्यासाठी वापरायचा. नंतर योग्य त्या व्हिडीओ एडिटर मध्ये कॅमेर्‍याचे फूटेज आणि मायक्रोफोन ने रेकॉर्ड केलेला ऑडीओ ट्रॅक घ्यायचा त्याच वेळी व्हिडीओ कॅमेर्‍याने रेकॉर्ड केलेला ऑडीओ ट्रॅक पण लोड करायचा . हा कॅमेर्‍याचा ऑडीओ ट्रॅक एक संदर्भ – रेफरन्स म्हणून वापरायचा असतो. वेगवेगळी ऑडिओ – व्हिडीओ तंत्रे वापरुन व्हिडीओ फूटेज आणि मायक्रोफोन ट्रॅक सिंक करायचा. कोणतेही चांगले व्हिडीओ एडीटींग़ सॉफ्टवेअर ही ‘सिकिंग’ ची सुविधा देतेच पण फक्त या ‘सिकिंग’ च्या कामासाठी तयार केलेली खास सॉफ्टवेअर्स पण आहेत. एकदा हे सिकिंंग झाले की कॅमेर्‍याचा सुमार दर्जाचा ऑडीओ ट्रॅक आता गरज नसल्याने कट / डीलीट करायचा अशी प्रक्रिया आहे . सिकिंग चे काम सोपे होण्यासाठी, शुटींग सुरु केल्या केल्या एक जोरदार क्लॅप साऊंड मुद्दाम म्हणून द्यायचा (याला सिनेमा जगात क्लॅप म्हणतात) , क्लॅप चा हा खास आवाज ऑडीओ – व्हिडीओ सिंक करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. हा क्लॅप नसेल तरी सुद्धा सिकिंग करता येते पण त्याला वेळ जास्त लागतो.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *