मागच्या भागात आपण प्राथमिक निष्कर्ष काढला होता की अथर्व ची शंका / भिती रास्त आहे ! त्याची नोकरी धोक्यात आहे!
मग खरेच अथर्व ची नोकरी जाणार का वाचणार ?
ते आपण आता केस स्ट्डीच्या या भागात पाहू..
या लेख मालेतला पहिला भाग इथे वाचा : बळीचा बकरा भाग – १
अथर्वचा प्रश्न नेमका मला समजला ती वेळ घेऊन केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.
प्रश्न नोकरी जाणार का ?
०६ नोव्हेंबर २०१६, २०:३०:२३ गंगापूर रस्ता – नाशिक
चंद्र , दशम (१०) आणि षष्ठा (६) चा सब यांनी धोक्याचा ईशारा दिला असला तरी हा फक्त एक प्राथमिक कयास आहे असे असले तरी दशा विदशांचा कौल आणि ट्रान्सीट तपासल्या शिवाय आपल्याला ठोस काही सांगता येणार नाही
तेव्हा आता आपण महादशा- अंतर्दशा- विदशा तपासु म्हणजे नक्की काय घडणार आहे याचा खुलासा होईल.
या प्रश्नकुंडली प्रमाणे चालू असलेल्या दशा- अंतर्दशा- विदशा यांचे टेबल शेजारी छापले आहे.
वेळे ला रवीची महादशा चालू आहे ती २५ मे २०१८ पर्यंत चालणार आहे.
या महादशा स्वामी रवी चे कार्येशत्व पाहूयात:
रवी पंचमात (५) आहे , रवीची सिंह रास चतुर्थ (४) स्थानावर आहे , रवी गुरु च्या नक्षत्रात , गुरु चतुर्थ (४) स्थानात , गुरु च्या धनु आणि मीन राशी सप्तम (७) , अष्टम (८) आणि लाभ (११) स्थानांवर , म्हणजे महादशा स्वामी रवी चे कार्येशत्व असे असेल:
रवी: ४ / ५ / ७ , ८ . ११ / ४
महादशा स्वामी पंचम (५ ) आणि अष्टम (८) स्थानां च्या माध्यमातून नोकरी साठी प्रतिकूल आहे.
दशा स्वामी बरोबर त्याचा सब पण तपासावा लागतो.
हा दशा स्वामी रवी चा सब आहे गुरु , गुरु चे कार्येशत्व असे असेल:
गुरु चतुर्थ (४) स्थानात आहे , गुरु च्या धनु आणि मीन राशी सप्तम (७) , अष्टम (८) आणि लाभ (११) स्थानांवर , गुरु चंद्राच्या नक्षत्रात , चंद्र अष्टमात (८) आणि त्रितीयेश (३)
गुरु : ८ / ४ / ३ / ७, ८, ११
दशा स्वामीचा सब गुरु देखील अष्टम (८ ) आणि त्रितीय (३) स्थानांच्या माध्यमातून नोकरी साठी प्रतिकूल आहे.
म्हणजे दशा स्वामी रवी आणि त्याचा सब गुरु दोघेही नोकरी साठी विरोधी आहेत. अथर्वची नोकरी जाण्याची शक्यता वाढली आहे .
नोकरीवरुन काढून टाकले जाण्या बाबतीत काही नियम अनुभवास येतात.
दशमाचा (१०) सब मार्गी असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्राच्या असेल आणि तो लग्न (१), पंचम (५) , नवम (९) , व्यय (१२) या पैकी एका भावाचा कार्येश असेल आणि दशास्वामी देखील १, ५ , ९ , ८, १२ या पैकी एकाचा कार्येश असेल तर जातकाला कामा वरुन काढून टाकले जाते.
इथे दशमा (१०) चा सब मंगळ असून तो मार्गी आहे , मार्गी ग्रहाच्या ( रवी) नक्षत्रात आहे, मंगळ पंचमाचा (५) कार्येश आहे , दशास्वामी रवी पंचम (५) आणी अष्ट्माचा (८) कार्येश आहे, नियम लागू पडतोय.
म्हणजे या रवीच्या महादशेत अथर्व ची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
पण रवीची ही महादशा २५ मे २०१८ पर्यंत चालणार आहे म्हणजे प्रश्न विचारल्या वेळे पासुन दिड एक वर्ष चालणार आहे तेव्हा आपल्याला या रवीच्या दशेतल्या अंतर्दशा पण तपासल्या पाहीजेत.
रवीच्या महादशेत सध्या बुधाची अंतर्दशा चालू आहे ती १७ जानेवारी २०१७ पर्यंत चालणार आहे. हा कालावधी साधारण सव्वा दोन महीन्याचा आहे, कालावधी लहान असला तरी अथर्वची काळजी आणि एकंदर तापलेलेल वातावरण पाहता नोकरी जाणार असेलच तर ती या कालवधीत सुद्धा जाऊ शकते तेव्हा आपण हा अंतर्दशा स्वामी बुध काय म्हणतो ते पाहीले पाहीजे.
बुध पंचम (५) स्थानात आहे, बुधाच्या राशी लग्न (१) , धन (२) आणि पंचम (५) स्थानावर आहेत , बुध गुरु च्या नक्षत्रात , गुरु चतुर्थ (४) स्थानात , गुरुच्या राशी सप्तम (७) आणि अष्टम (८) आणि लाभ (११) स्थानी, म्हणजे बुधाचे कार्येशत्व :
बुध : ४ / ५ / ७ , ८ , ११ / १, २ , ५
हा बुध अंतर्दशा स्वामी पंचम ( ५) , अष्टम (८) आणि त्रितीय (३) स्थानां च्या माध्यमातून नोकरी साठी प्रतिकूल आहे. पण त्याच वेळी बुध लाभाचा (११) आणि धन स्थानाचा (२) पण दुय्यम कार्येश आहे.
या अंतर्दशा स्वामी बुधाचा सब शुक्र आहे या शुक्राचे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे ,
शुक्र : १२, ५ / ६ / ५, १, २ / ६
म्हणजे अंतर्दशा स्वामी चा सब शुक्र १२, ५ या स्थानांच्या माध्यमातुन नोकरी साठी प्रतिकूल होत आहे. पण शुक्र धन (२) आणि षष्ठम (६) स्थानांचा दुय्यम दर्जाचा का होईना कार्येश होत आहे.
मग या रवी दशेत – बुध अंतर्दशेत अथर्व ची नोकरी जाणार का?
बुध व त्याचा सब शुक्र दुय्यम दर्जाचे का होईना २ , ११ व ६ भावांचे कार्येश होत आहेत. नोकरी जाण्याची शक्यता कमी वाटते आहे. नोकरी जाण्यासाठी / सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतेक भावां साठी दशा स्वामी रवी व अंतर्दशा स्वामी बुध मिळून असे कार्येश होत आहेत हे मान्य असले तरी दशम (१०) स्थानाचे व्यय स्थान म्हणजे नवम स्थान (९) साखळीत आलेच पाहीजे .
आता, नवम (९) स्थानाचे बलवान कार्येश कोणते?
नवम (९) स्थानात केतु आहे , केतु च्या नक्षत्रात ग्रह नाही, शनी नवमेश आहे, शनीच्या नक्षत्रात ग्रह नाहीत. म्हणजे नवम (९) स्थानासाठी केतु (स्थानातला ग्रह म्हणुन) शनी (भावेश म्हणुन) हेच दोन कार्येश आहेत, त्यात केतु ‘अ’ दर्जाचा बलवान कार्येश आहे .
नवम (९) स्थान: —- / केतुु / — — शनी
जर रवी महादशा – बुध अंतर्दशे मध्ये अथर्वची नोकरी जाणार असेल तर या बुधाच्या दशेत नवम (९) स्थानाच्या कार्येशां पैकी म्हणजेच केतु किंवा शनीची विदशा आली पाहीजे.
बुधाच्या अंतर्दशे मध्ये शनीची विदशा आहे ती २९ डिसेंबर २०१६ ते १७ जानेवारी २०१७ अशी चालणार आहे!
मग या शनी विदशेत अथर्व ची नोकरी जाणार का ?
त्यासाठी आधी शनीचे कार्येशत्व तपासु
शनी षष्ठात (६) आहे , शनीच्या राशी नवम (९) आणि दशम (१०) स्थानांवर , शनी बुधाच्या नक्षत्रात आहे , बुध पंचमात ( ५) आहे आणी बुधाच्या राशी लग्न (१) , धन (२) आणि पंचम (५) स्थानावर आहेत.
शनी: ५ / ६ / १ , २ , ५ / ९, १०
शनीचा सब शुक्र आहे
शुक्र : १२, ५ / ६ / ५, १, २ / ६
आपण केवळ नवम (९) स्थाना साठी शनी विदशेचा विचार करत आहे पण शनी स्वत: ६, १० कार्येश होतो आहे त्यामुळे केवळ नवम (९) स्थानाच्या जोरावर तो अथर्व ची नोकरी घालवेल ? घालवेल देखील !
आता हे कसे ठरवायचे ?
त्यासाठी आपल्याला ट्रांसिट तपासले पाहीजेत .
आपला दशा स्वामी रवी आहे , अंतर्दशा स्वामी बुध आहे आणि विदशा स्वामी शनी निवडला आहे. अपेक्षित कालावधी २९ डिसेंबर २०१६ ते १७ जानेवारी २०१७ असा आहे.
म्हणजे रवी – बुध , बुध – रवी किंवा बुध – शनी किंवा शनी – बुध अशी राशी – नक्षत्र / नक्षत्र – राशी अशी साखळी जुळायला हवी आणि रवीचे भ्रमण त्या साखळीतून , अपेक्षीत कालावधीत झाले पाहीजे.
प्रश्न विचारते वेळी रवी शुक्राच्या तुळेत , गुरुच्या नक्षत्रात आहे, २९ डिसेंबर २०१६ ते १७ जानेवारी २०१७ या अपेक्षित कालावधीत रवी गुरुच्या धनु राशीत भ्रमण करेल, अर्थात गुरु आपल्या साखळीत नाही.
अर्थात रवी धनु राशी ओलांडून शनीच्या मकरेत येईल तेव्हा , १४-१५ जानेवारी ते १७ जानेवारी , अशी साधारण २ दिवस फक्त शनी रास – रवी नक्षत्र अशी साखळी जुळते , रवी महादशा स्वामी आहे आणि शनी विदशा स्वामी आहे पण बुध जो अंतर्दशा स्वामी आहे त्याचा कोठेच संबंध पोहोचत नाही. अंतर्दशा स्वामीला डावलून , केवळ महादशा स्वामी आणि विदशा साखळी जुळवणे मला योग्य वाटले नाही त्यामुळे मी ही शनीची विदशा सोडून द्यायचे ठरवले. म्हणजेच पर्यायाने बुध अंतर्दशा पण सोडावी लागणार (शनी विदशा ही बुध अंतर्दशेतली शेवटची विदशा आहे)
त्यामुळे या शनीच्या विदशेत घटना घडण्याची शक्यता फार कमी आहे. तेव्हा आपल्याला ही बुधाची अंतर्दशा सोडून द्यावी लागेल (नंतर वाटल्यास पुन्हा या शनी विदशेचा विचार करता येईल), मला असे वाटून राहीले की या शनीच्या विदशेत जरी अथर्वची नोकरी गेली नाही तरी नोकरी संदर्भात एखादी अशुभ घटना नक्कीच घडण्याची शक्यता आहे.
आता या केतु अंतर्दशेत तरी घटना घडणार का?
ते आपण पुढच्या भागात पाहू
क्रमश:
शुभं भवतु
- काटा रुते कुणाला .. किस्सा – ३ - March 27, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – २ - March 26, 2018
- काटा रुते कुणाला .. किस्सा – १ - March 25, 2018
- जय खतंजली ! - March 24, 2018
- बळीचा बकरा भाग – ३ - March 23, 2018
- बळीचा बकरा भाग – २ - March 22, 2018
- बळीचा बकरा भाग – १ - March 21, 2018
- असे जातक येती – ११ - March 19, 2018
- वेबसाईट चे नवे रुप ! - March 18, 2018
- 6020 चा योगायोग - March 12, 2018
पुन्हा वाचून मजा आली
धन्यवाद श्री अविनाशजी
सुहास गोखले
निश्क र्ष वाचन्या साठी थांबलोय,बाकी’ए सब हमारे बस की बात नही’.
तरी पण वाचनार!
धन्यवाद श्री अण्णासाहेब
सुहास गोखले
वा वा! मस्त मेजवानी मिळाली.
धन्यवाद श्री प्राणेशजी
सुहास गोखले
Great details as always. In KP does 5 indicate change of career as well? Thanks.
धन्यवाद श्री हिमांशुजी ,
करियर हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे केवळ एका घरा वरुन कोणताही अंदाज बांधता येत नाही . पंचमाचा उल्लेख इथे आला ते षष्ठम (नोकरी, नोकरीच्या ठिकाणीची उपस्थिती) चे व्यय स्थान म्हणून तसेच पंचम हे दशमचे (नोकरी – व्यवसाय- उपजिविकेची मुख्य साधन) याचे अष्टम स्थान असा दुहेरी इफेक्ट विचारात घेतला आहे , इथे करियर नाही तर नोकरी बदल्णे / नोकरी जाणे / उपजजिविकेचे साधन नष्ट होणे असा विचार आहे .
सुहास गोखले