महाबळेश्वर परिसरात मित्रां समवेत ट्रेकिंग ला गेलेला रमेश रात्री दोन वाजता घरी परतला तो डावा कान गच्च दाबुन धरत ! रमेशच्या बायकोने घाबरत विचारले.. “काय को, काय झाले कानाला, काही लागले का?” “नाही, काही लागले नाही पण..” “कान फुटला का?” “नाही...” “मग असे झालेय तरी काय, कान एव्हढा का दाबून धरलाय ते?” “काय सांगू तुला, महाबळेश्वरात मध विकत घेण्यासाठी आम्ही एका मधुमख्खी पालन केंद्रात गेलो होतो, कशी काय कोण जाणे तिथली एक मधमाशी माझ्या कानात शिरली, पार अगदी आत पर्यंत गेलीय. आता ती बाहेर येत नाहीये, आत अडकून बसलीय, सतत कानात गुँ ss गुँ असा आवाज येतोय, साला , डोके उठलेय ह्या आवाजाने ..” रमेशची बायको हसायला लागली... “अहो, असे कधी होते का? कानात बाहेरुन काही आत जाऊ शकत नाही, कानात आत एक पडदा असतो, तो अडवतो सगळ्याला, तुम्हाला कसला…

या तात्पर्य कथेत जसे त्या श्रीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा ही कौशल्याने उपयोग करुन घेऊन प्रियदर्शीनी व कंपनी दोघांचाही लाभ करुन दिला तसेच एखादा तज्ञ ज्योतिषी जातकाची पत्रिका अभ्यासून जातकाला असेच उत्तम मार्गदर्शन करु शकतो जे ‘विवाह कधी / नोकरी कधी ‘ सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा जास्त बहुमोल व उपयोगी ठरेल.! या लेख मालिकेतले पहीले भाग इथे वाचा... निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ५ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ४ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ३ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - २ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - १ ज्यो तिष हे दिशादर्शकशास्त्र आहे. मी दिशादर्शक शास्त्र हा शब्द अत्यंत काळजीपुर्वक वापरला आहे .एखादी घटना केव्हा घडेल हे सांगणे ज्योतिषशास्त्राद्वारे सांगणे जरी शक्य असले तरी ज्योतिषशास्त्र हे केवळ घटना कधी हे सांगण्यासाठी वापरणे काहीसे चुकीचे आहे…

  सकाळी बरोबर साडेदहाला मनप्रित श्रीकांत सरांच्या केबिन मध्ये होती, पद्मराजन आला नाही पण त्याने श्रीकांत सरांना त्याबद्दल आधीच कल्पना दिली होती. अर्थात पद्मराजनची उपस्थिती आवश्यक नव्हतीच. “येस मनप्रित , आज आपण प्रियदर्शनी बद्दल चा डिसीजन घ्यायचा आहे. ..” या लेख मालिकेतले आधीचे भाग इथे वाचा... निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ४ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ३ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - २ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - १ “येस सर.. आपण काय निर्णय घेतला आहे ते जाणून घ्यायची मला कमालीची उत्सुकता आहे “ “आपल्याला चांगली माणसे मिळवून थांबायचे नाही तर त्यांचा चांगला वापर करुन घ्यायचा आहे आणि अशी माणसे 'लॉन्ग टर्म' आपल्या बरोबर राहतील असेही बघायचे आहे.. प्रियदर्शनी सारखी टॅलंटेड कॅन्डीडेट आपण गमवायची नाही. “ “सर..” “असामान्य लोकां कडून असामान्य कामें करवून घ्यायला फारसे…

  श्रीकांत सर आता काय सांगणार याची पद्मराजन आणि मनप्रित यांना कमालीची उत्सुकता लागून राहीली होती. काही क्षण शांततेत गेले... या लेख मालिकेतले पहीले भाग इथे वाचा... निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - ३ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - २ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - १ “पद्मराजन आणि मनप्रित ,   एखाद्या व्यक्तीला कामा वरुन काढून टाकणे हा काहीसा अप्रिय निर्णय आहे . एक व्यक्ती आपल्या पे-रोल वर आहे असे दिसत असले तरी त्याचे कुटुंब किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले पण अप्रत्यक्षात आपल्या पे-रोल वर असतात हे विसरता कामा नये. जेव्हा एखाद्याला आपण कामावरुन काढून टाकतो तेव्हा त्याच्या बरोबर त्याच्या कुटुंबाला ही आपण उघड्यावर पाडत असतो. तेव्हा एखाद्याला कामा वरुन काढून टाकणे हा आपला अगदी शेवटचा पर्याय असला पाहीजे, ते पाऊल उचलण्या पूर्वी आपण उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार हा…

  ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी मनप्रित आणि पद्मराजन श्रीकांत सरां समोर हजर झाले. सुरवातीच्या ख्याली-खुषालीच्या एक्स्चेंजेस झाल्या नंतर , श्रीकांतसरांनी एकदम मुद्दयाला हात घातला. या लेख मालीकेतले आधीचे भाग इथे वाचा... निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - २ निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - १ “बॅक टू बिझनेस मनप्रित, आपण सेजल च्या समस्ये बद्दल बोलू ... काय आहे सेजल ची समस्या ?” मनप्रितने आपल्या हातातल्या नोट्स वर एक नजर टाकली.. “सर , या वर्षी आपण बेंगलोर युनिट साठी ४४१ ट्रेनीज रिक्रूट केले होते, त्यातले ३५७ प्रत्यक्षात जॉईन झाले. या सगळ्या ट्रेनीजना जुलै ते ऑगष्ट ह्या काळात बेसीक इंडक्शन ट्रेनिंग दिले गेले आणि नंतर आपल्या कडे चालू असलेल्या आणि पाईप लाइन मध्ये असलेल्या सर्व प्रोजेक्टस च्या मॅनपॉवर रिक्वायर्मेंट नुसार आपण या ट्रेनीज ना ग्रुप्स अॅलॉट केले. ग्रुप अ‍ॅलॉट करताना  ट्रेनीचे इनीशीअल…

  सेजल तिची तक्रार सांगत होती तेव्हा श्रीकांतजींना पण हसायला आले होते पण त्यांनी मोठ्या कष्टाने ते आवरुन धरले होते ईतकेच ! या लेखमाले तला पहीला भाग इथे वाचा: निंदकाचे घर असावे शेजारी... भाग - १ पण सेजल जाताच ते सावध झाले , सेजल आणि त्या ग्रुप मधली ही कुरबुर / असंतोष त्याचे कारण कितीही क्षुल्लक / हास्यास्पद वाटत असले तरी ते तातडीने हाताळायला हवे हे त्यांनी ओळखले. YYY पॉवर मॅनेजमेट प्रोजेक्ट ची माईल स्टोन डिलिव्हरी अगदी तोंडावर आली होती, YYY शी आणखी काही नव्या प्रोजेक्ट्स वर चर्चा चालू होती. असे असताना त्या प्रोजेक्ट वर काम करणार्‍या ग्रुप मध्ये कोणताही असंतोष किंवा अस्वस्थतता त्यांना नको होती. त्यांनी  पद्मराजनला भेटायला बोलावले पण त्याला 'सेजल' च्या तक्रारी बद्दल काही सांगीतले नाही फक्त YYY च्या माईल स्टोन डिलिव्हरी विषयी काही चर्चा करायची आहे…