या तात्पर्य कथेत जसे त्या श्रीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा ही कौशल्याने उपयोग करुन घेऊन प्रियदर्शीनी व कंपनी दोघांचाही लाभ करुन दिला तसेच एखादा तज्ञ ज्योतिषी जातकाची पत्रिका अभ्यासून जातकाला असेच उत्तम मार्गदर्शन करु शकतो जे ‘विवाह कधी / नोकरी कधी ‘ सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा जास्त बहुमोल व उपयोगी ठरेल.!

या लेख मालिकेतले पहीले भाग इथे वाचा…

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ५

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ४

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ३

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – २

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १

ज्यो

तिष हे दिशादर्शकशास्त्र आहे. मी दिशादर्शक शास्त्र हा शब्द अत्यंत काळजीपुर्वक वापरला आहे .एखादी घटना केव्हा घडेल हे सांगणे ज्योतिषशास्त्राद्वारे सांगणे जरी शक्य असले तरी ज्योतिषशास्त्र हे केवळ घटना कधी हे सांगण्यासाठी वापरणे काहीसे चुकीचे आहे . असे करणे म्हणजे रस्त्यातले गटार तुंबले म्हणून पंतप्रधान मोदींकडे तक्रार करण्या सारखे आहे.

के.पी. वर माझा मोठा आक्षेप हाच आहे की फक्त इव्हेंट प्रिडिक्शन वर तिथे अतिरेकी भर दिला जातो. किंवा त्यातच मोठी मर्दुमूकी  मानली जाते हे मोठे दुर्दैव . आध्यात्म, मानसशास्त्र , प्रयत्नवाद अशांचा सुरेख मेळ असलेल्या आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्राला ह्या के.पी. ने शेकडो वर्षे मागे लोटले आहे.  के.पी. द्वारे , ‘नळाला पाणी कधी येईल “, “खंडीत झालेला विद्युतपुरवठा कधी सुरु होईल” या सारख्या प्रश्नांची उत्तरे अद्भूत म्हणता येईल अशा अचुकतेने मिळवता येतात , हा अनुभव मी स्वत: अनेकवेळा घेतला आहे. पण अशा प्रेडीकशन्स चा आपल्या आयुष्याच्या लाँग-टर्म प्लॅनींग साठी काय उपयोग ? हे म्हणजे चण्याफुटाण्याला चौरस आहार म्हणाल्या सारखे होईल !

ज्योतिषशास्त्राचा खरा उपयोग कसा करुन घ्यायचा हे भारतातल्या लोकांना कळलेच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. लग्न कधी होईल हा प्रश्न विचारला जातो पण विवाह सुखासमाधानाचा होईल का हा खरा प्रश्न कोणीही विचारत नाही.

ज्योतिषशास्त्र आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे वापरता येते.

 

ज्योतिषशास्त्र आपल्याला आपले सामर्थ्य ,उणीवां कोणत्या आहेत, आपल्यापुढे प्रगतिच्या कोणत्या संधी आहेत आणि भविष्यात आपल्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याचे मार्गदर्शन करते. त्यायोगे आपण आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देऊन वेळ, पैसा व ताकत यांचा सुयोग्य वापर करु शकतो. अपेक्षां किती, केव्हा व कुठे ठेवायच्या याचा अंदाज आल्याने वारंवार होणारे अपेक्षाभंग कमी होतात आणि जे होतात त्यांचे आघात काहीसे सौम्य होतात.

 

जसा त्या श्रीकांत सरांनी पिर्यदर्शनी मधल्या दोषाचाही अत्यंत कौशल्याने उपयोग करुन घेतला तसेच ज्योतीषशास्त्रा चा सुयोग्य वापर करुन नकारात्मक गोष्टींचाही सकारात्मक उपयोग करुन घेता येतो.

माझ्या माहीतीतील एका महिलेला प्रकृतीतल्या दोषांमुळे विवाह करता येणार नाही असे ऐन पंचविशीतच कळून चुकले होते, केव्हढा मोठा आघात त्यांच्या वर झाला असेल, पण त्यामुळे खचुन न जाता त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य शास्त्रीय संशोधन व समाजसेवेत व्यतीत केले, लग्न नाही,संसार नाही, जबाबदार्‍या नाहीत ना कोणतेही पाश या गोष्टी हाती घेतलेल्या कार्याला पोषकच ठरल्या , त्याचा त्यांनी चांगला उपयोग करुन घेतला आणि त्या यशस्वी ठरल्या, नावलौकीक मिळवून एक कृतार्थ जीवन जगल्या.

आता माझ्या कडून अशा पद्धतीचे मार्गदर्शन घेतेलेल्या काही जातकांचे अनुभव:

जातक कॉम्प्युटर इंजिनियर होता आणि एका मोठ्या आय.टी. कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता पण स्वारी काही खूष नव्हती. घरात त्याच्या लग्नाचे विचार चालू झाले होते पण हा पठ्ठ्या तो विषय काढला तोंड फिरवायचा ! पुढे पुढे त्याच्या स्वभावातला चिडचिडेपणा इतका वाढला कि एखाद्या मानसोपचारतज्ञाला दाखवायचे का असा विचार सुरु झाला.

जातकाशी बोलताना त्याची अवस्था ‘आहे मनोहर तरी गमते उदास.. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत, आणि त्यामुळे येणारे औदासीन्य अशी काही अवस्था होती, सोन्याच्या ताटातला मोताचा चारा या राजहंसाला गिळवत नव्हता..

या जातकाची पत्रिका सविस्तर अभ्यासल्या नंतर असे लक्षात आले कि सायबांची गल्ली चुकलीय .. त्याची पत्रिका ‘कायदा’ या क्षेत्रताले करियर आणि त्यात उत्तम यश दाखवत होती. आता प्रश्न पडला हा बाबा पडला आय.टी. इंजिनियर आता याला कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करायला सांगायचे का ? पण तरीही मी जातकाला ही बाब सांगीतली.. मी हे सांगत असताना जातकाचे डोळे लकाकले … अक्षरश: माझे पाय धरत म्हणाला ..

“काका, काय सांगता.. अहो मी ज्या कंपनीत काम करतो त्या मध्ये एक विभाग असा आहे जो सायबर लॉ, सायबर क्राइम्स, पेंटंट कॉपी राईट्स संबंधीत काम करतो आणि त्या विभागात काम करण्यासाठी त्याला एक दोनदा विचारणा झाली पण कामाचे स्वरुप रुक्ष असल्याने तिथे जायला मी तयार नव्हतो , मीच काय कोणीच त्या डिपार्टमेंतला जायला तयार नसते.. जर माझ्या पत्रिकेत नुसार कायदा हे क्षेत्र अनुकूल असणार तर मी त्या ऑफर चा नक्कीच विचार करेन , निदान तसा एक प्रयत्न तरी करेन..”

जातकाने बेंगलोर ला गेल्या गेल्या आपल्या बॉस शी बोलून त्या विभागात ट्रांस्फर करुन घेतली.. पुढे घडला तो इतिहास …

त्याच्या नैसर्गिक कला नुसार काम मिळाले, त्यात त्याने उत्तम प्रगती दाखवली… कंपनीने त्याला लंडनला कायदे विषयक खास अभ्यास क्रम करण्या साठी पाठवले . तो अभ्यासक्रम त्याने नुसता पूर्ण नाही केला तर तो त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. जातक सध्या लंडन मध्येच आहे आणि महत्वाचे अधिकाराचे पद सांभाळत आहे. आता त्याची गाडी सुसाट निघालीय आणि हो… लौकरच स्वारी विवाहबद्ध ही होत आहे…

माझ्याकडे आलेल्या आणखी एका जातकाची कथा…

जातक मुंबईला आपला वडिलोपार्जित व्यवसाय करत होता.. व्यवसाय व्यवस्थित चालू असला तरी म्हणावी तशी वाढ होत नव्हती, भरभराट नव्हती…

त्या जातकाची पत्रिका बघताच माझ्या लक्षात आले की या व्यक्तीला ‘स्पेक्युलेटीव्ह ‘पद्धतीच्या गुंतवणूकीत उत्तम लाभ होऊ शकेल. आता ‘स्पेक्युलेटीव्ह ‘पद्धतीच्या गुंतवणूकी कोणत्या ? अगदी मटका, लॉटरी , घोड्यांच्या शर्यती, बेटींग सारखे जुगार तसेच शेअर्स, म्युच्यूअल फंड , डे ट्रेडिंग, फ्युचर् ऑपशन्स , व्हेंचर कॅपीटल फंडिंग असे अनेक मार्ग येतात.

मजा बघा , ग्रह या जातकाला अशाच प्रकारची फळे देत होते पण जातकाला त्याचा अंदाज आला नव्हता.. या जातकाला लकी ड्रॉमध्ये हमखास आणि पहिले / दुसरे बक्षिस लागायचे… टी.व्ही. खरेदी केला.. कार्ड स्क्रॅच केले आणि फ्रिज गिफ़्ट मिळाला.. दिवाळीच्या खरेदीच्या वेळेच्या लकी ड्रॉ वर चक्क मारुती मोटार मिळाली होती.. इतके असताना जातकाने ‘स्पेक्युलेटीव्ह’ पद्धतीची कोणतीही गुंतवणूक केली नव्हती .. साधे लॉटरीचे तिकीट कधी काढले नव्हते.

मी जातकाला त्याचे ग्रहमान समजाऊन सांगीतले .. जुगार किंवा तत्सम अनैतीक बाबीं पासून लांब राहायचे पण शेअर्स, म्युच्यूअल फंड असे जे वैध गुंतवणुकीचे प्रकार त्यात हळूहळू गुंतवणूक करावयास सांगीतले .. अर्थात त्यातले धोके पण लक्षात आणून दिले.. तसेच योग्य त्या गुंतवकणूक सल्लागाराची मदत घे असेही बजावले..

जातकाने अगदी तसेच केले .. आज गेले दोन वर्षे जातक तसेच शेअर्स,म्युच्यूअल फंड या मार्गाने धो-धो कमावत आहे .. इतका की वडिलोपार्जित व्यवसाया कडे वेळ द्यायला त्याला आता फुरसत नाही..

मी आधी लिहले आहे , ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते, प्रयत्नांना पर्याय नाही, मात्र या प्रयत्नांना योग्य दिशा देण्या साठी ज्योतिषशास्त्राचा वापर चांगल्या तर्‍हेने करता येतो.

केवळ ‘घटना कधी ?” याची के.पी. पद्धतीची उत्तरे आणि पारंपरिक चे तोडगे हुडकत बसण्यापेक्षा , ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपली बलस्थानें कोणती आहेत याचा अंदाज घेण्यासाठी वापरा , आपलातल्या  नैसर्गिक कमकुवतपणा वा कमतरता ओळखायला या शास्त्राचा वापर करा. एकदा का आपली बलस्थानें व कमकुवतपणा कोणती यांचा अंदाज आला की आपण काय करु शकतो आणि काय करू शकत नाही याचा खुलासा होतो, योग्य दिशेनेच प्रयत्न करुन, उपलब्ध वेळ, पैसा, मानसिक, शारिरीक साधनसामग्रीचा अचूक व सुनियोजित वापर करता येतो. आगामी काळातल्या चांगल्या संधीची पूर्वकल्पना असल्याने अशा संधी हातातून निसटून जाणार नाहीत शिवाय योग्य ती तयारी करुन अशा संधींचा जास्तीतजास्त लाभ मिळवता येतो.

भविष्यातल्या आव्हानांचा वा अवघड परिस्थितींचा आधीच अंदाज आल्याने, आवश्यक मानसिक, शारिरीक आणि आर्थिक तयारी करुन त्यांचा यशस्वी सामना करता येतो व होऊ शकणारे नुकसान कमी करता येते.

स्वत:च्या कुवतीचा यथार्थ अंदाज आल्याने विनाकारण अवास्तव अपेक्षां चे ओझे पाठीवर बागळून मृगजळा मागे धावताना होणारी फरपट टाळता येते , वारंवार होणारे अपेक्षाभंग कमी होतात. जे नाही त्याच्या साठी कुढत न बसता जे समोर आहे त्याचा जास्तीत जास्त योग्य उपयोग करुन घेउुन , आयुष्य आनंदात , सुखा समाधानात व्यतित करता येते.

ज्योतिषशास्त्रा द्वारे संभाव्य संधी व समस्यां बद्दल मार्गदर्शन मिळते पण ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी कोणत्याही नव्या संधी निर्माण करु शकत नाही किंवा तुमच्या समस्या एखाद्या जादू सारख्या दूर करु शकत नाही. ज्योतिषशास्त्र स्वत: मधले कच्चे दुवे ओळखुन ते सुधारण्यासाठी वापरा, आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी किंवा त्यांची जबाबदारी नाकारण्यासाठीची एक पळवाट म्हणुन वापरु नका.

कोणी कितीही प्रचार केला तरी एक पक्के लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषी कोणत्याही मंत्राने , जपाने, खड्याने, यंत्राने , पूजेने किंवा तत्सम तोडग्याने तुमच्या पुढ्यातल्या समस्या दूर करु शकत नाही. तेव्हा ज्योतिषाकडे उपाय / तोडगे मागू नका आणि तोडगे करतही बसू नका !!

लेखमाला समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. अमोल डंके

  सुहास जी ,
  अगदी बरोबर सांगितले पण ९०% टक्के लोकांना समजून उमगत नाही .झट कि पट सर्व काही हवे असते .नेमके ठिकाण माहित नसते तरीही सर्वांच्या पुढे जायचं असते .त्यातून असे काही कर्म घडते कि पुढील जन्मात त्याचा त्रास होतो .मग असे का होते आणि आपण कसे वागले पाहिजे ह्या चा सारासार विचार होताना दिसत नाही .आज पर्यंत माझा जन्म कशा साठी झाला आहे असे कोणीही विचारले नाही .दुसर्यांना आयुष्यत मदत करणारी , त्यांचे कसे चांगले होईल ह्या बद्दल मार्गदर्शन करणारी मंडळी खूपच कमी आहेत .स्वताची तुंबडी भरणारी आणि शरीराची काडी असली तरी छाती पुढे काढणारे बगळे खूप बघितले .तरीही आपण योग्य मार्दर्शन करत आहात .आणि येणाऱ्या पुढील काळात मूळपुरुष श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर अखंड राहो हे च मागणे . शुभम भवतु .

  0

  1. सुहास गोखले

   श्री. अमोलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपले विचार स्वागतार्ह्य आहेत. पत्रिकेचा सुक्ष्म अभ्यास केला तर आपला कार्मिक बॅलन्स किती आहे म्हणजे किती देणे फेडायचे आहे हे पण कळू शकते तसेच कोणत्या प्रकाराची सत्कर्म करावयाची आहेत या बद्द्ल ही अंदाज करता येऊ शकतो.

   सुहास गोखले

   0

  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ज्योतिष शास्त्र कसे वापरायचे हे भारतातल्या लोकांना समजलेच नाही किंवा पोटभर्‍या ज्योतिषांनी हे शास्त्र जसे वापरायचे तसे वापरलेच नाही असे खेदाने म्हणावे लागते.
   तुलनेत पाश्चात्य देशांत हे शास्त्र लाईप मॅनजमेंट टूला म्हणून फार प्रभावी पणे वापरले जाते .. इव्हेंट प्रेडीक्शन त्याला ते फॉरच्युन टेलींग म्हणतात ते तिथे गुन्हा मानला जाते !

   सुहास गोखले

   0

 2. स्वप्नील

  छान लेख सुहास जी . खरच जोतिष शास्त्राचा विधायक वापर कसा करावा हे आपण छान समजावून सांगितले आहे . एक सहज विचारतो माझ्या मित्राला एका अभ्यासू व प्रामाणिक जोतीशाने मार्गदर्शन करताना इस्टेट एजंट, हॉटेल व्यवसाय , Travlling व्यवसाय इ . सुचवले आहेत .सध्या तो नोकरी करतो . यातून म्हणजे या व्यायासायातून अफाट पैसा मिळेल असे सांगितले आहे . पण त्याला यात काहीही रस /गंध पण नाही आणि हॉटेल किवा Travlling Business ला भांडवल पण नाही .अशा परिस्थिती त्याने काय केले पाहिजे ?

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *