गेल्या दिवाळीच्या टायमाला घरात चर्चा, ब्येत काय करायचा ? इंटरनेट आवाक्यात आले आणि माहीतीचे पेव फुटले , फेसबुक / व्हॉटस अप ने त्या आगीत त्येल ओतले. त्याचाच परिणाम म्हणून एक मेंनू ठरला …

मेल्यानू माका डायबेटीस आसा ह्या काय तेका माहीती नाय .. माका जलिवन्यासाटी …

माझा तोंडाचा पट्टा दणाणा सुरु झाला , काय करणार हो ,  वरच्या चित्रातली थाळी तर बघा !!

 

(फटू इस्कॉन च्या सौजन्याने , जय ईस्कॉन )

अस्ली थाली सग्ळी जौ द्या चतकोर तरी कोणी खाईल का  रे बेन्या ? कै च्या कैच !

 

आणि माझ्या सारक्या डायबेटिस वाल्यानं समजा खायचं डेरिंग केल्यान तर ‘सुगर ‘ किती वाढेल  , बाभौ !!

 

मग तेनी डोक्यालिटी वापरुंशान  दुस्रा म्येणू शिलेक्ट क्येला .. परत त्येच,  कुटे कुटे साऊथ इंडियात जात्यात , काय नाय ते बघत्यात आन हिथे तस्सेच करायचं म्हनत्यात ,

ह्यो बगा  ना ..  मध्व थाळी  चा ब्येत !

 


मोजून 34 आयट्म हैत म्हणं..

1. मीठ
2. लोणचे
3. पूड चटनी
4. कोशींबीर – 1 हिरव्या डाळीची
5. कोशींबीर – 2 चण्याच्या डाळीची
6. कायी चटणी (खोबर्यायची चटणी)
7. पाल्या -1 (सुकी भाजी -1 )
8. पाल्या -2 (सुकी भाजी -2 )
9. चित्रान्ना ( लिंबू भात) किंवा कायी सासीव अन्ना (खोबरे – मोहोरी भात)
10. हप्पला (पापड)
11. सांडिगे (सांडगे)
12. कडबू (मोदका सारखा एक प्रकार)
13. अन्ना (साधा भात)
14. थोव्वे (डाळ आमटी)
15. सिहिगोज्जू ( रायता)
16. सारु (रसम)
17. उद्दीन हेत्तू ( उडिद डाळीची भरड)
18. बदाने पोडी ( वांग्याची भजी)
19. मेनास्काई (गोड – आंबट पेस्ट)
20. गोळी भज्जे (मैद्याच्या गाठी)
21. अविअल ( मिक्स्ड व्हेज)
22. गट्टी भज्जे (भेंडिची भजी)
23. गुल्ला कोड्डेल ( वांगी घातलेले सांबर / डाळ आमटी)
24. गोड पक्वान्न – 1 (कॅच ऑफ द डे !)
25. गोज्जाम्बाडदे ( गोळ्याची आमटी)
26. गोड पक्वान्न – 2
27. गोड पक्वान्न – 2
28. गोड पक्वान्न – 4
29. गोड पक्वान्न – 5
30. वांगी भात
31. भर्ता (आल्याची पेस्ट वापरुन केलेले)
32. परडि पायस (अजून एक गोड खीरी सारखा पदार्थ)
33. मोसारु (दही)
34. मज्जीगे (ताक )
(फटू  इंटरनेट वरुन ढापल्याला हाये , जय गुगलबाबा ! )

पण येवढे आयट्म करायचे म्हंजे लय टायम लागलं म्हणुनशान यक शिंपल  म्येणू ठरला त्यो असा..

1. मस्त काजू बीजू घातल्याली , बदाम प्येरल्याली घट्ट बासुंदी
2. पुर्‍या
3. साखर भात (असली केशर आणि वरती मलई मारुन)
4. रस मलाई
5. मीनी (डिस्को) बटाटे वडे
6. हैद्राबादी वेज बिर्याणी
7. खमण ढोकळा (त्ये मोदी का कोन हाय त्यो आल्यापास्न ह्यो आयट्म सारखा  व्हायला लागलाय घरात!)
8. व्हेज कढाई

……..

(अजून दोन चार आयटेम हाईत म्हनं)
……..

 

आणि मला खास डायबेटीस स्पेस्यल म्येणू  ह्यो असा  ..

  1.     भरपूर कोंडा घातलेला , बिनतेलाचा , चामड्या सारखा चिवट , पिटूकला फुल्का – 2 नग
  2.     मलई विरहीत ताक एक वाटी  200 मीली
  3.     वातड कोबीचा पाला, दोन ट्माटू , एक काकडी ‘सलाड’ म्हणून .. एक बाऊल
  4.     हातसडीच्या तांदळाचा फड्फडित भात  पाव वाटी , 75 ग्रॅम
  5.     दोन मोठे चमचे घट्ट वरण (वर आता तूप मिळणार नाही म्हणून बोल्ली)  50 ग्रॅम
  6.     मिळेल तो , सापडेल तो पालापाचोळा उकडून केलेला भाजी सदृष्य पदार्य एक वाटी  100 ग्रॅम
  7.     दही  मलई विरहीत अर्धी वाटी 50 ग्रॅम
  8.     मीठ (पायजे तेव्हढे)
  9.     लिंबू (पायजे तेव्हढे)
  10.     पाणी (पायजे तेव्हढे)

काय सांगायचं !


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *